A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907def65dc47f72ca652a5632c33fbd9b2d72b18b5b1be): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi bhag 8
Oct 27, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग- 8

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग- 8

फिरूनी नवी जन्मेन मी भाग- 8

©®राधिका कुलकर्णी.

 

सकाळची कामे लगबगीने उरकत जशी सुखदा आणि आदि घराबाहेर पडले तसे नलिनीताईंनी हातातली उर्वरीत कामे बाजुला फेकुन सकाळीच वेणूताईंना फोन केला.

रिंग वाजताना एेकुन त्याही गडबडीतच फोनपाशी आल्या.

"हॅलोऽऽऽ कोण बोलतयं?"

"अहोऽऽ मी नलिनी बोलतेय सुखदाची आई."

"अगोबाई तुम्ही होय.मी म्हटले इतक्या सकाळी कोणाचा फोन? आणि ह्यावेळी तुमच्यामागे धावपळ मग तुमचा फोन कशाला येतोय असे वाटले." वेणूताईंनी सफाई दिली.

त्यावर नलिनीताई बोलल्या,"हो,खरय तुमचे पण आज बातमीच अशीय की राहवलेच नाही.सगळी कामे बाजुला सारून आधी फोन केला."

वेणूताई चिंतेेनेच विचारल्या,"काय झाले सगळे ठिक ना,जीजाची तब्येत??"

त्यांना उगीचच जीजाबद्दल काळजी दाटुन आली.

नलिनीताईंनी लगेच सांगितले,"अहो तब्येत वगैरे सगळ्यांचे सगळे ठिक आहे वेणूताई आणि जीजाही ठिक आहे.मी तुम्हाला वेगळीच बातमी द्यायला फोन केलाय."

सुहास त्याच्या आणि सुखदाच्या भेटीत काय बोलणे झाले हे वेणूताईंशी बोलला नसल्याने आणि मधल्या घडोमोडी सांगणारा नलिनीताईंचा फोनही मिस झाल्याने त्यांना क्लु लागला नाही की नलिनीताई नेमकी कोणती बातमी द्यायला फोन केल्या आहेत.

तोच विचार करत त्यांनी विचारले,"कसली बातमी लवकर सांगा बाई जीव टांगणीला लागला नुसता आता."

मग जास्त न ताणता नलिनीताईंनी सुखदाने लग्नासाठी होकार दिल्याची बातमी सांगुन टाकली.त्यावर वेणूताईंना तर हर्षवायु व्हायचाच बाकी राहीला.

"अहो काय सांगता!!!!खरच का हो म्हणाली सुखदा!देवच पावला म्हणायचा की..!"

त्यांना आनंदात काय बोलावे हेही सुचत नव्हते.

नलिनीताईंना दूर असुनही त्यांची अवस्था समजत होती.

थोड्याश्या भावनिक झालेल्या वेणूताई पदराने डोळे टिपत होत्या.आवाजही जरासा कातर झालेला.तरीही लगेच स्वत:ला सावरत मिश्किलपणे म्हणाल्या," मगऽऽ काय विहिणबाई आता पाहुणचार घ्यायला कधी येवु?सगळे मानपान घेणार बरं ही विहीण….आता पदर खोचुन तयार व्हा ह्या विहीणीचे नखरे उचलायला."

नलिनीताईही त्यांच्या मस्करीवर हसतच म्हणाल्या, "आता करू की.न करून कुठे जाणार..??मुलीकडची बाजू ना आमची.करू होऽऽऽ सगळे मानपान करू…तुम्ही फक्त नवरा मुलगा घेऊन या..."

त्यावर दोघीही पुन्हा हसायला लागल्या.आज कितीतरी दिवसांनी दोन आया इतके मनमोकळे हसत होत्या.चिंता काळजीची धुरकट पटलं विलय होऊन एक शुभ्र वलयांकीत प्रकाश दोन्ही घरांवर पसरल्यासारखे वाटत होते.

"विहीणबाई विहिणबाई चला अाता ऊठा….।

वेळ नका दवडु

कामे पडली फारऽऽ 

चला आता ऊठा

आता ऊठा….।."

नलिनीताईंनी लगेच काव्यात्मकरीत्या वेणूताईंना आपल्या मनातला आनंद व्यक्त केला.

वेणूताई हसुन मस्करीतच म्हणाल्या," आता फक्त चारोळ्या ऐकवुनच पोट भरणार आहात का आमचे?खरच कामाला लगायला हवे."

वेणूताई लगेच जरासा विचार करून 

म्हणाल्या,"मी काय म्हणतेऽऽ..,एकदा सगळे भेटुया का आपण.?"

"होऽऽमलाही तेच वाटते.आता होकार मिळालाय तर वेळ नको घालवायला.उद्याच भेटु संध्याकाळी."

नलिनीताईंनीही वेणूताईंच्या प्रस्तावाला हमी भरली.

"बरंऽऽमग मी सुहासशी बोलते आणि वेळ वगैरे ठरवुन सांगते."

वेणूताई पुढे लगेच म्हणाल्या, "असेऽकरा तुम्ही सुखदा आणि सगळ्यांना घेऊन आमच्याकडे जेवायलाच या उद्या,म्हणजे समोरासमोर एकदा मुलांसमक्ष बोलणे होईल आणि आपली पुढची सगळी बोलणीही ठरवता येईल काय??"

वेणूताईंच्या ह्या मुद्यावर लगेच सहमती दर्शवत नलिनीताई उत्तरल्या," हो ठिकच वाटतेय तरी एकदा सुखदाला वेळ वगैरे विचारून मी कळवते."

"हो चालेल.बरं ठेवु आता.अजुन पूजा व्हायचीय माझी."वेणूताई उद्गारल्या.

"होऽऽ ठिक आहे.बोलु पुन्हा.ठेवते."

 

ठेवते म्हणत नलिनीताईंनी फोन ठेवला तरी त्यांच्या मनात आनंद ओसंडुन वहात होता.

काय करू अन् काय नको असे झालेले.

लगेच काहीतरी आठवुन त्यांनी त्यांच्या आेळखीच्या उपाध्यायांना फोन लावला.

नजिकच्या काळातले चांगले लग्नमुहूर्त विचारून घेतले.पुढल्या महिन्यातच जो पहिला मुहूर्त असेल तोच धरून लवकरात लवकर हा विवाह उरकावा अशी त्यांची इच्छा होती.संपदाला जाऊन आता पाच महिने पूर्ण होत होते म्हणजे वर्षाच्या आत हे कार्य लवकरात लवकर उरकणे क्रमप्राप्त होते.

उपाध्यायांनी एक दोन चांगले मुहूर्त सुचवले.त्यांच्या मते खरे तर नोव्हेंबर शिवाय मुहूर्तच नव्हते लग्नाचे परंतु त्यातल्या त्यात एक दोन शुभ दिवस त्यांनी काढुन दिले.

आता फक्त उद्याच्या भेटीत ह्याबाबतीत सर्वांशी बोलुन ह्यातलाच एखादा शुभ-दिन सर्व संम्मत्तीने फायनल केला की पुढच्या तयारीला लागता येणार होते.

मनातल्या मनातच नलिनीताईंची लग्न-यादी तयार होऊ लागली.आज कामातही त्यांचे लक्ष लागत नव्हते. काय करायच,कसे करायचे,कुठे करायचे ह्या सगळ्याची बोलणी ठरवणे.एक ना अनेक विचार मनात घोंगावायला लागले.

       ~~~~~~~~~~~~~~~

सुखदा सगळी कामे उरकुन जीजाला झोपवत होती इतक्यात नलिनीताई खोलीत येऊन तिच्या बाजुला बसल्या.तिने खुणेनेच काय असे विचारले.

जीजाची झोपमोड होऊ नये म्हणुन नलिनीताई कुजबुजल्या आवाजातच तिला जीजाला झोप लागली की हॉलमधे ये असे सुचवुन हलकेच तिथुन बाहेर पडल्या.

नलिनीताई सुखदाची वाट पहात हॉलमधेच बसल्या होत्या रणजितरावही तिकडेच येऊन बसले.

सुखदाही थोड्याच वेळात हॉलमधे आली.

"हंऽऽ बोल काय बोलायला आत आली होतीस?"

तिने कुतुहलानेच अंदाज घेत विचारले.

