Friendship

Friends forever

   मैत्री
      तिला इयत्ता नसते,   तिला तुकडी नसते,
      जिला वर्ग नसतो, ती मैत्री असते

      तिला जात नसते,   तिला पात नसते,
       जिल्हा धर्म नसतो ,ती मैत्री असते

       तिला जीत नसते, तिला हार नसते
       जिला व्यवहार नसतो, ती मैत्री असते

       तिला मोज नसते, तिला माफ नसते
        जिला गर्व नसतो, ती मैत्री असते
    मैत्री, यारी, दोस्ती या विषयावर लिहावं तेवढं थोडंच आहे. प्रत्येकाची मैत्रीची व्याख्या वेगवेगळी असू शकते पण मैत्री हे नातं ज्या व्यक्तीमुळे निर्माण होतं तिला आपण मित्र सखा दोस्त यार असं काहीही म्हणू शकतो. पण खरंच मित्र कोणाला म्हणावं? असं वाटतं ना कधी कधी मनात तेव्हा ,
         ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना संकोच वाटत नाही, खोटे बोलावेसे वाटत नाही, फसवावेसे वाटत नाही,,,,, पाप-पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही..,,
         ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो ,ज्याच्याजवळ पराभवाचे शैल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुख-दुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो तो खरा मित्र..,.......
        मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच......!!!
       मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही.
        म्हणूनच अशी मैत्री करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे.
          "मैत्री म्हणजे दोन जीवाचा विसावा,
          गुजगोष्टी आणि निर्मळ झऱ्याचा
           छोटासा कालवा.,...........
     मैत्री हा विषयच इतका मोठा, आणि आशय घन आहे की त्यावर कितीही लिहिलं तरीही आणखीन लिहावंच वाटणार. बालपणी आपण ज्या आपल्या सवंगड्यांसोबत खेळतो ते आपले पहिले मित्र असतात. त्यानंतर शाळा, मग कॉलेज आणि कधी नोकरी अथवा व्यवसायाच्या निमित्ताने मिळणारे समविचारी लोक यांच्याशी आपली मैत्री कधी घट्ट होते ते कळतच नाही.
           मैत्री ही समविचारी, समान आवड किंवा कधीकधी समान कार्यक्षेत्र असल्याने जुळून यायला वेळ लागत नाही.
            शाळेतली दिवस खूप सुंदर असतात. कुठलंही टेन्शन नसतं, कुटुंबाची जबाबदारी, नोकरी व्यवसायातले तांण, जोडीदाराशी मतभेद असले कुठलेच काळजीच्या धाग्यांनी आपण बांधले गेलो नसतो. आपलं मन अगदी निरागस, फुलपाखरासारखं असतं. त्यामुळे या काळात होणाऱ्या गोष्टी निरंतर आयुष्यभर सोबत करतात. याच काळात जर चांगले, जिवलग, मनमिळावू दोस्त मिळाले तर सांगायलाच नको.
              कधीकधी ही शालेय जीवनातली मैत्री आयुष्यभर सोबत करते, तर कधी कधी उच्च शिक्षण, नोकरी व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे, बरेचदा शालेय मित्र मागे पडतात, पण एखाद्या निवांत क्षणी भूतकाळात डोकावलं तर आठवणींच्या फुलांवर हे मित्र स्वच्छंदीपणे विहार करत असतात.

                   मैत्री असते एक साठवण,.  
                मनाने मनाला दिलेली एक आठवण,
                 त्या आठवणी कधी कधी
                 डोळ्यात पाणी सोडून जातात
                जशी फुलपाखरं बोटांवर
                रंग ठेवून निघून जातात.
       बालपणात आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत मज्जा केलेली असते. त्यांच्याबरोबर प्रत्येक क्षण भरभरून जगलेलं असतो. कधी एक चॉकलेट दोघांनी मिळून अर्ध खाल्लं असतं, तर कधी एकाने डबा आणला नाही तर दुसरा त्याला स्वतः खाऊ घालतो. अभ्यास, होमवर्क, शाळेची सहल, स्काऊट आणि गाईड चे कॅम्प यामध्ये आपल्या मैत्रीच्या कंपूने जी धम्माल केलेली असते ती मनात सतत कुठेतरी आठवत राहते.
       
                  कभी झगडा ,कभी मस्ती
                  कभी आॱसु ,कभी हसी
                   छोटासा पल, छोटी छोटी खुशी
           एक प्यार की कशती , और ढेर सार मस्ती
            बस इसी का नाम ,तो है दोस्ती
          एका संशोधनानुसार जर मित्र सकारात्मक असतील तर आनंदाचा पाठवा बहरतो. ज्यांना मित्र नसतात किंवा कमी असतात त्यांच्या आयुष्यात आनंद कमी असतो, ऑस्ट्रेलियातील स्टडी ऑफ एजिंग च्या मते आयुष्यात आनंद वाढवायचा असेल तर मित्रांची संख्या वाढवा. संशोधकां नुसार आनंद व आपला मूड आशादायी करण्यासाठी मित्रांची आवश्यकता असते. संशोधक प्रमुख प्रोफेसर लोप फोर्ट म्हणतात ,"कुटुंबातील सदस्य व मित्रांचे सख्य, आपलेपणा यामुळे आयुष्यावर विलक्षण प्रभाव पडतो, जास्तीत जास्त मित्र सोबत असल्यास आयुष्यात येणाऱ्या चढ-उतार यांना खूप सहज सामोरे जाता येते. या संशोधनासाठी त्यांनी पंधरा हजारांहून अधिक लोकांचे निरीक्षण केले अभ्यासातून त्यांना असे आढळले की "धनसंपत्ती, राहणीमानाची साधने या घटकांपेक्षा लोकांना आपले मित्र आणि कुटुंबात जास्त आनंद आणि विश्वास मीळतो. 
                 फुर्सत मिले तो देख लेना
                  रिश्तों की किताब खोलकर
                 दोस्ती हर रिश्ते से
                  लाजवाब होती है
       आयुष्यातली काही काही नाती ही शब्दांमध्ये किंवा ना त्यांच्या चौकटीत बसत नाहीत. कधी त्यात लिंगभेद असतो तर कधी वयाचा लहान मोठेपणा. कधी तिथे व्यावसायिक पातळीचा प्रश्न असतो तर कधी सामाजिक बांधिलकीचा, पण तरीही कृष्ण सुदामा, किंवा द्रोपदी कृष्णाची मैत्री ही मैत्री ची काही आदर्श उदाहरण आहेत. त्यामुळे च
                  "  तुझ्या माझ्या मैत्रीचं नातं
                    जगाला कळत नाही आणि
                   जगाला काही सांगायला
                    आपलंही मन वळत नाही."
        
     त्यामुळे कुठं लहि रक्ताच नातं नसतांना, जुळून येणारे रेशीम बंध म्हणजे मैत्रीचे धागे.

             शेवटी काय मित्रांनो
          "दोस्ती सिर्फ पास होने का नाम नही
            अगर तुम दूर रहकर भी, हमे याद करो
            इससे बडा हमारे लिए, कोई इनाम नही
   

🎭 Series Post

View all