Jan 26, 2022
नारीवादी

चार दिवस सासूचे

Read Later
चार दिवस सासूचे


चार दिवस सासूचे याचा अर्थ मला कधी समाजालाच नव्हता, पण आता मला याचा अर्थ माझ्या परीने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे लागला. तर घरोघरी मातीच्या चुली अशी म्हण आहे. म्हणजेच पूर्वीपासून जसे चालत आले आहे तसेच आताही चालते. जग खूप पुढे चालले असे आपण म्हणतो पण मानसिकता काही बदलत नाही, ती अजून नाहीच आहे. तर चार दिवस सासूचे असे का? तर एका आईचे सासूमध्ये जेंव्हा रूपांतर होते तेंव्हा कोणत्याही स्त्रीमध्ये बदल होतोच, पण हा बदल जर सकारात्मक झाला तर चार दिवस सासूचे नसून प्रत्येक दिवस सासूचा होईल. जर अहंकार आणि मीपणा बाजूला ठेवला तर ते सहज साध्य होते.


जेंव्हा कोणतीही मुलगी लग्न करून सासरी येते तेंव्हा तिच्या मनात मिश्र गोंधळ माजलेला असतो. आनंद, भीती,उत्साह,अवघडलेपणा हे सर्वच ती अनुभवत असते. आता तिचे नाते नवऱ्यामुळे पूर्ण घराशी जोडले गेलेले असते. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच ती या घराशी, घरातल्या माणसाबरोबर नव्याने ओळख करून घेत असते. तिला फक्त गरज असते ती आधाराची आणि मायेची. आधार तर तिला नवऱ्याकडून मिळत असतो पण माया ती आपल्या सासूकडून मिळवण्याचा प्रयत्न करत असते.


नव्याचे नऊ दिवस संपले की संसाराला सुरुवात होते. इथे खरी परीक्षा सूनेची नसून सासूची असते. कारण सून नवीन घराशी, नवीन नात्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते, त्यावेळी तिच्या मनात सासूविषयी आदरयुक्त भीती असते. सून आल्यानंतर सासू लगेच स्वयपांक घरातून अर्थात कामापासून निवृत्ती घेते. खरतर एकदोन वर्षे सासूने सुनेबरोबर मिळून स्वयपांक,काम केले पाहिजे यामुळे काय होते कि दोघीमध्ये संवाद होत असतो आणि संवाद झाल्यामुळे त्यांच्या नात्याचे रूपांतर मैत्रीत होऊ शकते पण घरोघरी चित्र अगदीच उलटे असते, आता वय झाले, घुढग्यानचा त्रास, आता सून अली आहे मग मी अराम करणार अशी कारणे देऊन सासूने कामापासून निवृत्ती घेते त्यामुळे सुनेला काहीच पर्याय नसतो, मग संवाद कुठे तरी मागे राहून जातो आणि मग त्यांचे नाते फुलतच नाही. आणि वरून सुनेला टोमणे असतातच "तिला हे बनवता येत नाही, ते बनवता येत नाही, घर आवरता येत नाही...., काही भेटवस्तू आणली तर त्यामध्ये कमीपणा काढणे, प्रत्येक गोष्टीत खोट काढणे.


सून जर नोकरी करत असेल तरीही तिने नोकरी करून घर सांभाळावे अशी अपेक्षा केली जाते आणि त्यात काहीच गैर नाही पण तिच्या नोकरीमुळे तिची ओढाताण होत असते आणि यावेळी कामामध्ये थोडा हातभार खूप मोलाचा असतो पण इथे सासूचा अहंकार मध्ये येतो आणि त्यामुळे वयाचे आणि गुढग्याच्या त्रासाचे कारण सांगून हात झटकते, हो कारणच असते कारण ऐरवी गुढग्याच्या त्रास होतो आहे म्हणणारी सासू, जेंव्हा तिची मुलगी माहेरी येते तेंव्हा उत्साहाने तिच्यासाठी हे बनवू कि ते बनवू करत असते, अगदी स्वतः स्वयपांक घरात जाऊन जेवण बनवते पण सुनेच्या वाढदिवसालासुद्धा असा उत्साह सासू कधीच दाखवत नाही, ती सासूमध्ये आई शोधत असते पण ती कधीच भेटत नाही आणि येथेच सूनेची आदरयुक्त भीती ही तिरस्कारामध्ये होते. त्यानंतर सून कधीच सासूकढून अपेक्षा करत नाही, संवाद तर संपलेलाच असतो आणि इथे सासूचे चार दिवस संपतात आणि सुनेचे दिवस सुरु होतात.
अशा अनेक प्रसंगामुळे सूनेची सुद्धा सासूबद्दलचा आदर नाहीसा होतो, मग ती आपल्या मनाप्रमाणे जगायला सुरुवात करते कारण तिचा असा समज होतो कि कितीही घरासाठी झटले, कितीही प्रेम आणि सन्मान मिळवण्याचा प्रयत्न केला तरी ते मिळणार नाही मग आपलेपणाची जाणीवही नष्ट होत जाते.


प्रत्येक मुलगी लग्न करून सासरी येते तेंव्हा तिने सगळे सांभाळून घ्यावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा घरातल्या प्रत्येक माणसांनी तिला सांभाळून घेतले पाहिजे, तिची मते जपली पाहिजेत मग बघा कसे ती आयुष्यभर काहीही तक्रार न करता तुम्हा सगळ्यांना सांभाळेल, सगळ्यांची न सांगता सेवा करेल, घराला घरपण आणेल आणि सासूचे चार दिवस न राहता प्रत्येक दिवस सासूचा होईल, प्रत्येक दिवस सगळ्यांचा होईल.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PraJyotsna

Pharmacist

Independent Girl