त्यावर घसा साफ करत नलिनीताईंनी बोलायला सुरवात केली,"आज सकाळीच वेणूताईंना फोन करून तुझा होकार कळवला."

"बरं मगऽ?"

"त्या म्हणताएत उद्या त्यांच्याकडे सगळे भेटुयात.पण तुला विचारून ठरवावे म्हणुन आले.तेच विचारायचे होते,तु उद्या किती वाजेपर्यंत येशील?कितीची वेळ सांगु त्यांना?"

थोडावेळ विचार करून सुखदा बोलली,"अगं मी काय येईन रोजच्या वेळी सात साडेसात पर्यंत.त्यानंतर निघु."

बरं मग आठ साडेआठ पर्यंत पोहोचतो असे कळवु?"

नलिनीताई उत्तराच्या अपेक्षेने सुखदाकडे बघत होत्या.

"होऽऽऽचालेल.मला हरकत नाही."

सगळे बोलणे संपुन जो तो आपापल्या खोलीत परतला.

सुखदाही झोपायची तयारी करतच होती की मोबाईलवर नोटीफीकेशनची रींग वाजली.

ह्यावेळी कोण मेसेज करणार मला ह्या आश्चर्यातच तिने फोन ओपन केला.

सुहासच्या मेसेजची नोटीफिकेशन बघुन तिने नवलानेच ओपन करून वाचला.त्याचा मेसेज खालील प्रमाणे होता.

*मला कळवावेसे वाटले नाही नाऽऽ? हिच का आपली मैत्री…!!*

आणि त्याखाली रुसलेल्या इमोजीजचे तीन चार आयकॉन सेंड केलेले.

तिलाही ते वाचुन हसु आले.

तिने मस्करीतच उत्तर दिले,"तु तरी मला कुठे कळवले होतेस होकार देताना!!!?"

"Tit for Tat ! you know ! "

त्याखाली चिडवणारे इमोजी आयकॉन सेंड करून ती पुढच्या मेसेजची वाट पहात राहीली.

सुहासही मिश्कीलपणे म्हणाला,"अच्छाऽऽ!! ये बात है.. फिर हम भी ये बात आगे याद रखेंगे..

दोस्त दोस्त ना रहाऽऽऽ…."

सुहासचे सॅडसाँग सोबत धाय मोकलुन रडणारे इमोजीज् बघुन सुखदाला हसु आवरेना.

तिने काही न बोलता फक्त हसायचे इमोजी सेंड केले.

मस्करी झाल्यावर जरा सिरीयस होत सुखदाने सांगितले,"आत्ताच आईबाबांशी बोलणे झाले.आम्ही साडेआठ पर्यंत पोहोचतो तिकडे.

तुही येशील ना तोपर्यंत??"

"हो माझेही नुकतेच बोलणे झाले तेव्हाच कळले उद्याचे.मी येईन त्यावेळपर्यंत.."

सुखदा-"बरं पण उशीर खूप झाला म्हणुन आईने वेणूमावशींना फोन केला नाही ती उद्या सकाळी कळवते म्हणालीय पण आता तुच त्यांना कळवुन टाक."

सुहासलाही थोडी चेष्टेची लहर आली लगेच तो म्हणाला,"छे छे..आम्ही नवरदेव आहोत.आम्ही असे निरोप-बिरोप नसतो कळवत.

मुलीकडच्यांनी अशी कामे सांगायची हिंम्मतच कशी केली??"

मग सुखदाही चेष्टेत म्हणाली,"ओह्ऽऽ!!आम्हाला माहितच नव्हते मुलाकडच्यांना एवढा तोरा आहे हे.अशा घराशी आम्हालाच सोयरीक जुळवायची नाही.बसा कवटाळुन तुमचा तोरा..

हे आम्ही चाललो…"

त्याबरोबर सुहासने माघार घेणारे रडके नमस्कार करणारे इमोजी टाकत तिला म्हणाला,"बरं बरं लग्न नका मोडु कळवतो निरोप तुमचा."

"अजुन लग्न झाले पण नाही तर ही बया इतके नाचवतेय पुढे काय होणार रे देवाऽऽऽऽ….तुच वाली रे बाबा आता."

