काम घरून करायचं होतं आणि फक्त साईट visit ला ऑफिसला जायचं असं कामाचं स्वरूप होतं. तिने ऑनलाइन मुलाखत दिली आणि तिची निवड झाली. साईट visit च्या वेळी तिची चांगलीच धावपळ व्हायची. घरातलं सगळं आवरून, मुलीचं आवरून तिला सोबत घेऊन जावं लागायचं. मुलीचं नेमकं मधेच रडगाणं सुरू होई, तेव्हा तिच्या मॅनेजरने लहान मुलांना सोबत न आणण्यास बजावलं.
मायरावर खूप कठीण परिस्थिती ओढावली होती, पण तिला समाधान होतं की किमान एवढं तरी मी करू शकले, तिची मैत्रीण गायत्री..तिला तर लग्नानंतर साधी नोकरीही करता आली नाही..तिची तर काय अवस्था असेल?
तेवढ्यात तिच्या मॅनेजरचा फोन आला,
"हॅलो मॅडम, आज अचानक आपली visit फिक्स झालीये एका ठिकाणी..तिथे इंटेरिअर डिझायनर्स कौन्सिलचे लोकं येणारेत..तयारीत रहा.."
मायरा समोर यक्षप्रश्न उभा राहिला,
एक तर मुलगी नुकतीच झोपली होती, रात्रभर तिने जागरण केल्यामुळे आता तिच्यासोबतच झोप काढायचा तिचा विचार होता, घरातली कामं तशीच पडलेली..चेहऱ्यावर खूप आळस होता..एका क्षणासाठी तिला वाटलेलं, सासू सासरे जवळ असते तर किती बरं झालं असतं!
तिने कशीबशी तयारी केली, शेजारीच तिची एक मैत्रीण होती, rila विनंती करून मुलीजवळ तासभर बसायला सांगितलं..आढेवेढे घेत ती तयार झाली.
मायरा तिचं आटोपून तिच्या टीम सोबत गेली. तिथे बरीच मोठी मंडळी आली होती. संपूर्ण देशभरातील इंटेरिअर डिझायनर्स represnt करणारी अध्यक्ष मंडळी तिथे होती. मायरा तिच्या टीम सोबत खुर्चीत जाऊन बसली...
संचालकांनी घोषणा केली,
"आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या, गायत्रीज आर्टस् च्या संस्थापिका मिसेस गायत्री गोडबोले यांनी कृपया अध्यक्षपदाच्या खुर्चीवर स्थानापन्न व्हावे.."
नाव ऐकताच मायराच्या अंगावर काटा उभा राहिला..
"गायत्री??"
गायत्री दिमाखात येऊन स्टेजवर बसते, सर्वजण टाळ्या वाजवतात..
"तर...मिसेस गायत्री यांनी फार कमी वेळात आपल्या कंपनीला यशाच्या शिखरावर पोचवले आहे..देशातच नाही तर देशाबाहेरही त्यांचा नावलौकिक झाला असून आपले आजचे अध्यक्षपद स्वीकारले याचा आम्हाला विशेष आनंद आहे.."
गायत्रीचा सन्मान, तिचं कर्तृत्व ऐकून मायराला विश्वासच बसेना..
कार्यक्रम झाला, सर्व मंडळी जेवायला गेली. मायराला आपल्या मैत्रिणीला भेटायचं होतं पण सर्व मॅनेजमेंटचा स्टाफ वेगळा बसला होता..त्यांच्यासाठी विशेष आयोजन होते..आणि कर्मचारी आपल्या वेगळ्या जागेवर.
मायरा गायत्रीला फोन लावत होती पण फोन बंद येत होता, कदाचित तिने आपला नंबर बदलला असावा..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा