प्रेमासाठी (भाग ३)

प्रेमासाठी काहीपण


प्रेमासाठी (भाग ३)


ती सर्व काही सोडून आई बाबांकडे आली. नताशाला नुपूरला पाहून खूप आनंद झाला. पण आईबाबांना नुपूर सगळे सोडून आली त्याचे आश्चर्य वाटले. नुपूर आल्यावर सगळ्यांनी एकत्र जेवण केले. नताशा झोपायला गेल्यावर आईने नुपूरच्या केसांना तेल लावायला घेतले. बाबांनी इकडचे तिकडचे विषय काढत हळूच नुपूर ला " काय झाले " म्हणून विचारले. तसे तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती घडला सगळा प्रकार हळूहळू सांगू लागली. विराजची ओळख, तो आणि रितेश एकाच काॅलेजात असणे, रितेश नी विराटला दिलेली धमकी, आणि रितेशचे विराजला बेशुद्ध पडेपर्यंत मारणे, सगळेच विचीत्र होते. रितेशचे ऐकून आईबाबा दोघांनाही धक्का बसला. बाबा म्हणाले " माणूस असा कसा वागू शकतो. डायरेक्ट हाणामारी. अजब प्रकार आहे. " आई पण तिच्या बरोबर रडत होती.
" बाबा, मी मनापासून प्रेम करते रितेश वर. तुम्ही म्हणता तसे सर्व काही शिक्षणावर नसते. तो मनाने खूप चांगला आहे, पण माझ्या बाबतीत फार जास्त पझेसिव्ह आहे. मला तो सुधारायला हवा आहे. म्हणून मी इकडे आले. समजावून सांगून तो समजत नाहीये. निदान मी लांब गेल्यावर तरी त्याच्यात फरक पडेल असे वाटतयं. मी त्याच्या आईवडिलांशी पण बोलले पण मी त्यांच्याशी बोलले आहे हे रितेशला माहिती नाही. तो सुधारावा म्हणून ते पण प्रयत्न करणार आहेत. आपण सगळे मिळून प्रयत्न करू. त्याला अजून एक चान्स देऊ. " नुपूर.
" तू म्हणते आहेस ते खरंच बेटा. तो मुलगा खरचं चांगला आहे. मी अनुभवले आहे त्याला. कोणालाही मदत करायला तो कायम पुढे असतो. माणुसकी आहे त्याच्याजवळ. सगळ्यांना सारखी बुद्धी नसतेच ना. शिक्षणात कदाचित तो कमी असेल पण दुसऱ्या एखाद्या गोष्टीत त्याला यश मिळू शकेल. मला वाटते तो तुझ्या बाबतीत तो इनसिक्यूअर फिल करतो. त्याला भिती वाटत असेल तुला गमावण्याची. " बाबा.
" तू विचार करते आहेस ते बरोबर आ आहे नुपूर. शिक्षणच सर्व काही नसते. पण तू पुढचा विचार केला आहेस का? त्याच्यात जर सुधारणा झाली नाही तर? तो आयुष्यात पुढे जाऊन सेटल झाला नाही, काही करू शकला नाही तर? विचार केला आहेस? आणि नकाशावर काय परिणाम होईल? ती तर खूप लहान आहे अजून."नेत्राने नुपूरच्या आईने तिला विचारले.
" मग काय झाले आई? तो नाही काही करू शकला तरी मी करू शकते ना? असे थोडीच आहे की फक्त पुरुषाने मिळवायचे आणि बायकांनी बसून खायचे? आजकाल प्रत्येक क्षेत्रात बायका पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. त्यात कमीपणा काय आहे? मी नोकरी करेन, मी मिळवेन. त्यानी फक्त मला साथ द्यावी. एवढीच अपेक्षा आहे माझी त्याच्याकडून. " नुपूर.
" अग पण प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असतेच की आपल्याला चांगला शिकलेला कमावणारा जावई मिळावा, जेणेकरून तो आपल्या मुलीला सुखात ठेवेल. मलाही तसचं वाटतं तर त्यात चुकीचे काय आहे? तुझे बाबा देतील ही तुला साथ. तुझे आणि त्यांचे विचार अगदी सारखेच असतात नेहमी. मीही साथ देऊन तुला पण मनापासून नाही. कारण मला हे पटत नाही. तो मुलगा चांगला नाही असे मी म्हणत नाही, पण तो सेटल व्हायला हवा. त्याने हे मारामारी वगैरे सगळे बंद करायला हवे. " नेत्रा.

