गाजर हलवा रेसिपी

Gajar Halwa Recipe
गाजराचा हलवा :

सर्वात टेस्टी आणि हेल्दी अशी स्वीट डिश काय असेल ? असा प्रश्न आला की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे गाजराचा हलवा.
खाण्यास पौष्टिक स्वादिष्ट आणि झटपट असा बनणारा गोड पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला जास्त साहित्याची गरजही पडत नाही.
चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा मऊसूद असा गाजराचा हलवा.
हलव्याचा चम्मच तोंडात गेल्यानंतर जो गोडवा तोंडात उतरतो आणि मन भरून काहीतरी खाल्ल्याचा भास होतो तसा गाजराचा हलवा आज आपण घरी बनवणार आहोत.

साहित्य:
1)1 कीलो गाजर ( गावरानी )
2)साखर आवडीप्रमाणे गोड / कमी गोड
3)साजुक तुप 1/2 वाटी
4)काजू , बदाम , मनूका(हवे ते ड्रायफ्रूट्स)
5)1 वाटी मावा ( खवा )(हा तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा या ऐवजी फ्रेश क्रीम वापरू शकता)
6)दुध ( लागेल तसे )
7)वेलची पुड


पाककृती :
★ सगळ्यात पहिले आपल्याजवळ असणारे एक किलो गाजर स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
बारीक बारीक मुळा म्हणजेच गाजरावर कधीकधी आढळून येणारे सोनेरी रंगाचे धाग्यासारखे भाग काढून घ्या.

★तुमच्या जवळ असणाऱ्या बारीक किसणीने सर्व गाजरांचा कीस बनवून घ्या. (जर गाजरांची साईज फारच कमी असेल किंवा किसणी घरी अवेलेबल नसेल तर सर्व गाजरांचे छोटे छोटे तुकडे करा आणि नंतर ग्राइंडर मधून बारीक काढून घ्या)

★आता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवू शकता त्याने तो फार मऊसूत बनतो.
किंवा घट्ट झाकण बसेल अशा कढईतही आरामात गाजराचा हलवा बनतो.

★या स्टेजला जेव्हा तुम्ही कुकरमध्ये गाजराचा कीस ऍड करणार त्या अगोदर त्याच तुपात तुमच्याजवळ असणारे ड्रायफ्रूट्स हलके भाजून घ्या.वेगळ्या वाटीत काढून ठेवा.

★ सर्वात पहिले कुकरमध्ये अगदी दोन थेंब तेल घालून घ्या आणि त्यानंतर हवा तेवढा तुप, तूप गरम झाल्यानंतर त्यात आपण बनवलेला गाजराचा कीस ॲड करून घ्यायचा.

★मंद आचेवर पाच सात मिनिट हा कीस असाच हलवत राहायचा. थोड्यावेळाने हात लावून बघितल्यावर सगळा गाजराचा कीस गरम झाला असेल तोपर्यंत अशाच पद्धतीने शिजवून घ्या. पण ही कृती करत असताना सावध रहावे की कढईच्या किंवा कुकरच्या तळाला हा कीस लागू नये.

★आता जेव्हा आपल्याला वाटेल की गाजरातलं सगळं पाणी सुकल्या गेलेला आहे तेव्हा त्यामध्ये साखर घालून घेऊया.(काही जणांचा सल्ला असेल की आधी दूध किंवा क्रीम का नाही टाकली) तर तसे केल्यास, गाजर आणि साखर यात एक डिस्टन्स बनून राहतं त्यामुळे हवा तो गोडवा येत नाही. म्हणून आपण सगळ्यात अगोदर साखर ऍड केली आहे.

★अगदी ह्याच स्टेजला आपल्याला हवी असणाऱ्या कॉन्टीटीमध्ये इलायची पूड हलव्यामध्ये टाकून घ्या.

★आता साखर पूर्णपणे गाजरात विरघळत असतानाच यामध्ये गरजेनुसार (एक वाटी )दूध घालून घेऊया आणि घट्ट झाकण लावून दूध पूर्ण आटेपर्यंत , लो फ्लेमवर ही प्रक्रिया सुरू राहू द्या.

★दहा ते पंधरा मिनिटांनी झाकण उघडून पहा हलवा सुखा झाला असेल तेव्हा त्यामध्ये हलका गरम करून मावा किंवा फ्रेश क्रीम असेल तर तशीच ऍड करा.

★साईडला ठेवलेले ड्रायफ्रूट्स या स्टेजला यामध्ये मिक्स करा.
लक्षात घेण्यासारखी बाब आहे की ,सगळे ड्राय फ्रुट्स तेव्हा ऍड करायचे जेव्हा हलवा पूर्णपणे तयार असेल आणि हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं.

तर अशा पद्धतीने तयार आहे तुमचा अगदी रेस्टॉरंट स्टाईल पारंपारिक गाजराचा हलवा.खा आणि मस्त रहा .


- अंजली दिनकर औतकार