फिशटॅन्क ( भाग ५)
---_---_---_---_---_---_---_---_---_---_---_
एमा कुसूमचा शोध घेण्याकरिता तिच्या काही मित्र मैत्रीणीला संपर्क करते जे लंडनमधे शिक्षण घेत असतात.
---_---_---_---_---_---_---_---_---_---_---_
एमा कुसूमचा शोध घेण्याकरिता तिच्या काही मित्र मैत्रीणीला संपर्क करते जे लंडनमधे शिक्षण घेत असतात.
येथे आजी एके दिवशी फरशीवर पडते व अंथरुणाला खिळून राहते. सतत "बलविंदर ... बलविंदर ....." करत असल्याने तातडीने बलविंदर व सिमरला निरोप पाठवला जातो.
कुसूम नव्हती म्हणून ती लोकं येण्यास पुढे मागे करतात. जवळपास एक महिना उलटतो. पोर्णिमेची रात्र पुन्हा येते. आकाशातील पूर्ण चंद्र पाहता एमाला कळत आज सिमर पुन्हा दिसणार. एमा त्या रात्री बारा वाजण्याची वाट पाहात होती.
कोणाला शंका येऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत पलंगावर बसलेली असते. तिच्या मनात एक विचार सतत सुरु होता तो कुसूमबद्दल कारण सिमरने नाव घेतलेली सर्व पात्र तिच्यासमोर होते. कोणी हजर नव्हते तर ती फक्त एक व्यक्ती 'कुसूम'. ती कुठे आहे हे तिला सांगू शकणारी स्वतः कुसूम होती जिचा काही केल्या पत्ता लागत नव्हता. दुसरी व्यक्ती सिमर ; पण सिमरच्या सांगण्याप्रमाणे कुसूमला बलविंदर आपल्या सोबत घेऊन गेला होता त्या पुढचं तिला काही माहीत नव्हतं. सनी तर ओळखतही नव्हता कुसूमला. आता राहिले बलविंदर अंकल खुद्द कुसूमचे बाबा.
या सर्व विचारांच्या व्यापात एमा झोपी जाते. गाढ झोपेत असताना तिला एक स्वप्न दिसते. त्या स्वप्नात पुन्हा तीच लोकं .यावेळी एमा प्रत्येक पात्राला ओळखत होती. तिने फोटोत पाहिलेले सर्वजण तिला दिसू लागतात. पण यावेळी स्वप्नात तिला तिच्या बालपणीच्या काही घटना दिसतात. एमा एका अनाथ आश्रमाच्या गेटजवळ रडत बसली होती. एक कुणीतरी नन येऊन तिला घेऊन जाते. तिथे तिला एमा हे नाव मिळत. पुढे अजून काही कळणार इतक्यात एमा दचकून डोळे उघडते. खूप धावून आल्यासारख्या धापा एमाला झोपेतून जागी होताच लागतात. ती पाणी शोधते पाण्याचा जग तिच्या थरथरत्या हातातून निसटतो. पाणी सांडत म्हणून पाणी घेण्याकरिता एमा खाली उतरते. खाली येत असताना जिन्याजवळील खोलीला पाहते तर खोली बंद असते. एमा सरसर खाली उतरते तर अंगणात उजेड पाहून एमा त्या उजेडाला पाहतच राहते. अंगणात तिने स्वप्नात पाहिल्यासारखं सर्व दिसत होतं. बलविंदर , सिमर सोबत त्यांची दोन्ही अपत्य कुसूमला एमा फार निरखून पाहते अगदी निरागस मुलगी. तिच्या मानेवरील तीळ एमा पाहू शकत होती. तो उजेड तिला पुन्हा बलविंदरच्या खोलीत घेऊन जातो. तिथे बलविंदर सिमर ला खूप मारतो इतकं की सिमर बेशुद्ध होते. बलविंदरच्या हातात रुमाल होता काहीतरी लावलेलं. तो सिमरचे तोंड दाबतो त्याने. खोलीत एक दरवाजा असतो ज्यात आडवं करून बलविंदर सिमरला आत कोंडतो. नंतर सिमरचं काय होतं एमाला कळत नाही पण बलविंदर पुन्हा खाली येतो व सिमरच्या जुळ्या बहिणीला घरामागच्या दरवाज्यातून घरात आणतो तेव्हा रात्रीचे दोन वाजलेले असतात. हे सर्व पाहून एमाचा थरकाप उडतो. एमा स्तब्ध एका जागी उभी असते तिच्या समोर सिमर येते म्हणते "बेटा ! आठवडा भरात बलविंदर येईल त्याला सोडू नको " म्हणत सिमर नाहीशी होते.
