Feb 24, 2024
प्रेम

माझ्या प्रिय वाचकांना निवेदन

Read Later
माझ्या प्रिय वाचकांना निवेदन
माझ्या प्रिय वाचकांना ,
                सप्रेम नमस्कार
तू तर चाफेकळी या कथेचे भाग सध्या प्रकाशित होत नाहीयेत त्यावरून तसच काही कारण असेल याचा तुम्हाला अंदाज आला असेलच. खरंतर तुम्हा सगळ्यांना खूप खूप सॉरी.. पण घरी मेडिकल इमर्जन्सी आल्याने मला लिहिणं शक्य होत नाहीये. रोज मला वाटत की आज आपण लिहुया. पण दिवस कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो याचाच पत्ता नसतो. त्यामुळे खूप वाटलं तरी मी आत्ता लिहू शकत नाहीये. त्यासाठी तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. मी वैयक्तिक फार कोणाला ओळखत नाही पण तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे बऱ्याच जणांची नावं माहीत झाली आहेत. त्यामुळे माझ्या कथेच्या सर्व वाचकांना मी सांगू इच्छिते की , तू तर चाफेकळी या कथेचे भाग पुढील एक महिन्या नंतर म्हणजे 1 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा प्रकाशित केले जातील. माझी सध्या प्रचंड धावपळ होत आहे आणि त्यासोबत टेंशन देखील आहे. आशा आहे तुम्ही मला समजून घ्याल. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहुद्या हीच विनंती.

                                                          तुमचीच ,
                                                        सायली विवेक
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//