निरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 5

Friendship Story

" कमाल आहे एवढी शांतता का आज? काय झालं असं अचानक भेटायला बोलावलस?" सायलीने त्याला विचारलं.
" मला...... मला बेंगलोरला जॉब मिळाला आहे. मी एवढे दिवस त्यासाठी प्रयत्न करत होतो. त्यांनी इंटरव्हूय घेऊन माझी निवड पण केली."
" वाव! दिस इज रियली गुड न्यूज. अभिनंदन " त्याचं अभिनंदन करित ती म्हणाली. "पण मग तू आता इथे नसणार ना!"
"हो, दिवस किती भुर्रकन निघून जातात ना. खरंतर सुख दुःख आनंद शेअर करायची इतकी सवय झालीय आता." समर 
तिने स्वतःचे डोळे पुसले. " हा गोल्डन चान्स आहे. तुझी स्वप्न पुर्ण होतील. तुझे बाबा त्यांनी किती केलं आहे तुझ्यासाठी मम्मी नसताना. त्यांना किती आनंद होईल."
" हो गं. पण तुम्हा सगळ्यांना सोडून जाणं नको वाटतं. बाबा आता एकटेच असतील एवढ्या मोठ्या घरात."
" पण बिण कुछ नही, तू बेंगलोरला जाणार आहेस. उलट मी, आपले फ्रेंन्ड्स सगळ्यांनाच आनंद होईल तुझी स्वप्नं पुर्ण होतील. तू बेंगलोरला गेलास तरी आपल्या मैत्रीत दरी निर्माण नाही होणार.आणि मोबाईल, कंम्युटरने तर सगळंच शक्य आहे."
" हो मी जाईन. सायली थँक्स. तुझ्यामुळे मला आधार वाटतो नेहमीच." त्याच्या डोळ्यात आसु तरळले.
" जस्ट डोन्ट व्हरी." ती आश्वासकपणे म्हणाली.
.............

     अखेर बाबा आणि सायलीचा निरोप घेऊन समर बेंगलोरला जायला निघाला. विमानातून जाताना अनेक विचार मनात येत होते. तो भुतकाळाच्या स्मृतीत रमला. सायली आणि त्याची पहिली भेट त्याला आठवली. जशीच्या तशी. सगळ्यांची आठवण येत होती. डोळे वहायचे थांबत नव्हते.

दोन तीन दिवस झाले तरि समरचा फोन नाही,मेसेज नाही. कसं असेल त्याचं नवं अॉफिस, नव्या माणसात, नव्या जागी रुळला असेल. बिझी असेल. असे विचार सायलीच्या मनात यायचे. 
एके रात्री ती एकटक भिंतीवरील त्या पेंन्टिंगकडे पाहत होती. समरला फोन करावा का असंही मनात आलं. मनात हलकासा विचार आला, तो विसरला असेल कदाचित. तेवढ्यात टेबलवरचा मोबाईल वाजला. एवढ्या रात्री कुणाचा मेसेज म्हणून तिनं मेसेज बॉक्स अॉपन केला. ' Our Friendship is Heart of Our Life, Nobody can explain it, Nobody can break it.' समरचा मेसेज पाहुन तिचे डोळे आनंदले. समोरच्या पेंन्टिंगवरून तिने एकवार हात फिरवला. तिचे अश्रु आनंदाने ओघळत होते. तिने पटकन 'थँक्यु 'चा रिप्लाय पाठवला आणि शांतपणे झोपी गेली.

समाप्त 

🎭 Series Post

View all