Login

एक संवाद वाचकांशी

Best Wishesh

नमस्कार वाचकहो,

सर्वात आधी तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा... हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना निरोगी आणि आनंदी जावो ही सदिच्छा.

मला जरा आज तुमच्याशी संवाद साधायचा आहे म्हणून हा प्रयोग....मी तुम्हा सर्वांना प्रॉमिस केलं होतं की तुमची आवडती कथा "अनिका" हि नविन वर्षाच्या सुरवातीला पोस्ट करेन पण ते जमलच नाही त्यासाठी मनापासून क्षमस्व आहे... खर म्हणजे मला तुम्हाला हहेच सांगायचं आहे की मला टाईप करतान खुप त्रास होतोय ,मल  स्पोंडीलीसिस डेटेक्ट झाला आहे... सर्विकल स्पोंडीलिसिस ज्यामुळे हात खुप दुखतोय आणि हाताला मुंग्या येतात.... आणि त्यासाठी मला व्यायम आणि औषधांचा कोर्स दिला आहे.

मला तुम्हाला एवढच सांगायचं आहे की आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.. योग्य व्यायाम आणि आहार घ्या.... आपण निरोगी आणि आनंदी असू तरच ह्या सुंदर जगाचा मनसोक्त आनंद लुटू शकतो..मी माझ्या कथेचे भाग पुढच्या महिन्यापासून पोस्ट करेन . आशा करते तूम्ही माझ्यावर आणि माझ्या कथेवरच  असच प्रेम करत रहाल.... तुमचे प्रेम हिच माझी खरी कमाई आहे.

धन्यवाद!

अनुराधा पुष्कर