गजरेवाली भाग ६

It's A story Of Poor girl Revati


रेवती आज सकाळी लवकर उठली नेहमी प्रमाणे.. सगळं आटोपून गजरे विकायला देवी मंदिरा समोर गेली , आज वेळेआधी खूप गजरे विकले गेलेले , अगदी तिच्या मनासारखी कमाई झाली त्यामुळे तीने काही पैशातून देवीची आज खण नारळाने ओटी भरली ..आणि देवीला तिने प्रार्थना केली की," खूप वर्षांनी मी कुठेतरी बाहेर फिरायला जातेय.. त्यात ही सगळी अनोळखी लोकं ..खूप मज्जा येणार गोव्याला पण एक भीती आहे ,ही सगळी लोकं चांगली असतील ना ?..तसही तू आहेसच नेहमीप्रमाणे माझी काळजी घेयला ..चल आता जाते मी..अर्रर्र सॉरी सॉरी जाताना नेहमी येते मी म्हणायचं असतं होणं ?..बरं चल येते मी ".. ती मागे वळली तोच तिचा पदर देणगी पेटीच्या कोपऱ्यात अडकला... तिने तो पदर काढला आणि ती निघून गेली...

देवीआई जणू रेवतीला रोखू पहात होती ,तिला माहीत असावं पुढे काहितरी अघटित होणार आहे..

रेवती घरी गेली ..सोबत ज्या साड्या घेयच्या त्या तिने बॅगेत भरल्या.. सोबत अजून ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या सुद्धा घेतल्या ...मामाने तिला नाही म्हंटलं तरी काही पैसे दिलेच .. संध्याकाळी अनुप्रिया ,सुनिध आणि त्यांची गॅंग.. सगळेजण रेवतीच्या घरी आले.. घराबाहेर गाडीचा आवाज ऐकला तेव्हा रेवती आणि मामा- मामी बाहेर गेले ..मुलीसुद्धा आहेत यांच्या ग्रुपमध्ये हे बघून मामाला हायसं वाटलं...

रेवती पुढच्या सीटवर अनुप्रिया सोबत बसली..अनुप्रिया गाडी चालवत होती..अनुप्रिया ने मामाला सांगितलं की,
"तुम्ही टेन्शन घेऊ नका आणेल मी रेवती ला घरी पुन्हा "
"चलायचं आता रेवती ? "
रेवती : हो हो चला ..
रेवतीने गाडीत समोर छोटी गणपतीची मूर्ती होती त्याच्या पाया पडली आणि मोठ्याने बोलली .."बोला गणपती बाप्पा.." कोणीच मोरया नाही म्हंटलं हे बघून अनुप्रिया बोलली "मोरया " ..
ग्रुप मधील एक पोरगा म्हणजे दिनेश बोलला
दिनेश : सुनिध आपण काय देवदर्शनाला चाललोय का रे ? हे भलतंच अँटिक पिस आहे.. काय तर म्हणे गणपती बाप्पा मोरया ..हा हा हा ..

सुनिध काही बोलणार तेवढ्यात रेवती बोलली की,

रेवती : कोठेही जाण्यापूर्वी किंवा शुभकार्य करण्यापूर्वी गणपतीचे दर्शन घेयचं असतंच , राहुद्या तुम्हाला नाही कळणार ..तुम्ही आपलं कानात ते बोळे घालून मुन्नी बदनाम होई ऐकत बसा..

दिनेश : ए ..ए.. सुनिध सांग रे हिला ही अति बोलते बरं का

रेवती : सुरुवात कोणी केली

सुनिध : अरे बास बास काय लहान पोरांवानी भांडताय.. सुनिध ने दिनेश ला डोळा मारला आणि दोन बोटे ओठाला लावून थोडे फाकवले आणि जीभ बाहेर काढली ...

दिनेश ला सुनिध चा इशारा कळला त्यामुळे त्याने अंगठा दाखवून ठीक आहे असं सुनिध ला बोलला..

गाडी मध्ये मस्त गाणी चालू होती ,सगळेजण मजा मस्ती करत जात होते ..नंतर मध्ये अचानक अनुप्रिया ने ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली

सुनिध : काय झालं अनू का थांबली ?

