अंत्यविधी

Always enjoy each moment of life

अंत्यविधी

अंत्यविधी म्हणजे, प्रत्येकाच्या आयुष्यातला अंतिम विधी. जेव्हा एखाद्या बालकाच्या रूपाने ,मनुष्य जन्माला येतो, तेव्हा आईच्या पोटात एखाद्या आत्म्याने बाळाच्या रुपात वास्तव्य केलेले असते.

ते बाळ जन्माला आल्यानंतर, लहानाचे मोठे होते, मोठे होत असताना, खूप सार्‍या अग्निदिव्यातून जाते, त्यातून काही चांगल्या मार्गाने जातात, तर काही वाईट मार्गाने.

 प्रत्येक माणूस, आयुष्य कोणत्या मार्गाने जगला ,हे खूप महत्त्वाचे असते .प्रत्येक जण स्वतःसाठी तर जगतोच, पण स्वार्थ साधता साधता, ज्याला परमार्थ साधता येतो, तोच जीवनात आनंदी व समाधान पावलेला असतो. जोपर्यंत मनुष्य देहात आत्मा असतो, तोपर्यंत तो व्यक्ती जिवंत असतो ,ज्यावेळी एखादी व्यक्ती मरते, तेव्हा तिच्या शरीरातून आत्मा निघून जातो आणि त्या शरीराला कोणत्याही प्रकारचे किंमत राहत नाही. आत्म्याविना शरीर म्हणजे सुर्याविना पृथ्वी, सूर्य जसा पृथ्वीला प्रकाश देतो आणि त्यातून जगण्याची नवी चेतना मिळते, तसेच आत्मा जेव्हा शरीरात असतो, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला काही ना काही तरी करण्याची उमेद असते.

आत्मा शरीराला काय करायचे, त्याचे मार्गदर्शन करत असतो, म्हणून तर एकदा का आत्मा शरीरातून निघून गेला, की त्या शरीराला फक्त बॉडी म्हणतात आणि ती बॉडी काहीही करू शकत नाही ,म्हणूनच तिला अंत्यविधीच्या विधीत ,अग्नीला समर्पित करतात. एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर, त्यांचे नातेवाईक मात्र खूप रडतात, वेगवेगळ्या आठवणी काढतात, हे सगळं ती व्यक्ती आयुष्यात कशी वागली, यावर अवलंबून असतं ,पण कधीकधी काही लोक जिवंत असताना, कधी भेटत नाहीत, पण मेल्यानंतर मात्र, जसं काही खूप प्रेम होतं ,असं दाखवून रडतात, पण मला तरी वाटतं जोपर्यंत माणूस जिवंत आहे , तोपर्यंत त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणे ,त्याला भेटायला जाणे, हे करायला हवं.

 मेल्यानंतर तुम्ही किती रडता ,हे बघायला कुणीही येत नाही ,ते फक्त समाजाला दाखवण्यासाठी असतं ,असं थोतांड करणाऱ्यांचा, मला खूप राग येतो. देह अग्नीत जळून खाक होतो आणि आत्मा परमात्म्यात विलीन होतो ,असं म्हणतात ,देव आहे की नाही, हे माहीत नाही, पण एक अनामिक शक्ती मात्र आहे, की जिचा आपल्या आयुष्यावर कंट्रोल आहे ,हे मलाही मान्य आहे ,मग त्या अनामिक शक्तीला कुणी देव म्हणून संबोधते, तर कुणी परमात्मा म्हणतात .अंत्यविधीचा विधी होत असताना , मनुष्य स्वतःसोबत ,कोणतंही धन-दौलत घेऊन जात नाही, मात्र तो आपल्या कर्माने नेहमी इतरांच्या लक्षात राहतो, हे सगळ्यांनाच माहीत असते ,तरी काही लोक खुप लालची असतात, म्हणून प्रत्येकाने आपले कर्म चांगले ठेवावे.

 लेख आवडला असेल, तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

धन्यवाद.

रूपाली थोरात.