पुन्हा रडणारे इमोजी.

दोघांची अशी मस्करी चॅट्समधुन चाललेली.

 

 मध्यंतरीच्या काळात त्यांचे नकळत आक्रसलेले  मैत्रीचे नाते पुन्हा एकदा सहजपणे गुंफले जात होते ही एक समाधानाची बाब होती.

"चल उद्या भेटुच.बायऽ गुड नाईट !"

म्हणत दोघांनीही चॅट संपवला.

सुहासशी बोलण्याने तेवढ्याच वेळात सुखदाला एकदम फ्रेश फिल झाले.मैत्रीची ताकदच किती वेगळी असते ना.परिस्थिती कोणतीही असो मित्र नावाचा एक वाटाड्या तुमच्याजवळ असेल तर तो तुमच्या जीवनाचे तारू कधीही भरकटुच देत नाही. 

तिलाही आज तिचा तोच हरवलेला वाटाड्या मित्र पुन्हा मिळाल्याचा आनंद होत होता.शब्दात ही भावना व्यक्त करता येणे शक्यच नव्हते.

त्याच्या एका मेसेजनी फुललेला तिचा चेहराच सगळी कहाणी आपसुक सांगत होता.

      ~~~~~~~~~~~~~~

सुखदाच्या डोक्यात आज कॉलेजला निघाल्यापासुनच एक विचार सतत चालु होता.तिच्या मनात लग्न अत्यंत साधेपणाने घरातल्या घरातच जवळचे काही नातेवाईक जे दोन्ही घरासाठी अगदी खास असतील तेवढ्यांनाच बोलवुन सरळ नोंदणी पद्धतीने विवाह उरकुन महत्त्वाचे विधी घरातच करावेत असे वाटत होते पण ह्याला सुहास कसा रिअॅक्ट होईल?

घरच्यांच्या काय प्रतिक्रीया येतील हा अंदाज लागत नव्हता.नलिनीताई ज्या उत्साहात लग्नाबद्दल विचार करत होत्या ते पाहता त्यांनाही हे विचार कितपत पचनी पडतील हा प्रश्नच होता.काय करावे?ह्या बाबत अगोदर सुहासशी बोलावे का?

विचारांच्या नादातच ती कॉलेजला पोहोचली तरी 

 विचार मात्र मनात घोळतच होते.

हे सगळे बोलणे आज रात्रीच्या बैठकी आधीच होणे गरजेचे होते कारण सगळ्यांसमोर ह्या विषयाला फाटे फुटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि मग मोठ्यांच्या पुढे अरेरावीने आपला मुद्दा ताणुन धरणेही बरे दिसले नसते म्हणुनच हा विषय घाईने सुहासशी बोलणे गरजेचे वाटत होते तिला.

 विचार मनाशी पक्का झाला तसा तिने सुहासला मेसेज केला….,

" हाय सुहास...गुड मॉर्निंग!!थोडे बोलायचे होते.कधी फोन करू?Reply Asap.its urgent."

सुहासही ऑफीसच्या वाटेवरच होता.ड्राईव्ह करतानाच मेसेज बघुन त्याने लगेच रिप्लाय दिला," हायऽऽ! गुड मॉर्निंग!!

what happened? 

Anything serious? "

त्यावर सुखदाने लगेच रिप्लाय दिला…

"No..Nothing serious but its urgent.Need to talk before we meet in the evening."

सुहासलाही अंदाज आला काहीतरी महत्त्वाचे असणार त्याशिवाय ही असा कॉलेज अवर्समधे मेसेज करणार नाही.त्याने लगेच कळवले,"Ok.will call you in the

afternoon in lunch hours.bye.gd day!"

आता कधी दुपार होते असे झालेले सुखदाला.

एक एक लेक्चर्स संपुन आता त्यांचा लंचब्रेक झाला पण सुहासच्या फोनचा पत्ता नव्हता अजुनही.

तिची तगमग वाढत चाललेली.नंतर तिलाही फोन करता येणार नव्हता.काय करावे विचार करत तिनेच फोन लावला.

रींग जात होती पण सुहासने फोन उचलला नाही.तिची तगमग जास्तच वाढली.

नको त्या विचारांची उगीचच गर्दी व्हायला लागली मनात.

आपण चुकीच्या वेळी तर फोन केला नाही ना?तो कामात असेल का?म्हणालाय ना करतो मग करेल की,वाट पहायला कधी जमणार आपल्याला..?

स्वत:च स्वत:च्या अतिशिस्तबद्धतेवर चरफडत होती.

स्वत:ला दोष देणे चालु असतानाच सुहासचा कॉल येताना फोन व्हायब्रेटर मोडवर धक्के देत होता.तिला हायसे वाटले.पटकन फोन उचलला आणि दोघेही एकाचवेळी सॉरी म्हणले.

त्यावर दोघेही हसले.

सुहास तिला म्हणाला,"मी तर फोन करायला विसरलो म्हणुन सॉरी म्हणालो पण तु कशासाठी सॉरी म्हणालीस!!"

"अरे मला वाटले तु कामात असशील आणि मी तुला फोन करून डिस्टर्ब केले असेल म्हणुन तुला सॉरी म्हणाले."

"अच्छाऽऽऽ असे होय..मला वाटले तु प्रॅक्टीस करत आहेस." सुहास तिला चेष्टेतच पण गंभीरतेने बोलला.

तिला अर्थातच त्याचा बोलण्याचा रोख न समजल्याने तिने विचारले,"म्हणजे?कसली प्रॅक्टीस?"

अगंऽऽऽ हेच लग्नानंतर सारखे सॉरी कसे म्हणायचे ही प्रॅक्टीस गं.!!"

आत्ताशी कुठे तिची ट्युब पेटली.जराशा रागाच्या अविर्भावात ती चेष्टेतच म्हणाली,"आता ही प्रॅक्टीस तुलाच करायला लागणार आहे माझ्या मित्रा...तयार रहा सॉरी कधीही कुठेही केव्हाही म्हणायला.."

दोघांची अशी मस्करी चाललेली तशी भानावर येत सुखदा म्हणाली,"अरे आपण गमजा काय करत बसलोय मला लवकर बोलायचेय वेळ आहे का तुला..कारण मला नंतर वेळ नाहीये."

सुहास-"हो गंऽऽऽ बोल आहे वेळ मला.आणि नसेल तर तुझ्यासाठी काढेन मी."त्यातही डायलॉग हाणलाच त्याने.

सुखदा-"बरं ऐकऽऽ माझ्या मनात एक विचार आलाय.त्यावर मला तुझे मत जाणुन घ्यायचेय."

सुहास-" हं सांग ना..मी ऐकतोय."

सुखदा-"मला असे वाटतेय की हे लग्न रजिस्टर पद्धतीने व्हावे.आणि काही महत्त्वाचे विधी घरातच करावेत.अत्यंत साध्या पद्धतीने अगदी बोटावर मोजता येईल इतकेच खास नातेवाईक बोलवुन.तुला काय वाटते?"

सुहास-"हम्मऽऽऽ तुझा विचार पटतोय मला पण मग घरच्यांचे काय?त्यांना हा विचार पटेल का?"

सुखदा-" म्हणुनच तर आधी आपण दोघांचे एकमत व्हायला हवे ना.जर तु आणि मीच हा आग्रह आपापल्या घरच्यांना सांगुन कनव्हीन्स केले तर ते ऐकतील.पण बैठक सुरू झाल्यावर मात्र अचानक हा मुद्दा उपस्थित झाला असता माझ्याकडुन तर मग त्यांचे मत बदलणे मला एकटीला अवघड गेले असते म्हणुन तुला सांगायला हा फोन केला ना."

एका दमात श्वास न घेताच तिने सगळे सुहासपुढे सांगुन मोकळी झाली.

"हम्म..मुद्दा न पटण्या सारखे काहीच नाहीये.ठिक आहे.असेच करू.भेटु संध्याकाळी आमच्याकडे तेव्हा सविस्तर बोलु.आता पळतो. माझी मिटींग लाईन्डअप आहे.आय हॅव्ह टु गो नाऊ.सो सॉरी डिअर…"सुहास अजिजीनेच बोलत होता.

महत्त्वाचे बोलुन झाले होते आणि तिलाही लेक्चर्स होते त्यामुळे तिनेही ओके म्हणत फोन बंद केला.

