A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionde75bec94f7888a4fa70c806fcf0925ff3ac1b605723f5a6aa94df69daa096a69df1e9f1): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi bhag 7
Oct 21, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-7

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग-7

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -7

©®राधिका कुलकर्णी.

 

"आज्जी आज्जीऽऽ लवकर ये ना...कुठेस ग आज्जुडे?"

आदित्य शाळेतुन आला तोच नाचत.घरात पाऊल पडतेय तोच घरभर आपल्या आज्जीला म्हणजेच नलिनीताईंना हुडकत होता.

सगळे काम उरकुन नुकत्याच त्या जीजाला झोपवुन तिच्याच बाजुला लवंडल्या तशी डुलकी लागली त्यांना.

आदिची यायची वेळ झालेलीही त्यांना समजले नाही पण घरभर आदिच्या जोरजोरात हाका मारण्याने त्या जाग्या झाल्या.पटकन खोलीबाहेर आदिच्या जवळ जात बोलल्या, "आलं का माझं पिल्लु शाळेतुन..काय झाले?इतक्या जोरजोराने हाका का मारतोएस?आजोबा आत्ताच झोपलेत त्यांची झोपमोड होईल ना??हळु बोलऽऽ."

 

आदित्य लाडात आज्जी जवळ जात,"अगं आज्जुडे कारणच तसेय नाऽऽऽआणि तु कुठे दिसली नाहीस मग मी आवाजच देणार ना नाहीतर तुला कसे कळणार की मी तुला शोधतोय."

नलिनीताईंना त्याच्या बोलण्याने हसु फुटले.

"बर सांग आज आज्जुडीला का शोधतोएस आल्या आल्या?"

"आज्जी मी ना आज खूप खूप म्हणजे खूपच हॅप्पी आहे."

नलिनीताई-"अरे वाऽऽ!!का बुवा इतके खुष आहे आमचे पिल्लु??"

आदित्य- "आज ना स्कूलमधे मानसी मॅमने सरप्राईज टेस्ट घेतली."

"अच्छाऽऽ!! मग?"

नलिनीताई आदिचे कपडे बदलता बदलता उत्सुकतेनेच विचारल्या.

"अगं त्या टेस्ट मधे मॅमनी एक एस्से लिहायला सांगितला.ज्याचा एस्से सगळ्यात बेस्ट असेल त्याला होल क्सास समोर एस्से रिडींग करायला मिळणार.त्यात माझ्या एस्सेला फस्ट प्राईझ मिळाले,अॅम सो हॅप्पीऽऽ!! हुर्रे येहेऽ!!."

"हे बघ मॅमनी मला काय दिलेऽऽ.."

मानसी मॅमने गिफ्ट दिलेले चाॅकलेट आज्जीपुढे नाचवत आनंदातच आदि आज्जीला नाचुन हातवारे करून दाखवत होता.

"अरे वाऽऽऽ!! मज्जाय बाबा एका मुलाची.पण एस्सेचा विषय काय होता..?"

"एस्सेचा सब्जेक्ट होता - *द मदर*."

"अरे वाऽऽ!! मग आमच्या पिल्लुने काय लिहीले आम्हाला नाही का वाचुन दाखवणार!!"

नलिनीताई गमतीतच आदिला बोलल्या.

"होऽऽऽ दाखवणार नाऽऽ पण आत्ता नाही.सुखाई,आज्जो आणि तु सगळ्यांना एकत्रच वाचुन दाखवणार…"

"बरं बरं चला हातपाय धुवुन जेवुन घ्या आणि नीजा जरावेळ."

"आज्जीऽऽ मी आज कारटुन बघणार आहे. मला नाही झोपायचेय आज."

"बरंऽऽ पण आधी जेवण तर कर."

आदित्यची ही चीवचीव चाललेली आज आल्यापासुन.भलतीच खूष होती स्वारी आज.

सारखे मधे मधे दाराकडे बघणे चाललेले.

"काय रे सारखे दरवाजाकडे काय बघतोएस,कोणी मित्र येणार आहे का घरी?"

नलिनीताईंनी त्याची लगबग बघुन उत्सकतेनेच विचारले.

"अगं मी सुखाईचा वेट करतोयऽऽ तुला कळतच नाही बाबाऽऽ.."

त्याची मस्करी करायला नलिनीताईंनी मुद्दाम विचारले,"का.? सुखाईचा वेट का करतोय?तुला काही हवेय का?मी देते की नाहीतर आज्जोला सांग ते देतील आणुन.."

"अगंऽऽ आज्जुडेऽऽ मला काही नक्कोएऽऽय...मला एस्से रीड करायचाय ना तिच्यासमोर म्हणुन वेट करतोय.तु अशी कशी ग विसरतेस ओल्ड पीपल सारखी…!!"

तोडक्या मोडक्या इंग्रजी मिश्रीत मराठीमधे तो वैतागुनच आज्जीला बोलला.

त्याच्या वैतागण्याने नलिनीताईंना अजुनच हसु फुटले पण हसु आवरतच त्या निरागसपणे बोलल्या

"अरे खरच की!!मी विसरलेच."

"बर तु आता थोडा वेळ तुझा होमवर्क करून घे म्हणजे सुखाई आली की तुला फक्त एस्से वाचायचेच काम राहील..चला पळा आता स्टडीरूममधे.

नलिनीताईंनी त्याला मुद्दामच अभ्यासाला पिटाळले नाहीतर तो सारखा सुखदाची वाट पहात चकरा मारत बसला असता.आज त्याची एक्साईटमेंट शिगेला पोहोचली होती.कधी एकदा सुखाई येते आणि तिला आपला एस्से वाचुन दाखवतो असे झालेले.

 

शेवटी एकदाची ती जीवघेणी प्रतिक्षा संपली आणि सुखदाच्या गाडीचा आवाज आदिला आला तसा तो धावत पळत स्टडी मधुन दरवाजाकडे गेला.सुखदा अजुन गाडी पार्कच करत होती की तो घाईतच दार उघडुन व्हरांड्यातुनच सुखदाला आवाज देऊ लागला,"सुखाई सुखाईऽऽऽ,हे बघ,हे बघऽ." हातात मॅमने दिलेले व्यवस्थित जपुन ठेवलेले चॉकलेट नाचवत सुखाईला दाखवत होता.

त्याला तितकाही धीर धरवेना की ती गाडीतुन बाहेर येईल मग बोलु.

आदिचे चॉकलेट हातात घेत नाचणे बघुन सुखदालाही आश्चर्यच वाटले," हॅल्लोऽऽ चॉकलेट डान्स का करतोएस.?"

"आणि चॉकलेट खायचे सोडुन हातात घेऊन का नाचतोय?"

सुखदाने आत येतायेताच आदिला विचारले.

"अग सुखाईऽऽ हे नुसते चॉकलेट नाहीये काहीऽऽ."

चॉकलेट हातात घेऊन सुखदाच्या मागेमागे फिरत आदिने उत्तर दिले.

"अच्छाऽऽ!!नुसते चॉकलेट नाहीये म्हणजे??"

"अगंऽऽऽ म्हणजे हे प्राईझ आहे प्राईझ.मानसी मॅमनी दिलेय मला आज सगळ्या क्लास समोर…"

अरे वाऽऽ!! मानसी मॅम म्हणजे तुझी फेव्हरीट इंग्लिश टिचर राईट??"

"हम्मऽऽ!!"

"पण तिने प्राईझ कशासाठी दिलेय पिल्लुला??"

"अगंऽ ती एक गंम्मत आहे.मला सगळ्यांसमोर सांगायचीय.म्हणुन तर तुझी वाट बघत होतो ना."

"बरं बरंऽऽ मी जरा फ्रेश होऊन पाच मिनटात आलेच मग सांग हं मला..!!"

सुखदा रूममधे फ्रेश व्हायला गेल्याबरोबर आदित्यने उत्साहातच स्कूलबॅगमधुन एस्से राईटींगची कॉपी बाहेर काढुन तयार ठेवली.

