गजरेवाली भाग ७

It's A Story Of Poor Girl Revati


रेवती दिसायला खरंच खूप सुंदर होती त्यामुळे त्या बीचवर खुपजन तिला न्याहाळत होते, तिला पाहून दीपक सुद्धा घायाळ झाला मनोमन कविता करू लागला

गोव्याच्या या किनाऱ्यावर चंद्र जणू अवतरला
मोहरलेल्या या मेघांचा ऋतू भर उन्हाळ्यात पाहिला

दीपक म्हणजे सुनिधच्या कॉलेजमधील मित्र ..दिसायला सर्वसामान्य मुलांसारखाच पण स्वतःला फिट ठेवनारा, संस्कारांना कधीही न विसरणारा असा गुणी मुलगा.. ह्या वाह्यात गॅंग चा मित्र कसकाय झाला हे त्यालाच ठाऊक ..

सुनिध : ये रेवती हा घे हा गॉगल घाल आणि त्या समुद्राजवळ जाऊन उभा रहा मी मस्त फोटो काढतो ..

रेवती : नाही नको राहू दे

अनुप्रिया : अगं जा गं काढ मस्त मस्त फोटो , सगळी हौस पूर्ण कर तुझी ..कितिदिवस तू एन्जॉय न करता जगत राहणार ..

बिचारी भोळी रेवती अनुच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुनिध सोबत फोटो काढू लागली ...सूर्याकडे बघतानाचा, समुद्राच्या पाण्यात खेळतानाचा ,हॅट घालून असे एक ना अनेक फोटो सुनिध ने रेवतीचे काढले..काही वेळाने त्याने तेच फोटो मुलांच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर पाठवले ..

तिथे सगळे गप्पा मारू लागले "कसला भारी माल आहे राव हा ".." एकदम रावस पोरगी आहे " असे वेगवेगळे विशेषणं तिच्या सौंदर्याला देत होते ..दीपक ने सुद्धा ते मेसेज बघितले..

दीपक : अरे मूर्खा सुनिध लाज नाही का वाटत तुला असं करायला ,चल लगेच ते फोटो डिलीट कर .. एखाद्या आपल्या मैत्रीनी बद्दल असं बोलणं शोभत नाही तुला...

सुनिध : मैत्रीण असेल तुझी , मला तर फक्त ही एक रात्र भेटली तरी चालेल..

दीपक ला खूप राग आला त्याने एक कानाखाली लगावली सुनिधच्या ,सुनिध ने सुद्धा त्याची कॉलर पकडली.. त्या दोघांची हातापाई झालेली पाहून रेवती,अनुप्रिया आणि बाकीचे मित्र मंडळी तेथे आले...

अनुप्रिया : अरे ये वेडे झालात का तुम्ही ? इकडेही भांडण सुरू केलं का ?.. सगळे एकत्र मजा मस्ती करायला आलो आहोत ना आपण ,मग हे काय मध्येच

दीपक : विचार तूच सुनिध ला..

सुनिध दिपककडे खुन्नस नजरेने बघत होता..दिपकने त्याच्या हातातून फोन घेऊन त्यातील फोटो डिलीट केले आणि रागारागात रूममध्ये निघून गेला...

कोणाला काहीच कळलं नाही या दोघांमध्ये नक्की काय झालं ते ..त्या दिवशी सगळ्यांनी मस्त मच्छी, चिकन ,खेकडे यांच्यावर ताव मारला..

दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे मंडळी आनंदाने मस्त मजा मस्ती करत होते ,समुदावर वेगवेगळे खेळ खेळत होते ..रेवतीला समुद्राच्या ओल्या मातीत किल्ले बनवायला आवडलं म्हणून ती वेगवेगळे किल्ले बनवत होती आणि तिच्या सोबती होता आपला दीपक .. दोघेही एकमेकांना बघत बघत कोण आधी एक एक किल्ला पूर्ण करतय अशी शर्यत लावत होते .

संध्याकाळची वेळ होती अंधार सुद्धा पडायला लागला होता .. रेवतीला काय सुचलं काय माहिती पण ती बोलली की," सगळेजण आंधळी कोशिंबीर खेळूया ,या समुद्राच्या किनारी लय मज्जा येईल "
सगळेजण नको नको म्हणत होते पण महेश बोलला खेळूया की, महेशने सुनिधच्या कानात काहीतरी सांगितलं त्यामुळे त्यानेही महेशला डोळा मारून ठिके खेळूया बोलला .. इकडे तिकडे लांब लांब धावत पळत सगळे आंधळी कोशिंबीर खेळत होते ..आधी सुनिध ,मग दीपाली त्या नंतर अनुप्रिया मग रेवती असे करत करत सर्वांनी एक एक डाव खेळला डोळ्याला पट्टी बांधून ,अंधार सुद्धा खूप झाला होता पण तरीही सगळे आनंदात खेळत होते ...आता दिपकची वेळ होती डोळ्यांवर पट्टी बंधायची आणि हीच संधी सुनिधला, महेशला भेटली ..दिपकच्या अवती भवती सगळेजण पळत होते ..रेवती सुद्धा लांब लांब वर पळत होती ..पळता पळता अचानक कोणीतरी तिला मागच्या मागे तोंडाला बांधून उचलून नेलं ...