अनुप्रिया : अरे मोबाईल चा नेटवर्क गेलाय आता मॅप पण बंद पडलाय ..पुढे कसं जायचं ? तुमच्या कोणाच्या फोनला आहे का नेटवर्क ? ..

सुनिध : माझ्याही फोनला नेटवर्क नाहीये

कोणाच्याच फोनला नेटवर्क नव्हतं त्यामुळे सर्वांनी मागून कोणती गाडी येते का ते बघण्यासाठी खाली उतरले,म्हणजे त्या गाडीवाल्याला पुढील रस्ता विचारता येईल ..

रेवती : अनू मी झोपून राहू का गाडीमध्ये ? मला झोप येतेय

अनुप्रिया : हो हो तू झोप आम्ही बघतो काय करायचे ते ..

रेवती झोपण्याचे नाटक करते.. तिने फक्त डोळे मिटून घेतले आणि ती निघाली मार्ग काढत काढत... सुमसाम रोड होता मध्ये एक चौक लागला तिने सगळ्या चारही मार्गातून वाट काढत कुठे गोव्याला जाणारी दिशादर्शक पाटी दिसते का ते ती पाहत होती..

पण इकडे मागच्या सीटवर बसलेला दिनेश ,हळूच तिच्या खांद्याजवळ आला होता, तिच्या केसांना नाक लावून बेभान होत होता ,तो तसाच थोडा पूढे जात तिच्या मानेला त्याच्या ओठांचा स्पर्श करणार तोच रेवती जागी झाली आणि गाडीतून खाली उतरली...तिचं लक्षच नव्हतं की मागे असलेला दिनेश असे चाळे करत असणार ..

रेवती : अनुप्रिया ताई हा रस्ता मला ठाऊक आहे, चल बस गाडीत मी सांगते

अनुप्रिया : अगं मग आधी का नाही संगीतलं ? चला रे पटकन बसा गाडीत..

रेवती : हा इथून सरळ चल.. निदान चार पाच किलोमीटर मग एक चौक लागेल...

अनुप्रिया : इतक्यावेळ का नाही सांगितलं गं ?

रेवती : झोप येत होती गं खूप..

अनुप्रिया : घ्या आता ,इथं आमची झोपमोड झाली त्याचं काय.. बरं जाऊदे कोई नही..

थोडं पूढे गेल्यावर

अनुप्रिया : अगं हो गं.. बरोबर बोलली तू.. एक चौक आला आहे..पण आता कुठे वळायचं लेफ्ट की राइट ?

रेवती : उजव्या बाजूला वळ.. तेचं गं ते तुमचं ते राइट...

अनुप्रिया : अरे हो बरोबर की, हे बघ इथे आता बोर्ड लागलाय गोवा 170 किलोमीटर दाखवत आहेत.. चला आता काही टेन्शन नाही.. थँक्स रेवती

रेवती : जेव्हा रेवती असेल सोबत तेव्हा कशाला घेताय तुम्ही टेन्शन.

सगळेजण गोव्याला पोहचले , बिच जवळील एका हॉटेलमध्ये सगळे थांबले.. सुनिध ,दिनेश,गौरव,आकाश आणि दीपक हे सगळे एका खोलीत राहणार होते तर बाकीच्या सगळ्या मुली म्हणजे रेवती ,अनुप्रिया,कोमल,दीपाली हे सगळे दुसऱ्या खोलीत झोपायला गेले... सगळे दमले होते म्हणून लगेच सगळ्यांनी अंग टाकून देऊन मस्त झोप काढली...

दोन्ही रूम आजूबाजूला होत्या.. रेवती पहाटे ५ ला नेहमीप्रमाणे उठली .. तिला काही झोप येत नव्हती पुन्हा, म्हणून ती गॅलरीमध्ये गेली.. दोन्ही हात वर करून मस्त पहाटेच्या गार हवेत चांगली मोठी जांभई तिने दिली आणि मान वळवून दुसऱ्या गॅलरीमध्ये बघते तर काय.. एक मुलगा डीप्स मारत होता.. अंगात फक्त एक शॉर्ट होती .. त्याच्या उघडया अंगाकडे रेवती पाहतच राहिली.. त्याने डीप्स मारताना रेवतीला बघितलं त्याने लगेच तिला " हॅलो रेवती.. असं काय बघतेय "

रेवती : नाही काही नाही सॉरी.. सगळे झोपलेत म्हणून मी बाहेर आलेले..

दीपक : माझं नाव दीपक ... तुमच्या गाडीत होतो,ओळखलं का मला ?

रेवती : हो हो माहीत आहे.. तू कर तुझा व्यायाम मी जाते आत..

रेवती आत गेली आणि तिने काही काम नाही म्हणून बाथरुमध्ये आत जाऊन अंघोळ करण्यासाठी एक कॉक फिरवला तोच तिच्या अंगावर वरच्या शॉवर मधून पाणी येयला लागलं..

रेवती : आगं बाई, पाऊस आला वाटतं.. इथे आतमध्ये कसकाय पाणी येतंय पावसाचं ..

त्यामुळे तिने लगेच अनुप्रिया ला उठवलं

रेवती : अनू अगं मोरीमध्ये खूप पाऊस येतोय मला अंघोळ करायचीय

अनुप्रिया : काय बाथरुमध्ये पाऊस ? थांब बघते मी

अनुप्रिया शॉवर कडे बघून हसायला लागली

अनुप्रिया : अगं हा काय पाऊस नाहिये, याला शॉवर म्हणतात.. याच्या खाली मस्त उभा राहून अंघोळ करायचं... हे बघ हा कॉक फिरवला की बंद होतो शॉवर ,कळलं का आता ?

रेवती : अगं भलतंच वेगळं आहे ,पण करते मी प्रयत्न ..

रेवतीने शॉवर खाली पहिल्यांदा अंघोळ केलेली,तिला खूप मस्त वाटलं जणू पावसात भिजून निघलो असं वाटलं तिला...

तिने मस्त लाल रंगाची साडी त्यावर मॅचिंग चॉकलेटी रंगाचा ब्लाउज घालून ती बाहेर आली..सगळे तिच्याकडे बघून हसू लागले

रेवती : का ? काय झालं हसायला ? मलापण सांगा मीपण हसते थोडं..

कोमल : अगं रेवू तू काय अशी फिरणार आहेस गोव्यात ?

रेवती : हो त्यात काय झालं ?

दीपाली : अगं इथे गोव्यात सगळ्या मुली कमीतकमी कपडे कसे घालता येईल यासाठी प्रयत्न करतात..आणि तू तर साडीच गुंडाळून आली

अनुप्रिया : ते काही नाही रेवती हे बघ मी तुझ्यासाठी हे कपडे देते घालायला यापैकी कोणतेही घाल.. साडी घालून इथे फिरली तर सगळे लोकं तुला वेडी समजतील..

रेवतीने अनुप्रिया ने दिलेल्या कपड्यांपैकी एक पांढऱ्या रंगाचा टॉप आणि आकाशी निळ्या रंगांची जीन्स पॅन्ट घातली.. पण तिने वेणी तशीच ठेवली होती... अनुप्रिया आणि सगळ्या मुलींनी तिचा मेकओव्हर केला.. डोळ्यामध्ये मस्करा,डोळ्यांवर लाल शेड,ओठांवर फिकट लाल लिपस्टिक, केसांना मोकळे सोडून त्याला वेगळा अंदाज दिलेला... सगळ्याजणी बाहेर गेल्या .. रेवती लाजत लाजत जात होती पण तरीही त्याच्या ग्रुप मधील मुलं तर मुलंच पण तिथे असलेले सगळे पुरुष रेवतीकडे बघत होते..नजरेला घायाळ करणारं रूप दिसत होतं रेवतीचं त्या गोव्याच्या उन्हामध्ये..

दिनेश मानेला हात लावून खाजवत बोलला,
दिनेश : यार सुनिध हा माल मला हवाय

सुनिध : टेन्शन मत ले यार एकसाथ बाटकर खायेगे


क्रमश :

काय होईल पूढे ?..पहात रहा गजरेवाली फक्त आपल्या ईरा वर...


🎭 Series Post

View all