नलिनीताईंना ओढतच किचनमधुन हॉलमधे आणुन बसवले.आज्जो म्हणजेच रणजितरावही आपल्या खोलीत काहीतरी वाचत होते.त्यांनाही हाताला धरून हॉलमधे नलिनीताईंच्या बाजुला आणुन बसवले आणि अधिरतेने सुखदा बाहेर यायची वाट पहात थांबला.

 

सुखदा आवरून हॉलमधे आली आणि सगळ्यांनाच एकत्र बसलेले पाहुन आश्चर्यानेच विचारले,"अरे वाऽऽ! सगळेच जमलेत म्हणजे काहीतरी जबरदस्त सरप्राईज दिसतेय?"

खाणाखुणा करतच ती आदिला उद्देशुन आई बाबांकडे बघुन बोलली.

त्यावर आदि लगेच तिला सोफ्यावर आज्जी शेजारी बसवत म्हणाला,"एक सरप्राईज आहे.आधी तु बस तर खरी..!!"

तिला जवळजवळ आेढतच त्याने नलिनीताईंच्या जवळ बसवले.

"आता सगळ्यांनी पिनड्रॉप सायलेंट होऊन मी इकडे काहीतरी रीड करणार आहे ते ऐकायचेय...कळलं का??"

सगळे एकसुरात अगदी शाळकरी मुले म्हणतात तसेच म्हणाले, "होऽऽऽऽय…!"

त्यावर खुष होऊन वहितले पान उलगडुन आदित्य वाचन करायला उभा राहीला.

Now I am reading one essay.Subject of the essay is 

              *The Mother.*

 

God created this world but he was unable to take care of each and everyone so he sent his messenger on the earth.That messenger of God is called The Mother.

Everyone has only one messenger of God but am very fortunate to have two messengers of God.

One who looks at me from the sky and takes care of me from above and the other one takes care of me here on the earth at every moment of my life. 

The name of that messenger means my mother is Sukhada but I called her Sukhaai…

sukhaai means in marathi-Sukh vaatnari Aai..!

means always spreading happiness.

 

She is very beautiful and the world's best mother for me. 

She always takes care of me. 

Though she is working lady and tired with her work, she helps me in my studies. 

Every weekend she takes me and my younger sister for outing.sometimes we go to park and enjoys a lot there.

she plays games with us.then she takes me to eat chats at chat street.

she brings gifts for me. 

Whenever I'm ill she looks after me and sits beside me whole night. 

Sometimes if I am doing anything wrong she scolds me but then immidiately takes me in her arms and loves me.. 

She is so polite,cute and loving. 

She is best mother and I love her so much. 

She also loves me very much.. 

Thank you sukhaai for being my mother. 

I love you so much.. 

Thank you.  

 

दोन मिनिटं हॉलमधे पुर्ण शांतता होती.

नलिनीताईंसहित सगळ्यांचे डोळे पाण्याने डबडबलेले होते.

वातावरण एकदम भावुक झालेले तरीही भानावर येत सगळ्यांनी एक सुरात टाळ्या वाजवत आदिचे कौतुक केले.

सुखदाचीही अवस्था वेगळी नव्हती मात्र भावना अनावर होऊऩ काही न बोलताच ती आपल्या खोलीत गेली आणि आत्तापर्यंत रोखलेल्या  भावना मोकळ्या करत ढसढसा रडु लागली.

लहानग्या आदिचा चेहरा सुखाईच्या काहीही न बोलता तिथुन निघुन जाण्याने उदास झाला.

तो कावराबावरा झाला की सुखाईला अचानक काय झाले.तो तिच्या खोलीकडे उदास नजरेने फक्त बघत राहीला.

नलिनीताई भांबावुन तिच्या मागोमाग खोलीत गेल्या.तिला रडताना पाहुन त्यांचेही डोळे भरून आले.आईची चाहूल लागताच ती नलिनीताईंच्या कुशीत शिरून आपल्या भावनांना वाट मोकळी करून रडु लागली. 

"आईऽ बघ ना त्या लेकराने मला  किती मोठा सन्मान दिलाय आई म्हणुन.कशी उतराई होऊ ह्या प्रेमाची!!!"

