प्रेमासाठी ( भाग २)

प्रेमासाठी सर्वकाही
प्रेमासाठी (भाग २)

नुपूरची परीक्षा संपली. परीक्षा संपल्यावर ती एका चार्टर्ड अकाउंटंटकडे जाॅबला जाऊ लागली. रितेश काॅम्प्यूटरचा क्लास करत होता. नुपूर च्या परीक्षेनंतर दोघे फक्त एकदाच भेटले. तेही अगदी पाच मिनिटे. रितेश आता तिचा दुरावा सहन होत नव्हता. त्याला वाटत होते ती मुद्दाम करते आहे. पण नुपूर मात्र मनात काहीही न ठेवता तिच्या करिअर वर फोकस करत होती.
नुपूरचा परीक्षेचा रिझल्ट लागला. ती खूप चांगल्या मार्कांनी पास झाली. तिला बाबांनी सी. ए. करायची परवानगी दिली. रितेश मात्र बारावी नापास झाला. त्याचे मनच अभ्यासात नव्हते तर तो पास कसा होणार? नुपूर त्याला भेटायला गेली. पण तो एकदम कूल होता. नापास झाल्याचे काही दुःख त्याच्या चेहर्यावर दिसत नव्हते. तरीही नुपूर त्याच्याशी बोलली. " झाले गेले सगळे विसरून जा. परत नेटाने अभ्यास कर. बारावी पास होऊन व्यवसायासाठी उपयुक्त काहीतरी कोर्स कर. स्वतःच्या आयुष्यात सेटल होण्यासाठी धडपड कर. " नुपूर सहज बोलून गेली. पण रितेशला मनातून राग आला, पण तो काही बोलला नाही.

