फिशिंग

फरक...दाखवणारी. . अलककथा
फिशिंग....

त्याने रात्रीचा शिळा भात... चटणीशी कालवून खाल्ला.....व अंगणातील.... झुडुपाखाली मऊ मातीत....काठीने खणायला लागला... तशी पाच सहा मोठी गांडूळे निघाली.... त्याने पानाचा टोपा करून त्यांत भरली... खांद्यावर दोन गऱ्या घेतल्या.... व नदीकडे धूम ठोकली.....

फ्रीज उघडला.... त्याने फ्रीज मधुन ब्रेड काढुन त्याला बटर लाऊन खाले.... एक बॅग घेतली त्यांत नूडलस व बियर चे केन घेतले...आणि पाठीवर फिश स्टिक घेऊन तो नदीकाठी पोहचला.....

नदीकाठी पोहोचल्यावर त्याने आपल्या गऱ्यातील गळ सुटे केले...... त्याने पानांतील एक मोठ गांडूळ काढले... त्याचे दोन तुकडे केले.... आणि दोन्ही गळांना टोचून ते पाण्यात टाकले......

त्याने पाण्यात हात बुडवला... हाताला थंड पाणी लागल... त्याने ते पाणी चेहऱ्यावर मारले..... त्याला जरा फ्रेश वाटले... ..आपली फिश स्टिक काढली... त्याला फिश फूड लावले.... व गळ पाण्यात टाकला......

गळाकडे बघत असता...त्याला तहानेची जाणीव झाली... तो तसाच खडका वरून खाली उतरून नदीच...गढूळ पाणी पीला......

पाण्याची गूळणी...करून त्याने त्याने फोल्ड केलेली खुर्ची लावली..... व बियरचा एक घोट घेऊन तो गळाकडे पाहु लागला...

गळाला काहीतरी लागले असेल या आशेने... त्याने गळ उचलला.... तर गळ रिकामा होता... त्याने पुन्हा एकदा गांडुळांचा तुकडा गळाला टोचला व गळ नदीत टाकला.....


त्याने गळ उचलला एक मोठा गळाला लागला होता.... तो पकडुन त्याने आपल्या लहान बर्फाच्या पेटीत ठेवला.....

संध्याकाळ होत आली एकही मासा गळाला लागला नव्हता.... आज परत फक्त चटणीशी जेवायला लागणार म्हणुन तो काळजीत होता गांडुळांचा वास हाताला येईल म्हणून थोडस गवत चोळून त्याने हात धुतले.......


घरी गेल्यावर त्याने हॅन्ड वॉशने हात धुवून नोकराला तो मासा मस्त फ्राय करायला सांगितले..... नोकराने फ्राय करून मासा त्याच्या जेवणा सोबत टेबलवर आणून ठेवला......

त्याने जेवणावर नजर फिरवली आज देखिल फक्त चटणी सोबत सुका भात होता..... कारण आजही त्याच्या गळाला मासा लागला नव्हता.त्याने तसाच तो भात तोंडात कोंबला......

बियरचा घोट घेऊन.. त्याने त्या फ्रायचा व जेवणाचा आस्वाद घेतला....

तो पाण्याचा घोट घेऊन उद्या तरी एखादा मासा लागेल... असा विचार करत.....करत झोपी गेला....

लेखन : चंद्रकांत घाटाळ..
.