
स्टेशनवर भेटलेला पाच वर्षाचा सामाजिक गुरु
मी हाफ डेनी कामानिमित्त घरी निघाले होते ,स्टेशनवर पोहोचली तर ट्रेन यायला अजून वेळ होती ,म्हणून बाकड्यावर बसले . माझ्याशेजारी साधारण पाच वर्षाचा मुलगा आणि त्याची आई ट्रेनची वाट पाहत बसले होते,तो एकही मिनिटं शांत बसत नव्हता, सारखी काहितरी चुळबूळ चालू होती ,त्याची आई सारखं त्याला ओरडत होती,शांत बस म्हणून ,आमच्या पासून थोड्या अंतरावर एक बाकडा होता ,त्यावर दोन कॉलेजच्या मुली भेळ खात गप्पा मारत होत्या ,तो अधून मधून त्यांच्या कडे पाहत होता आणि आईला भेळ घे ,म्हणून खुणावत होता,तसं आईने चॉकलेट काढुन त्याच्या हातात दिलं आणि दटावल्ं ,की सांगितल ना, की बाहेरचं नाही खायचं.
बिचारा शांत झाला, त्याचा मूड ठिक करण्यासाठी विचारलं,तुझं नाव काय. तो म्हणाला,प्रतीक .
मी-कुठल्या वर्गात आहेस
प्रतीक-सिनियर के जी
मी-कुठल्या शाळेत जातो
प्रतीक- युरो किडस
असं बोलत तो धावत मुली बसल्या होत्या ,त्या बेंचकडे गेला ,त्या मुलींनी खाली फेकलेला कागद उचलला आणि जवळ असलेल्या डस्टबिन मध्ये नेऊन टाकला,त्याची आई त्याच्या मागे गेली,पण तो जे करत होता ,ते पाहून तिथेच थबकली . तो त्या मुलीं जवळ गेला ,त्यांनी बिचा-यांनी शरमेने मान खाली घातली ,तसं तो त्यांना म्हणाला ,दिदी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात ,स्वच्छ भारत ,आपणही ठेवला पाहिजे ,इथून पुढे डस्टबिन मध्ये टाकत जा .तितक्यात ट्रेन आली ,तसं त्या मुली पटकन ट्रेन मध्ये चढल्या,त्याची आई त्याला घेऊन मी जिथं बसले होते,तिथं समोर येऊन बसली.
तसं मी त्याला कौतुकाने एक चॉकलेट द्यायला लागली,त्याने आईकडे पाहिले ,आई जेव्हा हो म्हणाली ,तेव्हा त्याने घेतले .
मी-प्रतीक तू कुठे पाहिलेस पंत प्रधानांनी सांगितलेलं
प्रतिकची आई - अहो ताई ,सगळ्याच शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत अभियानचा व्हिडिओ दाखवतात,आम्हाला तर तो बाहेर गेल्यावर कचरा इकडे तिकडे टाकू देत नाही,स्वत: काही खाल्ले तर रैपर एक तर बैग मध्ये किंवा जवळ पास असणा-या डस्टबिन मध्ये टाकतो.
त्यावेळी मला पंतप्रधानांच्या कृतीचे खरचं खूप कौतुक वाटल्ं , त्यांच्या या प्रयत्नांनी ,ते देशाची भावी पिढी ,स्वच्छतेचं महत्त्व जाणणारी बनवत आहे ,ह्यातून त्यांचा दूर दृष्टीकोन दिसून येतो.
अशा या पाच वर्षाच्या गुरुने स्टेशन वरील सगळ्याच लोकांना आपल्या कृतीतून एक सामजिक संदेश दिला होता ,म्हणून तो सामाजिक गुरु आहे ,असं वाटतं,त्या मुलाचं वागणं मनाला कुठं तरी स्पर्श करून गेलं.
तुम्हाला सगळ्यांना जर हा माझा सत्यात आलेला अनुभव आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा आणि अभिप्राय अवश्य द्या,हसत रहा,वाचत रहा आणि आनंदात रहा.
रुपाली थोरात