नंतर रितेशने पुन्हा नुपूरला आपल्या मनातली फिलिंग सांगितली. नुपूर थोडी नर्व्हस होती. पण तिच्याही मनात अशाच फिलिंग आहेत हे तिन्ही सांगितले. पण तिने रितेशला क्लिअर केले की सी. ए. होणे ही तिची महत्वाकांक्षा आहे. आणि ती त्याच्यावरच सध्या पूर्ण लक्ष देणार आहे. ती म्हणाली, " रितेश तुही सध्या तुझ्या शिक्षणावर, करीअर वर फोकस कर. ते जास्त महत्वाचे आहे. प्रेम करायला आयुष्य पडले आहे, पण शिक्षण करिअर हे ज्या त्या वयातच व्हायला हवे. करीअर सेट झाल्यावर आयुष्य नियोजीत करता येते. आयुष्याला स्थिरता येते. आणि मग आपल्या माणसांनाही आपण सुख देऊ शकतो. " रितेशला ही तिचे म्हणणे पटले. त्याने त्यानुसार वागायचे ही ठरवले. त्याने क्लास करता करता स्टेशनरी सप्लाय करायला सुरवात केली. निरनिराळ्या ऑफिसेसमध्ये, शाळा काॅलेजमध्ये तो स्टेशनरी, केमिकल, लॅबोरेटरीला लागणारे साहित्य तो सप्लाय करत होता. त्याचा त्या व्यवसायात चांगला जम बसू लागला होता.
नुपूरचा जाॅब सुरू होता. त्यांच्याच काॅलेजमध्ये शिकणारा विराज तिच्या ऑफिसमध्ये काम करत होता. तिची त्याच्याशी चांगली मैत्री होती. पण ऑफिस कलीग म्हणून. एकदिवस नुपूरने त्याची आणि रितेश ची ओळख करून दिली. रितेश ही त्यावेळी विराजशी व्यवस्थित बोलला. पण यावेळीही त्याच्यातला आशिक जागा झाला. त्याने विराटची चौकशी करायला सुरुवात केली. विराटला भरपूर मैत्रिणी आहेत आणि त्याची दोन तीन अफेअर आहेत हे समजल्यावर तो आपसेट झाला. त्याने एक दिवस विराटला राजाने रस्त्यात गाठले आणि त्याला धमकी दिली, " जर पुन्हा नुपूर सोबत दिसतात तर याद राख. ऑफिस व्यतिरिक्त नुपूरशी बोलायचे नाही. " रितेश. दोन तीन दिवस विराजमान नुपूरशी बोलणे सोडले. नुपूरला कळत नव्हते काय झाले आहे. शेवटी न राहवून तिने विराजला विचारलेच. खूप आढेवेढे घेत विराजमान नुपूरला सत्य सांगितले. म्हणाला, " नुपूर माझ्या मनात गैर काहीच नाहीये. आपण ऑफिस कलीग आहोत म्हणून एकमेकांशी बोलतो. पण ह्याचा तुझ्या मित्राला रितेशला प्राॅब्लेम आहे. त्याने मला तुझ्याशी बोलायचे नाही म्हणून धमकी दिली आहे. " हे ऐकून नुपूर सुन्न झाली. रितेश असे काही वागेल असे तिला वाटलेच नव्हते. पण ती रितेशशी बोलायला गेली नाही. कारण बोलून काही उपयोग होणार नाही असे नुपूरला वाटत होते
इतक्यात नुपूरच्या बाबांची पुन्हा दुसऱ्या गावात बदली झाली. नुपूर सी. ए. करत होती त्यामुळे तिला इथेच राहणे भाग होते. नताशा आणि आई बाबा नवीन बदलीच्या गावी गेले. नुपूर लेडीज होस्टेलवर जाऊन राहू लागली. आता रितेशला ती रोज दिसतही नव्हती. दोघांच्या व्यस्ततेमुळे भेटही जास्त होत नव्हती. पण तिची आठवण मात्र त्याला सारखी येत होती. तशातच रितेशला एक दिवस विराज नुपूरला होस्टेलवर सोडायला आलेला दिसला. परत रितेशच्या मनात संशयाचा किडा वळवळायला लागला. आपल्या टपोरी मित्रांना त्याने विराज बद्दल वाढवून चढवून सांगितले आणि तो त्या टपोरी मित्रांना घेऊन विराजला बेदम मारहाण करून आला. विराज बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडला होता. नशीबाने एका सद्गृहस्थाने त्याला हाॅस्पिटलमधे अॅडमिट केले. विराज शुद्धीवर आला तेव्हा त्याचे आईवडील आणि त्याचा चुलत भाऊ संकेत त्याच्याजवळ होते. त्यानी आईवडिलांना काही सांगितले नाही पण भावाला सर्व सांगितले आणि भावाला सांगून नुपूरला हाॅस्पिटलमधे बोलावून घेतले आणि तिला सर्व काही सांगितले. विराटची अवस्था फार वाईट होती. त्याच्या डोक्याला मार बसला होता. पाच टाके पडले होते. हाताला प्लास्टर होते. डोळा सुजला होता. नुपूर त्याची अवस्था बघून रडायला लागली. तिने मनापासून विराजची माफी मागितली. तरी संकेत तिला खूप बोलला, " तुमचे अफेअर आहे तर तुमचे तुम्ही बघून घ्या ना. दुसऱ्या कुणाला विनाकारण का त्रास देत आहात? तुमचाच एकमेकावर विश्वास नाही मग काय उपयोग?" संकलन तिचा अपमान केला, पण नुपूरला ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. ती तडकच रितेशच्या घरी गेली. रितेश घरीच होता. रागाने ती त्याला बोलत होती, " वेड लागलयं तुला. प्रेम करतोस ना माझ्यावर. मग इतका विश्वास नाही तुला माझ्यावर? नुसते मी कुणाशी बोलले तर तू लगेच जाऊन त्याला मारणार का? त्यापेक्षा मलाच मारून टाक ना. कशाला प्रेमाच्या बाता मारतोस, हे प्रेम नाहीये तुझे. तुझे प्रेम असते तर तू असा वागलाच नसतात. एकदा तरी मला विचारायचे होते की काय नाते आहे तुमच्यात? एका ऑफिसमधल्या कलीगशी बोलतानाही मी तुला विचारून बोलायला हवं का? कंटाळा आलाय मला तुझ्या वागण्याचा. आणखी कितीवेळा समजून घ्यायचे मी तुला? त्यापेक्षा नकोच. मी संपवतात हे सारे आता. मला तोंड ही पहायच नाही यापुढे तुझे. आपल्यात मैत्री सुद्धा नाही आता. आणि येऊ ही नकोस माझ्यापुढे कधी. नाहीतर याद राख मी स्वतःला संपवून घेईन. " रितेशला सर्व कळत होतं. ती दुखावली गेली होती. रितेशने तिची माफी मागून तिला थांबविण्याचा खूप प्रयत्न केला. रितेश ची आई घरातच होती. पण त्यांना काहीच माहिती नव्हते. फक्त रितेश खूप चुकीचे वागला आहे एवढे त्यांना समजले. त्यांनी सरळ रितेशला विचारले, " कुणाला मारून आलास तू आणि का? बघता बघता तू ही त्या मवाली पोरांच्या राहून मवाली झालास का? कुणाकुणाला त्रास देणार आहेस तू? " असे बोलून त्या रडू लागल्या. रितेश घरातून निघून पुन्हा नुपूरच्या मागे हाॅस्टेलवर आला. पण नुपूरने त्याला तिथून हाकलून दिले. आता यापुढे रितेश आपल्याला सारखाच त्रास देणार हे तिला माहिती होते. विराज पूर्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत ती थांबली. तिने ऑफिसमध्ये आधीच रिझाईन केले होते. ज्या दिवशी विराजला घरी सोडले, त्या दिवशी ती आई बाबांच्याकडे गावाला निघून गेली.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all