प्रेमासाठी (भाग ४)
नुपूरला भेटण्यासाठी रितेश अधीर झाला होता. त्याने परत विराजला गाठले. विराजला वाटले हा मारणार परत आपल्याला. पण त्याने विराजची खूप गयावया केली आणि नुपूरला फोन लावायला लावला. फोन लागल्या लागल्या लगेच विराटच्या हातातून फोन काढून घेतला. नुपूरचा आवाज ऐकून रितेश च्या डोळ्यात पाणी आले. तो नुपूरची देखील गयावया करू लागला, पण नुपूरने लगेच फोन ठेऊन दिला आणि नंतर विराजच्या फोन वरून आलेले फोन उचलले नाही. नुपूर खूप रडली, पण असे वागण्या खेरीज तिच्याकडे काही इलाज नव्हता. इकडे विराजच्या रोज रोज मागे लागून शेवटी पंधरावीस दिवसांनी रितेश ने नुपूर कुठल्या गावात राहते हे शिताफीने काढून घेतले. दुसऱ्या दिवशीच तो त्या गावात हजर झाला. दिवसभर नुपूरचा पत्ता शोधण्यासाठी गावभर फिरला, पण ना त्याला नुपूर भेटली ना तिच्या घरचे कोणी दिसले. दुसऱ्या दिवशी ही तो दिवसभर असाच फिरला. पण त्याला कोणीच दिसले वा भेटले नाही. तिसरा दिवस त्याने नुपूरच्या वडीलांचे ऑफिस शोधण्यात घालवला. त्यांच्या फर्मचे नाव पक्के माहिती होते त्यामुळे तिसऱ्या दिवशी त्याला बरोबर जाऊन त्याने नुपूरच्या वडीलांना गाठले.
" नमस्कार काका, किती शोधले मी तुम्हांला? " त्यांना वाकून नमस्कार करत तो म्हणाला. नुपूरच्या बाबांनी दुर्लक्ष केले. पण तो फारच मागे मागे फिरून बोलू लागला. शेवटी ते म्हणाले, " हे बघ मला इथे ऑफिसमध्ये तमाशा नको आहे. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. तू जा. " तो निघाला पण ऑफिसच्या दारात त्याची वाट बघत बसून राहिला आणि ऑफिस सुटतात त्यांच्या मागे जाऊन बरोबर घरी हजर झाला. नुपूर तिच्या ऑफिसला गेली होती त्यामुळे ती घरी नव्हती. रितेश इथे आलाय याची कल्पना फोन करून नुपूरला देऊन ठेवली होती. त्यामुळे नुपूर थोडी घाबरली पण मग नंतर मनाची तयारी करूनच घरी आली,
नुपूरने काळा टाॅप आणि लाल लेगींन घातली होती. त्यावर लाल ओढणी. त्याच्या आवडीचे रंग. दिवसभर दमल्यामळे चेहरा थकलेला दिसत होता, केसांच्या अवखळ बटा निसटून कपाळावर आल्या होत्या. पण त्या अवतारात ही ती खूप छान दिसत होती. तशी ती दिसायला चार चौघींसारखीच होती. निमगिरी रंग, मोठे ब्राउनीश डोळे. केस पाठीवर मोकळे सोडलेले. तिला बघून तो हमसून हमसून रडायला लागला. त्याची अवस्था तिला पहावली नाही. त्याच्या जवळ जाऊन तीही रडायला लागली. त्यांना सावरून बाबांनी सोफ्यावर बसवले. तो नुपूर वर किती प्रेम करतो हे बाबांनाही जाणवले. आईच्या मनातही चलबिचल झाली.
" नुपूर खूप खूप साॅरी ग. प्लीज मला माफ कर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय." रितेश म्हणाला.
" नुपूर खूप खूप साॅरी ग. प्लीज मला माफ कर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय." रितेश म्हणाला.
" मीही नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण तू वागलासच असा की मला हे पाऊल उचलावे लागले. नको वाहून असे रितेश. त्रास होतो मलाही. " नुपूर.
" आता परत कधीच असे वागणार नाही मी. प्राॅमिस. " रितेश.
" नाहीच वागायचे. इतका चांगला मुलगा आहेस तू. जरा रागावर ताबा ठेवायला शिक. नाहीतर नुपूर तुझी होणार नाही. " नुपूरचे बाबा.
" खरं रितेश, मी प्रेम करते तुझ्यावर. पण तू नीट वागलास तरच ते पूर्णत्वास जाईल. ही आपली परीक्षा आहे, आपल्या प्रेमाची परीक्षा आहे असे समज. तू सुधारला आहेस हे कळल्यावर मग मी पुढचा विचार करेन. पण तू परत कधीही असा वागणार नाहीस हे प्राॅमिस कर. तुझ्या बिझनेसवर लक्ष दे. काॅम्प्यूटर क्लास केला आहे त्यात अजून पुढे शिक. त्यात काही व्यवसाय करता येतो का बघ. तुझ्या आईवडिलांचा तू एकुलता एक मुलगा आहेस, त्यांचीही जबाबदारी आहे तुझ्यावर. त्यांचा थोडा विचार कर. " नुपूर.
" हो मी. सगळे करीन. पण फक्त तू मला सोडून जाऊ नकोस." रितेश.
" चला आता जेवून घ्या. उपाशी असाल दोघेही. " नेत्रा नुपूरची आई म्हणाली.
जेवण झाल्यावर रितेश निघून गेला. रितेशने नुपूरला फोन घेण्याची विनवणी केली. पण नुपूरने आठवड्यातून एकदाच तो ही सुट्टीच्या दिवशी फोन करण्याची अट घातली. आणि महिन्यातून एकदाच भेटायचे ते ही घरी सर्वांच्या सोबत. रितेश गेला पण इकडे नुपूरलाच करमत नव्हते. ती बाबांच्या गळ्यात पडून खूप रडली. बाबांचे आणि तिचे बाॅडींग होतेच तसे.
इकडे रितेश घरी परत आला. त्याच्या चेहर्यावरचा आनंद लपत नव्हता. त्याचे बाबा घरात नव्हते. बाबा येईपर्यंत तो कसातरी थांबला. बाबा आल्यावर आई बाबांच्या पायावर डोकं ठेवून खूप रडला. आणि सगळी हकीकत त्यांना सांगितली. त्यांनीही प्रेमाने त्याला जवळ घेतले. आणि त्याला माफ केले.
आता मात्र रितेश खूप व्यवस्थित वागू लागला. विराजला भेटून त्याला मिठी मारून त्याची माफी मागितली. आपला व्यवसाय वाढवायचे प्रयत्न सुरू केले. नवीन इंटरनेट कॅफे सुरू केले. आता त्याचा छान जम बसू लागला.
इकडे नुपूर ही ग्रॅज्युएट झाली. सी. ए. च्या परीक्षा ती देतच होती. आर्टिकल शीप ही चालू होती. आठवड्यातून फोन आणि महिन्यातून एकदा भेट होत होती. विराज आणि रितेशची आता चांगली मैत्री झाली होती.विराजकडून नुपूरला रितेश बद्दल सर्व काही समजत होते. रितेश आता खरचं सुधारला होता. सगळ्यांशी नीट वागत होता. नुपूरच्या प्रेमाने आणि आईवडिलांच्या व इतरांच्या सहकार्याने तो योग्य मार्गावर येत होता. महिन्याला त्याच्या फॅमिली ला पासून शकेल एवढे पैसे मिळवत होता.
आता रितेश आणि नुपूरच्या ही आईवडिलांना लग्नाचे वेध लागले होते. लग्नाची बोलणी करण्यासाठी रितेशचे आईवडील आता नुपूरच्या आईवडिलांना भेटायला जाणार होते.
क्रमशः
सौ. हर्षाची प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा