गाजराची खिचडी.

It's A Funny Receipe Story


#आम्ही_सारे_खादाड

गाजराची खिचडी

नमस्कार मंडळी कसे आहात मी रिषभ घेऊन आलोय एक भन्नाट, लज्जतदार स्वादिष्ट अशी रिसीपी खास तुमच्या माझ्या सारख्या खुळचट खवय्यांसाठी?

आपल्याला लागणारे साहित्य: एक टी स्पून मीठ ,थोडा
हातभर लोणच्याचा मसाला चाटून पहा जास्त गोड नसावा तो मसाला, मग मूठभर खायचा सोडा आणि तीन चार फेटवलेली अंडी आणि हो ते काजू बदाम आणि डाळ पण राहिली की ..

सर्वप्रथम आपण एक घमेलं घेऊया त्यामध्ये गाजरं किसून घेयची मग त्यात वरतून मूठभर खायचा सोडा टाकावा,काजू ,बदाम आणि डाळ सुद्धा टाकावी..मग हे मिश्रण कुक्कर ला लावणे ,अहो लावणे म्हणजे कुक्कर मध्ये टाका ..तो कुक्कर गॅस वर ठेवा.. अरे बापरे शिट्टी का होत नाहीये अरे हा गॅस चालू करायलाच विसरलो.. वयोमानानुसार विसरायला होतं मला थांबा थोडं शंखपुष्पी पितो म्हणजे मी विसरणार नाही .. मी काय म्हणतो जर या मिश्रणात शंखपुष्पी ऍड केलं तर ? अरे वा आयडिया कमाल आहे ..मग आहे की नाही मी हुशार ?
तुमच्या सारख्या वाचकांच्या सानिध्यात राहून वाण नाहीतरी गुण लागलाय मला ... आता मी कुक्कर मध्ये शंखपुष्पी अर्ध बाटली ऍड करून टाकलं .. आर्धातासाने मी पुन्हा कुक्कर उघडलं ...वाह काय मस्त घट्ट मिश्रण झालं आहे . आता या मिश्रणाला कढई मध्ये टाका ,नाही नाही यावेळी मी नाही विसरलो गॅस चालू करायला ...आता या मिश्रणात आपण टाकूया फेटाळलेली चार अंड्याच्या आतील क्रीम, वरतून टाकूया हातभार लोणची मसाला ..मग टाकूया एक टीस्पून मीठ ..पादरं मीठ असेल तर उत्तमच ..वरतून ताटाने झाकून ठेवा.. हे सगळं झालं की मग अर्ध्यातासाने येऊया कढई उघडायला .. अरे वाह गाजराची खिचडी झाली ...वाह काय मस्त लागत आहे एकदम झक्कास ??? ...चला भेटूया पुढील भागात नवीन भन्नाट रेसिपी घेऊन ..??

ए ए किसन कॅमेरा बंद कर लगेच ,मला जोराची आलीय ??

🎭 Series Post

View all