Oct 27, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -21

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग -21

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -21

©®राधिका कुलकर्णी.

 

पब मधल्या त्या ओंगळ गोंगाटाने लवकरच सुखदाचे मन उबले.तिला आता आपल्या रूमच्या काचेतुन दिसणारा विस्तीर्ण समुद्र खुणावत होता.

त्याची निळाई आपल्या डोळ्यात साठवायला ती अधीर झाली होती.

तिने हळुच सुहासच्या कानात आपली ईच्छा बोलुन दाखवली तसा तोही तयार झाला.

दोघेही ताज व्हिलेज रसॉर्टपासुन अवघ्या दोन तीन किलोमीटरवर असलेल्या सिन्क्वेरियम बीचवर पोहोचले.संध्याकाळची वेळ.मावळतीचा सूर्य नुकताच अस्त पावुन त्याच्या तांबुस निळ्या जांभळ्या छटांनी आसमंत उजळलेला.

माणसांच्या कोलाहलापासुन दूर अतिशय शांत,स्वच्छ आणि अगदी तुरळक गर्दी असलेला तो किनारा बघुन सुखदाला खूप छान वाटले.

पायातले बूट,चपला काढून दोघेही त्या ऐसपैस पसरलेल्या अथांग किनाऱ्यावर हातात हात गुंफुन चालू लागले.

पायाखाली सरकत जाणारी ती मऊशार वाळू पावलांना गुदगुल्या करत होती.आेल्या किनाऱ्यावर चालताना पायाच्या  उमटणाऱ्या त्या पाऊलखूणा मागून येणाऱ्या लाटेने पुन्हा पुसुन कोऱ्या होत होत्या.

अगदी आपल्या आयष्यातील दु:खं,काळजी, चिंतांसारखेच.एक सुखाची लहर आणि मागच्या दु:खाच्या साऱ्या खूणा क्षणात नाहीशा व्हाव्यात अगदी तसेच.

सुखदाला समुद्र खूपच आकर्षित करायचा नेहमीच.आजही त्या अमर्याद पसरलेल्या लांबच लांब किनाऱ्यावरून समुद्राकडे एकटक नजर लावुन बघत ती सुहासला म्हणाली….

सुखदा - सुहासऽऽऽ तुला आवडतो काऽऽ रे समुद्र?

बघ त्याच्याकडे.मला तर ना हा समुद्र एखाद्या शांत,संयत ध्यानस्थ ऋषी सारखा वाटतो.

बघ नाऽ किती कायऽऽ काय सामावुन घेतो तो आपल्या उदरात.

चांगले,वाईट,पीडा,त्रास सगळे सगळे आपल्या पोटात गुडूप करून वरून मात्र हा असा नितांत धीर गंभीर.आपल्या उदरातल्या वादळाची चाहूलही लागू देत नाही.

सर्व दु:ख स्वत:कडे ठेवुन मानवाला मात्र अनंत हस्ते कमलाकराने देतच राहतो.

आपल्याला किती शिकण्यासारखे आहे नाही ह्याच्याकडून.

आपण थोडे काही मनाविरूद्ध झाले की लगेच रिअॅक्ट होतो.आपल्याला ह्याच्याकडून ती धीरगंभीरता ती सहनशीलता खरचच किती घेण्यासारखी आहे.

आपण मनुष्य त्याच्यावर किती सारे अन्याय करत निसर्गाच्याविरूद्ध त्याच्या उदरात नको नको ते आणुन ओततो.तो मात्र सहनशील उदार कधी एखाद्या कनवाळू बापाप्रमाणे उदात्तपणे आपली मनमानी सहन करून आशीर्वादाचा वरदहस्त सतत आपल्या डोक्यावर ठेवत राहतो.

सगळ्या दुखांवर फुंकर घालुन आपल्याला हवी असलेली तीच शांतता,शीतलता बहाल करत राहतो अविरतऽऽऽ…!!

नाहीतर कधीकधी त्या उन्मत्त उत्श्रुंखल खट्याळ प्रियकरासारखे उत्कटपणे कवेत घेतो आणि वेड लावतो त्याच्या अथांगतेचे नाहीऽऽ का???

 

सुखदा किती वेळची मंत्रमुग्ध होऊन समुद्राचे गुणवर्णन करत होती.सुहास तिच्या कमरेत हात लपेटुन हळुच तिच्या कानात म्हणाला.

सुहास(मिश्किलपणे) - अगदी माझ्या सारखाय नाही गंऽऽ हा??

ती इतकी एकाग्रतेने गंभीरपणे काहितरी सांगत होती आणि सुहासने हा असा खट्याळ डायलॉग मारून तिचा पुर्ण मूड क्षणात बदलवून टाकला.

ती ही त्याला लटक्या रागात एक चापट मारत म्हणाली.

सुखदा - तु???आणि समुद्रऽऽऽ?? तोंड पहा आरशात!!!

आता तिनेही त्याला चिडवत मुद्दाम त्याची मस्करी केली.

त्यावर लटकाच रूसवा दाखवत सुहास म्हणाला.

सुहास(तोंड पाडून) - मग कायऽऽ? किती ते कौतुक…!!

मला नाऽऽऽ हा समुद्र आता माझा 'सवत्या' वाटायला लागलाय.केव्हापासुन त्याची नुसती तारीफ पे तारीफ…तारिऽऽफ पे तारिऽऽफ..!!

निदान एखादा कौतुकाचा शब्द ह्या पामराच्याही नशिबी येवु दे की ज्याने तुला इतक्या सुंदर बीचवर आणले.त्याचे तर तुला काहीच नाहीऽऽ…!!

त्याची ती लटक्या रागाने गाल फुगवुन केलेली गोऽड तक्रार ऐकुन तिला क्षणभर सुहासच्या जागी आदिच दिसला,,लाडिकपणे रागाने सुखाईजवळ तक्रार करणारा…..आत्ताचे हे बालसुहासचे रूसवे मोहक रूप तिला वेड लावुन गेलं.

पण आत्ता हे वाक्य बोलली असती तर सुहासचा मूड गेला असता म्हणुन ती लाडातच त्याचा गालगुच्चा घेत त्याचा चेहरा गोंजारत म्हणाली.

सुखदा - तु आहेस म्हणुन तर मी आहे नाऽऽ डिअरऽऽ..बघ माझ्या डोळ्यात,काय दिसतेय तुलाऽऽ??

माझ्यासाठी तुच समुद्र आहेस..त्या समुद्राच्या तटावरची मऊ लुसलुशीत रेती आत्ता कुठे मला स्पर्शुन गेलीय.आत्ता कुठे मी किनाऱ्यावरून त्याच्या पाण्याला,त्या लाटांना आपल्या अंगावर झेललेय…

तो तुच आहेस ज्याने माझा ह्या सगळ्या नव्या अनुभुतींशी परिचय करून दिला आहे.

मी खूप समाधानी आहे हे वेगळं सांगायला हवेयऽऽ का???

सुखदाने त्याच्या घाऱ्या गहिऱ्या डोळ्यात खोल नजर रोखत बोलली.

सुहासनेही आपली नजर तिच्या नजरेत रूतवत एकटक तिला पहात म्हणाला..

सुहास- बऽऽऽसं….इतक्यावरच समाधान?????

अजुन ह्याची अथांगता कुठे अनुभवलीस..!!

त्या गहिऱ्या निळाईला आत आत खोल उतरवावेसे नाही का वाटत तुलाऽऽऽ…!!!

त्यावर ती नि:शब्द झाली.

संपदाचे स्वप्नातले वाक्य जसेच्या तसे पुन्हा तिच्या मन:पटलावर येऊन आदऴले.फक्त ह्यावेळी ते सुहासच्या तोंडुन ऐकु येत होते..काय पण विलक्षण योगायोग..!!

मी तर ह्या स्वप्नाबद्दल सुहासला काहीच सांगितले नव्हते तरीही तो तसेच कसे बोलतोय??

ह्याचा बोलविता धनी कोणी दुसरेच तर नाही नाऽऽऽ…..???

तिने आसपास नजर फिरवली.वातावरण शांत होते.

हलकेच वाऱ्याची एक लहर कानाशी गुदगुल्या करत सर्वांगाला स्पर्शुन गेली.जणु कोणीतरी अलगद स्पर्श करावा तसे काहीसे.

कदाचित सपुताईऽऽऽ..??

तिच्या मनातील विचारांनी तीच चपापली.

हा तिचाच हळुवार प्रेमळ स्पर्श असेल तर ही तिचीच ईच्छा समजू का मीऽऽऽ !!!

नुसत्या विचारांनीच तिला आतुन रोमांचित व्हायला झाले.

काही न बोलता मान खाली घालुन ती उभी राहीली.तसा सुहास तिच्या जवळ येत तिला आपल्या दिशेने खेचत तिच्या ओठांवर पुसटसे चुंबन देत बोलला.

सुहास - सांग नाऽऽ..मला उत्तर हवेय तुझ्याकडुन..

तुझ्या ईच्छेविरूद्ध मी काहीच करणार नाही सुखी..मला तुझी स्वीकृति हवीय…

त्यावर काही न बोलता तिने सुहासला घट्ट मिठी मारली.हलकेच आपले आेठ त्याच्या छातीवर टेकवत ती म्हणाली…

किती वेडाएस रेऽऽ तू……!!

माझ्या स्पर्शांच्या संवेदना तुला काहिच का सांगत नाहीत…!!

काही गोष्टी शब्दात नसतात सांगायच्या..

त्या  फक्त समजुन घ्यायच्या असतात...  स्पंदनांतुन,जाणीवेतुन,स्पर्शातुनऽऽ…!!!

कळतेय का वेडूऽऽऽऽ!!!

तिच्या छातीवरील त्या ओठांच्या स्पर्शाने सुहास मोहरला.क्षणभर त्या जाणीवेने गोठुन गेला.

जणु एखाद्या स्वर्गीय लहरींवर स्वच्छंद प्रवास करत असल्याचा भास झाला त्याला.

तिने त्याच्या दंडांना हलवुन जागे केले तेव्हा तो भानावर आला.

"चल निघायचेऽऽऽ?" सुखदाने विचारले..

तसे सुहासने पुन्हा एकदा त्या अंधारल्या किनाऱ्यावर आपल्या मिठीत घेत तिला बोलला..

सुहास - Am very much excited Sukhiऽऽ….!!!

Let's start for the new journey of our life..!!

Are you interested to explore me!!!!? 

 

त्याच्या शेवटच्या प्रश्नाने तिच्या अंगातुन वीज सळसळत गेली.लाजुनच तिने त्याला होकार भरला.

तसा सुहास आनंदाने वेडा झाला.तिला पटकन आवेगात उचलुन घेत तो म्हणाला..

सुहास - You don't know how much happy I'm at this moment !!!

 

सुखीऽऽ तु मागे मला एक वचन दिले होतेस आठवतेय तूला??

मी जे मागेन ते द्यायचे कबूल केले होतेस तु..!!!

आज मी काहीतरी मागणे मागणार आहे तुझ्याकडे.माझी ईच्छा पुर्ण करशील!!!?

सुखदाने मानेनेच होकार भरत विचारले

सुखदा - काय ईच्छा आहे माझ्या वेडुची..कळु तर दे..

सुहास - सुखदा आज आपल्या सहजीवनाचा प्रवास सुरू करताना मला पुन्हा त्याच नववधु रूपात तुला बघायचेय.

तोच हिरवागार शालू,हिरवा चूडा,मोगऱ्याचे केसात माळलेले गजरे आणि नखशिखांत दागिन्यांनी मढलेली माझी गौरवर्णी सुखीऽऽ.मी ते रूप पहायला आतूर झालोय गंऽऽऽ.

मग हळुच कानात मिश्किलपणे पुटपुटला..

सुहास(डोळा मारत) - नुसते दागिने उतरवण्यातच पहाट व्हायला हवीऽऽ…

त्यावर सुखदा पुन्हा माेहरून गोऽऽड लाजली.

 

आता दोघांची शेकोटी पुरेसी पेटली होती.

दोघेही अधीर झाले होते त्या एकरूपतेच्या क्षणाचा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी..

दोघांचीही पावले अधीरतेने आता हॉटेलच्या दिशेने पडू लागली.

सुहासने इकडेही सुखदासाठी एक सुंदर सरप्राईज आधीच प्लॅन करून ठेवले होते.

त्याला आता स्वत:कडुन नकळत तिला दिल्या गेलेल्या प्रत्येक वेदनांची पुर्ण भरपाई करायची होती अगदी त्या समुद्रासारखीच…

आता फक्त निळाई आणि अथांगतेची अमर्याद अनुभूती……!!!

बाकी काहीच नसणार होते तिच्या पुढील आयुष्यात.मनातल्या मनात सुहासने हे वचन तिला केव्हाच देऊन टाकले..

        ~~~~~~~~~~~~~~~~

थोडे अंतर चालुन गाडीने ते हॉटेलवर पोहोचले.गाडी valet कडे सोपवुन दोघेही रिस्पेशन काऊंटरवर आले.रूमच्या कीज कलेक्ट करून दोघेही लिफ्टकडे वळले.मागे वळुन सुहासने ईशाऱ्यातच रिस्पेशन मॅनेजरला खुणावुन विचारले तसे त्यानेही थम्प्स अप करत होकार दिला.

दोघेही रूमपाशी पोहोचले तसे फोन आल्याचे निमित्त करून सुहासने तिलाच रूमचे दार उघडायला सांगुन तिकडच्या लॉबीमधे फोनवर बोलत असल्याचे भासवले.

सुखदाने कॅज्युअली दरवाजा उघडला.आत पाऊल ठेवणार तोच ती दारातच थबकली.

दारापासुन बेडपर्यंतचा पुर्ण रस्ता गुलाब पाकळ्यांच्या पायघड्यांनी सजवलेला होता.त्याच्या दुतर्फा सेंटेड कँडल्सनी सजावट केलेली.मंद मादक सुवासाने सर्व वातावरण सुगंधीत झालेले..

हलकेच त्या पायघड्यावर ती तिचे पहिले पाऊल ठेवणार तेवढ्यात सुहास पाठीमागुन आला…

सुहास - अहंऽऽऽ!! हा प्रवास आता असा एकट्याने नाही करायचा स्वीटीऽऽ..

आता पुढील प्रत्येक पाऊल हातात हात घालुन एकमेकांच्या सोबतीनेच उचलायचे राणीऽऽ..!!

त्यावर ती गोऽऽड लाजली.सुहासने आपला हात तिच्या हातात गुंफत चालता चालताच तिला सप्तपदी चालताना देतात तसे पहिले वचन दिले..

सुहास - ह्यापुढे तुझ्या आयुष्याची वाटचाल नेहमी अशाच रेशमी पाऊलवाटांवरून सतत होत राहील ह्याची मी काळजी घेईन.

जर वाटेत एखादा काटा आलाच(खाली वाकुन एक चूकार काटा अलगद बाजुला वेगळा करत) तर त्यावर पहिले माझे पाऊल पडेल.तो काटा मी माझ्या अंगावर झेलेल हा माझा शब्द आहे तुलाऽऽ…

त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक तीच्या अंगातुन शीरशीरी उठत होती.

हाताला धरून त्याने तिला बेडपर्यंत आणले.

बेडसुद्धा नितांत सुंदर रोज पेट्ल्सच्या हार्टशेपने सजवला होता.बेडच्या चारही कॉर्नर्सवर गुलाब आणि निशिगंधाचे बुके ठेवलेेले होते.

साईडटेबलवर एका बास्केटमधे शँपेनच्या बॉटल सोबत एक गिफ्ट रॅप केलेले दिसत होते.त्यावर सुंदरसे कार्डही स्टीक केलेले होते.

ती घाईघाईने त्या बास्केटमधल्या गिफ्टरॅपकडे गेली.गिफ्ट हातात उचलुन आश्चर्यानेच तिने ते कार्ड उघडले.

एक सुंदर चारोळी हार्टशेपमधे लिहीलेली होती.

त्या ओळी अशा होत्या….

 

"तुझ्या अत्तरी देहाला

माझ्या श्वासांची ओंजळ।

अंगोपांगी बहरला

जणु आश्वत्थ पिंपळ।।"

सुहास…..

ती अचंबीत झाली ते वाचुन.

इंग्रजीतला एखादा टिपीकल रोमँटिक डायलॉग कोट करून लिहीला असेल असा तिचा संभ्रम पण इकडेही सुहासने चक्क स्वत:च रचलेली काव्यात्मक भेट देऊन तिला अजुन एक गोड सरप्राईज दिले.

ती आवेगाने त्याच्या कुशीत शिरत म्हणाली..

सुखदा - wowwwww!!! 

What a romantic poetic thought!!! 

सुहासऽऽऽ हे तू लिहिलेस खरचं!!!

माझा विश्वासच बसत नाहिये..

तुझी ही रोमँटिक साईड मला आजच कळतेय हंऽऽ…

Thank you so much for this lovely gesture sweetheart…!! 

 

तिने त्याला गालावर एक हलकीशी पप्पी दिली आनंदाच्या भरात.

त्यावर सुहास तिच्याकडे पाहुन खट्याळपणे म्हणाला..

सुहास - तुला अजुन माझ्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायचाय डार्लिंग..म्हणुनच तर विचारले ना मगाशी...would you like to explore me!!! 

त्याचा बऱ्याच ह्या शब्दावर दिलेला जोर सगळे काही सांगुन जात होता...

त्यावर ती पुन्हा लाजली.

तिने आता ते गिफ्ट उघडले.त्यात तिचा तोच लग्नातला शालू पॅक करून ठेवलेला.

त्याने ईशाऱ्यातच आपली ईच्छा आठवण करून दिली.

तसे तिने त्याला बाहेर पिटाळत सुहासकरता सजायला सुरवात केली.

      ~~~~~~~~~~~~~~~~~~

स्वत:ला सजवुन तयार करून तिने आरशात बघितले.लग्नातही स्वत:कडे फारसे निरखुन न पाहिलेली सुखदा स्वत:च्याच वधु वेशातील सोज्वळ रूपाकडे स्तिमित नजरेने पहात राहिली.

स्वत:च स्वत:ला एक गोड स्माईल देत तिने सुहासला मेसेज करून बोलवुन घेतले.

तो कोणत्याही क्षणी रूममधे प्रवेश करेल.तो कसा रिअॅक्ट होईल ह्या नुसत्या कल्पनेनेच ती मोहरली.

पाचच मिनिटात सुहास रूममधे आला.तिच्या त्या नववधुतल्या रूपाला तो वेड्यासारखा विस्फारल्या नजरेने न्याहाळत राहीला.हळुहळु एक एक पाऊल टाकत तो तिच्या जवळ आला.

तीची लाजुन खाली झुकलेली मान त्याने अलगद वर उंचावली.

हलकेच तिला कपाळावर किस करत म्हणाला..

सुहास - आलोचऽऽऽ….!

त्याने बॅगेतुन काहीतरी घेतले आणि वॉशरूमला गेला.

थोड्या वेळातच तो आला तेव्हा तोही त्याच सिल्क कुर्ता पायजम्यात होता जो त्याने लग्नात घातला होता.

त्याच्या कलोनचा मादक गंध तिच्या चित्तवृत्तींना चेतवत होता..

सेंटर टेबलवरच्या बास्केट मधली शँपेन त्याने उघडुन त्याचा तो फेसाळता प्रवाह हवेत उडवला.थोडी शँपेन तिला पाजवत त्यानेही थोडी चाखली.सगळे वातावरण रोमँटिक झालेले.सुखदा आतुन थोडीशी घाबरलेली.तिचा ऊर कितीवेळचा एका अनामिक हुरहुरीने धपापत होता.

सुहास आरशापुढेच तिला मागुन मिठी मारत तिच्या प्रतिबिंबाकडे एकटक रोखुन पाहू लागला.

सुहास(मादक अवाजात) - खूऽऽऽऽऽप गोडऽऽऽ दिसतीएस….माझी स्वीऽऽट राणीऽऽ.

ती तशीच त्याच्या अंगावर झुलली तसे तिच्या केसातला मोगऱ्याचा सुवास त्याला धुंद करू लागला.तिच्या मऊ रेशमी केसांची बट त्याच्या गालांशी चाळा करू लागली.तिच्या परफ्युमचा मोहक वास त्याच्या नाकात शिरून त्याला कासावीस करू लागला.तो उत्तेजित झाला.

त्याचे उष्ण श्वास सुखदाच्या मानेला स्पर्श करत होते.सुहासने आपले ओठ हलकेच तिच्या मानेवर टेकवले तसा शरीरभर एक सरसरून काटा आला सुखदाला.तिच्याही ह्रदयाची धडधड वाढू लागली.

सुहासने हलकेच तिला आपल्या दिशेने वळवत तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.

तिच्याकडे मधाळ नजरेने बघत अलगद तिला उचलले आणि बेडवर टेकवले.तिला हलकेच बेडवर झोपवुन तो तिच्या जवळ सरकला त्याबरोबर सुखदाच्या पोटात अनामिक हुरहुरीने फुलपाखरे उडायला लागली.तिच्या श्वासांची गती वाढली.सुहासने तिच्या चेहऱ्यावर रूळणारी बट हलकेच दूर सारत तिच्या कपाळाचे पुन्हा एकदा चुंबन घेतले.आता सुखदाने आपले डोळे मिटुन घेतले तसे त्याने आपले ओलसर ओठ तिच्या डोळ्यावर टेकवले.त्याबरोबर तिच्या मेंदूत गोड झिणझिण्या उठल्या.तिने आवेगाने सुहासला मिठी मारली.त्यानेही आपल्या हाताची पकड तिच्याभोवती घट्ट केली.सुखदाने स्वत:हून आपले ओठ त्याच्या ओठावर टेकवले तसे तोही उत्तेजित झाला.त्याचे शरीर ताठर झाले.अंगातुन वीजेचा प्रवाह दौडू लागला.ह्रदयाचे स्पंदनं वाढली.त्याचेही श्वास गरम होऊ लागले.

त्याने त्याचे आेठ तिच्या मानेवर,गळ्यावर टेकवत हलकेच खाली उतरला.तिच्या प्रत्येक घाटदार वळणांवर आपल्या ओठांची मोहोर टेकवत राहीला.

त्याच्या प्रत्येक स्पर्शांनी तिच्या शरीरात वीजेचे लोळ उठत होते.ती कधी मोहरत होती तर कधी शहारत होती.कधी थरथरत होती तर कधी तोंडातुन अस्फुट हुंकारही देत होती.

परस्परांना आपल्या स्पर्शांनी उत्तेजित करत दोघेही स्वर्गीय सुखाच्या प्रत्येक पायरीचा मनसोक्त आनंद लुटत होते.

आता कपड्यांचा अडसर दूर झाला आणि त्या परमोच्च आनंदाच्या ते अगदी निकट पोहोचले.

स्वर्ग फक्त दोन बोटांवर राहीला.सुहासने आपली मधाळ नजर सुखदावर टाकत त्या स्वर्गीय दरवाजाचा वेध घेतला.

पुढले कित्येक तास ते त्या स्वर्गीय सुखाच्या परमोच्च आनंदात मनसोक्त विहरत राहीले.

ती एखाद्या मासोळीगत तडफडत होती प्रणयरसाच्या त्या खोल डोहात स्वत:ला आकंठ बुडवु घेण्यासाठी. त्या आनंदात ती चिंब नाहून निघत होती.घामाने डवरलेल्या तिच्या देहावर जणू तृप्तीचे असंख्य गूलाब फुलले होते.

तो स्पर्श,ती संवेदना,तो क्षण कधी संपुच नये असे तिला वाटत होते.

बऱ्याच वेळच्या परिश्रमानंतर तिला आज पहिल्यांदाच तृप्त वाटत होतं.

शांत समाधानी नितांत सोज्वळ चेहऱ्यावर हलकेच सुहासने आपले ओठ टेकवले.

तसे तिच्या डोळ्यात पाणी आले.

तिच्या डोळ्यातील पाणी पाहुन सुहास घाबरला.

त्याने काळजीनेच तिचे डोळे पुसत विचारले..

सुहास - काय झाले सुखी?तुझ्या डोळ्यात पाणी का?खूप त्रास होतोय का?

अॅम सो सॉरी डार्लिंगऽऽऽ.

क्षणभर तो स्वत:लाच अपराधी समजु लागला.

तसे सुखदा त्याला बिलगली.त्याच्या कानात हळुवारपणे म्हणाली ..

सुखदा - आय लव्ह यु सुहासऽऽऽ…हे तृप्तीचे समाधानाचे अश्रु आहेत. आणि हे समाधान तु मला दिले आहेस.

एक स्त्री म्हणुन आज मी परिपूर्ण झाले..

आणि हे पुर्णत्व तुझ्यामुळे मला मिळालेय..

Thank you so much..!

सागराच्या त्या अथांगतेची अनुभूती आज मला मिळाली.

नाहीतर मी किनाऱ्यावरच उभी राहिले असते स्वत:च्या अपुर्णत्वाला उराशी कवटाळून.

समर्पण हेच जीवनाचे सार आहे हे आज मला पटले डिअर….

दोघेही पुन्हा एकदा एकमेकांच्या बाहूपाशात विसावले.

कुस्करलेल्या मोगऱ्याचा अत्तरी सूवास त्यांच्या अंगप्रत्यंगांवर आपली सुगंधी मोहोर उठवुन एका सुंदर क्षणांची साक्ष देत होता……

तृप्तीने ओथंबलेले दोन देह शांतपणे आयुष्यातील एका सुंदर पर्वाची वाट बघत पहु़डले होते.

नव्या पर्वाची नवी पहाट आपल्या उदयाची चाहूल देत पूर्व दिशेला संधीप्रकाशाची उधळण करत होती. त्या सोनेरी किरणांनी आसमंत उजळुन निघत होता.

 

तिकडे खिडकीशी पडद्याची हलकेच फडफड झाली.एक आत्मा तृप्ततेने दोन मनांचे मिलन घडवून अनंतात विलीन होऊ पहात होता.

 

तर दसरीकडे नियतीनेही तिच्या हातात दडवुन ठेवलेल्या हुकूमी पानांची झाकली मूठ आज दिलखुलासपणे उघडी केली होती……

-----------------------(क्रमश:21)----------------------------

(क्रमश:21)

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार मंडळी,

कथा आता अंतिम चरणात पोहोचलीय हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

तुम्ही सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर दोघांच्याही आयुष्यात उगवला.

स्त्री पुरूषाचे नाते हे फक्त शारीरिक नसुन भावनिक जास्त असते तरीही मनाने कितीही जवळ असलात तरी जोपर्यंत तुम्ही शरीराने एक होते नाहीत तुमचे नाते कधीही पुर्णत्व प्राप्त करत नाही आणि त्यादृष्टीने आजचा भाग त्याच्या आयुष्याचा चरम-बिंदू होता असे म्हणायला हरकत नाही.

कसा वाटला आजचा भाग?

हे कमेंटद्वारे जरूर कळवा.माझी कथा आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कुठेही शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..