Nov 30, 2021
प्रेरणादायक

क्षणभंगुर क्षण... डॉ. अनिल कुलकर्णी

Read Later
क्षणभंगुर क्षण... डॉ. अनिल कुलकर्णी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

क्षणांचा खेळ.... डॉ. अनिल कुलकर्णी

आयुष्य म्हणजे दुसरं आहे काय? क्षणांचा खेळच आहे. प्रत्येक क्षण वेगळा. प्रत्येक क्षण वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला क्षणांना अस्तित्व असतं, क्षणांना भविष्य नसतं. पुढच्या क्षणी काय होणार कुणालाच माहीत नसतं आयुष्य म्हणजे दोन क्षणातल अंतर. पावसाच्या पडणाऱ्या थेंबाला मोती झाल्यावर अस्तित्व असतं.मातीत मिसळल्यावर अस्तित्व नसतं. एक क्षण ठरवतो मोती कि माती.
क्षण जाणिले कुणी. सगळं क्षणिक असलं तरीही माणसे क्षणोक्षणी स्वतःचाच विचार करतात. मी, माझ आयुष्य, माझा संसार या पलीकडे त्यांचा परीघ विस्तारत नाही. क्षणांच्या विचाराचा केंद्रबिंदू मी असतो. मी, आम्हीं,आपण याची त्रिजा माणसं वाढवत नाहीत, त्यामुळे संकुचित वर्तुळात माणसं आयुष्य जगतात. भरभरून जगलेल्या क्षणावरंच माणसं आयुष्य जगतात. आयुष्य क्षणभंगुर चित्रपट असला तरीही तो प्रत्येकाला पाहायचा असतो,जगायचा असतो.
शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षण. सुखद कसा होईल हा प्रयत्न प्रत्येक जण करतो, पण आहे त्या क्षणांना मृत्युच्य दाढेत  ढकलणारेही आहेत, त्यालाही क्षणच कारणीभूत आहेत.
क्षण आयुष्य सजवतात, तसंच आयुष्यामध्ये रडवतातही.हसऱ्या क्षणांची बेरीज व दुःखद क्षणांची वजाबाकी करता यायला हवी.सुखद क्षणांचा गुणाकार करायला हवां.क्षणांचे कोडे सोडविता आले पाहिजे. क्षणावर कविता करता आली पाहिजे. दुःखी क्षणांचा भागाकार करता यायला हवा.
क्षणांचे काळ, काम, वेग गणित जमले पाहिजे.
अवघड क्षणांच अवघड गणित चुटकी सरशी सोडविता आले पाहिजे. क्षणापूर्वी असणारी माणसे क्षणात नसतात. सुखद क्षणांच्या मैफिली रंगवता आल्या पाहिजेत.  क्षणांना रंगात न्हावू घालता आलं पाहिजे. क्षणां रंगपंचमी खेळुन, सणांचा उत्सव साजरा करता आला पाहिजे. ज्याने क्षणांना जिंकले त्याने आयुष्याला जिंकले. क्षणांच्या आहारी जाऊ नका .दुःखद क्षणांना दूर ठेवा, त्यांच्याशी सोशल डिस्टंसिंग ठेवा. दुःखद क्षणावर मुखवटे चढवता आलं पाहिजे. दुःखद क्षणापासून स्वतःला विलगीकरणात ठेवता आलं पाहिजे.
यशोशिखरावर पोहोचलेली माणसे ही स्वतःला  कधी कधी नैराश्याने विनाशाच्या गर्तेत झोकून देतात, कारण की शिखरावर पोहोचेपर्यंत त्यांनी क्षणभर विश्रांती घेतलेलीच नसते. आयुष्यातल्या क्षणभर समाधानाच्या थांब्यावर थांबायला हवं आणि पुढे प्रवाससुरू करायला हवा.
ऑक्टोपस प्रमाणे हव्या त्या क्षणांना बाहुपाशात घ्यायला हवं व दुःखद क्षणापासून स्वतःला सोडवून घ्यायला हवं. प्रत्येक क्षण माणसाला घडवितो. व्यक्तीच्या आयुष्यातील क्षणांची मालिका कशी असते ,त्यावरून व्यक्तिमत्त्व ठरतात. ज्यांचं बालपण समृद्ध क्षणांनी भरलेलं असतं, त्यांचा प्रवास यशाकडे असतो.
ज्यांचं बालपण संघर्षाच्या क्षणांनी ओतप्रोत भरलेलं होतं, तेही यशाच्या मार्गावर वाटचाल करतात.
क्षणांना नुसतं कुरवाळून आयुष्य घडत नाही. क्षणांची आव्हानें ज्यांनी पेलली ते यशस्वी ठरले. क्षण ठरवतात तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमचा निर्णय घेण्याची क्षमता. योग्य क्षणी योग्य निर्णय घेता आला पाहिजे.
क्षण ठरवतात रंग आयुष्याचे
क्षण पालटतात रंग आयुष्याचे
क्षण रंगवतात रांगोळी आयुष्याची
क्षण बिघडतात रांगोळी आयुष्याची.
आयुष्य म्हणजे क्षणाांची पाने असलेले पुस्तक.
काही पाने आनंद देणारी, काही पाहणे रडवणारी काही पाणी रटाळ. आयुष्याचं पुस्तक शेवटपर्यंत वाचायला हवं. क्षणाला जिंकाल तरच  आयुष्य जिंकाल. फसव्या क्षणांनाही जिंकता आलं पाहिजे.
फसवें क्षण टाळले की संयम यशाकडे नेतो. क्षणिक सुखाने आयुष्याची राखरांगोळी होते.
क्षण येतात क्षण जातात. मनावर ठसणारे क्षणच
आयुष्यावर ठसा उमटवितात. क्षणभराचे दवबिंदूू, क्षणभराचा इंद्रधनुष्य हीच आपली जगण्याची प्रेरणा असतें. पाऊस निनादत असतो तेव्हा ती येते तो क्षणंच प्रेमाचा असतो.
क्षणांना जपलं की आयुष्य आपलंच असतं.
आगें भी जाने ना तूू
पिछे भी जाने ना तू
जो भी है बस एक पल है.
डॉ.अनिल कुलकर्णी.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr.Anil Kulkarni. Pune

Retd.

Ex -Director Education Dept.