गहिवरला श्वास तू 8

नवरा बायको अन विश्वास
पण सावीला आता ते चॅलेंज डोळ्यासमोर फिरू लागलं..

श्रीधर माझा होता, माझाच राहील..त्याला पुन्हा मिळवणं माझ्यासाठी अशक्य नाही...

या विचाराने तिच्या डोक्यात प्लॅन्स सुरू झाले.

श्रीधर संध्याकाळी ऑफिसवरून घरी येत होता, त्याची वेळ सावीने माहीत करून घेतली आणि त्यावेळी बरोबर ती लिफ्टबाहेर घुटमळू लागली..गार्गीच्या हे लक्षात आलं. ती दारातच उभी राहिली आणि सावी कडे बघून हसू लागली..सावीला कळेना ही काय हसतेय..गार्गी मुद्दाम दाराआड अशी लपली की श्रीधरला ती दिसणार नाही...

श्रीधर लिफ्टमधून वर आला आणि लिफ्टचं दार उघडलं..समोर च्या आकृतीवरून ती सावी होती हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने नजर वर न करताच लिफ्टमधूनच गार्गीला आवाज द्यायला सुरुवात केली..

"गार्गी...अगं कुठे आहेस..आज तुला शॉपिंगला न्यायचं आहे ना??"

गार्गी दाराअडून बघत होती, सावीचे डोळे लाल झालेले, गार्गी तिच्याकडे बघून अजूनच हसू लागली... गार्गीचं चॅलेंज सावी सपशेल हरली होती.

श्रीधर आत आला आणि त्याने घाईगडबडीत दरवाजा लावला..

"काय डोक्याला कटकट आहे यार..ही बाई काय अशी समोरच उभी राहते??"

गार्गीला वाटत होतं की तिला दिलेल्या चॅलेंजबद्दल गार्गीला सांगावं, पण मग ती चिटिंग झाली असती..तिने मुद्दाम ते टाळलं...

सावी बरेच प्रयत्न करत होती श्रीधरला आपल्या जाळ्यात ओढण्याचा, पण गार्गीचा श्रीधरच तो, कसा बळी पडेल?

पण काळाने अशी एक परिस्थिती आणली की नवरा बायकोचा एकमेकावरचा विश्वास अगदी डळमळीत व्हावा..नियतीनेच त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं..🎭 Series Post

View all