एमा शुद्धीत येते तोपर्यंत तिच्या भोवती सर्वजण उभे असतात. एमाची तब्येत बिघडते. डॉक्टरांना बोलावले जाते. डॉक्टर विश्रांती घ्या म्हणून काही औषध देऊन जातात. तीन दिवस एमाला सनी बाहेर पडू देत नाही. एके दिवशी बलविंदरचा कॉल येतो व बलविंदर येणार असल्याचे कळते. दोन दिवस उलटत नाहीत तोच बलविंदर - दलजीत ( सिमर) येतात. आजीची विचारपूस करतात. बलविंदर येताच आजी ठणठणीत होते.
एमा एके दिवशी सर्वजण बसले असता म्हणते मी एक जादू दाखवू का ? सर्वजण होकार देतात. एमा दलजीतला बोलावते व म्हणजे हे पाहा हे नाव अंकलच टॅटू आहे पण याला मी गायब करू शकते म्हणत सॅनिटायझर व साबणासोबत पाणी लावून धुवून काढते. दलजीत यावर ततपप करते एमा चा तिला राग येतो. आजी हे पाहून म्हणते," अरे हे नाव तर माझ्यासमोर गोंदवलं होतं. मग हे कसं शक्य आहे?"
यावर एमा म्हणते "आजी ते टॅटू नाही तो स्टिकर आहे." एमा म्हणते.
" सिमर आंटी केस समोर घ्या ना.मी जादूने लहान करते म्हणत एमा स्वतः एमा दलजीतचे केस समोर घेऊन तीळ दाखवते तर त्या ठिकाणी तीळ नसतो.
बलविंदर रागारागाने बोलतो, " एमा हे काय लावलंय ? काय प्रकार आहे हा ?"
एमाः " अंकल ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता द्यायलाचं हवय. मला माहिती आहे सर्व. आंटीच नाव दलजीत आहे सिमर नाही."
सगळेच आवाक होऊन एमाला पाहू लागतात. एका आवाजात सगळे जण " काय ? हे कसं शक्य आहे ?"
आजोबा : " दलजीत तर कुणासोबत तरी पळून गेल्याचं कळलं होतं ."
एमा " हो आजोबा, बरोबर आहे पण त्या तुमच्याचं मुलासोबत गेल्या होत्या ."
आजीला राग अनावर होतो.
नीलची आई : " एमा पण तुला हे कोणी सांगितलं ?"
बलविंदरच्या खोलीकडे बोट करत एमा :" आंटी मला हे स्वतः सिमर आंटी ने सांगितल आहे. त्या खोलीत आहेत . त्या मला दिसतात. त्यांनीच सांगितल. "
सनी : " कस शक्य आहे. एमा तुझा गैरसमज होतो आहे काहीतरी ."
एमा : " नाही या तुम्ही सर्व जण मी दाखवते " म्हणत सर्वांना खोलीकडे घेऊन जात असते. इथे बलविंदर व दलजीत पळ काढू लागतात. सनी व त्याचे काका त्यांना वेळीच पकडतात. त्या दोघांना धरून खोलीत आणले जाते.
आजी जोराजोरात आरडाओरडा करून रडू लागते " सिमर कुठे आहेस ग पोरी ? ये ना समोर ये ग. ही म्हातारी चुकली ग पोराला ओळखायला "
एमा सगळ्यांना खोलीत तर आणते. आता पुढे तिला कोणती भिंत ते समजत नव्हतं.
एमा म्हणते " सिमर आंटी तुम्हाला आज न्याय मिळेल. मला नेमकं सांगा कुठे आहात तुम्ही. इशारा तरी करा ."
खोलीची खिडकी उघडी असते जोराची हवा येते व खिडकीचे पडदे उडू लागतात. या परद्यात फिशटॅन्क जवळील पॉट पडतो. एमा हा इशारा समजून पॉटजवळ जाते. सनीने पोलिसांना कळवलेले असते. एमा पॉट ठेवलेल्या जागेला निरखून पाहते तर तिथे लॉक करण्याची जागा जिला चावीच्या मदतीने उघडू शकतो असं दिसते.
