गहिवरला श्वास तू 6

नवरा बायको अन विश्वास

श्रीधर घाईघाईने ऑफिसला निघून गेला. गार्गी घरातल्या कामात व्यस्त झाली. दूधवाला आला तसं तिने दार उघडलं, दूध घेतलं. समोरच्या फ्लॅटमध्ये काही माणसं सामान ने आन करत होती. तिने कुतूहलाने पाहिलं. एक नवीन भाडेकरू तिथे राहायला येत होते. पण ते कुठे दिसत नव्हते. ती आत गेली आणि आपल्या कामाला लागली.

संध्याकाळी श्रीधर कामावरून परत येत असतांना गार्गीने त्याला बरंच सामान सांगितलेलं. त्याच्याकडे बऱ्याच पिशव्या असणार, त्याला मदत करावी या हेतूने ती लिफ्टबाहेर उभी राहिली. जसा लिफ्टचा दरवाजा उघडला तसा तिला धक्का बसला. श्रीधर आणि सावी, दोघेही एकत्र..काही क्षण ती बघतच राहिली. श्रीधर पटकन घरात गेला. गार्गी सावीकडे बघत तिथेच उभी राहिली. सावी घाबरली होती पण धीर धरत गार्गीला म्हणाली,

"Hi.. मी सावी, तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये नवीनच राहायला आले आहे.."

गार्गीने हसतमुखाने मान डोलावली आणि म्हणाली,

"अच्छा...बरं काही मदत लागली तर सांगा नक्की.."

असं म्हणत दोघी आत गेल्या, सावीच्या मनात गार्गीचा चेहरा फिरत होता, "हीच का श्रीधरची बायको? किती सात्विक, सोज्वळ चेहरा आहे हिचा. श्रीधर हिच्यावर प्रेम करतो, हिच्याशी प्रेमाचे शब्द बोलतो, हिला कवेत घेतो... हा विचार तिच्या मनाला टोचत होता. पण ती काय करू शकणार होती?

गार्गी घरात आल्यावर तिच्या मनात विचारचक्र सुरू झालं. सावीची श्रीधरसोबत भेट घडवुन आणेपर्यंत ठीक होतं पण ही अशी समोरच राहायला आलीये म्हटल्यावर आता रोज नजरानजर होणार...

श्रीधर आणि सावीमध्ये जवळीक वाढेल अशी भीती गार्गीला नव्हती, तिला काळजी होती ती श्रीधरची..श्रीधरला सावीला सामोरं गेल्यावर कितीदा awkward वाटेल? कितीदा तो तिला avoid करू शकेल? त्याला बाहेर जाताना येताना कायम घाबरतच यावं लागेल. या काळजीने तिच्या मनात घर केलं.

काही दिवस सरले,

सावी तिच्या नवऱ्यासोबत खुश नव्हती हे दिसत होतं. बऱ्याचदा श्रीधर आणि सावीची नजरानजर होई, श्रीधर सावी कडे दुर्लक्ष करायचा हे बघून तिला अजून वाईट वाटायचं, आणि इकडे गार्गी ला हे बघून वाईट वाटायचं की सावीला किती वाईट वाटत असेल..

एकदा ती श्रीधरला म्हणाली,

"अरे सावी तुझ्या ओळखीची आहे, तिच्याकडे इतकं दुर्लक्षित नजरेने का पाहतो? दोन शब्द बोललास तर काय बिघडतं?"

"या लोकांना पण इथेच घर मिळालं वाटतं... काय रोजची कटकट आहे.."

श्रीधर वैतागायचा.पण नाईलाज होता.

एकदा श्रीधर घाईघाईने ऑफिसला जायला निघत होता, तोच दारात पाय घसरून पडला...

त्याची पडायची आणि सावीने दार उघडायची वेळ एकच..सावी धावत श्रीधरकडे आली..

"काय झालं? जास्त लागलंय का??"

श्रीधर घाबरला, त्याने गार्गीकडे पाहिलं..

गार्गी आपलं हसू दाबत होती. एक तर आधीच सावी जवळ राहतेय म्हणून श्रीधर वैतागलेला, त्यात आज हे..

सावीने गार्गीकडे पाहिलं, आपला नवरा पडला अन ही हसतेय?? तिला रागच आला..श्रीधर पटकन उठला,

"जास्त काही नाही, मी ठीक आहे.."

असं म्हणत निघून गेला,

आता मात्र सावी शांत राहिली नाही, गार्गीला ती म्हणाली,



🎭 Series Post

View all