आता सुहासचा होकार मिळाल्याने तिला जरा हायसे वाटत होते.

            ~~~~~~~~~~~~~~~

संध्याकाळी ठरल्या प्रमाणे वेळेतच सुखदाकडची मंडळी वेणूतांईंकडे पोहोचली.दारात पोहोचताच चिमुकली जीजा कडेवरून वेणूताईंकडे झेपावली.आदिही आज्जीला जाऊन बिलगला.दोन्ही कोकरांना एक कडेवर एक मांडीशी घेत वेणूताई त्यांच्यावर प्रेमसुखाचा वर्षाव करू लागल्या.जवळपास पाच महिन्यांनी त्या लेकरांना बघत होत्या.एकीकडे डोळ्यात पाणी तर दुसरीकडे आनंदाने लाड करण्याचा सोहळा चाललेला.दोघांचाही ह्या आज्जीवर भारी जीव.जन्मापासुन त्यांनीच तर संभाळले होते संपदाच्या माघारी त्यामुळे मुलांनाही आज्जीला काय काय सांगु झालेले.

आदि तर आपली निबंध वही देखील घेऊन आला होता गुपचूप बाबा आणि आज्जीला दाखवायला.त्यांचा हा सर्व कौतुक सोहळा चाललेला एवढ्यात सुहासच्या गाडीचा हॉर्न वाजला तशी पाेरं लगेच गेटकडे धावली.

हे सगळं रोज अनुभवणारी सुखदा कुतुहलाने मुलांना निरखत होती.मुले बोलत नाहीत पण मनात ते बाबाला,इकडच्या आज्जीला किती मिस करतात हे त्यांच्या आत्ताच्या कृतीतुन सहज लक्षात येत होते.

आपण घेतलेला निर्णय किती योग्य होता आहे ह्यावर पुन्हा एकदा तिचे मनातल्या मनातच शिक्कामोर्तब झाले.

डोळ्यातले समाधानाचे आश्रु अलगद टिपत सुखदाही समोर गेली.

सुहास दोन्ही पिलांना कडेवर घेत त्यांचे पापे घेतच आत आला.

सुखदाने त्याची अवघडलेली अवस्था बघुन जीजाला कडेवरून घेतले तशी जीजा कधी नव्हे ते सुखदापासुन झेपावुन बाबांवर उडी मारायचा प्रयत्न करत होती.ते पाहुन सुहासच बोलला, "आलो पिल्लु बाबा बाहेरून आलायं नांऽऽ छीऽऽ ब्यॅऽऽ झालाय नाऽऽ छान फ्रेश होऊन तुला घेतो हं पिल्लुऽऽ".

त्याने दुरूनच एक फ्लाईंग कीस देत आपल्या रूमकडे गेला.

सगळ्यांचे चहापाणी उरकले तसे सगळे बैठकीत सुहासची वाट पहात बसले.सुखदाला कधी नव्हे ते आज खूप अवघडलेपण जाणवत होते.ह्या आधीही कैकदा ह्या घरी ती आली होती पण आज नात्यांचा नवा परिपाठ जोडताना तिला जरा अस्वस्थ,कसल्यातरी दडपणात असल्याचे जाणवत होते.तीचे हे सगळे मनातल्या मनात चाललेले असतानाच सुहास फ्रेश होऊन आला.

आई/बाबा म्हणजेच रणजितराव आणि नलिनीताईंना नमस्कार करून जवळच्याच सोफ्यातील खुर्चीत जीजाला मांडीवर घेऊन बसला.किंचित स्मित चेहऱ्यावर ठेवुन नलिनीताई आणि रणजितरावांची औपचारिक चौकशी केली.

दोन मिनिट सगळे एकदम शांत झाले.

वातावरणात अचानक एक तणाव जाणवु लागला.ह्याआधीही कितीदा भेटलेले हेच सगळेजण पण तेव्हा जी नाती तयार झाली होती आज त्याच नात्यांना नविन ओळख देताना सगळेच पुन्हा अनोॆळखी का भासत होते ह्याचे उत्तर आत्तातरी कुणाजवळच नव्हते.