"त्याच्या नजरेतले माझे हे रूप पाहुन मलाच कळत नाहीये की मी काय व्यक्त होऊ."

"काय बोलु ह्यावर आता...खरच नि:शब्द केले गं पोराने मला."

सुखदाच्या डोळ्यातले पाणी अजुनही संपत नव्हते.

तेवढ्यात आदिही भीतभीत हलकेच पावले टाकत तिच्याजवळ आला आणि उदास चेहऱ्यानेच बोलला,"सुखाईऽऽ तुला माझा एस्से आवडला नाही का गं?"

"तु का रडतेस गं अशी.मी तुला हर्ट केले का?"

मग तिच्या जवळ जात हलकेच तिचे डोळे आपल्या चिमुकल्या हातांनी पुसत म्हणाला

 "तु रडु नको ना गंऽ सुखाईऽऽ,तुला बघुन मग मलाही रडु येतेय बघ."

आदिचेही डोळे खरोखर डबडबले होते पाण्याने कधीही रडु फुटेल असे.

"तुला नाही आवडला ना एस्से तर मी फाडुन टाकतो थांब.व्हेरी बॅड एस्से !!मला नको ते मानसी मॅमचे गिफ्ट."

हातातले चॉकलेट दूर भिरकावत आदि सुखदाला बिलगुन रडायला लागला.

आता सुखदाने स्वत:ला सावरले.

आदिच्या समोर गुडघ्यावर वाकुन बसली आणि त्याचे डोळे आपल्या हातांनी पुसत म्हणाली,"अरे पिल्लु तुझा एस्से एकदम एक्सलंटहुन एक्सलंट आहे."

"मला खूप खूऽऽऽप खूऽऽऽऽऽऽप आवडला..!"

इतका छान एस्से लिहीलास,माझे कित्ती सारे कौतुक केलेस ना त्यात म्हणुन मला आनंदाने रडु आले बरं पिल्लु.."

आदि जरा विचारात पडला आणि विचारला,"सुखाई हॅप्पी असताना पण लोक रडतात का!!"

मला तर बाबा कोणी मारल रागावलं किंवा पडलो आणि लागलं तरच रडु येतं.सुखाई मोठी लोकं थोडी स्टुपिड असतात का गं.?म्हणजे हॅप्पी असल्यावर कोणी रडतं का ?!!"

"वाऽऽ असं स्टुपिड नाही बोलायचे.मोठे असतात ना ते??"

"आकेऽऽ सुखाई सॉरीऽऽ!"

"दॅट्स लाईक माय स्वीट बेबी..!"

"बरंऽऽ,आता मानसी मॅमनी तर प्राईज दिले आता सुखाई कडुन काय गिफ्ट हवेय सांग बघु.?"

"आज सुखाई एका मुलावर खूपच खुष त्यामुळे आज जे मागेल ते मिळणार आहे एका मुलाला..!!"

सुखदा त्याचा मुड चेंज करायला गमतीतच त्याला बोलली.

"खरंऽऽऽच..!!"

"हो अगदी खरंऽऽ बोल काय हवेय? तु जे मागशील ते तुला देणार प्रॉमिसऽ."

तिने हळुच त्याचा पापा घेत त्याला कडेवर घेतले.तसा तो एकदम खुष झाला.

आपल्या दोन्ही हातांनी सुखदाच्या मानेभोवती विळखा घालत म्हणाला, "सुखाईऽऽऽ तु ना ऑलवेज माझ्या सोबत रहा.

कधी कध्धीऽऽ मला आई गेली तसे सोडुन जाऊ नकोस,प्रॉमिस..????"

 

ते वाक्य ऐकुन तिचे डोळे पुन्हा भरून आले.भावना अनावर झाल्या.

तिने आदिला घट्ट मिठी मारत म्हणाली, "नाही रे राजा मी तुला आणि जीजाला सोडुन कध्धी कध्धी कुठेही जाणार नाही प्रॉमिस पक्का प्रॉमिसऽऽ!!"

