Login

निखाऱ्यातली फुलं-2

प्रेरणादायी कथा
मायरा आणि तिचा नवरा असे दोघेच फ्लॅटवर राहायचे. तिने गेल्या गेल्या कामासाठी बायका पाहिल्या, आपल्या नोकरीची सोय केली आणि आयुष्य सुकर केलं.

सकाळी उशिरा उठायचं, बाई येऊन नाष्टा स्वयंपाक बनवून जायची, दुसरी बाई येऊन धुणं, भांडी, झाडू, फरशी करून जायची..मायरा फक्त स्वतःसाठी आणि नवऱ्यासाठी चहा बनवे आणि आवरून ऑफिसला जाई. घरी आल्यावर जेवण तयार असायचं.. जेवण केलं, फिरणं हिंडणं झालं की दिवस संपला..

आपलं आयुष्य किती सुखी आहे या विचाराने मायरा खुश होती, याउलट गायत्रीचं काय होत असेल या विचाराने तिला धास्ती वाटायची. गायत्रीचं लग्न झाल्यापासून तिचा साधा फोनही येईना. नंतर नंतर तर तिचा फोनही बंद लागायचा.

एके दिवशी मायराने न राहवून गायत्रीच्या आईला फोन केला,

"हॅलो मावशी..गायत्रीचा फोन लागत नाहीये.. काय झालंय?"

"अगं तिच्या पुतण्याने तिचा मोबाईल पाण्यात पाडला.. बंद आहे मोबाईल.."

मायराने कपाळावर हात मारला..

"हेच होणार माहीत होतं मला.." मायरा मनातल्या मनात म्हणाली..

"तुझं काय चाललंय बेटा?"

"मी इथे जयपूर ला असते..जॉब सुरू आहे माझा.."- मायरा

"अच्छा..गायत्रीला पण म्हटलं मी की जॉब सुरू कर..पण ती आता जॉब करायला नाहीच म्हणतेय.."- आई

"का?"- मायरा

"घरातली कामच संपत नाहीत गं तिच्या..त्यात तिची मोठी जाऊ, चांगलीच आगाऊ आहे..गायत्रीला सारखं या ना त्या कामात गुंतवून ठेवते..तिची सासू जावेच्या शब्दाबाहेर नाही. पुतणे तर दिवसभर घरात धिंगाणा घालतात..दिर, नणंद बाहेर जातात त्यांना वेळेवर डबे, वेळेवर नाष्टा... वेळच पुरत नाही तिला.."

हे ऐकून मायराने फोन ठेवला आणि स्वतःशीच बोलू लागली..

"मी सांगत होते..सांगत होते नको करू अश्या ठिकाणी लग्न...पण नाही ना, स्वतःला मोठी तत्त्ववेत्ता समजते ही..नाही ऐकलं माझं.."

मायराला रागही येत होता आणि दुसरीकडे आपला निर्णय किती योग्य होता हेही जाणवू लागलेलं. 2-3 वर्ष गेली, मायरा आणि गायत्रीचा आता संपर्कच तुटला होता..मायराला दिवस गेले. प्रेग्नंन्सी सोपी नव्हती, तिला बेड रेस्ट सांगितली होती. तिचं वजन खूप वाढलं असल्याने आणि व्यायामाचा अभाव असल्याने तिला बऱ्याच शारीरिक तक्रारी जाणवू लागल्या होत्या. मोठ्या त्रासानंतर तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला, आता पूर्णवेळ त्या मुलीमागेच जायचा.

मायराचा जॉब सुटल्याने पैशाची कमतरता जाणवत होती. घरातल्या कामवाल्या बायकांना पगार द्यायला शिल्लक उरेना, नवऱ्याचा पैसा घरखर्च आणि हफ्ता भरण्यात जायचा. तिने स्वयंपाकिण बाई कमी केली, आता तिला स्वतःला सगळं बनवावं लागे.

ती कामं आणि वरून मुलीकडे लक्ष देणं प्रचंड जिकिरीचं होऊ लागलेलं. स्वयंपाकाची सवय नसल्याने तिला चांगलं असं बनवता येईना, कच्चं राहायचं किंवा तिखट मीठ कमी व्हायचं..त्यामुळे आता नवऱ्याच्याही तक्रारी वाढू लागलेल्या.

मुलगी चांगलीच खेळकर असल्याने तिला एकटं सोडता येईना..पाळणाघरात ठेऊन कामावर जायचं मायराने ठरवलं..कारण पैसे हातात आले तर किमान घरखर्च सुटेल.. आता असंही स्वतः कमवत नसल्याने तिला बऱ्याच अडचणी येत असायच्या. त्यात बाहेरचं खाऊन, अवेळी खाऊन तब्येत सुटली होती आणि शारीरिक तक्रारीही सुरू झालेल्या.

मोठ्या मुश्किलीने तिने एक काम पाहिलं..