गळचेपी

Galchepi


गळचेपी

सकाळी सकाळी ममताच्या फोन वर तिचा कॉल आला,तो कॉल बघताच ममताने तो मुद्दाम उचलला नाही.. मुद्दाम...कारण तो कॉल उचलणे तिला फार महत्वाचे वाटले नाही...तिला वाटले तेच कारण सांगणार ती समोरची....."बाई आई मी येऊ शकत नाही, माझ्या घरात पाणी भरले आहे...माझे समान सगळे भिजले आहे...माझी मुले घरी आजारी आहेत..त्यांना सांभाळायला घरी माझ्याशिवाय कोणी नाही...मला जरा आजच्या दिवस सांभाळून घ्या...मी उद्या नक्की येईल..."

हा फोन तिच्या कामवलीचा होता, ती ज्या झोपडपट्टीत रहात होती त्या झोपडपट्टी मध्ये पावसाचे पाणी भरत असे..आणि पाणी भरले की तिचे घरातील समान ओले होत..स्वयंपाक ही करता येत नसत...त्या दिवशी तर घरात राहण्यासारखी परिस्थिती ही नसत...मग तिला मुलांना सांभाळावे की घराला आवरावे ही पंचाईत होत...मग काही दिवस ती कामावर ही जाऊ शकत नसत...तिला फक्त आपले मुलं आणि विस्कटलेले घर इतकेच दिसत आणि समजत असे...ज्या घरी कामाला जात त्या घरी तिने आज फोन करण्याची हिंमत केली होती...काही बायका समजदार होत्या तर त्यांनी तिची दरवर्षीची परिस्थिती माहीत असल्याने,/ येऊ नकोस तू, पण तुला काही मदत लागली तर सांगशील आम्हाला, आम्ही मदत करू तुला,काळजी घे तुझ्या मुलांची, आणि घर सोडून जायचे असेलच तर आमच्या buliding मध्ये तुला जागा ही करून देऊ / असे सांगून तिला हिम्मत दिली...

तर इकडे ममताला फोन करायला तिने ममताच्या नंबर वर कॉल केला,तो ही जरा घाबरतच केला होता,कारण बाकी सगळ्या बायका तिला सांभाळून घेत..तिची अडचण समजून घेत होत्या तर नेहमी प्रमाणे ममता ने मात्र तिला बोलायचा सटाका सुरू करायला नको ह्या विचारात ती घाबरत फोन लावत होती...तिला माहीत होते की,ह्या मॅडम किती काही होऊदे त्या तिला कधीच समजून घेत नसत...त्यांना किती ही तिची परिस्थिती माहीत असो त्या ठरल्या प्रमाणे म्हणणार," तुझी परिस्थिती काही असो,पण आज सुट्टी घेऊ नकोस,माझ्या घरी येऊन काम करून जा, बाकी मला काही माहीत नाही, मी तुला इतरांपेक्षा 1000 रुपये नेहमीच जास्त देत असते...माझ्या घरी तुला जेवण देत असते... तुझ्या मुलांना माझ्या मुलांचे कपडे देत असते... आणि तुला कामावर ठेवण्याआधी मी बोली केली होती...मी हजार रुपये जास्त देईल पण मला कामात हलगर्जीपणा नको आणि दांड्या ही नकोय....मग इतके बोलून त्या त्यांनी तिचा वर केलेले असंख्य उपकार बोलून दाखवतात...ते काय कमी की जर कामावर गेले नाही की पगारातील पैसे ही कापून घेतात... ते काय कमी की ममता मॅडम नेहमीपेक्षा जास्त काम करायला लावतात.....म्हणून काही जास्त रकमे पायी कमल ताई त्यांच्या घरी काम करत...आणि ममता मॅडम यांची तर तिला कुठे काम मिळत नव्हते तेव्हा विश्वास ठेवून काम दिले होते... आणि इतर मैत्रिणींना ही तिला काम द्यायला सांगितले होते.. त्यांच्या मुळेच तर आज कमल ची परिस्थिती पालटली होती...

खरे तर कमल त्यांचे उपकार मानत होती, आणि म्हणून त्या किती ही कठोर वागल्या तरी त्यांचे काम सोडणार नव्हती, सोडू शकत नव्हती..पण कधी कधी तिला त्यांच्या ह्या अश्या स्वभावाचा खूप त्रास होत होता...तिने तर ममता मॅडम यांची त्यांच्या सगळ्या अडचणीत खूप सेवा केली होती, त्यांचे बाळंतपण ही तिने एखाद्या बहिणी प्रमाणे केले होते...

ममता मॅडम चे मुलं कमल च्या अंगा खांद्यावर जणू मोठे होत होते......तिने नेहमीच आपल्यावर ममता मॅडम ने केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून आपले काम प्रामाणिकपणे करणे हे ठरवले होते..आणि तसेच ती करत होती...पण ह्याची जाणीव कधी ममता मॅडम ला होऊ दिली नाही की त्याची जाणीव ममता मॅडमला कधीच जाणवली नाही...

कमल ला ममता मॅडम बरं बघत नसतं.. आजकाल त्या जास्तच चीड चीड करत होत्या...काही ना काही कारणावरून कमल वर चिडत असत...तिच्यावर राग वैताग काढत...तिच्यासोबत मुदाम हेकट पणे वागत...आणि मी तुझ्यावर किती उपकार केले हे जाणीव करून देत.....आणि म्हणूनच आता कमल ला मॅडम च्या ह्या बोलण्याचा त्रास होत ...किती ऐकून घ्यायचे सतत...किती मानहानी सहन करायची...मान्य आहे त्यांनी उपकार केले पण इतके ही टोचून बोलणे कसे सहन करू...

तरी कमल मात्र कामाशी काम करत..अगदी कोणीही चूक काढणार नाही असे...दोन time येऊन काम करत....पण आज खऱ्या अर्थाने तिच्या घरावर संकट आले होते आणि आज तिला स्वतःचे रहाते घर वाचवणे खूप गरजेचे होते नाहीतर घर ही हातातून जाणार होते आणि पुन्हा ही जागा ही मिळणार नव्हती...त्यात नुकसान झाले ते वेगळेच...मुलांची कोण सोय करणार, कुठे सोय करणार याची चिंता वेगळीच होती तिच्यासाठी...बाकी सगळ्या घरच्या मॅडम कमल ला सहाय्य करत होत्या, कधी आर्थिक कधी इतर मदत करत...पण कधी कोणी कमल हिला एका शब्दाने दुखावले नव्हते कारण त्यांना माहीत होते कमल खूप प्रामाणिकपणे काम करत...कधी तिची कुठली तक्रार नसत...आणि तिच्या सारखी कोणी मावशी मिळणार नाही...म्हणून सगळ्या तिला खूप जपत... आणि ती ही सगळ्यांसोबत मिळून मिसळून पडेल ते काम करत...तिने कोणाकडे कधी हात पसरले नाही... पैश्या साठी तगादा लावला नाही...चोरी तिला माहीत नाही..

आज कमल ने मॅडम ला फोन लावला तसा त्यांनीच आवाज चढवला, "काय ग आज यायचे नाही का घरी, मी तुझी वाट बघत आहे...खूप कामे पडली आहेत ती कोण करणार...तुला नसेल जमत तर तसे सांग मी दुसरी बघते ,तुझी नेहमीची नाटकं सुरू झाली दर वर्षी प्रमाणे.. घरात पाणी घुसले, मी कशी येऊ...पण आज मी काही ऐकून घेणार नाही हं..."

मॅडमचा असलेला मान आणि त्यासोबत वाढत जाणार धाक यात आता मान कमी होत होता तर धाक वाढत होता,आणि म्हणूनच कमल ने बऱ्याचदा मॅडमचे काम सोडून देण्याचा विचार ही केला होता...

इकडे मॅडम सतत काय कमल सुट्टी मागत असते,आता ही कामवाली नकोय मला,मी दुसरी कामवाली शोधणार ,तिचे काम ही आता मला पटत नाही,ठीक आहे की सुट्टी दिली नाही तर येते पण आता कमल नकोच,उगाच डोक्यावर बसायचे काम करण्याआधी तिला कायमची सुट्टी देतेच...

मॅडम कमल ला पुन्हा फोन लावते,"हॅलो कमल आज तू ये,आणि आजच सगळा हिशोब करून घे तुझा,म्हणजे मी ही मोकळी आणि तू ही मोकळी, मग तुला हवे त्या मॅडम कडे काम कर आणि मला हवी ती कामवाली मी बघेन...वाटलं कधी तर बोलवेन तुला...इतकी वर्षे काम केले आहेस तर तुला विसरणे तसे शक्य नाही, हो आणि जितक्या सुट्ट्या झाल्या असतील त्याचे पैसे मी काही कमी करणार नाही, इतकी तर मी तुझी भर करेन..तुझ्यावर उपकार समज.."

मॅडम हे बोलत असतांना कमल ला तिकडून खूप वाईट वाटत होते ,रडू ही आले होते,आज एक दिवस अडचणीत ही मॅडम सांभाळू शकल्या नाहीत,मी तर एकदा ही उपकार बोलून दाखवले नाहीत, तसे ही गरिबांनी उपकार केलेले उपकार उपकार कुठे म्हणायचे,ती तर पैस्याच्या मोबदल्यात केलेली कामे समजतात हे श्रीमंत लोक...बाई साहेबांना मी खूप जवळची मानत होते आणि त्यांनी इतके वर्ष काम करून मला कामवालीच समजले शेवटी...मला ही आता नकोय त्यांचे कोणते उपकार इथून पुढे...आणि त्यांच्या बद्दल असलेला आदर ही कमी व्हायला नको त्या पेक्षा काम सोडलेले बरे....मला अडचण होती म्हणून मी सुट्टी मागितली आणि त्यांनी अडचण समजून घेण्यापेक्षा मला सोडून देणे हा मार्ग निवडला....पण त्यांना माझी आठवण आणि किंमत मी काम सोडल्यावर नक्की कळेल..

कमल पुन्हा कधीच मॅडम कडे गेली नाही की तिने त्या महिन्याचा पगार मागितला नाही...मॅडम जेव्हा पुन्हा प्रेमाने बोलवतील तेव्हा मात्र मी कोणता ही राग मनात न ठेवता जाईल हे नक्की असे कमल ने मनाशी ठरवले होते..

खूप दिवस झाले कमल ने काम सोडलेले पण ती तिचे पैसे घ्यायला ही आली नाही की भेटायला ही आली नाही...तिला बोलून आता जवळपास 10 दिवस उलटून गेले होते...ना तिचा काही फोन ना ती कुठे दिसली...आता मॅडम ला नवीन कामवाली मिळत नव्हती...ती घरीच काम करत होती...मॅडम ची चांगलीच दैन होत होती...ऑफिस ,घर आणि मुलं आणि घरची कामे सांभाळताना चांगलेच नाके नऊ आले होते...कोणी बाई मिळत नव्हती...त्यात मूसळधार पाऊस आणि घरात लिकेज होत असल्याने तर हाल हाल होत होते...ऑफिसमध्ये जातांना आता त्यांना उशीर होत होता,तिकडे बॉस ओरडा देत...काम नीट होत नसे...घरी लक्ष लागून असे,मुले घरी एकटेच असत...ती घरी येईपर्यंत जेवण होत नसे...मुले भूक भूक करत...अश्यात तिची बॉस समजून घेत नसे...ज्या दिवशी ऑफिसला दांडी होत त्या दिवशी तिचा पगार कापून जात...इकडे कमल असती तर अशी दैन ,असे हाल झाले नसते, ती असती तर मुलांना तिने बघितले असते,घर आवरले असते...तिने मुलांसाठी काही खायला करून दिले असते...आता कुठे मॅडम ला वाटत होते कमल किती भार हलका करत होती,तिच्या।विश्वासावर मी बिनधास होते...मी तर खूप मोठी चूक केली...ती कामवाली कमी आणि माझा डावा हात होती...घर माझे होते पण त्यात तिचा खऱ्या अर्थाने वाटा तिचा होता... मी समजत की मी तिच्यावर उपकार केले पण आज कळत आहे तिनेच माझ्या वर उपकार केले होते जे किती ही पैसे देऊन फेडता येणे शक्य नाही...तशी कमल पुन्हा मिळणे शक्य नाही...पण आता ती येणार नाही... मी तिला काढून टाकले तिला परके केले..


तिक्यात मॅडमचा फोन वाजला ,एक अननोन नंबर होता, तिकडून कोणी स्त्री बोलत होती, "ताई कश्या आहात तुम्ही, मला समजले विशाल आणि अवणीचे खूप हाल होत आहेत, ते आता एकटेच असतात, आणि तुम्हाला ही सगळे सांभाळून ऑफिसला जातांना खूप त्रास होत आहे ,म्हणून विचारले ,मी पुन्हा आले कामावर तर चालेल का तुम्हाला ?"

ती कमल होती, तिला कोणी तरी सांगितले होते की तुझ्या मॅडम चे खूप हाल होत आहे, त्यांचे मुलं ही तू नसल्याने एकटे पडले आहेत, मॅडमला तुझी आठवण येते आहे, म्हणून न राहून कमल ने हिम्मत करून मॅडम ला फोन केला होता...


इकडे मॅडम ने कमल चा तिने काम सोडल्यावर फोन delete केला होता, पण कमल ने मात्र आज ही त्यांची किंमत आणि मान ठेवला होता ,आणि म्हणूनच तिने हे समजल्यावर पुन्हा फोन केला आणि पुन्हा मॅडम चे काम सुरू केले...


कमल घरी आल्यावर मॅडम ने सुटेचा निःश्वास टाकला आणि पुन्हा एकदा कमल कडे झालेल्या चुकी बद्दल माफी मागितली,आणि
म्हणाल्या," मला समजले की तुझ्या घरच्या जबाबदाऱ्या माझ्या कामापेक्षा मोठ्या आहेत ,आणि जशी तू माझे घर सांभाळून घेत होतीस तसे कधीतरी मी ही तुझ्या अडचणीत तुला सांभाळून घेणे गरजेचे होते...पण दरवेळी मी माझ्याच अडचणी दूर करण्यासाठी तुझ्या जबाबदऱ्यांकडे दुर्लक्ष करत...पण आता समजले की तुझे ही घर आहे,तुझ्या ही अडचणी आहेत..मी पैसे जरी देत असेल तरी तुला तुझ्या जबाबदाऱ्या निभावणे जास्त गरजेचे होते.."

कमल.."बाई तुम्ही काय बोलतात माहीत नाही पण मी तुमच्या घराशी जोडले आहे,तुमचे उपकार आहेत,आणि मुलं मला मावशी म्हणतात फक्त त्यासाठीच मी परत आले आहे"