Login

निखाऱ्यातली फुलं-4

प्रेरणादायी कथा
अखेर कार्यक्रम संपला, सर्वजण घरी जायला निघाले..गायत्री गाडीत बसणार एवढयात मायराने तिला हाक मारली,

"गायत्री.."

मायराला बघून गायत्रीला खूप आनंद झाला,

"मायरा? तू इथे?"

"हो, मीही बसले होते या गर्दीत.."

मायराने गायत्रीला घरी यायचा आग्रह केला, गायत्रीने लगेच होकार दिला आणि दोघीही मायराच्या घरी गेल्या. घरी जाताच पाहिलं की तिची मुलगी उठली होती आणि घरी थांबलेली मैत्रीण वैतागून म्हणाली,

"किती फोन केले मी तुला.."

"अरे देवा, कार्यक्रमात फोन सायलेंट होता माझा."

ती मैत्रीण सुस्कारा टाकत निघून गेली, मायराने मुलीला शांत केलं, खाऊ घातलं तशी ती खेळायला लागली..

"किती गोड आहे तुझी मुलगी.."

"तुला नाही का अजून मूल?"

"आहे ना, माझा सार्थक.. सहा वर्षाचा होईल आता.."

"तरी लहानच ना, त्याला नाही आणलं सोबत?"

"नाही, शाळेत गेलाय.."

"मग त्याला घ्यायला सोडायला?"

"घरी सासू सासरे आहेत, दिर आहेत, जावा आहेत..कुणीही जाऊन आणेल त्याला.."

"गायत्री मी तुझ्या आईला एकदा फोन केलेला..तेव्हा कळलं तुझा मोबाईल खराब झालाय..हेही कळलं की तू संसारात चांगलीच अडकली आहेस..पण मग एवढं सगळं असतांना तू ही कंपनी कधी सुरू केलीस? त्यातही एव्हढा नावलौकिक कसा मिळवलास??" मायराला राहवलं नव्हतं आणि एका दमात तिने सगळं विचारलं..

"बरोबर आहे तुझं..सासरी मी खुप अडकले होते..दिवसभर घरातील कामं.. त्यात एवढी लोकं सांभाळणं, खूप कठीण गेलं.."

"मग तरी हे सगळं.."

"सासूबाईंनी स्पष्ट सांगितलं होतं, की घराबाहेर तासनतास राहून नोकरी करायची नाही...जावेने सांगितलं, की घरातली कामं वेळेवर व्हायला हवी..माझे पुतणे दिवसभर घरात धिंगाणा घालतात अजूनही.."

"मग कसं केलंस हे सर्व?"

"अगं त्यांनी इतकी बंधनं घातली म्हणूनच तर हे सगळं शक्य झालं.."

"ते कसं?"

"नोकरीस सासूबाईंनी नकार दिला, म्हणून मी घरूनच काम सुरू केलं..सर्वप्रथम माझ्याच घराचं डिझाइनचं काम केलं..ते बघून घरचे खुश झाले..मला बाहेरूनही ऑर्डर येऊ लागल्या.."

"मग त्यांनी करू दिलं?"

"हो मग, जावेने सांगितलं होतं की घरकाम चुकवायचं नाही...त्यामुळे सकाळी लवकर उठून कामं आवरायची सवय लागली..चांगलाच व्यायाम व्हायचा...आणि वेळेवर कामं व्हायची..मग मला 11 नंतर भरपूर वेळ मिळायचा.. तेव्हा मी घरीच ऑफिस सुरू केलं..घरातली कामं झाल्यामुळे फावल्या वेळात काहीही केलं तरी घरच्यांना काही अडचण नव्हती.."
क्रमशः


🎭 Series Post

View all