गजरेवाली भाग ३

It's A Story Of Garland Flower Girl


रेवतीने मामीला दारात पाहिलं ,थोडी घाबरली पण मागे उभा असलेला मामा दिसल्यामुळे जरा हायसं वाटलं बिचारीला ..
पांढऱ्याशुभ्र अनारकली ड्रेस मध्ये रेवती जणू सुंदर परी दिसत होती
मामा : काय गं रेवू आज उशीर का झाला ? आणि हे काय हा ड्रेस नवीन घेतला का ? मी आणलेली साडी आवडली नाही वाटतं

रेवती : नाही मामा तसं नाही , अरे मी रस्त्याने येत असताना एका मोठ्या गाडीमुळे अंगावर चिखल उडालेला, माझा आवतार खूपच घाण झालेला होता ..म्हणून त्या गाडीत बसलेल्या बाईसाहेबांनी मला घरी नेलं आणि हा ड्रेस घालायला लावला , खूप छान लोकं होती ..

मामा : कोण होत्या त्या बाईसाहेब ?

रेवती : अरे आपल्या देशमाने पाटलांची लेक होती , काय बरं नाव तीचं ..हा अनु ..अनु ..असं काहितरी होतं बघ

मामा : अनुप्रिया मॅडम व्हय ?

रेवती : हो हो त्याच त्या .

रेवती : अगं त्या बी तुझ्याच वयाच्या आहेत , खूप शिकलेल्या आहेत

मामी : ते सगळं राहुद्या मला एक सांगा तुम्ही हिला साडी आणली आणि मला दाखवली पण नाही ,निदान मला सांगायचं तरी .. कुठं आहे साडी बघू बरं कशी आहे ..

रेवती : अरे देवा मी साडी विसरून आले तिकडेच , थांब मामा मी आत्ता जाते आणि लगेच घेऊन येते ..

मामा: अगं नको रातच्याला नको जाऊ अशी एकटीने , रस्ता पण खूप लांबवरचा आहे . उद्या जा तू , साडी काय पळून चालली आहे होय ?

रेवती : बरं ठिके राहिलं , मी उद्या जाईन

मामी : हम्म ,चला आता जेवून घ्या ताईसाहेब ..तुम्ही नव्हता म्हणून हे बी नाही जेवले आणि हे जेवले नाही म्हणून मी बी नाही जेवले

मामा : अगं बाबो तू आणि माझ्यासाठी जेवली नाही ? काळजात कसं अगदी धस्सं झालं हे ऐकून ..

मामी : जा बाबा तुम्हाला काय माझ्यावर प्रेमच नाही

मामा रेवतीला डोळा मारून हसत होता ..नंतर तिघेही जेवायला बसतात ,जेवताना मामा रेवतीला बोलतो की, " बरं रेवू तुझ्याकडे एक काम होतं .. नाही जाऊदे काही नाही मीच करेल ते काम "

रेवती : अरे बोल की , असं अर्ध्यावर सोडू नको बोलणं .

मामा : नाही अगं काही नाही जाऊदे

रेवती ने भाकरीचा आणि बेसनाचा घास हातात घेतलेला असतो , ती तसाच तो घास पुन्हा ताटात टाकते आणि म्हणते

रेवती : हे बघ मामा तू जर नाही बोलला तर मी बोलणार नाही बरं का

मामा : बरं ..बरं..सांगतो , अगं गावात एक तमाशाचा फड उभारला गेलाय.. ५ दिवसांसाठी आले आहेत ते मंडळी , त्यांना सगळा भाजीपाला ताजा हवाय . त्यामुळे आपल्या शेतातील वांगी नेऊन देयची आहे आणि सोबत कोथिंबीर सुद्धा

रेवती : एवढंच ना मी जाते की ..

मामा : अगं असं तरण्या ताठ्या मुलीने तमाशाच्या फडावर जाणे शोभत नाही ,मीच जातो

मामी : हम्म , राहुद्या तुम्ही अजिबात जायचं नाही ,कोण कुठली ती तमासगीर जी बाप्यांना भुरळ घालते आणि संसार मोडते अशा बाईकडे अजिबात जाऊ देणार नाही मी तुम्हाला

रेवती हसायला लागते

मामी : तुला काय झालं दात काढायला ?

रेवती : अगं मामी तुला वाटतं व्हय मामाकडे कोणतीतरी बाई बघत असेल

मामा : म्हणजे तुला म्हणायचं काय मी देखणा नाही का ? अगं आता गुडघ्याला बाशिंग बांधतो बघ हजार पोरी लग्नाला तयार होतील

मामी : व्हय का ? गुडघ्याला बाशिंग बांधून बघा बरं , मग मी हाय आणि तुम्ही हाय .. ते काही नाही रेवती तू जाशील उद्या त्या बाईकडे वांगी घेऊन ..

मामा : अगं पण ..

मामी : पण नाही आणि बिन नाही ..

रेवती : हो गं मामी मीच जाईल उद्या तिकडं आणि अनुप्रिया बाईसाहेबांकडून साडी बी आणते..

नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता रेवती उठली ,पटकन आवरून न विसरता ३,४ किलो वांगी पिशवीत घेऊन मोकळं टोपलं रिक्षात ठेऊन गेली मार्केटला गजरे,फुलं आणायला ..

आज मार्केटमध्ये गजरे घेत असताना तिला तहान लागली म्हणून मार्केटमध्ये असलेल्या पाणपोई जवळ गेली ,पदराने मानेला,तोंडाला आलेला घाम पुसत ती पाणपोई वर ठेवलेला पेला उचलणार तोच तो पेला सुनिध ने उचलला ..

रेवतीने त्याच्याकडे दचकून पाहिलं ,आता मात्र तिचा संताप झाला ..

रेवती : काय ओ का सतत मागेमागे असता माझ्या ,आजतर चक्क मार्केट मध्ये सुद्धा गाठलं मला तुम्ही . गरीब सुंदर पोरगी दिसली की लाळ टपकायला लागली वाटतय लगेच

सुनिध : ओ मिस ,तोंड सांभाळून बोला बरं का .. मी इथं तुमच्या मागे नाही आलो ते पहा समोर जिम दिसतेय ना त्या बिल्डिंग मध्ये आलेलो ,आजपासून जिम जॉईन केली म्हणून मलाही तुम्ही इथं पहिल्यांदा दिसलात

रेवती : कसला बाद आहेस तू ..जाऊदे सोड राहूदे नाही पेयचं मला पाणी

त्याच्याकडे बघून नाक मुरडत रेवती निघून जाते टोपलं घेऊन गजरे विकायला

ओ दादा ,दादा घ्या की ओ गजरा
ओ ताई ,ओ माई घ्या की ओ गजरा
अबोली,चमेली ,जुई अन मोगरा
ए पिंट्या घे रे गजरा..

दिवसभर गाणी म्हणून लोकांना विनवणी करुन रेवतीने आजदेखील खूप गल्ला कमावला , तहान लागली म्हणून समोरच्या लिंबू सोड्या वाल्याकडे गेली

रेवती : ए भाऊडया एक लिंबू पाणी दे बरं पटकन ,लय ऊन आहे त्यामुळे तहान लागली दादा ..

तो लिंबू पाणी बनवत होता तेव्हा रेवती बघते की, एवढं मोठं टपोरं पिवळ लिंबू त्यातील फक्त आर्धच लिंबू एका सरबतासाठी
वापरलं जातंय

रेवती : फक्त आर्धच लिंबू ?

तो : व्हय मग , पूर्ण टाकलं तर कडू होईल की

लिंबू सरबत पित असताना रेवतीला प्रश्न पडतो

रेवती : बरं दादा या लिंबाचा उपयोग असा काय असतो बरं ? भाजीवर वरतून पिळायला आणि हे असं लिंबूपाणी बनवायला होणं ? जास्त काही कामच नाही या लिंबाचं

तो : असं कसं अहो अमावस्या पौर्णिमेला लिंबू मिरची लोकं घराला ,गाडीला बांधतात आणि शिवाय कोणावर करणी किंवा काळी जादू करायची असेल तर लिंबू मधून फाडतात आणि त्यावर कुंकू टाकून मंत्र फुकतात

रेवती घाबरते,पटापट सरबत पिते

तो : ते बघा त्या रस्त्यावर कडेला कोणीतरी उतारा टाकलाय लिंबाचा

रेवतीने रस्त्याच्या कडेला असलेले लिंबू पाहिले ,आजूबाजूला कुंकू होते त्या लिंबावर टाचण्या टोचवलेल्या होत्या .तिला या सगळ्या गोष्टीं खूप भीतीदायक वाटतात..

रेवती : ए बाबा धर हे तुझे पैसे उगाच कुठचा विषय कुठही भरकटत आहे

मोकळं टोपलं डोक्यावर घेऊन आणि वांग्याची पिशवी हातात घेऊन रेवती आता अनुप्रिया कडे निघाली ..४,५ किलोमीटर टमटम मध्ये बसून ती अनुप्रिया च्या बंगल्यावर पोहचली .. तिने दरवाजा वाजवला

"टक टक टक...कोणी आहे का घरात..
बाईसाहेब मी रेवती आलेय, काल माझी साडी इकडंच विसरले , अरे कोणी आहे का ? "

तिने दरवाजाला हात लावला तर दरवाजा उघडाच होता ,वांग्याची पिशवी जड होती म्हणून बाहेरच ठेवून फक्त मोकळं टोपलं घेऊन ती आत गेली .. हॉलमध्ये कोणीच नव्हतं ,आजूबाजूच्या खोलीत पण कोणीच नव्हतं .. वरच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला म्हणून ती वरती गेली .. दरवाजा थोडा लोटून तिने आत पाहिलं , आतील दृश्य पाहून ती पुरती घाबरली ,तिला खूप घाम फुटलेला कारण ,आत केसं मोकळे सोडलेली,हिरवी काष्टा साडी घातलेली आणि कपाळावर मोठं कुंकू लावलेली अनुप्रिया बसलेली होती .तिच्यासमोर काही लिंबू पडलेले होते ,कुंकवाचा सडा होता , काही चित्रविचित्र काळ्या बाहुल्या होत्या ..रेवतीला पाहून अनुप्रिया हसली आणि फक्त इशाऱ्याने आत येयला लावलं ...रेवती घाबरली, तिने घाबरून हातातील टोपलं खाली टाकलं आणि जोरात " आ " असं तोंडावर हात ठेवून ओरडत पळून गेली ...

धपाधप पायऱ्या उतरत खाली आली पळत पळत घराच्या मुख्य दरवाजा पाशी आली, घाबरून तिने पुन्हा वरच्या खोलीकडे पाहिलं आणि निघून गेली, जातांना वांग्याची पिशवी देखील घेऊन गेली ..आता तिला जायचं होतं त्या तमाशाच्या फडावर .. रात्रही होत होती पण चलता चलता तिला सतत अनुप्रियाचा तो विचित्र अवतार अजूनही दिसत होता ...बिचारीला दैवी शक्ती लाभलेली त्यामुळे डोळेबंद केले की मनातील विचार अनुप्रियाकडे घेऊन जायचे म्हणून ती पळत पळत त्या तमाशाच्या फडाकडे निघाली ...

नार नटखट नटखट अवखळ तोऱ्याची
तरणी ताठी नखऱ्याची
अशी कचकन,लचकत मुरडत आले
मी नाजूक छमछम घुंगराची

रेवती ला जणू कोणी झपाटलं आहे असं ती स्वतःच्या तंद्रीत धावत त्या फडावर आली आणि तशीच सगळ्या गर्दीतून वाट काढत पुढे पुढे जाऊ लागली

बाण नजरेतला घेउनी अवतरली सुंदरा
चंद्रा ..रात रंगील ती रंगुनी
चंद्रा ..साज शृंगार हा लेवूनी
सूर तालात मी रंगुनी
आले तारांगनी ..चंद्रा

रेवती ला काहीही सुचत नव्हतं ,खूप घामाघूम झालेली होती ,आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष न देता ती त्या तमाशात घुसली नाचणाऱ्या चंद्राकडे गेली आणि तिच्या समोर जाऊन चक्कर येऊन पडली , चंद्रा सुद्धा नाचता नाचता थांबली..हातातील वांग्याची पिशवी पडल्याने सगळीकडे वांगी झालेले ...समोर बसलेली लोकं ओरडू लागली त्यामुळे फडावर लगेच पडदा टाकण्यात आला..

कोण आहे ही चंद्रा ? काय करत होती अनुप्रिया त्या खोलीत ?
सुनिध आणि रेवती मध्ये काही घडेल का ?
वाचत रहा गजरेवाली ,फक्त आपल्या लाडक्या ईरा वर
Stay Tune

🎭 Series Post

View all