A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907def7d706fae17c2402cc53f9af4f0281fcf4f454a8b): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi bhag 17
Oct 27, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग 17

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग 17

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-17 

©®राधिका कुलकर्णी.

 

विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उरकला तसे जो तो आपापल्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारू लागला.

वेगवेगळे फ्रुट्स व्यवस्थित कट करून कलात्मकरीत्या सजवुन ठेवलेले होते.

स्टार्टर्सच्या वेगवेगळ्या व्हेज/नॉनव्हेज  व्हराईटीजनी स्टॉल्स सजले होते.

जेवणातही विविध प्रकारचे स्टॉल्स लावलेले.

खवय्यांची नुसती चंगळ होती.

सुखदाला क्षणभर मुलांची आठवण आली.

आदिला पनिरचे स्टार्टर्स किंवा पनिरचे कुठलेही पदार्थ प्रचंड आवडायचे.

एक काऊंटर स्नॅक्स चॅटचाही अरेंज केलेला.

त्यात स्पेशली पावभाजी बघुन सुखदाला पुन्हा वाटले आज मुले सोबत असती तर त्यांनी किती मज्जा केली असती...डोक्यातले विचार तात्पुरते बाजुला सारून तीही तिच्या आवडीचे पदार्थ एन्जॉय करू लागली.

सुहास मित्रांसोबत ड्रिंक्स आणि स्टार्टर्स एन्जॉय करत होता.

मधुनच दोघांची नेत्रपल्लवी व्हायची आणि तेवढ्या गर्दीतही तो तिला डोळा मारून घायाळ करायचा.त्याचे घारे नशिले डोळे जास्तच नशिले दिसायचे अशावेळी.सुखदा रोमांचित व्हायची त्या एका क्षणातही...

सगळ्यांच्या गराड्यात कौतुकांचे वर्षाव झेलत बऱ्यापैकी सेटल होत सुखदा सगळ्यांशी हसुन खेळुन गप्पांचा आनंद घेत होती.कोण काय काय काम करते हा प्रश्न सहज निघाला आणि जेव्हा कळले की सुखदा मॅथमॅटिक्स विषयाची प्रोफेसर म्हणुन पोतदार सारख्या नामांकीत इन्स्टीट्युटमधे काम करते तेव्हा सगळ्यांचे आयब्रोज रेज झाले.

आपण हिला काय समजत होतो आणि ही काय निघाली ह्या विचारांनी सर्वच जणी मनोमन खजील झाल्या.

एखाद्या व्यक्तीच्या बाह्य वर्तनावरून त्याच्याविषयी कुठलेही आडाखे बांधणे किती चुकीचे असते हे तिथे उपस्थित प्रत्येक सो कॉल्ड कल्चर्ड एज्युकेटेड समजणाऱ्या बायकांना कळुन चुकले होते.

आता त्यांचा सुखदाकडे पहाण्याचा संपुर्ण दृष्टीकोण बदलुन गेला होता.प्रत्येकजण तिच्याशी आदराने बोलत होते.

हे असे सगळे लेडीज गोट्यात चाललेले असतानाच

सचिनने म्हणजेच( पार्टी होस्ट) सुहासच्या मित्राने  सुखदाला हाक मारली.तशी ती त्या घोळक्यातुन बाजूला होऊन सचिनकडे आली.

सचिनने हलक्या आवाजात तिच्या कानाशी येऊन सांगितले..

सचिन -पता नही क्या हुआ है लेकिन सुहास आज उसके लिमिट से जादा पी रहा है. I think you please take him home. 

तुम ड्राईव्ह कर सकती हो या मै मेरा ड्रायव्हर साथ मे भेजू??

त्याने काळजीनेच विचारले.

सुखदा - No.Not needed.I can drive. 

सचिन-Ok,Then Great..you please hurry up… 

सचिन - OMG.I forgot to ask,Have you finished your dinner??

सुखदा - oh.yes.just finished.And I was about to ask Suhas whether to go home or what..

सचिन - Ok…..please जल्दी से उसे घर ले जावो..

सुखदा - Yeah sure!

And thanks for this wonderful evening.

Enjoyed every bit of it.Thank You.

Good Night !

सुखदानेच सुहासच्या वतीने आभार मानले. 

 

सगळ्यांना परत एकदा टाटा बाय बाय करत शेवटचा निरोप घेत सुखदा सुहासला घेऊन तिकडुन बाहेर पडली.

 

सुहासला फ्रंट सीटवर बसवुन सीटबेल्ट लावुन सुखदाने स्वत: ड्रायव्हींग व्हीलचा ताबा घेतला.

रात्रीचा साधारण दिड-दोन वाजत होता.सगळा रस्ता सुनसान झालेला.क्वचित एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज त्या निरव शांततेचा भंग करत होता.ते सोडता चिटपाखरूही दिसत नव्हते.

तिने जरा स्पीडमधेच गाडी चालवायला सुरू केली.

इकडे सुहासची बडबड सुरू झाली.

सुहास- सुखीऽऽ...आज तर तु पार्टीची शान झालीस की.

You were the center of attraction of today's party.!!

अॅम रिअली प्राऊड ऑफ यु डिअर..!

सुखदा तुला एक सांगु..!

त्याने थो़डा पॉज घेतला.

सुखदा - थांबलास का??बोल नाऽऽ..मी एेकतेय.

सुहास - तु ना आज काऽऽटा दिसत होती काटाऽऽ.

सुखदा (हलकीशी लाजत स्माईल करत)- अच्छाऽऽ???

सुहास - अगं तिकडे सगळ्यांची नजर तुझ्यावरच आणि डान्स नंतर तर सगळे जसे काही हिप्नोटाईझ झालेले.अगदी मी सुद्धा.

जो तो फक्त तुझ्याविषयीच बोलत होता.

मी तर वेडा झालोय वेडा तुझी अदा,तुझी ग्रेस पाहुन!!

तु इतका सुंदर डान्स शिकलीएस हे माहितच नव्हते मला..what a beautiful fusion of ballet and Kathak!!

Amazing..!

It was memorising experience for me.. 

रिअली फिलिंग प्राऊड यार!!

सुहासची अशी अखंड बडबड रस्ताभर चाललेली..

सुखीऽऽ तुला एक सांगुऽऽ…?

सुहासने पुन्हा तेच वाक्य रिपीट केले.

सुखदा -काय...??

विचारताच सुहासने तिचे तेच कौतुक करत बोलला

सुहास - आय लव्ह यु सुखदा..!!

पुन्हा हे ते बोलुन पुन्हा काहीतरी सांगायचेय म्हणत पुन्हा आय लव्ह यु चे पालुपद..

 

रस्ताभर सुहासची गाडी घुमुन फिरून आय लव्ह यु वर येऊन टेकत होती.सुखदाचा मस्त टाईमपास होत होता ड्रायव्हींग करता करता.

तिला कळत होते की त्याला जास्त झालीय आज आणि नशे मधेच सगळे कौतुक चाललेय...

असे म्हणतात की नशेत माणसं खरे बोलतात.

म्हणजे सुहासच्या मनात खरचं माझ्याविषयी ह्याच फिलिंग्ज आहेत????

त्या कल्पनेनेच तिला शहारून आले.

आता सुखदाने विचारले…

सुखदा - सुहासऽऽ एक विचारूऽऽऽ??

सुहास - नकोऽऽ …..नको विचारूस.

आय नो व्हॉट यु विल आस्क…

सुखदा - मग सांग, मी काय विचारणार???

सुहास - तुला हेच विचारायचेय नाऽऽ मी इतकी का घेतली??

आता आश्चर्य करण्याची वेळ सुखदाची होती.किती मनकवडा आहे हाऽऽ!!! ह्याला कसे कळले मी हेच विचारणार…

आपल्या मनाशीच चाललेले संवाद आवरते घेत तिने पुन्हा सुहासला विचारले..

सुखदा - मग आता प्रश्न तुला कळलाच आहे तर उत्तरही दे नाऽऽ…

तु मला लिमिटमधे घेईन हे प्रॉमिस केले होतेस पण तु ते पाळले नाहिएस सुहासऽऽ..काय झालेय इतके?

माझ्या माहितीप्रमाणे माणसे फक्त दोन परिस्थितीतच जास्त घेतात ..एकतर खूप दु:खी असतील तर किंवा मग जरूरीपेक्षा जास्त खुष...

तुझे ह्यापैकी नेमके काय कारण …..कळेल का???

सुखदाने बरोब्बर मुद्दा पकडुन त्याला कॉर्नर केले.तसे आपल्या नशिल्या गहिऱ्या डोळ्यांनी अजुनच रोखुन पहात तो बोलला.

सुहास - विल यु ट्रस्ट माय रिझन टु ड्रिंक मोर..!!!

सुखदा - यसऽऽऽ. But speak the truth…

सुहासने पुन्हा एक पॉझ घेतला….

सुखदा(विस्मयाने) - why such a big pregnant pause…???

सुहास - मी शब्दांची जुळवणी करतोय..

कसे सांगु…

सुखदा(अधिकच चकित होऊन) - सांग.जे मनात असेल ते मोकळेपणानी सांगु शकतोस तु..

सुहास - खरं सांगु सुखीऽऽऽऽ….मी तुझ्या व्यक्तिमत्त्वाने भारावुन गेलोय आज.

ब्युटी विथ ब्रेन दॅट टुऽऽ विथ सच अ थंडरबोल्ट बॉडीलँगवेज,खर सांगु...माझा माझ्यावर कंट्रोल राहिला नसता आज…

म्हणुन एक नशा दडपायला दुसऱ्या नशेचा सहारा घेतला..

Please don't mind dear. But I cdnt control myself… 

सुखदा स्तिमित होऊन ऐकत होती फक्त…...

 

तेवढ्यात सुहासने कारच्या कप्प्यात हात घालुन एक पेनड्राईव्ह काढुन मोबाईलला कनेक्ट केले.

कदाचित त्याच्या आवडीची गाणी असावीत त्यात.

ते लावुन तो सुखदाला म्हणाला..

धिस इज फॉर यु सुखीऽऽ.

आय वॉन अ डेडीकेट धिस साँग फॉर यु…

जस्ट लिसन टु ईट…..

I hope you will understand what I feel for you..!!

 

गाण्याच्या ओळी अशा होत्या…….

 

A thousand miles between us 

                    now 

It causes me to wonder 

                    how 

Our love tonight remains so strong 

  It makes our risks right all along 

 

The time we spend apart will make       our love Grow stronger 

 

But it hurts so bad I can't take

it any longer 

 

I wanna grow old with you 

I wanna die lying in your arms 

 

I wanna grow old with you 

I wanna be looking in your eyes 

 

I wanna be there for you

Sharing everything in you do

 

I wanna grow old with you …..

 

वेस्टलाईफ आल्बमचे 'आय वॉन ग्रो ओल्ड विथ यु' हे भावपुर्ण गीत ऐकुन सुखदा सुहासकडे क्षणभर स्तिमित नजरेने बघतच राहीली.

तिला खरच कळत नव्हते कसे रिअॅक्ट व्हावे...

सुखदा - वॉव्हऽऽ! जस्ट अमेझिंग साँगऽऽ..!!

फुल ऑफ इमोशन्स..!!

हाऊ कॅन आय थँक यु सुहास..जस्ट स्पीचलेस..

त्यावर सुहास फक्त त्याच रोखलेल्या नजरेने किंचित स्माईल करत सुखदाकडे बघत राहिला...

सुहासच्या मनातल्या सर्व भावना जशाच्या तशा त्याच्या डोळ्यात उतरलेल्या ती बघत होती.

एकाचवेळी आर्जव आणि काहितरी हक्काची आग्रही मागणी मागणाऱ्या उत्कट भावभावना एकवटुन आल्या होत्या त्या भेदक नजरेत..

एका हाताने व्हिल संभाळत तिनेही आपल्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसल्या.

 

गाणी ऐकता ऐकताच घर कधी आले कळलेच नाही.

तिने हलकेच सुहासला त्याच्या जागी आणुन बसवले.तो अर्ध जागृतावस्थेत होता.ग्लानीतच होता.सुखदानेच त्याचे बुट,ओव्हरकोट काढुन त्याला बेडवर नीट झोपवले.

नंतर स्वत:चेही कपडे वगैरे बदलुन झोपेच्या आधीन झाली.

     ~~~~~~~~~~~~~~~~~

दिवस असेच जात होते.सुहास सुखदाचे नाते निश्चितच पहिल्यापेक्षा जास्त जवळचे झाले होते. तरीही सुहासने अजुनही सुखदाला पत्नी म्हणुन स्वीकारले नव्हते.

एकतर दोन्ही मुले सोबत असल्याने हवा तसा एकांत त्यांना मिळत नव्हता.आणि चुकुन कधी तशी संधी आलीच तरी सुहास अचानक मधेच स्वत:ला दूर करायचा.सुखदाची प्रचंड तगमग व्हायची.

हे नाते तन मन धनाने तिने जरी स्वीकारले असले तरी सुहासच्या मनात काय चालले होते हे मात्र कळत नव्हते.सुखदा पुन्हा एकदा त्याच अनुभवातुन जात होती ज्यामुळे तिचा भूतकाळ काळवंडला होता.आताही तिच पुनरावृत्ती..

सुखदा मनातुन स्वत:च्या नशिबाला दोष देत होती.

पुन्हा दुसरा विचार हा यायचा की हे लग्न करतानाही आपण आपल्या इच्छा आकांक्षांचा विचार केला नव्हता मग त्या पुर्ण झाल्या काय किंवा नाही झाल्या काय त्याचे एवढे मनाला का लावुन घ्यायचे??

अशाप्रकारे मनाची समजूत घातली तरी शरीर आकांत करत असे.जर मला त्या परमोच्च सुखाचा अनुभव द्यायचाच नव्हता तर मग ही प्रेमाची बतावणी तरी का केली सुहासने मला?

मी तर काही न मागता आहे तसे सगळे स्वीकारूनच ह्या नात्यात पाऊल ठेवले होते ना?मग का मला ह्या खोट्या आशा दाखवल्या ज्या कधी पुर्णच होणार नव्हत्या???

का…?? का …?? का…????

सुखदाचे मन टाहो फोडुन प्रश्न विचारायचे ज्याची उत्तरे मात्र कुणाजवळच नव्हती.

        ~~~~~~~~~~~~~~~

सुखदा आताशा सगळे कर्तव्य करायची वरवर हसुन रहात असली तरी आतुन तुटत चालली होती.

मनातली सल कुठे बोलायची सोय नव्हती.

काय सांगणार होती आणि कुणाला???

सगळ्यांना हेच माहित होते की हे तडजोडीवर अटी घालुन जुळलेले लग्न आहे मग आता ही तक्रार करायला तरी कुणाकडे जाणार???

 

सुहासला विचारावे असे खूपदा तिच्या मनात येई पण मग भांडण कटकटीतुन तो अबोला चीडचीड,धुसपूस..आणि मग घराची शांतता भंग पावणार.आपल्या क्षुल्लक इच्छेकरता सगळ्या घरादाराची शांतता बिघडवायचा काय हक्क आपल्याला..?? 

असे म्हणत ती तोंडापर्यंत येणारे शब्द पुन्हा घशात ढकलत असे.

त्यामुळे सुहास कधी प्रेमाने जवळ घेतला तरी आताशा तिला त्यात ती मजा येत नव्हती कारण ह्याचा शेवट काय आणि कुठे येऊन थांबणार हे तिला आधीच माहीत असल्याने तिच्यात तो अानंद उत्साह नसायचा.

काय कारण होते?

का वागत असेल सुहास असे?

प्रश्नांच्या गुंत्यात ती हरवुन जायची.

 

कॉलेज सुरू व्हायला आता फक्त आठवडा बाकी होता.तिची लिव्ह संपत आली होती.

कधी एकदा कॉलेज सुरू होतेय आणि मी स्वत:ला कामात जुंपुन घेतेय असे तिला झाले होते.

निदान ते चालु असते तर मन कुठेतरी अडकुन तरी राहीले असते पण सध्या मात्र तिची शारीरिक,मानसिक,वैचारिक चहुबाजुंनी फक्त आणि फक्त घुसमट होत होती.

 

नियतीने सुखाचे दान पदरात टाकलेय म्हणता म्हणता हा कोणता लपंडाव सुरू केला होता सुखदासोबत??

भावनांच्या अंधळ्या कोशिंबीरीचा हा फसवा खेळ नियती का खेळत असेल सुखदा सोबत…??

सुखदाला आता अजुन कोणत्या नविन नाट्याला सामोरे जावे लागणार होते?

काय होते विधात्याच्या मनात….!!!!!

----------------------(क्रमश:17)-----------------------------

क्रमश:17

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी,

सुखदा पुन्हा एकदा वर्तुळ पुर्ण करून त्याच बिंदुवर येऊन पोहोचलीय.

काय वाटते?काय वाढुन ठेवलेय नियतीने तिच्या पानात???

सुखदा कशी सामोरी जाईल ह्या प्रश्नांना….?

हे सगळे जाणुन घ्यायचे असेल तर पुढचा भाग वाचायलाच हवा ना..

आजचा भाग इतर भागांच्या तुलनेत जरा लहान ह्यासाठी झालाय की पुढच्या भागात वरील सर्व प्रश्नांची उकल होणार आहे.

आशा आहे वाचक वर्ग सुज्ञपणे ही बाब समजुन घेईल..

कसा वाटला आजचा भाग??

कमेंट्सद्वारे जरूर कळवा..

माझी कथा आवडल्यास शेअर करायला विसरू नका..आणि हो माझ्या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका..

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.माझी मुळीच हरकत नाही.)

धन्यवाद.

@राधिका.

 

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..