सखी...एक अनोखं नातं.

Best Friend
स्त्री ही जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या नात्यांना निभवित असते.अनेक भूमिका पार पाडीत असते.आईवडिलांची मुलगी,भावाबहिणींची बहिण,पतीची पत्नी, सासूसासऱ्यांची सून,दीरनणंद यांची वहिनी आणि आपल्या मुलांची आई इ.तसेचं ती अजून एक नातं जोडत असते,जपत असते आणि ते म्हणजे सखीचं..
सखी म्हणजे काय ?सखी म्हणजे मैत्रीण! लहाणपणी आपण ज्यांच्या बरोबर खेळतो,हसतो,बागडतो,आनंदाचे क्षण एकत्र घालवतो.ते आपले मित्रमैत्रिणी, सवंगडी! आपण या सर्वांबरोबर आनंदाने राहतो,सर्वांशी आपले छान जमते.पण प्रत्येकाशी चं आपण आपले मन मोकळे करीत नाही. काही ठराविक व्यक्तींशी चं आपण मनाने जोडले जातो,त्यांना भेटण्याची ओढ असते,ज्यांना भेटल्यावर आनंद होतो.
ज्यांच्या शी बोलताना आपल्याला संकोच वाटत नाही, आपण मनमोकळे बोलत असतो,बोलल्यानंतर खुप बरे वाटते ,असे नाते म्हणजे खऱ्या मैत्रीचे!
प्रत्येकाच्या आयुष्यात असे मैत्रीचे नाते असतेचं आणि कोणत्या ना कोणत्या रूपात आपली सखी भेटत असते.
मुलगी आईची सखी असू शकते,बहिण आपल्या भाऊबहिणीची सखी असते.आई ही आपल्या मुलांची सखी बनते आणि पत्नी ही तर पतीची सखी असायलाचं हवी!
शाळा,कॉलेज,office इ.कोठेही आपल्याला आपली सखी मिळत असते.
सखीचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णाची राधा!

राधा ही कृष्णाची चांगली सखी होती.दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम होते.राधाकृष्णाचे नाते हे प्रेमाचे,मैत्रीचे आणि पावित्र्याचे होते.
\" कृष्ण के अंग अंग मे हैं राधा
कृष्ण में ही बसती हैं राधा
कृष्ण के मन की मीत हैं राधा
कृष्ण की प्यारी सखी हैं राधा ।\"

एक पुरुष आणि एक स्त्री हे एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण असू शकतात. पण त्या नात्यात विश्वास, खरेपणा असावा. समाजात स्त्रीपुरुष यांच्या मैत्रीला वेगळ्या दृष्टीने,अर्थाने पाहिले जाते. व्यक्ती धोका देवू शकतात पण खरी मैत्रीचे नाते फसवणार नाही. जिथे फसवणूक, विश्वास घात असते तिथे मैत्री नसते...
खऱ्या मैत्रीत शुद्ध अंतकरण, चांगल्या भावना,अतूट प्रेम,पक्का विश्वास असावा लागतो.मैत्री ही वरवरची नसावी तर मनापासून केलेली असावी शारीरिक सौदर्य, पैसा,स्वार्थ या हेतूने केलेली नसावी.निःस्वार्थ मैत्री असावी.
प्रत्येक स्त्री ही प्रत्येक नातं मनापासून जपते.एक आई,एक बहिण,एक मुलगी,एक पत्नी म्हणून जसे ती कर्तव्य करीत असते,या नात्यांशिवाय जीवनाला अर्थ नाही तसेचं स्त्री ही एक सखी म्हणून खुप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.
सखी ही आनंद देते,संकटात मदत करते,मनातील भाव ओळखते,आपल्या गुणांचे कौतुक करते ,आपल्या चुका दाखवून योग्य मार्गदर्शन करते.जगण्याची प्रेरणा देते.सखी म्हणजे आपलेचं प्रतिरूप असते.

सखी तू म्हणजे..
सुखात हसणारी
दुःखात धीर देणारी
मैत्रीचे नाते जपणारी
आयुष्यभर सोबत राहणारी....