Feb 24, 2024
रहस्य

वाचकांसाठी - थोडंसं मनोगत थोडंसं निवेदन

Read Later
वाचकांसाठी - थोडंसं मनोगत थोडंसं निवेदन

 

ईराच्या सगळ्या वाचकांचे खूप मनापासून आभार. तुम्ही माझ्या तिनंही कथांना खूप उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी खरंच आभारी आहे. सध्या मी मेघ दाटले नावाची एक रहस्य कथा लिहत आहे. पण गेल्या चार - पाच दिवसात कथेचा पुढचा भाग प्रकाशित न होऊ शकल्याने तुम्ही नक्कीच नाराज असाल. पण काही कारणांमुळे मला कथेचा भाग लिहायला वेळ मिळालेला नाही. जेवढी तुम्ही कथेच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत असता. तेवढीच उत्सुकता भाग प्रकाशित करताना आम्हाला देखील असते. कारण कमेंटच्या माध्यमातून आपली भेट होते. पण मेघ दाटले या कथेचे भाग थोडे दिवस तरी तुम्ही वाचू शकणार नाही. त्याबद्दल क्षमस्व. माझ्या काही वैयक्तिक कामामुळे कथेचं लेखन सध्या करणं मला शक्य होतं नाहीये. खरंतर गेले चार दिवस भाग पोस्ट करता न आल्याने मी अस्वस्थ आहे. पण कथा थांबवायची की लिहायचं ते कळत नव्हतं. पण काही कामांमुळे मी आत्ता कथेच्या लेखनासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये. त्यामुळे मेघ दाटले या कथेचे भाग पुढील एक महिन्यासाठी तरी प्रकाशित होऊ शकत नाहीत.  तरीही वेळ मिळाला तर जमतील तसे भाग पोस्ट करायला मला आवडलं असतं. परंतु त्यामध्ये काही काळानंतर संदर्भ आणि रस दोन्ही निघून जातो. ते मला नको आहे. त्यामुळे आत्ता कथेचं लिखाण तात्पुरतं थांबलं असलं तरी मेघ दाटले ही कथामालिका पुन्हा नव्याने तुमच्यापुढे वाचनासाठी सादर केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे कथेचा भाग का पोस्ट झाले नाहीत असं ईरा वरती विचारण्याची गरज कोणत्याही वाचकांना यानंतर पडणार नाही. त्यामुळे कथेची लेखिका म्हणून मी सध्या कथेचं लिखाण थांबवलं असलं तरी पुन्हा एक महिन्या नंतर पुढचे भाग प्रकाशित होतील. कोणीही कृपया गैरसमज करून घेऊ नये. तुमचे प्रेम कायम राहू द्या. नवीन भागासह लवकरच भेटू. होणाऱ्या प्रतिक्षेबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.. मेघ दाटले या कथेच्या वितारणारचे सर्व हक्क लेखिकेकडे स्वाधीन आहेत. तरी कथा कॉपी करू नये. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे.  धन्यवाद. 

 

सायली विवेक. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//