एक तास झाला ,दोन तास झाला सर्वजण रेवतीला शोधत होते ..सर्व मित्र मैत्रिणी रात्रभर झोपले नाही, तिला खूप शोधलं पण ती सापडली नाही ..शेवटी दुसऱ्या दिवशी पोलीस कम्प्लेट केली तेव्हाही पोलिसांनी दिवसभर शोधूनही त्यांना ती सापडली नाही ...अनुप्रिया ,दीपक, सुनिध ,महेश सगळे खूप अस्वस्थ झालेले ...रेवतीच्या घरी कळवण्यात आलं ..मामा मामी खूप रडले .. मामाने देवीकडे साकडं घातलं तरीही काहीही झालं नाही ..एक महिना ,दोन महिने जवळजवळ आता वर्ष झालं रेवतीचा पत्ता कोणालाही कळला नाही ..सगळं होत्याचं नव्हतं झालं ..रेवती हरवली होती ...टवटवीत पूजेची फुलं, माळ,वेणी विकणारी गजरेवाली आता देवीच्या दारात पुन्हा कधी दिसलीच नाही ..
**********************************
१० वर्षांनी

"अरे निवडून निवडून येणार कोण
रेवतीबाईं शिवाय आहेच कोण ?"

"वाटीभर चिवडा रेवतीबाईला निवडा"

पाहिलंत मंडळी किती जल्लोष दिसत आहे सर्वांच्या चेहऱ्यावर.
दादर ,विरार,भाईकळा,ठाणे जवळजवळ अर्धी मुंबई आज रेवतीबाईच्या पाठीशी उभी आहे .. लवकरच या पंचवार्षिक निवडणुकांचा निकाल लागेल आणि मग कळेलच कोण होईल आमदार ...मी रिपोर्टर सुमित्रा बांदेकर विथ कॅमेरामन सागर न्यूज मराठी मधून..


तेव्हढ्यात चार मोठ्या पांढऱ्या रंगाच्या फोर व्हीलर एकामागे एक आल्या.. मध्ये लाल दिव्याची गाडी होती.. स्टेजच्या बाजूला सर्व गाड्या थांबल्या..त्या लाल दिव्याच्या गाडीचा दरवाजा एका बॉडिगार्डने उघडला.. मोरपंखी रंगाची काठापदरी सहावारी साडी,कपाळावर लाल कुंकू ,डोळ्याला काळा गॉगल.. केसांवर मोगऱ्याच्या फुलांचा लांब गजरा माळलेला असलेली एक महिला बाहेर आली.. सर्व गर्दी तिच्या अवतीभवती जमली,सर्वांनी घोषणा देयला सुरुवात केली.. ती सगळ्याना एक गोड स्माईल देत राम राम,नमस्ते करत डोक्यावर पदर घेऊन गर्दीतून वाट काढत काढत स्टेजवर गेली..समोर माईक होताच तिने एक हात वर करून सगळ्यांना घोषणा देयला थांबवलं...


"नमस्कार मंडळी ,माझ्या भावांनो,बहिणींनो आणि माझ्या लाडक्या चाहत्या वर्गाला माझा मनापासून राम राम .. कसे आहात सगळे मस्त मजेत ना ? हो मजेत असायलाच हवं तुम्ही, माझ्या लोकांनी नेहमी आनंदात रहावं हीच माझी अपेक्षा असते बाकी कोण तुमची कामं करत नाही त्या लोकांकडे बघायला मी रेवती जुन्नरकर आहेच ... आज निकाल आहे ना या पंचवार्षिक आमदार निवडीचा ...मी शब्द देते की पुढील एक काही मिनिटांत निकाल येईल आणि इकडे सगळं आसमंत गुलालाने गुलाबी होऊन जाईल जणू ज्योतिबाचा डोंगर असेल"..ज्योतिबा नाव मुखी येताच तिला भूतकाळ आठवला आणि मन हळवं झालं तिचं .. तेवढ्यात मोठ्या भोग्याचा आवाज आला " या पुढील पाच वर्षांसाठी आपल्या आमदार बनल्या आहेत रेवतीबाई जुन्नरकर " सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला.

रेवती : बघा म्हंटलं नव्हतं का आपलंच राज्य असणार आता ईथुनपुढे ..ए वाजव रे ..

स्टेजवरून बाकीच्या आप्तेष्ट मंडळीसोबत खाली जाऊन रेवतीने साडीचा पदर कंबरेला खोचला मग तीही सगळ्यांसोबत विजयाचा आनंद साजरा करू लागली ..

धुरळा धुरळा धुरळा रं
धुरळा धुरळा धुरळा कर लेका
नजर धारदार माणूस दमदार
राजाचं जिगर पब्लिक फिगर
धुरळा करतोय जिथं बी शिरतोय
धिंगाणा होतोय तिथं
नाद करा… पण आमचा कुठं?

आता साऱ्यांची हवाच काढू
येउद्या समोर मातीत गाडू
आता गळ्यात घालून चैन
स्टाईल ऐसा करेंगे फाडू
ये बुलेट घेऊन गॉगल लावून
पॅटर्न करूया हिट
नाद करा… पण आमचा कुठं?

मग रेवतीबाईंच्या पीए ला हॉस्पिटलमधून कॉल आला ,त्याने लगेच रेवतीबाईना बातमी सांगितली ..गर्दी खूप होती त्यामुळे तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाणे शक्य होणार नव्हतं मग एकच उपाय होता...गर्दीतून वाट काढत काढत ती गाडीजवळ गेली ,तिने गाडीत बसून थंडगार पाणी पिलं आणि अलगद तिने आपले डोळे बंद केले.

क्रमश :



🎭 Series Post

View all