एमा : " अंकल आता खोटं बोलून उपयोग नाही चावी कुठे आहे सांगा"
आतापर्यंत पोलिसही आलेले असतात. काय तो प्रकार सर्व पोलिसांना सांगताच त्यांचा देखील विश्वास बसत नाही. पण एमा खंबीर पणे सिमरची बाजू मांडते हे पाहून पोलीस तिला साथ देतात. बलविंदर चावी टॅन्कमधे असल्याचे सांगतो. पोलिस हवालदार चावी शोधून काढतात. एमा त्या चावीने पॉटच्या जागी असलेले लॉक उघडते खटकन आवाज येतो पण कुठेलेचं कोणतेचं दार उघडत नाही. एमाला आठवतं दार आडवे आहे. ती पोलिसांना सांगून त्या भिंतीवरील सर्व डेकोरेशन बाजूला करते. भिंतीवरील प्लायवूड तोडताच एक मोठा दरवाजा दिसतो. तो उघडा असल्याचे कळताच हवालदार दरवाजा उघडून आत जातात. तर घरातील सर्व सदस्य डोळ्यांनी पाहतात आत एक हाडांचा सापळा पडलेला असतो. ती एक लहान खोली असते. आजवर कोणालाच याचा पत्ता नसतो. पोलीस बलविंदर व दलजीतला पुढील कारवाईकरिता घेऊन जातात.
एमा : " पोलीस ! थांबा ह्यांची मुलगी कुसूम ती देखील यांनी गायब केली आहे तिचा शोध घ्या ."
बलविंदर : " गायब नाही केली ती सुखरूप आहे तिच्या घरी. तिला मी एका बाईला दत्तक दिली होती ."
एमा : " तिचा काही कॉन्टेक्ट नंबर ?"
बलविंदर : " हो आहे . पण वर्षापूर्वी तिचं निधन झालं. मी गेलो होतो तेव्हा तिथे कुसूम नव्हती. माहिती काढली तर कळलं त्या बाईला कॅन्सर असल्याचं समजलं होतं म्हणून तिने काही रक्कम एका अनाथ आश्रमाला देऊन कुसूमला तिथे सोडलं होतं. "
एमा : " नाव काय अनाथ आश्रमाच ?"
बलविंदर : " ब्लेसींग फ्लॉवर"
नाव ऐकून एमाचे डोळे मोठे होतात. कारण याचं अनाथ आश्रमात ती वाढलेली असते. एमा लगेच आश्रमात कॉल करते व जवळपास वीस वर्षा पूर्वी आलेल्या सर्व बालकांची माहिती काढते जे भारतीय वंशाचे असतात. एमाच्या फोनचा स्पिकर ऑन असल्याने सर्वजण ऐकत असतात. समोरील व्यक्ती एका जुन्या फाइल मधे नमुद नाव व काहींची बदलेली नाव ऐकवत होते. यात एमाचं नाव देखील येतं.
सनी एमाचा फोन घेत विचारतो " एमाला कोण सोडून गेलं होतं काही माहिती ?" कारण एमाला कायम सल राहिली होती तिच्या घरून कोण आहे हे तिला माहिती नव्हतं.
समोरची व्यक्ती उत्तरते " हो माहीत आहे ना पण त्यांनी एमाला काही सांगण्यास सक्तीने नकार दिला होता. काही पैसे देखील दिले होते. एमा तीन वर्षाची असताना तिला येथे एक कॅन्सर पिडीत बाई सोडून गेली होती. "
एकून एका मागोमाग एक धक्केचं बसत होते. बलविंदर पोलिसांना विनवणी करून एमाजवळ जातो. तिला डाव्या बाजूच्या मानेवरील केस बाजू करण्यास सांगतो. एमा केस बाजूला करताचं बलविंदरला धक्का बसतो. ही जन्मखूण कुसूमच्या मानेवर असते अगदी तिचं एमाच्या मानेवर.
हे पाहून आजी एमाला एका आसऱ्या आड नेऊन एमाला तिचा टी शर्ट वर करायला लावते व कमरेत एक बिंदू सिमर ने गोंदवलेला असतो तो पाहते.
एमाच्या कमरेत ते गोंदण्याचं निशाण दिसतं. आजी एमाला बाहेर घेऊन येते " हीच माझी कुसूम आहे." असे म्हणते व तिचा मुका घेते. एमा भारावते तिला आज तिच कुटूंब परत मिळतं. घरातील सर्वजण एमाला सामावून घेतात. पोलीस कारवाई करिता बलविंदर व दलजीतला जेलमधे ठेवतात.
वीस एक दिवस उलटतात पोर्णिमेचा चंद्र पुन्हा आकाशी येतो. आज सिमर शेवटचं आपल्या मुलीला भेटते आशीर्वाद देते व मुक्त होते.
धन्यवाद !
लेखिका : अहाना
---_---_---_---_---_---_---_---_---_---_
---_---_---_---_---_---_---_---_---_---_
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा