गडद झाल्या तिन्हीसांजा भाग ६ अंतिम भाग.
मागील भागात आपण बघीतलं की मालतीने स्वतःच्या मुलाला विपूलला घर सोडण्याची नोटीस पाठवून धाडसी पाऊल उचललं. आता बघूया पुढे काय होईल.
विपूलला मालतीने वकीलाच्या मार्फत घर सोडून जाताना घरातील वस्तूही घरातच सोडून जाण्यास बजावलं. घर सोडण्यासाठी आठवड्याभराची मुदत दिली.
विपूलच्या हातात जेव्हा ही नोटीस पडली तेव्हा तो चक्रावला. आपली आई असं काही करेल असं विपूलला कधी वाटलच नाही. नोटीस वाचल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. विपूलचा चिंताक्रांत चेहरा बघून त्याच्या बायकोने रश्मीने विचारलं
" विपूल काय झालं?
"आईने हे घर सोडण्यासाठी नोटीस पाठवली आहे."
"काय? आईनी असं का केलं? "
"सात दिवसांत घर सोडायचं आहे. हो की नाही असं या नोटीसला उत्तर द्यायचं आहे.'
"बाई बाई कमाल झाली तुझ्या आईची. आपल्या पोटच्या पोराला घर सोडून जा सांगताना काहीच कसं वाटलं नाही?"
"मला आई असं काही करेल असं कधी वाटलं नव्हतं."
"आता काय करायचं?'
"मी नोटीसला ऊत्तर देण्याऐवजी आईला भेटून येतो."
"त्यांना म्हण तुम्ही तिथे शांतपणे जगा आणि आम्हाला इकडे जगू द्या. इथे होत्या तरी ताप होता डोक्याला आता इथे नाही तरी ताप आहेच."
"तू त्रास करून घेऊ नको. ऑफीसमधूनघरी येताना तिला भेटून येईन. मी आज जमलं तर आजच जाईन. कारण नंतर मंथ एन्ड मुळे दोनतीन दिवस जमणार नाही. मी आज ऑफीसमध्ये कामाने खूप थकलोय. जरा वेळ पडतो. जेवायची वेळ झाली की आवाज दे."
एवढं बोलून विपूल विमनस्क मन: स्थितीत आपल्या खोलीत गेला.
एवढं बोलून विपूल विमनस्क मन: स्थितीत आपल्या खोलीत गेला.
विपूल कामापेक्षा या कोर्टाच्या नोटिसीमुळेच जास्त थकला.
रश्मी स्वयंपाक घरात स्वयंपाकची तयारी करायला गेली. स्वयंपाक करताना तिच्या डोक्यात आता काय करायचं हेच फिरत होतं.
****
मालतीने दोन तीन दिवस विपूलच्या उत्तराची वाट बघीतली. विपूलचं उत्तर किंवा फोन काहीच आलं नाही. अजून दोन दिवस वाट बघून मालतीने रामटेके वकिलांना फोन करायचं निश्चित केलं.
त्याच संध्याकाळी विपूल मालतीला भेटायला आला.विपूलला बघून मालतीला मनातच हसायला आलं.
विपूल खोलीत आला आणि म्हणाला,
विपूल खोलीत आला आणि म्हणाला,
" आई तू मला कोर्टाची नोटीस पाठवलीस मी घर सोडावं म्हणून."
"हो. कधी सोडणार घर?" मालतीने निर्विकारपणे विचारलं.
"हो. कधी सोडणार घर?" मालतीने निर्विकारपणे विचारलं.
"आई अग मी तुझा मुलगा आहे." विपूलच्या आवाजात अजीजी होती.
"हो का मला वाटलं मी निपुत्रिक आहे."
"आई काहीतरी काय बोलते." विपूल त्रासिक सुरात म्हणाला.
"मग काय बोलू?"
"तू मला नोटीस का पाठवली सांग?"
"मला त्या घरात राह्यला यायचं आहे म्हणून मला घर रिकामं करून हवंय."
मालती ठाम स्वरात म्हणाली.
मालती ठाम स्वरात म्हणाली.
"अगं मग येनं. आमच्या बरोबर रहायला."
"नाही मला एकटीलाच राह्यचं आहे."
"आई हा कसला बालिशपणा आहे?"
"मी करतेय तो बालिशपणा आणि तू केलं ते काय?"
"मी काय केलं?"
"तू काय केलं? मला इथे वृद्धाश्रमात ठेऊन स्वतः त्या घरात चैनीत राहतोय. हा तुझा शहाणपणा आहे?"
"तुझ्या स्वभावामुळे तुला मी इथे आणून सोडलं."
"माझ्या स्वभावामुळे? काय असं विचीत्र लागले? इतकी वर्षे हीच आई प्रिय होती. लग्न झाल्या वर नावडती झाली. विपूल तुझ्या आणि रश्मीच्या विचीत्र वागणूकीमुळे मला ही कोर्टाची नोटीस पाठविली लागली. मी कष्ट करून,पै पै जमवून हा प्लाॅट घेऊन त्यावर घर बांधलं ते माझ्या हक्काचं घर तुम्ही फुकट वापरतात हेच मला नकोय."
"आई हे तू जरा जास्तच बोलतेय."
"जास्त नाही योग्य बोलतेय. मला माझं घर परत कर. तुम्ही कुठेही राह्यला जा ."
"इतकी कठोर झालीस तू?"
"तुझं हृदय कोमल आहे म्हणून मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडलंस? सात दिवसांत घर रिकामं कर अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल."
एवढं बोलून मालती निर्विकारपणे हातातील काम करत राहिली.
मालतीच्या या त्रयस्थ वागण्यामुळे विपूल भांबावला.
विपूल आणि मालतीचा वाद ऐकत पलंगावर बसलेली जानकी अवघडलई. तेवढ्यात त्यांचं लक्ष जानकी कडे गेलं. इतक्या वेळ या खोलीत दुसरं कोणी आहे हे विपूलच्या लक्षात आलं नाही. त्याला फार अवघडल्यासारखं झालं.
" बोलणं झालं असेल तर नीघ. घर रिकामं केलं की घराची किल्ली माझ्या हवाली कर."
मालतीचा एकदम निर्वाणीचा सूर लागला होता. विपूलच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्याला कधी शंका आली नाही की आई असा काही निर्णय घेईल.
विपुलच्या डोळ्यासमोरून भूतकाळ सरकला. त्याचं लग्न झाल्यावर काही महिने रश्मी नीट वागली नंतर तिचे नखरे सुरू झाले. विपूल गोंधळला कोणाच्या बाजूने बोलावं आईच्या की बायकोच्या?
जिने आपल्याला जन्म दिला. आपल्याला वाढवताना बराच संघर्ष केला, आपल्यावर चांगले संस्कार केले तिची बाजू घ्यावी की जी आपल्या आयुष्यात गोड संमोहित क्षण घेऊन आली आहे, जिच्या बरोबर पुढे भविष्यातील अनेक धेय्य साध्य करायचे आहे तिची बाजू घ्यावी.
शेवटी तरूण, संमोहित क्षणांच्या धुंद विळख्यात अडकून विपूलने जुन्या जर्जर झालेल्या आधारवडाला सोडण्याचा निर्णय घेतला.
मालतीने हा निर्णय घेतल्यावर विपूलच्या लक्षात आलं की आपण दोन्ही बाजूंमध्ये संतूलन साधण्यात कमी पडलो. आपण एकाच प्रवाहात वहात गेलो. जो आपल्याला आवडला. आपल्यासाठी कष्ट घेतलेल्या आधार वडाच्या सावलीला आपण स्वतः हून दूर लोटलं. पण आता वेळ गेली होती. आता कितीही विनवणी केली तरी हा आधार वड आता आपल्याला सावली देणार नाही.हे विपूलच्या लक्षात आलं.
सत्य परिस्थिती लक्षात आल्यावर जड पावलांनी विपूल उठला. मालती कडे गेला तिच्या पायावर डोकं ठेवून माफी मागून झटकन खोलीबाहेर गेला.
विपूल निघून गेल्यावर मालतीचा बांध फुटला. तिच्या आवाजाने जानकी भानावर आली आणि ती चटकन उठून मालतीजवळ गेलीं.मालतीला जानकीने आपल्या मिठीत घेऊन तिला थोपटू लागली.
***
बराच वेळाने मालती भानावर आली. तिने चटकन आपले डोळे कोरडे केले.
" जानकी आज हे नातं संपलं. तू माझी नातेवाईक होशील नं शेवटपर्यंत?"
मालतीने भावूक पणे विचारलं.
" मालती तूच माझी सख्खी बहीण आहेस. आता माझे रक्ताचे नाते तरी कुठे राह्यले? मी एकटीच आहे पुढील आयुष्यात. आपण दोघी एकमेकींना सोडू नाही."
जानकी मालतीच्या हातावर थोपटत म्हणाली.
" जानकी विपूल ने घर रिकामं केलं की त्या घरात आपण दोघी राह्यला जायचं. "
" तुझ्या घरात?"
जानकीने आश्चर्याने विचारलं.
" हो. आणखी एक लक्षात ठेव आपण आपल्या सारख्या वयस्कर लोकांसाठी काम करायचं. आपल्या दोघींपैकी कोणीतरी एक आधी जाणार. ती गेली म्हणून दुसरीने अस्वस्थ राह्यचं नाही आपलं काम पुढे चालू ठेवायचं. जी मागे राहील तिच्या शेवटच्या दिवसात सुखानंद वृद्धाश्रम काळजी घेईल."
" ते का घेतील? आपण तर त्यांचा वृद्धाश्रम सोडून जाणार."
" मी सगळी लिखापडी करून ठेवणार आहे. माझं घर हे आपल्या दोघींच्या नावाने करणार आहे. आपल्या दोघींच्या मृत्यू नंतर मी हे घर माझ्या नातवाच्या नावावर करणार आहे."
मालती एकदम ठाम स्वरात बोलत होती. तिचं बोलणं ऐकून जानकीला खूप आश्चर्य वाटलं.
" मालती तू एवढा पुढचा विचार कधी केला?"
" जेव्हा तू मला भेटलीस. तुझ्या रुपाने मला जगण्याची उमेद मिळाली. तेव्हाच हे सगळं मी ठरवलं. मध्ये मी दोन चार वेळेला रामटेके वकीलांच्या ऑफीसमध्ये जाऊन यावर चर्चा केली. नंतर निर्णय घेतला."
" बापरे तू मला प्रत्येक वेळी वेगवगळी काम सांगून बाहेर गेलीस ते रामटेके वकीलांच्या ऑफीसमध्ये गेली होतीस?"
" हो.आता मी निश्चिंत झाले."
जानकी मालतीच्या हुशार चाणाक्ष पणाने खूपच प्रभावित झाली.
मालती अचानक जानकीच्या गळ्यात हात टाकून म्हणाली,
मालती अचानक जानकीच्या गळ्यात हात टाकून म्हणाली,
आम्ही चिमण्या जोडीच्या. आम्ही एकाच फांदीवर राहणार. हक्काच्या फांदीवर मनसोक्त झुलणार. "
एवढं बोलून मालती हसायला लागली.तिच्या सुरात सूर मिसळून जानकी पण हसायला लागली.
***
काही दिवसांत मालती जानकीला घेऊन आपल्या घरात राह्यला गेली.
काही दिवसांत मालती जानकीला घेऊन आपल्या घरात राह्यला गेली.
मालतीने ठाम राहून स्वतःच्या घरात राहणं पसंत केलं.आपला बसायचा पाट तिने परत मिळवला.
_______________________________
समाप्त.
_______________________________
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा