A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session93ee91e3fdd85eed691b8ef903c5638078b65a40a88f1c93540d7f98d153319372d3f993): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi bhag 22
Oct 20, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -22

Read Later
 फिरूनी नवी जन्मेन मी भाग -22

फिरूनी नवी जन्मेन मी भाग - 22

©®राधिका कुलकर्णी.

 

कालच्या परीश्रमाने थकुन दोघेही तसेच अनावृत्त बिछान्यावर पहुडलेले होते.

सकाळची कोवळी किरणे आता किंचित उष्ण होऊन बाल्कनीच्या पडद्याआडून आपल्या अस्तित्वाची मधेच चाहूल देत होते.

सुखदाला त्या सूर्य किरणांनीच आज जागे केले.

डोळ किलकिले करत तिने मोबाईलमधे वेळ बघितली तर...बापरे नऊ वाजायला आले होते.

त्यांना कालच रिसेप्शनवर सांगण्यात आले होते की सकाळी सात ते नऊ कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतो..त्याची आठवण होताच ती घाईने उठायला गेली पण सुहासच्या हाताच्या विळख्याने तिला जखडून ठेवले होते.

त्याचा हात तिच्या अनावृत्त उरोजांना स्पर्श करत होता.तो गाढ झोपेत होता.झोपेत त्याचा चेहरा एखाद्या निरागस लहान बालका प्रमाणे मोहक दिसत होता.तिने कूस वळवुन क्षणभर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले.

आपल्या अंगावरचा हात अलगद बाजूला करून त्यावर आपले ओठ हलकेच टेकवत तिने त्याच्या

तळव्याचे पुसटसे चुंबन घेतले आणि त्याच्या मिठीतुन आपली हलकेच सुटका करून घेतली.ती हळुच बेडवरून उठुन आता वॉशरूमकडे जाणार तोच तिला पाठिमागुन हिसका बसला आणि ती पुन्हा सुहासच्या जवळ जाऊन पडली.

सुहासच्या हाताचा पुसटसा किस घेतानाच त्याची झोप चाळवली असावी.

तो अजुनही अर्धवट झोपेत होता.

सुखदाला दूर जाताना पाहुन परत स्वत:कडे खेचत मिटल्या डोळ्यांनीच तो बोलला.

सुहास - झोप की जराऽऽऽवेळ.आता कुठे आदिची घाई आहे की जीजाची काळजी आहे..झोप निवांत.

त्यावर सुखदा त्याला जरासे जागे करतच म्हणाली..

सुखदा - अरे किती वाजलेत ते तरी बघ.ऊन्हं वर आलीएत.

आणि कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टची वेळ टळुन जाईल..उठ आताऽऽऽ.

त्याच्या मिठीतुन सुटायची व्यर्थ धडपड करतच ती बोलली.

पण त्याने तिला अधिकच जवळ खेचत म्हणाला

सुहास -यसऽऽऽ... कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट तर मस्ट आहे.अॅम रिअली व्हेरी हंग्री...

त्याच्या इतक्या पटकन दुजोऱ्याने एक प्रसन्न हसु तिच्या चेहऱ्यावर फुलले.त्याला उठवायचा प्रयत्न करतच ती म्हणाली.

सुखदा - मग चल ऊठ पटकन.जाऊन ब्रेकफास्ट करून घेऊ.मलाही भूक लागलीय आता.

त्यावर बंद डोळ्यांनी पालथे पडूनच तो उद्गारला….

सुहास - मग त्यासाठी खाली जायची काय गरज!!!!

कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट ईज हिअर बिसाईड मी…!

त्याने तिला तशीच आपल्याकडे खेचली आणि तिच्या छातीवर आपले डोके ठेवुन पडुन राहीला.

त्याच्या ह्या खोडसाळपणावर ती म्हणाली.

सुखदा -युऽऽऽ बदमाश!!!हा ब्रेकफास्ट तुझा ऑलरेडी झालाय.जास्त हावरटपणा बरा नाही.

अख्खी रात्र जागवलीस अजुन किती हवेय रेऽऽऽ..!!!

सुहास - तरीही मला भूक लागलीय.आणि हा मऊ लुसलुशीत काँटीनेंटल ब्रेकफास्ट तर मला हवाच….

त्यावर जराशी लाजत पण लटक्या रागाने त्याला चिडवत ती म्हणाली.

सुहास - असे जास्त जेवल्याने अपचन होईल हंऽऽ सुहास…

त्यावर सुहासही उद्गारला..

सुहास - माझी पचनशक्ती प्रचंड दांडगी अाहे.बघायचेय तुलाऽऽऽ.

तसे म्हणतच त्याने तिला आपल्याकडे खेचली.तीही पुन्हा त्याच्या स्पर्शात विरघळत गेली..

 

त्यानंतर पुढचा कितीतरी वेळ दोघेही पुन्हा एकमेकांच्या सहवासात त्या परमोच्च आनंदाच्या स्वर्गीय सुखाची अनुभूती घेत राहीले.एकमेकांना पुन्हा एकदा तृप्त करत राहीले.

जवळपास तासभरानी सुहास हळुच सुखदाला म्हणाला..

सुहास - आता खरं तृप्त वाटतेय आणि पोटाची भूकही लागलीय...किती परीश्रम झालेत.!!

जवळपास सहाशे कॅलरीज तरी नक्कीच बर्न झाल्या असणार कालपासुन…

सुहासच्या ह्या विनोदावर लाजतच पण एक फटका मारत सुखदा त्याला म्हणाली..

सुखदा -You naughty dog….!!! 

बस झाले तुझे पीजे मारणे.चल आता आवर लवकर नाहीतर ब्रेकफास्टची वेळ टळुन जाईल.

त्यावर सुहास लगेच तिला हळु आवाजात म्हणाला.

सुहास - अगंऽऽ खरच डार्लिंगऽऽऽ. मी पीजे नाही मारत आहे.कुठल्यातरी फॉरेन मेडीकल जर्नलने हे प्रुव्ह केलेय की योग्य पद्धतिने केलेला सेक्स हा एकावेळी 110 कॅलरीज बर्न करतो…

मग मी काही खोटे बोललोय का बघ…

त्याने आपले अॅडिशनल जनरल नॉलेज इथेही झाडायला कमी नाही केले..

त्यावर त्याच्यापुढे कोपरापासुन हात जाेडत सुुखदा म्हणाली..

सुखदा -धन्य आहात तुम्ही गुरूज्ञानी!!!!

आता तुझे अतिरिक्त ज्ञान पाजळून झाले असेल तर आपण ब्रेकफास्टला जाऊयात काऽऽऽ…??

त्यावर मिश्किलपणे तिची खेचत सुहास म्हणाला..

सुहास -अशीच येणारेसऽऽऽ..!!!

जरा भानावर ये..

त्याच्या ह्या पांचट विनोदावर चिडुन तिने त्याला उशीनेच बडव बडव बडवायला सुरवात केली तसे सुहास तिचा मार चुकवत हसत डोळा मारत बेडमधुन ऊठला आणि फ्रेश व्हायला वॉशरूमकडे पळाला.

तो गेला तसे ती ही लाजुन आरशापुढे उभी राहीली.आज प्रथमच तिला स्वत:ला ती सुंदर दिसत होती.आपल्या अंगांगावर सुहासच्या स्पर्शाची उठलेली मोहोर पाहुन ती पुन्हा एकदा लाजली.कालपासुनच्या उन्मादक प्रणयाच्या जागोजागी दिसणाऱ्या खूणा तिला पुन्हा मोहरून टाकत होत्या..

       ~~~~~~~~~~~~~~~~

आजच्या प्लॅननुसार त्यांना शांतादूर्गा मंदिरात जायचे पक्के होते.बाकी अजुन काही ठरले नव्हते.साईटसीईंग ही काही इतर जोडप्यांप्रमाणे त्यांची गरज नव्हती त्यामुळे वेळ पाहुन ते त्यांचे प्लॅन करणार होते.

सुहास फ्रेश होऊन आला तसे सुखदाही फ्रेश व्हायला गेली.तोपर्यंत सुहासने तिच्यासाठी आणलेल्यापैकी एका ड्रेसचा बॉक्स बेडवर ठेवला.

तिने अगोदरच मंदिरात जायचे म्हणुन एक सिल्कची कांजीवरम साडी काढुन ठेवली होती.

शॉवरबाथ घेऊन बाथरोब गुंडाळुन ती बाहेर आली.तिचे ते ओलेते रूप बघुन सुहास पुन्हा घायाळ झाला.त्याची आपल्यावर रोखलेली नजर बघुन तिने आधीच सावधगिरीचा पवित्रा घेत त्याला म्हणाली

सुखदा - सुहासऽऽऽ….आता तु फटके खाणार हंऽऽ माझ्या हातचे.चल आवर पटकन.आणि ती लार टपकवणे बंद कर जराऽऽ..!

तिने त्याचा पुरता हिरमोड केलेला पाहुन तो जरासा खट्टू झाला.पण आता लेट करून चालणारही नव्हते.त्यांना आधीच लेट झाला होता.त्याने साईटसिंईंग करता एक कॅब बुक केली होती त्यामुळे नाईलाजाने का होईना त्याला तिचे म्हणणे ऐकणे भागच पडले.

तिने बेडवरचा बॉक्स बघुन आश्चर्यानेच विचारले.

सुखदा - अरेऽऽ ह्यात काय आहे??

त्यावर किंचित हसत सुहास म्हणाला..

सुहास - अगंऽऽ उघडून तर बघ..!!कळेलच…

 

तिने बॉक्स उघडला.त्यात एक अतिशय किलर स्पॅगेटी स्ट्रॅप्ड ब्लॅक कलर आॅफव्हाईट लेस-बॉर्डर सुंदर मिनी-स्कर्ट होता.सुहासची चॉईस सुंदरच होती.त्यात वादच नव्हता परंतु तिला मंदिरात जाताना असा वेस्टर्न कॉश्चुम घालायची मुळीच ईच्छा नव्हती.मग जरा विचार करून ती सुहासला म्हणाली..

सुखदा - अरे सुहास आपण शांता दूर्गा मंदिरात जाणार ना अगोदरऽऽ?? 

मग तिकडे हा ड्रेस नको रेऽऽ..बरे नाही दिसणार.त्यापेक्षा एक आयडीया आलीय,तसे करूयात का?? बघ पटतेय का..

सुहास(प्रश्नार्थक नजरेने) - कायऽऽऽ?

सुखदा - आपण असे करूऽऽ हा बॉक्स सोबत घेऊन जाऊ.आत्ता निघताना मी साडी नेसते.देवीचे दर्शन आटोपले की वॉशरूममधे जाऊन ड्रेस चेंज करेन तेव्हा साडी बदलुन हा घालेन..कशी वाटतेय कल्पना!!!

तिने त्याच्या प्रतिक्रियेची वाट पहात विचारले.

त्यावर सुहासने डन म्हणताच ती छान साडी घालुन त्याला साजेसा नाजुकसा दागिना घालुन पटकन तयार झाली.कॉलेजमुळे तिला साडी नेसायची आणि दिवस दिवस ती कॅरी करायची छान सवय होती.साडीत ती दिसायचीही खूप गोड.तिच्या प्रत्येक रूपांवर आज सुहासची विकेट पडत होती.

तो स्तिमित होऊन तिच्या विविध रूपांकडे एकटक बघत रहायचा..आताही तेच घडले.भान हरपुन तिच्या शालीन सोज्वळ रूपाकडे तो बघत राहीला..

सुखदानेच त्याच्या डोळ्यापुढे टिचकी वाजवुन त्याला वास्तवात आणले तसा तो भानावर आला.

सुहास - Looking extremely elegant !!!!! 

असे कॉम्प्लिमेंट देतच दोघेही लिफ्टद्वारे डायनिंग हॉलला आले.

डायनिंग हॉल एरीयात सगळ्या हनिमून स्वीट बुकींग्जसाठी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टची वेळ तासभर वाढवुन दिली होती.हि आॅफर फक्त हनिमून कपल्स करता स्पेशल असल्याने ते वेळेत पोहोचले होते.

डायनिंग एरीयात विविध प्रकारचे सर्व ब्रेकफास्ट आयटम्स स्टॉलप्रमाणे अरेंज केलेले होते.बेकरी आयटम्स पासुन साऊथइंडियनचे सर्व प्रकार झालेच तर कॉंटीनेंटल आयटम्स असे विविध प्रकार नुसत्या नाष्ट्यासाठी होते.सुखदाने स्वत:साठी ग्रील्ड सँडविच आणि कॉफी घेतली.सुहासला काही सुचत नव्हते.त्याने थोडे थोडे सगळे टेस्ट केले.आणि शेवटी मस्त गरमागरम कॉफी..भरपेट नाष्टा करून आता दोघेही रिसेप्शन लॉबीमधे कॅबची वाट पहात तिथल्या सोफ्यावर बसले.

साधारण साडेदहा अकरा होत आलेले.

तो अस्वस्थपणे घड्याळ्यात पहात असतानाच कॅब आल्याची वर्दी रिस्पेशन मॅनेजरने दिली.सुखदा हातात ड्रेसचा बॉक्स घेत गाडीत बसली.

दोघेही लवकरच शांता दूर्गा मंदिराच्या भव्य प्रांगणात पोहोचले.

तुरळक गर्दी होती.दोघांनी पंधरा वीस मिनिट लाईनमधे उभे राहत अखेरीस मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचले.मंदिराचा विस्तीर्ण परीसर अतिशय शांत होता.बारीक बारीक इतरही बरीचे देवळे तिथेच स्थापीत होती.सगळ्या,मंदिराचे दर्शन घेत शेवटी ते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याशी पोहोचले.

शांतादूर्गेची अतिशय शांत प्रसन्न मूद्रा असलेली मूर्ती बघुन सुखदाच्या डोळ्यांचे पारणे फिटले.तिने मनोभावे हात जोडून नमस्कार केला.

सहजीवनाचा प्रवास सुरू होण्यापूर्वीही एका देवीचे आशीर्वाद मिळाले होते आणि सहजीवनाचा प्रवास सुरू झाल्यावरही देवीचेच दर्शन सर्वात अगोदर घडावे हा किती विलक्षण योगायोग होता.

क्षणभर हा सगळा विचार करत सुखदाने पुन्हा एकदा आपल्या सुखी संसारासाठी आशीर्वाद मागत मनोमन हात जोडले देवीसमोर..

ह्या भाग्याला कुणाची नजर न लागो ही प्रार्थना करत ती दोन मिनिट तिथेच टेकली.तेवढ्यात सुहास पुजाऱ्याशी काहीतरी बोलत असलेला तिने बघितला.

ती विचारच करत होती हा काय बोलत असावा इतक्यात तो तिच्याच दिशेने येताना तिने पाहीले.तो जवळ येऊन सुखदाला म्हणाला..

सुहास - मी पुजारी बाबांकडे चौकशी केली.इथे मंदिराला लागुनच त्यांची मंदिराची पर्सनल सामग्री ठेवण्याची खोली आहे.

ते आपल्याला जरावेळ करता उघडून देतो बोललेत तर तु तिकडे जाऊन साडी बदल.वॉशरूममधे साडी ओली व्हायची भीती ना..हे सेफ आहे.जा पटकन..बदलुन ये कपडे.

तिला मनोमन त्याच्या ह्या चाणाक्ष चौकसपणाचे कौतुक वाटले.किती काळजीवाहू आहे हा…!!

मनातल्या मनात त्याचे कौतुक करत ती खोलीत गेली.पटकन साडी बदलुन तो मिनी-स्कर्ट चढवला.तिकडे आरसा वगैरे नसल्याने तिला कळत नव्हते तीला बरा दिसतोय की नाही ड्रेस.कितीतरी वर्षांनी ती वेस्टर्न आऊटफीट्स घालत होती म्हणुन थोडी साशंक होती.बाहेर गेल्यावर सुहासलाच विचारू असे मनाशी ठरवतच ती बाहेर आली तर सुहास मंदिर परीसरात कुठेच नव्हता.तिने इकडे तिकडे नजर फिरवतच त्याचा नंबर डायल केला.

फोन उचलल्याबरोबर तो इतकेच म्हणाला..

सुहास(फोनवरून)- पायऱ्या उतरून खाली ये.गाडीत मी तुझी वाट पहातोय..ये लवकर..

अरेऽऽऽ पणऽऽ…….

तिचे वाक्य पुर्ण होण्या अगोदरच त्याने फोन कट केला.

तो तिला एकटीला सोडून का गेला असे ती विचारणार होती पण त्याआधीच फोन बंद झाल्याने नाईलाजाने ती हळुहळू पायऱ्या उतरत खाली आली.

हा ड्रेस नंतर घालायचाय हे माहित असल्याने अगोदरच ती ब्लॅक हाय हिल्स घालुन निघाली होती.त्यामुळे ती शांततेने एक एक पायरी अंदाज घेत उतरत होती.

सुहासला तिचे हेच दूरवरूनचे दर्शन हवे होते म्हणुन तर हा सगळा खटाटोप त्याने केला होता.

पायऱ्या उतरून येताना त्या ब्लॅक मिनीमधे ती कमालीची हॉट दिसत होती.तिची परफेक्ट फिगर आणि ताशीव गुळगुळीत संगमरवरागत दिसणारे घोटीव पाय तिच्या सौदर्यात चार नाही तर दस दस चाँद लावत होते.

ती जाळ लावत सुटली होती.प्रत्येक नजर एकदातरी तिला वळुन बघतच होती.ती मात्र ह्या सगळ्यापासुन अनभिज्ञ स्वत:चा तोल सावरत शांतपणे पावले टाकत कारकडे कूच करत होती.

ती कारच्या जवळ पोहोचली तसा कधी नव्हे ते ड्रायव्हरनेही तिच्यावर एक कटाक्ष टाकला.मगाशी साडीत पाहिलेली साक्षात देवीची मूर्ती आता एकदम काटा दिसत होती हे ट्रान्सफॉर्मेशन त्या ड्रायव्हरच्याही नजरेतुन सुटले नाहीतर बाकीच्यांची काय कथा.

सुहासने कारचा दरवाजा उघडला तशी घामेघुम झालेली सुखदा वैतागुनच सुहासला म्हणाली..

सुखदा - तिकडे वर थांबायला काय झाले होते रेऽऽ? मला एकटीला टाकुन इकडे येऊन बसायला इतके काय महत्त्वाचे काम होते तुझे??

माझी एकटीची किती फजिती झाली.मला त्या हायहिल्समुळे नीट चालताही येत नव्हते.नेमक्यावेळी तु नव्हतास आधाराला..

ती जराशी रूसलीच होती सुहासवर..

रागाने गालाचा फूगा करून ती काही न बोलता बसुन राहीली.

गाडीत ड्रायव्हर असल्याने त्याला जास्त बोलताही येत नव्हते.

तीही ते समजुन शांतपणे बसुन राहीली.

 

गाडी आता 'दूधसागर धबधबा' जे गोव्याचे मेन टूरिस्ट्स अॅट्रॅक्शन होते तिकडे त्यांचा प्रवास सुरू झाला.जवळपास दीड दोन तासाचा प्रवास.असे वाटत होते जणू काही जंगल सफारीचीच टूर करत आहोत.फरक फक्त इतकाच की हे जंगल प्राण्यांशिवाय होते.मधेमधे वाटेत छोटे छोटे पाण्याचे ओढे लागत होते त्यातुन कार जाताना चहू बाजुंनी पाण्याचे तुषार उडत होते एखाद्या स्पोर्ट्सकारमधे बसुन केलेल्या थरार शो सारखे ते सगळे भासत होते.

सुखदा जरी रागात होती तरी मनातल्या मनात तिला सुहासबरोबर ह्या जंगलसफारीची मजा लुटताना खूपच मज्जा येत होती.अनिमिष नेत्रांनी सृष्टीचे ते सौंदर्य ती मनात साठवुन घेत होती.

अखेरीस ते एका विशिष्ट लिमिटपाशी पोहोचले जिथुन पुढचा प्रवास फक्त पायीच करता येणार होता.

तिकडे टिकीट्स काढुन बदल्यात लाईफ सेव्हींग जॅकेट्स देऊन तुमच्या पदभ्रमंतीला सुरवात होते.गाईड तुम्हाला त्या धबधब्याच्या अगदी निकट पर्यंत घेऊन जातो जिथुन त्या विशालकाय जलप्रपाताचे विहंगम दृष्य नजरेस पडते.सगळा खाचखळग्यांच्या पाऊलवाटांचा ओबडधोबड कच्चा रस्ता.मधेच पाण्याचे वाहते ओढे असा चित्तथरारक प्रवास अखेरीस तिथे संपतो जिथे दूधासारखा तो फेसाळ प्रवाह कितीतरी फूट उंचीवरून खडकांवर आपटत पडत राहतो.

आता सुहास आणि सुखदा हातात हात घट्ट धरून त्या पाण्याच्या डोहात उतरले.दोघांनाही पोहता येत असल्याने आणि लाईफ जॅकेटही असल्याने ते निर्भिडपणे त्या प्रचंड जोर असलेल्या डोहात उतरले..अंगाला पाणी लागताच तिच्या अंगावर शीरशीरी उठली.

दोघेही भान विसरून त्या पाण्यात मनसोक्त जलक्रीडा करू लागले दिडतासाचा सिमित वेळ कधी संपला कळलेही नाही.आता दूपार टळुन गेली होती.आणि परीश्रमाने भूकही लागली होती.तिथेच स्टॉल्सवर जे व्हेज पदार्थ उपलब्ध होते ते आॅर्डर करून त्यांनी त्याची मनसोक्त मजा लुटली.

आता पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला.

साधारण साडेसहा सातच्या आसपास ते रूमवर पोहोचले.दोघांनाही चहाची नितांत गरज होती.प्रवासाने थकायला झाले होते.त्यांनी रूमसर्व्हीसचा नंबर फिरवुन स्नॅक्स आणि चहा ऑर्डर केले.

सुखदा रूमवर आल्यावर तिला सुहासचे मंदिरातले वागणे ज्याचा इतकावेळ विसर पडला होता ते पुन्हा आठवले आणि ती जराशी रूसुन बसली.

सुहासला कळेना बाहेर इतक्या वेळ एनजॉय करणारी आता अचानक का रूसली.?

त्याने मनाशी विचार करतच तिला विचारले.

सुहास - हॅलोऽऽऽ काय झाले??

नाकावरच्या रागाला औषध काय..;

गालावरच्या फुग्यांचे म्हणणे तरी काऽऽऽय।।

त्याने गाण्यातुन केलेल्या चौकशीने खरतर तिचा राग कुठल्या कुठे पळाला होता पण तरीही तिने ओढुन ताणुन रागाचे सोंग घेतले..

सुहासने पुन्हा विचारल्यावर ती बोलती झाली.

सुखदा - मी तुला मंदिरातुन गाडीत बसल्यावर काहीतरी विचारले होते त्याचे उत्तर तु अजुन दिले नाहीस..असा का सोडून आलास मला एकटाऽऽऽ सांग???

त्यावर सुहासने हलकेच सुचक स्माईल देत तिच्या जवळ आला.तिच्या खांद्याना अलगद पकडत बेडवरून उठवुन तसेच तिला आरशासमोर नेऊन उभे केले आणि तिच्याकडे पाठिमागुन आरशातल्या प्रतिबिंबाकडे एकटक रोखुन पहात म्हणाला..

सुहास - बघ आरशात स्वत:ला..काही कळतेय??

तिला अजुनही प्रकाश पडत नव्हता.ती विचार करत नुसती बघत होती पण त्याचा रोख तिला काही केल्या समजत नव्हता.

तिने आश्चर्यमिश्रीत प्रश्नांकीत नजरेने विचारले..

सुखदा - कायऽऽ??मला तर नाही समजत आहे काहीऽऽ..

त्यावर सुहास आता खरे उत्तर द्यायला शब्द जुळवू लागला.त्याला माहित होते कारण कळल्यावर आपण पुन्हा सकाळसारखा मार खाणार पण तरीही धीर करून तो बोलला.

सुहास - अग डार्लिंग हा ड्रेस घातल्यावर पायऱ्यावरून उतरत येताना तु दूरून कशी दिसशील हे मी व्हिज्युव्हलाईज करत होतो म्हणुन मग ते दृष्य प्रत्यक्षपणे बघण्यासाठी मी एकटाच खाली येऊन बसलो गाडीत..

त्यावर लटक्या रागातच 

सुखदा - मग हे ध्यान बघुन हसला असशील नाऽऽ मनातल्या मनात…!!

सुहास(नजर जास्तच रोखुन) - ध्यान नाही गंऽऽऽऽ...उलट माझं फक्त तुझ्यावरच ध्यान होतं इतकी तु हॉट सेक्सी बाँम्ब दिसत होतीस..

हायऽऽऽ ये दिल तुम पर फिर फिदा हो गया मेरीऽऽ जानऽऽऽ।

तो अगदी हातवारे करून शहारूख स्टाईलमधे तिला डायलॉग मारला.

तशी ती प्रचंड लाजली.आणि लटक्या रागानेच त्याला छातीवर ठोसे मारू लागली.

त्यांची अशी हसी,मस्करी चाललेली इतक्यात त्यांची ऑर्डर सर्व्ह झाली.

दोघांनी स्नॅक्समधे ऑर्डर केलेले कबाब आणि चहाचा येथेच्छ फडशा पाडत फ्रेश होऊन ते पुन्हा पायीच सींक्वेरीयम बीचवर निघाले.

समुद्रावरचे ते खारे वारे अंगाला झाेंबत होते.वाऱ्याचा झोत कधीकधी इतका जोरदार की हवेने ढकलले जात होते ते.

त्या बोचऱ्या वाऱ्याने अंगावर शहारा उमटत होता.रात्रीची वेळ असल्याने एक्कादुक्का कोणीतरी सोडता फारशी वर्दळ नव्हती बीचवर.त्या नीरव शांततेत फक्त लाटांच्या गाजेचाच ध्वनी कानी पडत होता.

दोघेही दूरवर बराचवेळ किनाऱ्यावर चालत राहिले.

आज आणि काल फक्त चोवीस तासांचे अंतर पण त्या दोन्ही वेळची मनस्थिती किती वेगळी होती.

तीच जागा,तोच किनारी,तीच सोबत,तीच वेळ... पण काल बेचैन,अस्वस्थ,प्रश्नांचे काहूर उठलेले मन आज मात्र तृप्त,शांत,आनंदी,समाधानी होते.

 

तिच्या मानसिक भावनिक स्थित्यंतरांचा तोच तर एक साक्षीदार होता.तिने मनोमन त्याला नमन करून त्याचे आभार मानले.त्याच्या सानिध्यात तिला जीवनातील सर्वात सुंदर भेट मिळाली होती..कशी विसरू शकणार होती ती त्याला.

त्याचे श्रेय तर द्यायलाच हवे नाऽऽ!!

तेच केले तिने…..

 

आता अंधार अधिकच गडद झाला होता.

त्यामुळे ते पुन्हा परतीला लागले.नुकतेच थोडेसे खाणे झालेले असल्याने दोघांनाही फारशा भूका नव्हत्या.लाईट काहीतरी सूप वगैरे मागवुन त्यांनी रात्रीचे जेवण उरकले.

 

बस आजची रात्र.उद्या त्यांचा प्रवास सावंतवाडी करता होणार होता.

तसे अंतर फार नसल्याने अगदीच घाई नसली तरी चेक आऊट टाईम बारा असल्याने त्यांनी अकरालाच रूम व्हेकेट करण्याचा निर्णय घेतला.त्याप्रमाणे सामानाची बांधाबांध आधीच करून ते बेडवर विसावले.

सुहासचे मन जरी सांगत होते काहीतरी मस्ती करू तरी शरीर थकलेले होते.त्यात उद्या ड्राईव्ह पण स्वत:च करायचे होते त्यामुळे आज विश्रांती नितांत आवश्यक होती.

म्हणुन मनातल्या मोहाला तुर्तास बाजुला सारून शांतपणे झोप घेण्याचाच पर्याय त्याने निवडला.

सुखदाही दिवसभराच्या दगदगीने थकली होती.

दोघांनाही विश्रांतीची नितांत गरज होती.बेडवर एकमेकांच्या अंगावर हात टाकुन पडताक्षणी दोघेही झोपेच्या आधीन झाले…………….

------------------------(क्रमश:22)----------------------------

(क्रमश:22)

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार मित्रहो,,,,

 

गोव्यातील नितांत रोमहर्षक प्रवास आता सावंतवाडीकडे कूच होताना उद्याच्या भागात दिसेल.

सुहास सुखदाचे नाते पुढे काय वळण घेते हे पहायचे असेल तर पुढचा भाग नक्की वाचा..

कथा कशी वाटतीय,आजचा भाग कसा वाटला?हे कमेंटमधे जरूर कळवा.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..