 

सगळे वातावरण भावुक झाले होते.नलिनीताई आणि रणजितरावही  सुखदा आणि आदित्य मधला भावनिक संवाद एेकुन भावुक झाले. दोघांच्या डोळ्यातही पाणी तरळले.

सगळ्या जून्या आठवणी काही क्षणाकरता का होईना पुन्हा जाग्या झाल्या मनात.

वातावरण उगीचच गंभीर झाले काही वेळाकरता.सुखदानेच मग पुढाकार घेत वातावरणातली गंभीरता घालवायला युक्ती केली, "चला चला आता पिल्लुच्या एस्से कॉम्पीटीशनचे सेलिब्रेशन तो बनता है ना बॉस..आज मस्त पावभाजी खायला सगळेच बाहेर जाऊया.चला पटकन तयार व्हा."

पावभाजीचे नाव काढताच आदिचा चेहरा खुलला कारण त्याला पावभाजी खूप आवडायची.महिन्यातुन तिनदा तरी हा मेनु घरी व्हायचाच.

"य्येऽऽऽ!!.त्त त्त त्ततर्र.. त्त त त्ततर्रऽऽ!! पावभाजी!!!"

आदि गुणगुणतच नाचायला लागला हातवारे करून.त्याच्या आनंदात सगळेच हसायला लागले.वातावरण पुन्हा पर्ववत झाले होते.

        ~~~~~~~~~~~~~

पावभाजी नंतर येताना आईसक्रीम अशी धमाल करून सगळे उशीरा घरी पोहोचले.आदि तर गाडीतच आज्जोच्या मांडीवर पेंगुळायला लागला.जीजाही नलिनीताईंच्या मांडीवर गार वारं लागताच झोपी गेली.

सगळे घरी येताच आपापल्या खोलीत गेले.झोपलेल्या जीजाला घेऊन नलिनीताई सुखदाच्या खोलीत आल्या.तिला सुखदाच्या पलंगावर निजवुन त्या निघतच होत्या की सुखदाने त्यांना हटकले,"आई झोपणारेस?"

नलिनीताईंना अर्थबोध झाला नाही.त्यांनी चमकुन तिच्याकडे बघितले आणि विचारले,"का गं?"

"काही नाही थोडं बोलायचं होते तुझ्याशी आणि बाबांशी." सुखदाने अडखळतच सांगितले.

"मग बोल की." नलिनीताईं उत्तरल्या.

हम्म्ऽऽ!!!

एक थंड सुस्कारा सोडत सुखदा म्हणाली, "बरंऽऽ तुम्ही दोघे हॉलमधे या तिकडेच बोलु.नाहीतर आपल्या आवाजानी मुले उठायची.तु बाबांना घेऊन ये तोपर्यंत मीही उद्याची तयारी करून येतेच पाच मिनटात."

नलिनीताई बरं म्हणत काहीशा विचाराच्या तंद्रीतच बाहेर गेल्या.

आता हिला नेमके काय बोलायचे असेल हाच प्रश्न पुन्हा मनात घोंगावायला लागला.

आपण नेहमी सरळ डोक्याने विचार करतो पण हिच्या डोक्यात कधी काय येईल हे सांगणे अवघड..

मनात विचारांची उलटसुलट चाललेली खिचडी त्यांना चींता लावुन गेली.मनावर उगीचच ताण जाणवला.त्यांनी हळुच मनातली भीती रणजितरावांपुढे बोलुन दाखवली तसे त्यांनी नलिनीताईंचे सांत्वन करत म्हणाले,"आता उगीच उलट सुलट विचार करत बसु नकोस.जे पण होईल ते परमेश्वराच्या इच्छेने सगळ्यांच्या चांगल्यासाठीच होईल तेव्हा जास्त विचार न करता आधी ती काय बोलतेय ते ऐकुन तर घेऊ..चल जास्त विचार नको करूस नाहीतर बीपी वाढायचे तुझे."

हम्मऽऽ म्हणत ते दोघेही मुकपणे हॉलमधे येऊन बसले.

सुखदाही सगळी तयारी आटोपुन हॉलमधे आई बाबांच्या शेजारी येऊन बसली.

आधी काय बोलावे हेच तिला सुचेना.शब्द जोडत होती पण तोंडातुन बाहेर पडत नव्हते.

ती शांतता दोघांनाही असह्य होत होती.

नकळत त्यांचे मन भूतकाळात गेले.

काही वर्षापूर्वी असाच एक दिवस आला होता जेव्हा अशीच शांतता तिने निर्माण केली होती परंतु शातंतेचा भंग केल्यावर जे ऐकवले होते त्यामुळे दोघांच्याही पायाखालची जमिन सरकली होती.आज तीच जीवघेणी शांतता ते दोघे अनुभवत होते त्यामुळे पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना ही भीती मनात घर करून गेली काही क्षण.

अखेर रणजितरावांनीच शांततेचा भंग करत विचारले,"हं काय चाललेय मनात.बोल ना बाळं."

सुखदाने घसा खाकरत बोलायला सुरवात केली,"आई ..बाबाऽऽ... मी एक निर्णय घेतलाय.

खरेतर गेले दोन/तीन दिवस माझ्या मनात वेगवेगळे विचार चाललेलेच होते पण ठोस अशा निर्णयावर पोहोचु शकले नव्हते.

परवा सुहासशी बोलुन मनातले बरेच गुंते,गैरसमज दूर झाले तरीही मन का कुणास ठाऊक धास्तावत होते.

वयाच्या ह्या टप्प्यावर जेव्हा आपल्या मर्जीप्रमाणे जगायची सवय जडलेली असते शरीराला तेव्हा पुन्हा आयुष्याची नवी घडी बसवणे,नवे लोक,नवे वातावरण,नव्या सवयी ह्या सगळ्याला आपलेसे करून वेळ प्रसंगी मनाला मुरड घालुन काही तडजोडी स्वीकारणे कितपत जमेल हीच शंका होती मनात.

मुलांना असणारी ममत्वाची कमतरता तर मी पुरी करतच आहे मग पुन्हा ह्या नव्या नात्यात स्वत:ला जोडणे गरजेचे आहे का?असे विचारही येत होते.

पण हा खूप एकांगी,एकतर्फी निर्णय होता हे माझ्या लक्षात आलेय.

मला जरी नविन नात्याची गरज नसली तरी मुलांना आई बरोबर पित्याचेही प्रेम आवश्यक आहे.बाबा म्हणुन सुहासला मुले आणि सुहास मुलांना मिस करतच असणार हे माझ्या कधी डोक्यातच आले नाही. आता त्याचा नाईलाज म्हणुन त्याने मुलांना सध्या इकडे ठवले असले तरी आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल.मुलांसाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था तो शोधेलच.आणि कदाचित तोच विचार करून त्याने वेणुमावशींचा प्रस्ताव मान्य केला असणार.पण मी खूप चिडले गैरसमज करून घेतला सुहास बद्दल.परवा ह्याच सगळ्याचा जाब विचारायला मी त्याला भेटायला गेले होते.पण तो ज्यापद्धतीने ह्या सर्व परिस्थितीबद्दल विचारपुर्वक बोलला त्यामुळेच मी वेगळा विचार करायला भाग पडले.

पण तरीही लग्न म्हणजे एक दु:खदायक प्रवास असे मी माझ्यापुरते समिकरण बनवुन घेतले होते आणि माझ्या एकट्याच्या जीवनात मी समाधानीही होते आहे पण संपदाची अशी एक्झिट,मुलांचे आपल्याकडे राहणे आणि माझीही मुलांसाठीची ओढ मला नकळत त्यांची आई कधी बनवुन गेले मलाही समजले नाही.

 

परवा सुहासनेही सांगितले की आदि मला किती रिस्पेक्ट करतो प्रेम करतो आणि तेच कारण होते की तो वेणुमावशींना हो बोलला लग्नाबाबत.

त्यावेळी ही गोष्ट तितकीशी गांभिर्याने मी घेतली नव्हती परंतु आज आदि जे काही बोलला त्याच्या एस्सेपेक्षाही जास्त जेव्हा मी त्याला विचारले तुला काय हवे गिफ्ट म्हणुन तर तेव्हा त्याने जे उत्तर दिले ना त्याने मी जास्त हलले मनातुन आणि म्हणुन मी मुलांच्यासाठी हा निर्णय घेतलाय……"

पुन्हा एक जीवघेणी शांतता.

श्वास रोखलेले.

तिने अजुनही निर्णय काय तो सुनावला नसल्याने आई बाबांच्या प्रश्नार्थक नजरा तिच्यावरच रोखलेल्या…

दोन मिनिट पॉझ घेत सुखदाने आपला निर्णय एेकवला,

"आई बाबा वेणूमावशींना सांगा मीही सुहासच्या अटीसहित ह्या लग्नाला तयार आहे.

तुम्हालाही हेच हवे होते नाऽऽ आईऽऽ-बाबाऽऽ.??

"मग आता तरी ते पडलेले चेहरे सावरून खुष व्हा,तुमची मुलगी लग्नाला हो म्हणालीय."

 

सुखदाने आई बाबांना भानावर आणले.त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की सुखदा खरच हो म्हणालीय.

जणु एक खूप दिवसांचे अधुरे स्वप्न साकार होतानाचा आनंद दोघांच्याही डोळ्यातुन आश्रुरूपाने बाहेर पडत होता.

सुखदाही दोघांना कवटाळुन घट्ट मिठी मारून त्या आनंदाच्या उबेची अनुभूती घेत राहिली.

आज नलिनीताईंची मुलीचे घर पुन्हा बसावे ही अंतस्थ ईच्छा शेवटी पुर्ण होणार होती.

त्या लगेच ऊठुन देवघरात गेल्या.नंदादिप अजुनही शांत तेवत होता.दिव्याच्या संथ प्रकाशात उजळलेला देव्हारा त्यांना एक वेगळीच ऊर्जा देत होता.

जे होते ते चांगल्यासाठीच हे शब्द पुन्हा पुन्हा कानात गुंजत होते.

अंबाबाईच्या फोटोला नमस्कार करून त्या पुन्हा बाहेर आल्या.

आज खरच कुंद आभाळ स्वच्छ निरभ्र झाले होते.

नलिनीताईंच्या मनाने उल्हासीत होऊन एक मस्त गिरकी घेत आपला आनंद साजरा केला…

आता नलिनीताईंना लेकीच्या लग्नाचे वेध लागले.

लवकरच लग्न चौघडे वाजणार.ह्या दाराला पुन्हा लग्नाचे तोरण चढणार….!

एक नवे नाते पुन्हा आकार घेणार ….

ही बातमी कधी एकदा वेणूताईंना कळवतेय असे झालेले नलिनीताईंना.

सुर्योदय होण्याची प्रतिक्षा फार जीवघेणी वाटत होती आज…

 

*प्रियेऽ पहा…..

रात्रीचा हा समय सरूनी (2)

येत उष:काल  हा...।*

 

मनातल्या मनात हेच नाट्यपद गुणगुणत उष:काल कधी होतोय ह्याची अधिरतेने वाट पहात नलिनीताई अंथरूणावर लवंडल्या……..

-------------------------------(क्रमश:7)--------------------------------

(क्रमश:-7)

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार मंडळी,

ज्या गोष्टीची आतुरतेने तुम्ही सर्वजण वाट पहात होतात ती गोष्ट आज घडली.अखेर सुखदा लग्नाला तयार झाली.

आता पुढे ह्यांची मैत्री आणि मैत्रीतुन फुलणाऱ्या प्रेमाचा रोमांचक प्रवास बघायचा असेल तर पुढचे भाग वाचायला विसरू नका.

लवकरच सुखदा आणि सुहासच्या नव्या नात्याची सुंदर वीण हळुवारपणे विणलेली तुम्हाला वाचायला मिळेल.

आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समधे नक्की सांगा.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहित कथा नक्की शेअर करू शकता.परंतु साहित्य चोरी कृपया करू नये.हा कायद्याने दंडणीय अपराध आहे हे लक्षात असु द्या.)

धन्यवाद.

@राधिका कुलकर्णी.


 

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..