ह्या नव्या नात्यांची परिभाषा तयार व्हायला ,नविन नाळ जुळायला कदाचित काळाशिवाय कोणाचीच मदत होऊ शकणार नव्हती.

त्या ओढग्रस्त शांततेचा भंग करत वेणूताई रणजितराव आणि नलिनीताईंना उद्देशुन म्हणाल्या,"चला सगळेच जमले आहेत तर एकदा महत्त्वाचे बोलुन घेऊ.जास्त उशीर नको व्हायला,उद्या सगळ्यांनाच कामावर जायची घाई आहे ना…"

त्यावर नलिनीताई म्हणाल्या, "हो आता सुखदा आणि सुहासराव समोरच आहेत तर एकदा त्यांचा होकार किंवा जे काय आहे ते समोरासमोर होऊन जाऊ दे."

"काय सुहासराव हा प्रस्ताव मान्य आहे ना तुम्हाला?"

सर्वासमक्ष तो आज त्याचे मुद्दे पहिल्यांदाच मांडणार होता.त्याला बोलायला जरा जड जात होते पण लग्न हा ही एक व्यवहार आहे त्यात लपुनछपुन काही राहिला नको म्हणुन नाईलाजाने का होईना त्याला बोलणे भाग पडत होते.

सुहासने बोलायला सुरवात केली.

"आई /बाबा,मी मझे विचार ह्याआधी आईच्या माध्यमातुन तुम्हाला पोहोचवलेच आहेत.सगळ्यांनाच,सुखदालाही माझे विचार माहीत आहेत तरीही पुन्हा सर्वांसमोर सांगतो.

संपदाला जाऊन फक्त पाच महिने होत आहेत.ह्या धक्क्यातुन अजुन कोणीच सावरलेले नाहीये.मी तर अजुनही तिच्या आठवणीतुन बाहेर आलेलो नाहीये पण मुलांना आईची गरज आहे हा मुद्दाही नाकारण्याजोगा नाही हे पटलेय मला.त्यामुळेच केवळ मुलांकरता मी ह्या लग्नाला तयार झालेलो आहे.सुखदा फक्त मुलांची आई ह्या नात्यानेच ह्या घरात पाऊल ठेवेल हे सगळ्यांनी ध्यानात असुद्यात.नंतर ह्या विषयावरून कुठलेही क्लेश मतमतांतरे होऊ नयेत म्हणुन हे सर्वांसमक्ष सांगतोय."

"बाकी सुखदाच्या बाबतीतली प्रत्येक जवाबदारी मी पुर्णपणे संभाळेन.तिला जसे तुमचे घर तसेच हे घर असेल आणि तिचे सर्व निर्णय ती इथेही स्वतंत्रपणे घेऊ शकेल ह्याची मी ग्वाही देतो.

तीला इकडे कुठलीच कमी पडणार नाही ह्याचीही मी काळजी घेईन,हा शब्द आहे माझा."

सगळेजण सुहासचे बोलणे शांतपणे एेकत होते.त्याचे बोलणे संपले तसे वेणूताईं सुखदाकडे बघत म्हणाल्या,"सुखदा आता तुही तुझ्या मनात काय असेल ते मोकळेपणाने सांग बरं."

सुखदाला असे चार लोकांत आपले मत मांडणे कसेतरीच वाटत होते पण अटिंवर जेव्हा नाती जाेडली जातात तेव्हा भावनिकता बाजुला ठेवुन व्यवहार जपावाच लागतो.त्यामुळे हिंम्मत करून तीनेही बोलायचे ठरवुन सुरवात केली,"वेणूमावशी आत्ता सुहास जे काही बोलला त्याच्याशी मी पुर्णपणे सहमत आहे.त्याच्या सगळ्या अटिंसहीत मला हा प्रस्ताव मान्य आहे फक्त माझी एक छोटिशी ईच्छा किंवा विनंती समजा हवं तर पण ती आहे.जर ती तुम्ही सर्वांनी मान्य केली तर मला आनंद होईल.तुमची परवानगी असेल तर सांगते…"

ह्यावेळी सुचकपणे तिने सुहासकडे पाहीले.सुहासला तिचा रोख कळला.