" आई अगदी तुला चुकीचे नाही म्हणत मी. तू तुझ्या जागी बरोबरच आहेस. पण आई प्रेम, प्रेमासाठी वाट्टेल ते करायची तयारी आहे माझी. आणि मी आत्ता लगेच नाही करणारे लग्न. त्याला सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याला मारामारी बद्दल चांगली शिक्षा देतीय मी. मी बोलत नाही म्हंटल्यावर तो नक्की प्रयत्न करेल आणि पुन्हा अस काही करणार नाही. त्यालाही सेटल व्हायचा चान्स देणारच आहे मी. " नुपूर. "

" खूप अवघड असते हे नुपूर. तू मिळवशील, पण बायको मिळवती आहे आणि आपण बसून खातो. याचा न्युनगंड ही येऊ शकतो त्याला. त्याने तुमच्यामध्ये आणखी वाद होतील. बायको मिळवती आहे म्हंटल्यावर लोकही नाही नाही ते बोलतात. आणि लोकांचे बोलणे ऐकून माणूस बिथरतो. आणि आपले नातेवाईक, ते काय म्हणतील? " नेत्रा.

" लोकांचे आणि नातेवाईकांचे सोड ग नेत्रा. मी खंबीर आहे सगळ्यांना तोंड द्यायला. माझ्या दृष्टीने नुपूर चे त्याच्यावर आणि त्याचे नुपूर वर प्रेम आहे हे महत्त्वाचे. प्रेम खरे असेल तर माणूस कितीही संकट आली तरी त्यांना तोंड देतो. आणि पैसाच मिळवायचा म्हणालीस तर, आहे पैसा आवश्यक आहे, पण पैशानेच सर्व गोष्टी होतात असे नाही. आपले प्रेमाचे माणूस आपल्या जवळ असले की झोपडीत ही सुख मिळते. पण प्रेमच नसेल तर राजवाड्यात ही सुख मिळत नाही. आणि आपण आपल्या नुपूरला चांगले संस्कार दिलेत, चांगल शिक्षण देतो आहोत. ती शहाणी आहे, विचारी आहे. ती सगळं काही व्यवस्थित निभावून नेईल, मला खात्री आहे. " बाबा.

हे ऐकून नुपूर बाबांच्या कुशीत शिरून रडायला लागली. बाबांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे हे बघून तिला बरे वाटले, "बाबा मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी सगळे नीट करीन." नुपूर म्हणाली. तसे आईनेही तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला.
" आम्ही कायम तुझ्या पाठीशी राहू. तुला चांगले आयुष्य लाभो. देव तुला सुखी ठेवो, एवढीच प्रार्थना आहे देवाकडे. " नेत्रा म्हणाली.

दुसऱ्या दिवशी नुपूर त्या गावातील एका सी. ए. च्या ऑफिसमध्ये पोचली. तिच्या पहिल्या सरांनी तिला रेफरन्स दिला होता. तिची कामातली लगन बघून तिला लगेच तिथे जाऊन मिळाला. दुसऱ्या दिवसापासून तिची आर्टिकल शीप सुरू झाली.

इकडे रितेश मात्र तिच्या दूर जाण्याने खूप अस्वस्थ होता. रात्र रात्र जागून काढत होता. तिचा नवीन पत्ता देखील त्याला माहिती नव्हता. त्याचे आईवडीलही त्याला त्यांनी या सगळ्यातून अंग काढून घेतले आहे असेच दाखवत होते. नुपूरला सुद्धा अजिबात चैन पडत नव्हते. शेवटी पहिले प्रेम, मनापासून केलेले. ते परीक्षा तर घेणारच ना.
" चार दिनों दा प्यार हो रब्बा लंबी जुदाई,
बडी लंबी जुदाई"
अशी अवस्था दोघांचीही झाली होती. विरहा नंतर प्रेम आणखी बहुतेक असे म्हणतात. दोघांनाही ओढ लागली होती भेटण्याची, पण नुपूर तरीही त्याच्यात थोडा तरी बदल दिसल्या शिवाय त्याला भेटणार नव्हती.


क्रमशः

सौ. हर्षाची प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all