दिवाळी चा किल्ला....

Diwali Fort

दिवाळीला गावी  बरेच जण म्हणजे घरातली बच्चे कंपनी मिळून किल्ला तयार  करतात...प्रत्येकाच्या  दारात किल्ला  पाहून  आमच्या  10 वर्षाच्या डॉली  ( देवश्री ) ला पण किल्ला करायची आयडिया आली ,डॉली चा गोंधळ बघून मग आमची छोटी  अडीज वर्षाची ( अनुश्री ) पण सारखी बाहेर धावू लागली,.... मग मला विचारून अगदी मस्का मारून मारून, डॉली ने मला हॊ म्हणायला भाग पाडले..

आणि मग मी हॊ नाही करता करता  - एकदाची किल्ला करण्यासाठी घराच्या  कंपाऊंडच्या  बाहेरची जागा ठरली.

मित्र - मैत्रीणीच्या मदतीने मग माती जमली,  आणि मग बच्चे कंपनी जोमाने सकाळपासून कामाला लागली -  माती सारवली पाण्याने आणि मग सर्वानी मिळून  छान सा जमेल तसा सुंदर किल्ला तयार  केला मुलांनी दुपारी मग सगळी दमली.. तरी ही किल्ला सजवून झाल्यावरती सगळी नाचली आनंदाने, मग मम्मी  बघ चल किती छान  झालाय किल्ला म्हणून डॉली ने मला जवळ जवळ ओढूनच बाहेर आणले..

पप्पा ला मग संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर पाणी पिण्याच्या च्या आधीच अतिउत्साहाने डॉली ने किल्ला नेवून दाखवला, पप्पा पण म्हणाला खूप सुंदर आहे किल्ला आणि म्हणाला किल्ला खूप आवडला..मग काय डॉली बाई  अजून च खुश.......

आमच्या  देवरुख मध्ये दिवाळी ला किल्ला स्पर्धा पण भरवल्या जातात.. मुलांना सुंदर आकर्षण बक्षीशे पण दिली जातात.. मराठा भवन म्हणून आहे तिथे किल्ला करायला मुलं जातात 3,4 दिवस, खूप छान  छान मुलांनी केलेले किल्ले असतात तिथे, आणि मग दिवाळी च्या दिवशी किलल्यांचे प्रदर्शन पण भरवले जाते बरेचदा..,.

मुलांची हौस, आणि  त्यातून ती हौस  पूर्ण झाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरचा  आनंद    -   ह्याहून दुसरे काय हवे असते आई - वडिलांना.........

सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे... ( देवरुख  - रत्नागिरी ).....