त्यावर सर्वच म्हणाले,"अगं बोल की इकडे कोणी परकं का आहे, सगळी घरचीच तर आहेत बोल काय बोलायचे ते सांग. "

"आई/बाबा,वेणूमावशी मला तुम्हाला असे सांगायचेय की लग्नाला तर मी तयार आहे पण अजुन सपुताईच्या जाण्याने आपण सारेच व्यथित असताना लग्नाचा खूप मोठा तामझाम करणे मनाला रूचत नाही तेव्हा लग्न अगदी साध्या पद्धतीने व्हावे असे मला वाटते.जर सुहासची हरकत नसेल तर आम्ही रजिस्टर्ड पद्धतीने कोर्ट मॅरेज करू आणि महत्त्वाचे काही विधी घरच्या घरी करावेत असे वाटते.खूप लोकांनाही गोळा करू नये.जे नातेवाईक आपल्या खूपच जवळचे आहेत अशा चार दोन जणांना बोलवावे असे मला वाटते.ह्यावर सुहासचे मत काय हे कळले तर बरे होॆईल."

आपले वाक्य पुर्ण करता करताच तिने सुहासकडे सुचक नजरेने बघितले जणु ह्या प्रस्तावाला त्याची स्वाक्षरी मिळाली की मग कोणीच काही बोलणार नाहीत ही तिची अंतस्थ ईच्छा असावी ह्या मागची.

सुहासनेही आधीच ठरल्याप्रमाणे त्याला पटलेय असे दाखवत म्हणाला,"हो मलाही हा मुद्दा पटतोय सुखदाचा.जास्त गाजावाजा न करता अगदी घरच्यांच्या समवेत हा सोहळा पार पाडावा असे वाटते."

सुहासच्या बोलण्याने सुखदाही खुष झाली.मनावरचे खूप मोठे दडपण कमी झाले.आता दोघांची स्विकृती असल्यावर मोॆठ्यांना हे मान्य करावेच लागणार ह्यात तीळमात्र शंका नव्हती सुखदाला.तिने कुणाचे लक्ष नाही बघुन हलकेच फक्त ओठांच्या हालचालीतुन सुहासला थँक्यु म्हणाली.

तिला वाटले कोणी बघितले नाही पण वेणूताईंच्या नजरेतुन त्यांची ही नेत्रपल्लवी सुटली नाही.

पण ह्यावर मोठ्यांनीही एक अशीच अट तोड म्हणुन ठेवलेली ह्यांना कुठे माहित होती.शेवटी जुन्या जाणकारांची डोकी जरा चार हात जास्तच पुढे चालतात ह्याचा अनुभव ह्या दोघांनाही यायचा होता.

आम्ही तुमच्याहुन चार पावसाळे जास्त पाहिलेत.

उडती चिडियाँ के परं गिनने मे हम माहिर है।

किंवा मग.,

हम आपकी नस-नस से वाकिफ है।

ह्या सगळ्या समानार्थी म्हणी ह्या सिनियर्स तिगडीला आत्ता लागू पडत होत्या.

आता ह्यांच्या मनात कोणता मनसुबा घर करून आहे हे लवकरच कळणार होते.

"काय असेल तो बॉम्ब…..?"

म्हाताऱ्यांच्या डोक्यात काय खिचडी पकत होती हे मात्र दोघांसाठीही कोडेच होते…...

------------------(क्रमश:)------------------------

(क्रमश:-8)

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार मंडळी..

साध्या पद्धतीने लग्नाची अट हि मोठी मंडळी मान्य करतील का?

त्याबदल्यात दुसरी कोणती गोष्ट तर ते मान्य करून घेणार नाहीत ना दोघांकडुन?"

काय बॉम्ब टाकणार आहेत सिनियर्स??

हे सगळे कोडे जाणुन घ्यायला पुढचा भाग वाचायला विसरू नका.

हा भाग कसा वाटला तेही कमेंट्समधे नक्की सांगा.

(लेखन/वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत तुम्ही हि कथा कुठेही शेअर करायला माझी पूर्ण परवानगी आहे.

साहित्यचोरी कृपया करू नका.हा कायद्याने दंडात्मक गुन्हा आहे.)

धन्यवाद.

@राधिका कुलकर्णी.
 

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..