चाराक्षरी...

A Poem On Sea..


फेसाळत्या
तुझ्या लाटा
सुन्न करी
माझ्या वाटा...
घेऊनि त्या
लाटांना रे
शोधतो तू
वाटांना रे...
भावनांनी
ठरविल्या
वाटाच तू
अडविल्या...
अडविता
वाटांना रे
रडू आले
लाटांना रे...
रडल्या रे
तुझ्या लाटा
शोधताना
माझ्या वाटा...
गवसता
माझ्या वाटा
हसल्या रे
तुझ्या लाटा..!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे