A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session965315ee058a371fc510a3de59fe87e825ed1c02482053a0cb94146d3dfcd92486a0791d): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi bhag 16
Oct 23, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग 16

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग 16

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-16

©®राधिका कुलकर्णी.

 

सुहासला आज ऑफीसला थोडे लेट जायचे होते.

कालपासुनचा हेक्टीक प्रवास.त्याला विश्रांतीची नितांत गरज होती.जीजाच्या अंगावर हात टाकुन तिला कुशीत घेऊन तो थोड्यावेळ

झोपला.अचानक फोनच्या मेसेजची रींगटोन वाजली.त्याने मेसेज चेक केला आणि तो काहीतरी आठवल्या सारखा ताडकन बेडवर उठुन बसला.

त्याच्या क्लोज कलिग कम मित्राच्या वेडींग अॅनिव्हर्सरी निमित्त त्याने त्याच्या फार्म हाऊसवर पार्टी ठेवली होती.फक्त काही निवडक क्लोज फॅमिलीजलाच बोलावले होते कारण ही पूल पार्टी होती.

सुहास आणि सुखदा न्यु वेडेड कपल म्हणुन त्यांना पार्टीचे गेस्ट ऑफ ऑनर केले होते.म्हणजेच दोघांनी कंपलसरी जायचेच होते त्याशिवाय स्विमिंग कॉश्चुम ही लागणार होता.ही कपल्स पार्टी होती.लहान मुले अलाऊड नव्हती.

हा विषय सुखदाला कसा सांगावा हाच प्रश्न होता.

त्याने हलकेच सुखदाला हाक मारली.

सुखदा कामात असावी.हात पुसतच ती बेडरूममधे आली.

सुखदा - काय रे, झोपला नाहीस?हाक मारलीस का मला?

काही हवेयऽऽऽऽ?

सुहास - अगंऽऽ एक सांगायचेच राहिले.मी पुर्ण विसरलो.

सुखदा - काय …सांग नाऽऽ? 

सुहास - अगं आज माझ्या कलिगची वेडींग अॅनिव्हर्सरी आहे आणि आपल्याला त्याच्या पार्टीचे गेस्ट ऑफ ऑनर केलेय because we are the newly wedded couple… 

सुखदा- बर मगऽ?

सुहास - अगं मग कायऽऽ.आपल्याला जावे लागणार आहे पार्टीला.

सुखदा - ओके..जाऊयात की.तेवढेच मुलांनाही चेंज.कुठेच गेलो नाही त्यांना घेऊन बरेच दिवसात.बिचारे बोअर झाले असतील नाऽऽ.

त्यावर सुहासला काय बोलावे कळेना…..

थोडा अडखळतच तो म्हणाला

सुहास- न….नाहीऽ…. मुलांना नाही नेता येणार.

सुखदा(आश्चर्यचकीत होऊन) - काऽऽऽ?

सुहास - अगंऽऽ कारण ती अडल्ट्स कपल पार्टी आहे. It's Adults pool party… 

वेस्टर्न ड्रेस कोड आहे.लेट नाईट पार्टी…

सुहासने हळूहळू विषय सुखदापूढे मांडला.

आता ती काय रीअॅक्ट होतेय हे बघणे बाकी होते.

वेस्टर्न ड्रेस कोड म्हणल्याबरोबर सुखदाचे तोंड आंबट झाले.गेल्या कित्येक वर्षात तिने वेस्टर्न आउटफिट्स घेतलेही नव्हते आणि घातलेही नव्हते.

प्रिन्स बरोबर डेटवर असताना त्याला आवडतात म्हणुन तीने खूप वेस्टर्न स्टाईल्स ट्राय केल्या होत्या.

पण नंतर कॉलेजमधे जॉब लागला तसा तिकडे फक्त साडी किंवा पंजाबी ड्रेस हे दोनच ड्रेस कोड अलाऊड असल्याने तिचे वस्टर्न घालणे जवळपास बंदच झाले.उरली सुरली कसर प्रिन्सशी काडीमोड झाल्यावर त्याच्या आठवणीचे काहीच नको म्हणुन सगळे स्कर्ट्स,मिनीज,वनपिस तिने एका मुलींच्या वसतीगृहात दान करून टाकले.तिच्या सगळ्या आवडी-निवडी,इच्छा,आकांक्षा ह्यांना पुर्ण तिलांजली देऊन ऐन तारूण्यात एका साध्वीचे जीवन जगत होती ती.

 गेल्या पाच सहा वर्ष तिने ह्यापैकी काहीच छानछौकीचे वापरले नव्हते त्यामुळे असण्याचा तर प्रश्नच नव्हता.

एकीकडे सुहासचा हिरमोड होईल वाटत होते तर दुसरीकडे तिला असल्या कार्पोरेट पार्टीजमधे काडीचाही रस नव्हता.

तिथे नुसता सगळा भपका आणि दिखावा जो तिला मुळीच रूचणारा नव्हता.त्यात सगळेच अपरिचित लोक.काय करणार आपण जाऊन तरी..?

जायला नाही म्हणावे का?असेही एक मन म्हणत होते.

तिच्या चेहऱ्यावर माजलेले असंख्य प्रश्नांचे जाळे बघुन सुहासने विचारले

सुहास - काय ग कसला इतका गहन विचार करते आहेस?

सुहासला काय उत्तर द्यावे हेच तिला कळत नव्हते.

सुखदा - असं कर तु एकटा जा.

आदिच्या टेस्ट्स सुरू आहेत ना.मला त्याचा अभ्यास पण घ्यायचाय.जीजालाही बघावे लागेल.

कसेही तुझ्या कलिग्जची पार्टी आहे तुला जावेच लागेल.मी तिकडे कोणालाच ओळखत नाही आणि मी अशा पार्टीज कधी अटेंडही केल्या नाहीत ह्या आधी.मला बोअर होईल रे तिकडे…

सुहास(तिच्याकडे निरखुन पहात)- तु तुझ्या नवऱ्याला ओळखतेस ना!!! तेवढे पुरे नाहिये का तुझ्यासाठी?

त्याच्या ह्या पॉईंटवर तिला काय बोलावे सुचेना.

सुखदा - अरे पणऽऽ आदिचा अभ्यास……?

तिने पुन्हा आदिची सबब पुढे दामटली.

सुहासला कळत होते की हा सांगितलेला मुद्दा काही तितकासा महत्त्वाचा नाहीये कारण काहीतरी वेगळेच आहे.त्याने काहीतरी विचार करून बेडवरून उठला.

सुहास(जरबेने)- हे बघ सुखदाऽऽऽ कार्पोरेट वर्ल्डचे काही प्रोटोकॉल्स असतात ते पाळायलाच लागतात.आणि हा माझा खूप खास दोस्त आहे शिवाय आम्ही सोबत काम पण करतो.आपल्याला ह्या पार्टीला जावेच लागणार आहे.त्याने आपल्याला इतका मोठा सन्मान दिलाय त्याच्या पार्टीत आणि मी एकटा गेलो तर ते किती वाईट दिसेल.वर सगळ्यांना चघळायला नविन विषय मिळेल तो वेगळाच.ते काही नाही तुला यायलाच लागेल.मी आता आवरून ऑफीसला जातोय.यायला लेट होईल तोपर्यंत तु आदिचा अभ्यास, जीजाला झोपवुन तयार रहा.मी आलो की आपण निघु साडे आठ नऊ पर्यंत.कसेही उद्या संडे आहे त्यामुळेच ही लेट नाईट पार्टी थ्रो केलीय त्याने.

वॉशरूममधे शिरता शिरता सुहासने एका दमात सुखदाला सगळे सांगुन अंघोळीला गेला.

ती तिकडेच विचार करत उभी राहिली.

आता कसे सांगू सुहासला माझ्याकडे एकही वेर्स्टन आऊटफिट नाहिये.ड्रेसकोड शिवाय पार्टीला कसे जाणार??

सुहास अंघोळीहुन परत आला तरी ती विचारात मग्न बेडवरच बसुन होती.

सुहासने तिच्याकडे बघितले.

सुहास - काय गंऽऽ अजुन काही राहिलेय का सांगायचे..?

कदाचित नविन वातावरण,नविन लोक त्यामुळे यायला घाबरतेय असे वाटुन सुहास बोलला.

सुहास(समजावणीच्या सुरात) - हे बघ सुखदा इतके टेंशन घेऊ नकोस ..बघ आत्ता इतकी विचार करतीएस नाऽ पण तुच पार्टी जास्त एनजॉय करशील..लग्न झाल्यापासुन असेही आपण दोघेच एकत्र कुठेतरी गेलोय का?? चल ना ह्यानिमित्त एकत्र थोडा टाईम स्पेंट करू..कायऽऽऽ पटतेय की नाही??

आपल्या ओल्या केसांतले पाणी तिच्या अंगावर उडवत त्याने विचारले.

ती सुहासचे सगळे ऐकुनही तंद्रीतच होती.थंड पाण्याचे तुषार अंगावर पडताच ती भानावर आली.

तिने सुहासकडे मान वळवुन बघितले.आता तिला आपली अडचण सांगणे भागच पडले कारण सुहास हट्टालाच पेटला होता.तसे त्याचेही चूक नव्हतेच.इतके दिवस हे नाते स्वीकारण्यात वेळ खर्ची झाला.आत्ता कुठे नात्याला एक नविन नाव रंग,रूप, ओळख मिळत असताना त्याचा असा हिरमोड करणे सुखदालाही पटत नव्हते.

शेवटी नाईलाजानेच तिने आपल्या मनातली अडचण बोलुन दाखवली.

सुखदा - होऽ पटतेय मला तुझे पण एक अडचण आहे..

सुहास(उत्सुकता आणि विस्मयाने) - आता कायऽऽऽ??

सुखदा - अरे माझ्याकडे पार्टीसाठी वेस्टर्न ड्रेसेस नाहीएत.मी वापरतच नाही तुला माहितीय नाऽऽ..

आत्ता कुठे सुहासची ट्यूब पेटली.ती का इतकी आढेवेढे घेतीय हे लक्षात आल्यावर त्याला पटकन काहीतरी आठवले आणि चुटकी वाजवतच तो म्हणाला

सुहास - That reminds me..माझ्या लक्षातुनच गेले बघ आपल्या सकाळच्या नादात...असे म्हणतच त्याने तिच्याकडे सुचकपणे डोळा मारला.त्याबरोबर तिलाही तो सगळा प्रसंग आठवुन लाजायला झाले.

तरी विषय बदलायचा म्हणुन तिने विचारले.

सुखदा- तु आत्ता काहीतरी सांगणार होतास नाऽऽ...सांग नाहीतर परत विसरशील..

सुहास - (कपाटातुन एक बॉक्स बाहेर काढत) अगं फ्लाईटला लेट होते म्हणुन तिथेच विंडो शॉपिंग करत असताना एक सुंदर ड्रेस दिसला.मला उगीचच वाटले की तुला तो खूप छान दिसेल म्हणुन माझ्या प्रेमाची पहिली आठवण भेट म्हणुन घेतला.पण तुला सांगायलाच विसरलो मी.

हा बॉक्स उघडून बघ आवडतोय का?

आणि साईज पण चेक कर.मी आपला अंदाजाने संपदाच्या साईजचा घेतला.बघ येतोय का,नाहीतर ब्रँडेड असल्याने तो इकडेही आपल्याला एक्सेंज करता येईल.जाताजाता चेंज करून पुढे जाऊ.

सुहासने बोलता बोलताच ऑफीससाठी तयार झाला आणि लगेच बाहेरही पडला.

त्याला बाय करून ती बेडरूममधे आली.बॉक्स उघडून बघितला. त्यात खूपच सुंदर आॅफ शोल्डर वनपिस होता. पाहुन तर न आवडायजोगा नव्हताच.संपदा आणि तिचे मापही जवळपास सारखेच होते परंतु बऱ्याच वर्षात वेस्टर्न आऊटफिट्स घातलेले नसल्याने कुठे आेंगळ तर नाही ना वाटणार हीच भीती होती तिला.तशी रेग्युलर डान्स क्लास आणि स्विमिंगमुळे तिची फिगर तिने व्यवस्थित मेंटेन केली होती तरीही तिला ह्या कपड्यात वावरणे जरा अनकम्फर्टेबल होईल का हिच चिंता सतावत होती.तिने साईज चेक केला.आरशात वळुन मागून पुढुन पोट कुठेही दिसत तर नाही ना चेक केले.तिला ड्रेस व्यवस्थित आला तसे चेहऱ्यावर एक छानसे स्माईल आले.तिने तो परत व्यवस्थित बॉक्समधे ठेवला आणि बाकीच्या कामात गुंतली.

आता संध्याकाळी जायचे म्हणल्यावर रात्रीची बरीच सारी कामे आत्ताच करून ठेवावी ह्या विचाराने ती एक एक काम उरकू लागली.मनात थोडी धाकधूकही होती.पहिल्यांदाच सुहास सोबत कुठेतरी बाहेर तेही अशा अवतारात वेणूमावशींना काय वाटेल ह्या विचाराने ती वरमली.

अजुन वेणूताईंना खबर लागलेली नव्हती की ह्यांच्या नात्याने एकमेकांना पती पत्नी म्हणुन स्वीकारलेय.मग असे सोबत गेले तर त्या काय विचार करतील???हा विचारही सुखदाच्या मनात डोकावला तसे तिने वेणूमावशींना संध्याकाळच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचे ठरवले.

ती हलकेच वेणूताईंच्या खोलीत गेली.

वेणुताई काहीतरी वाचत बसल्या होत्या.बाजुला जीजा खेळत होती आज्जीसोबत.

सुखदा - काय करताय मावशी?

सुखदा अशी काम नसताना आली की त्यांना अंदाज लागला की तिला नक्की काहीतरी बोलायचे असणार.

वेणूताई - काय गंऽ… काही बोलायचेय का?

सुखदा - (मनात शब्दांची जुळवणी करत) काही नाही….आज सुहासच्या एका ऑफीस कलिगच्या लग्नाचा वाढदिवस आहे.त्याची पार्टी आहे रात्री...अस सुहास म्हणत होता..

वेणूताईंना लगेच कळले ही पुढे काय म्हणणार.त्यांनाही तिची खोड काढायची लहर आली.त्या चेहऱ्यावर शक्य तितका गंभीर भाव आणत म्हणाल्या..

वेणूताई - अरे वाह् ...मग जा की सगळे मिळुन.असेही लग्नानंतर आदि/जीजाला घेऊन कुठे गेलाच नाही आहात.जाऊन या ..मस्त मजा करा हंऽऽ..

पुस्तकातली नजर न हटवताच त्या बोलल्या.आणि हळुच तिरक्या नजरेने सुखदाच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघुन मनाशीच हसल्या.

सुखदाला काय बोलावे हेच समजेना.

तरीही शब्दांची जुळवाजुळव करत ती बोलली.

सुखदा - अहोऽऽ मावशी तसे नाही.पार्टी फक्त मोठ्यांसाठीच आहे.मुलांना नाही नेता येणार.तसेही लेट नाईट पार्टी अाहे त्यामुळे मुलांच्या झोपेची वेळ होईल तोपर्यंत त्यामुळे त्यांना नेता आलेच नसते.

खरंतर मलाही मुलांना सोडून जावे वाटत नाहीये पण सुहासचा खूपच हट्ट चाललाय. त्या मित्राने आमच्या लग्नानिमित्त आम्हाला स्पेशल गेस्ट म्हणुन बोलावलेय तिकडे म्हणुन मग दोघांना जावे लागेल अस सुहास म्हणतोय….

सुखदा बोलुन थांबली.वेणूमावशींच्या प्रतिक्रियेची ती वाट पहात होती.

त्यावर वेणूताईही खट्याळ कटाक्ष टाकत म्हणाल्या.

वेणूमावशी -अस म्हणतोय काऽऽऽ सुहासऽऽऽ…!!!

बरं मग तु काय ठरवलेस ..जाणार आहेस की नाही??

वेणूताईंनी तिला चांगलेच कात्रीत पकडले होते.तिला कळत नव्हते आता काय उत्तर द्यावे…

तरी मग हिंम्मत करून म्हणाली…

सुखदा - म्हणजे आम्हालाच मेन गेस्ट केलेय तर एकटा सुहास गेलेला बरा नाही ना दिसणार?आणि मग लोकं उगीच चर्वण करत बसणार ….असेऽऽ सुहास म्हणालाऽऽ...म्हणुन आता नाईलाजाने का होईना मला जावेच लागणार आहे मावशी..

वेॆणूताई(गालातल्या गालात हसत)- अगंऽऽ मगऽऽ जा की..त्यात काय विचारायचे! तुम्ही मानत नसला तरी जगासाठी तर नवरा बायकोच आहात ना..सुहासचे बरोबरच आहे जगापुढे दाखवायला तरी तुम्हाला नॉर्मल नवरा बायको प्रमाणे वागावेच लागेल ...जा. माझी काही हरकत नाही.आणि मी बघेन मुलांना.तुम्ही आरामात जा आणि आरामात या..

सुखदा(थोडी चाचरत)- आणखी एक सांगायचे होते…

वेणूताई - बोल नाऽऽऽ..एवढा विचार का करतेस.बोल बिनधास्त..

सुखदा(घाबरतच) - काही न…..नाहीऽऽऽ.ते ..पार्टीचा ड्रेसकोड आहे.तिकडे साडी किंवा पंजाबी ड्रेस चालणार नाहीये…..

वेणूताई(खोटा गंभीर चेहेरा करून) - बरंऽऽ मग….?

सुखदा - सुहासने एक ड्रेस आणलाय जरा फॅशनेबल आहे..मी घातला तर चालेल का तुम्हाला..??

मनावरचे ओझे उतरल्यागत तिने एकदाचे विचारलेच.

वेणूताई - चालणार नाहीऽऽऽ…

सुखदा एेकुन आश्चर्यमिश्रीत प्रश्नांकीत नजरेने वेणूताईंकडे बघु लागली.तिची अवस्था इकडे आड तिकडे विहिर अशी झालेली.

वेणूमावशींची परवानगी नसताना घातला तर मावशी नाराज आणि न घातला तर सुहास..काय करावे ह्या विचारात चिंताक्रा्त चेहऱ्याने ती तिथेच उभी राहीली.

त्यावर वेणूताईंनी इतक्यावेळ पकडलेले सासुचे गंभीर बेअरींग सोडत जोरजोराने हसुन म्हणाल्या

वेणूताई - अगंऽऽऽ माझे वाक्य पुर्ण नाही केलेय मी अजुन..

चालेल का विचारलेस ना ...तर चालणार नाही..पळणार असे म्हणत होते मी..तर तु लगेच चेहरा पाडलास.

आता वेणूताईंनी तिला आपल्या जवळ बसवले.तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाल्या…

वेणूताई - बाळऽऽ सुखदाऽऽ तु जरी ह्या घरात सून म्हणुन आली असलीस ना तरी तु माझी दुसरी लेकच आहे.संपदालाही ह्या घरात कधीच कुठले बंधन नव्हते.फक्त नव्यासोबत आपले जुने संस्कार विसरू नयेत एवढेच मला वाटते.तुम्ही दोघीही खरच खूप गुणी मूली आहात हो..इतक्या शिकल्या,सवरलेल्या,नौकरी करणाऱ्या तरी घरातल्या कामातही हुशार.मोठ्यांचा आदर करणाऱ्या.खरच मी खूप भाग्यवान आहे मला इतक्या गोड लेकी दिल्या देवाने.

बोलता बोलता भावूक झाल्या वेणूताई.पण लगेच स्वत:ला सावरत पदरानेच डोळे टिपत सुखदाला म्हणाल्या

वेणूताई (डोळ मिचकावत किंचित मिश्किल हसत)- आता तुला म्हणुन सांगते..सिक्रेट आहे हंऽऽ, आई लेकीतले..कुणाला बोलु नकोस कुठे.सुहासलाही माहित नाही.

सुखदा आता विस्फारलेल्या डोळ्यांनी वेणूताईंकडे बघत त्या काय सांगतात हे एेकायला कान टवकारून बसली.

वेणूताई - माझे नविन लग्न झाले ना तेव्हा सुहासचे वडिल म्हणजे तुझे सासरे एक पिक्चर बघुन आले.त्यात हिरॉईनने एक गाऊन घातला तसा तुही घाल म्हणुन मागेच लागले माझ्या.तेव्हा घरात सासू सासरे,आज्जे सासूबाई,भरलेले घर.आतासारखी वेगळी खोली नसायची.फक्त रात्री झोपण्यापुरते त्या खोलीत एकत्र यायचो.बाकी वेळी 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी परिस्थिती.तिन दिवस तुझे सासरे फूगा होऊन बसलेले.

शेवटी एका रात्री त्यांना तसा गाऊन घालुन दाखवला तेव्हा कुठे स्वारी पुन्हा खुषीत आली.त्याच्या नंतरच सुहासचा जन्म झाला.अगदी बापावर गेलाय पोरंऽऽऽ….

वेणूताईंनी हसत हसत सुखदाच्या मनानरचे ओझे रिकामे केले.

आज तिला मावशी एका नव्या रूपात पहायला मिळत होत्या.एका नव्या मैत्रीच्या नात्याने पुन्हा समोर येत होत्या. काळ कुठलाही असो पती पत्नीच्या नात्यात रंग तेच असतात.काळानुसार रूप बदलत असेल कदाचित.

कितीतरी दिवसांनी आज मावशींबरोबर असा मनमोकळा प्रेमळ संवाद घडला होता.

आज पुन्हा एकदा तिला स्वत:च्याच भाग्याचा हेवा वाटला.डोळ्यातले काजळ हलकेच तिने कानामागे लावत प्रार्थना केली ह्या भाग्याला कोणाची दृष्ट न लागो देवाऽऽ…

     ~~~~~~~~~~~~~~~~~

संध्याकाळ उलटून गेली होती.सुखदा आदिचा अभ्यास घेताघेताच जीजालाही जेवू घालत होती.जीजा जेवण झाल्यावर तासभर इकडे तिकडे हुंदडल्याशिवाय झोपत नसे.त्यामुळे आज तिचे जेवण लवकर उरकले तिने.आदिचा होमवर्क आणि युनिट टेस्टच्या पेपरचा अभ्यास उरकुन त्यालाही ताट वाढले.

त्या दोघांची जेवणे उरकले म्हणजे ती निश्चिंत आणि वेणूताई पण.नाहीतर त्यांच्या मागे मागे फिरत जेवू घालणे म्हणजे एक दिव्यच असायचे.अशात वेणूताईंचे गुडघेदुखीही वाढली होती.त्यामुळे मुलांचा भार त्यांच्यावर कमीतकमी पडेल ह्याची पुर्ण काळजी घेई सुखदा..

मुलांची निजानिज चाललेली तेवढ्यात सुहासचा मेसेज आला..

सुहासचा मेसेज- Reaching home in half an hour.. Be ready.. Bye.. See you soon..! 

तो वाचला आणि तिची धडधड पुन्हा वाढली..

ड्रेस घातल्यावर मला पाहुन सुहासची काय रिअॅक्शन असेल?

मला कॅरी करता येईल ना ड्रेस?

त्याला मी ह्या आऊटफिटमधे आवडेल नाऽऽ.?

कशी दिसेन मीऽऽ…?

बरी तर दिसेल ना..!!!नाहीतर चार चौघात उगीच हसं नको व्हायला सुहासचं..

एक ना अनेक विचारांनी सुखदाच्या मेंदुला पोखरायला सुरवात केली.

स्वत:च्या विचारांना सावरतच ती खोलीत गेली.

 तिने अगोदर मस्त शॉवर घेतला.सुहासने आणलेला तो आॅफ शोल्डर ब्लॅक फ्लोरल वनपिस तिने घातला.त्याच्यावरच्या लाईट पिंक कलरची फ्लोरल डिजाईनमुळे तो खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होता.

तिने हलकासा ड्रेसला साजेसा मेकअप केला.लग्नानंतर आज पहिल्यांदाच तिने मेकअप कीट हातात घेतले होते.

छानसे ड्रेसला मॅचिंग अक्सेसरीज घालुन ओठांना लिपस्टीकचा शेवटचा हात फिरवला.

केसी रेंजचे तिचे फेव्हरीट इटरनिटी परफ्युम अंगावर स्प्रे करताच तिच्यासकट सगळी खोली सुवासिक झाली.त्या मनमोहक सुगंधाने तिला एकदम फ्रेश वाटायला लागले.

स्वत:ला एकवार आरशात बघत केसांवर ब्रश फिरवत असतानाच सुहास बेडरूममधे आला.

तिला त्या ड्रेसमधे पाहुन तो पुरता घायाळ झाला.

आॅफ शोल्डर वनपिसमधे ती काटाऽऽ दिसत होती.

सुहासच्या ह्रदयाची धडधड अचानक वाढली.

तो दारातुन एकटक तिला न्याहाळु लागला. सुहास आल्याची जाणीवही नसलेली सुखदा अचानक वळली आणि दारात सुहासशी नजरानजर झाली.त्याला पाहताच तिने उत्साहात विचारले.

सुखदा - कशी दिसतेय मी? म्हणजे ड्रेस बरा दिसतोय ना अंगावर?

तिने अतिशय निरागसपणे विचारले.

सुहास - कशी दिसतेय??

आज पार्टीला जायचेय म्हणुन नाहीतर …..तुझे काही खरे नव्हते.

त्यावर सुखदा अधिकच लाजली.

सुखदा- चलऽऽ काहितरीच तुझे..!!

सांग ना कशी दिसतेय?

तिने पुन्हा विचारले.

त्यावर अतिशय निर्विकार चेहऱ्याने

सुहास - थांब जरा मी मित्राला फोन करून कळवतो एक्स्ट्रा पाण्याचा स्टॉक रेडी ठेव..

सुखदा(निरागसपणे)- ते कशाला?

सुहास(खट्याळ स्वरात) - अगंऽऽ कशाला काय आता तु अशी आग लावत फिरणार मग स्वमिंग पूलचे पाणी वाफ होऊन हवा नाही होणार का..?

त्याच्या ह्या विनोदावर ती पुन्हा लाजली.

सुखदा - चल चावट कुठचा...उगीच मस्करी नको करूस..आणि आता उशीर नाही होत का? चल आवर पटकन..

सुहास(तिला पाठीमागून मिठी मारत) - जावेसेच वाटत नाहीये गंऽऽऽ.अस वाटत असचं ह्या शेकोटीच्या उबेत रात्रभर बसुन रहावे.दिवस कधी ऊगवुच नये आणि रात्रही संपूच नये…

You looking  sooooo hot and sexy…!! 

सुखदा आता लाजुन चूर चूर झाली.गालांवर कोणीतरी गुलाब चुरडल्यागत ते गुलाबी झाले होते.

शेवटी स्वत:ला सुहासच्या मिठीतुन सोडवत तिने जवळजवळ ढकलतच त्याला वॉशरूममधे पिटाळले.

सुहासही पटकन तयार होऊन आला.

सगळ्यांना बाय करत ती गाडीत येऊन बसली.

आदिने गेटमधे येऊन बाय सुखाई म्हणत तिला गोड निरोप दिला.

कधी कधी सुहासला प्रश्न पडायचा हि मुले खरच माझी आहेत की सुखदाची इतकं त्यांचे एकमेकांवर प्रेम होते.

जराशा थट्टेतच सुहास म्हणाला

सुहास - निघायचं सुखाईऽऽऽ…?

त्यावर लटक्या रागाने सुखदा म्हणाली..

सुखदा - एऽऽऽ सुखाई काय रेऽऽ...मी फक्त आदि आणि जीजाची सुखाई आहे, कळल नाऽऽ..

सुहास(मस्करीत) - अच्छाऽऽऽ!!!? मग माझी कोण आहेस?

सुखदा(लाजुन) - मला नाही माहित..तु पुढे बघुन गाडी चालव नाहीतर अॅक्सिडेंट होईल..

सुहास(डोळा मिचकावुन) - तो तर कधीच झालाय गंऽऽ.अजुन सावरलो नाहीये त्यातुन.दिल पुर्जा पुर्जा हो गया है।

सुखदा(लाजत पण खोटं खोटं चिडुन) - सुहासऽऽ आता फाजीलपणा पुरे कर आणि गाडी चालव नीट.

सुहास..बरं जशी आज्ञा राणीसरकार…!

असे सगळे संवाद करत एकदाचे ते डेस्टीनेशनला पोहोचले.

गाडी पार्कीग बॉय कडे सोपवत सुहास आणि सुखदा बाहेर आले.

सुहास हळुच सुखदाच्या कानाशी येऊन म्हणाला

सुहास- आज तिकडे सगळ्यांची सुट्टी करणार बघ तु..

काहीशा आश्चर्यातच सुखदाने विचारले- म्हणजे?

सुहास - ते तुला आत गेल्यावर कळेलच.

सुखदा - चल आताऽऽ..

ते दोघे जातच होते की होस्ट मित्र सचिनने पुढे येऊन दाेघांचे स्वागत केले.दोघा नवरा बायकोंनी मिळुन सुखदाची बाकी जोडप्यांशी ओळख करून दिली.

सुहासचे म्हणणे आत्ता कुठे सुखदाच्या टाळक्यात घुसले.

तिथे सगळ्या पेज थ्री लेडीज भडक मेकअप आणि अंगाबांध्याचा कुठलाही पत्ता नसलेल्या धान्याच्या गोण्यांसारख्या हायप्रोफाईल बायका उगीचच फॉर्मल हसुन बोलत होत्या.उगीच दिखावुपणा करत धेडगुजरी इंग्लिश झाडत सुखदाला असे दाखवायचा प्रयत्न करत होत्या की आम्ही कशा वेल कल्चर्ड एज्युकेटेड आहोत.ते सगळे पाहुन सुखदा स्वत:शीच हसली.

जे ज्यांच्याजवळ नसते ते असल्याचे दाखवण्याचा अट्टाहास लोक करतात.नसलेली अक्कल,हुशारी,पैसा,पद किंवा प्रतिष्ठा ह्याचा उगीच खोटा दिखावा करत असतात ही मंडळी.

त्यातलीच काही इकडेही ती बघत होती.त्यांची वेव्हलेंथ सुखदाशी मॅच होऊच शकत नव्हती हेच कारण होते की ती फारशी कोणात मिसळु शकली नाही.जुजबी औपचारिक ओळख करून ती तिकडुन सटकली.

फार्म हाऊसच्या इतर डेकोरेशन आणि विविध रंगी प्लांट्सची रंगसंगती त्यांची नीटनेटकी मांडणी हे पहात ती टाईमपास करत होती.

सुहास त्याच्या मित्रांच्या गराड्यात अडकला होता.

इतक्यात सुहासचा एका मित्र (बहुतेक जास्त झाली होती त्याला) सुहासशी बोलताना आणि सुखदा तिथुन पास होताना एकच गाठ पडली.तो जे बोलला ते वाक्य ऐकुन सुखदा उदास होऊन एका कोपऱ्यात जाऊन उभी राहीली.

ते वाक्य असे होते….

सुहासचा मित्र - यारऽऽ सुहास कॉनग्रॅच्युलेशन्सऽऽऽ!!!!

तेरी तो लॉटरी निकल आयी।व्हेरी लकी हंऽ!!

एक से बढकर एक बिवी मिली है।उपरसे कमाल की कातिल।

नही तो हमारे नसिब देखो।

एक ही दो के बराबर फुल गयी है।

साला रात का मजा ही निकल गया है।

आजकल सब काम इमॅजिनेशनसे हो रहा है।

असे म्हणत आपल्याच पाच्कळ चिप विनोदावर गडगडाटी हसला.

सुहासची नजर त्यावेळी तिकडुन चाललेल्या सुखदावर पडली तसा तो चपापला.

ती दूर एकटीच एका कठड्याला टेकुन बसली होती.चेहरा उदास झालेला.

सुहास धावतच तिच्यापर्यंत पोहोचला.

सुहास - हेऽऽ इकडे काय करतीएस एकटीच?

सुखदा(निर्विकारपणे) - काही नाही असेच…. तु जा नाऽऽ..तुझ्या मित्रांबरोबर एनजॉय कर..

सुहासला सुखदाचे डोळे हलकेच पाणावल्यासारखे वाटले.

तो तिच्या जवळ येऊन 

सुहास(समजुत काढत) - हेऽ बघऽ सुखदाऽऽ, तु त्या मित्राचे बोलणे मनावर घेऊ नकोस.अगंऽऽ तो ड्रंक आहे आणि त्याला बोलण्याचा सेन्सच नाहीये.तो असाच सुटतो पीला की म्हणुन तसा बोलला तो.

आय नो  यु आर हर्ट.त्याने असे बोलायला नको होते,पण मी त्याला गप्प केलेय आणि बाकीच्यांनी  पण त्याला समज दिलीय.

तु प्लिज तुझा मुड स्पॉईल नको ना करूस.चल ना तिकडे सगळ्यांसोबत मिक्सअप हो.अशी एकटी उदास तुला बघवत नाहीये मला..आणि मी सॉरी बोलतो हवे तर..पण प्लिज तु मुड बदल..

सुहास कळकळीने विनंती करत होता.

त्याचा मुड आपल्यामुळे खराब होऊ नये म्हणुन ती हसुन पुन्हा सगळ्यात सामील झाली.

सगळ्या बायका आपापसात कुजबुजत गॉसिप्स करत होत्या.कोणी नवी दिसली की ते तिलाच गिनिपीग करून तिच्या दिसण्या बोलण्यापासुन हर गोष्टीचे गॉसिप्स करत असत.आज त्यांची गिनिपीग सुखदा होती.

" नुसतीच दिसायला चांगलीय.वेस्टर्न कपडे घातल्याने कोणी काही मॉडर्न होत नाही..बघ नाऽ आल्यापासुन एक शब्द तरी बोलतेय का??

कदाचित सुहासने मुलांसाठी कॉम्प्रमाईज करून दिसायला सुंदर अडाणी गंगू पकडुन आणलीय असे वाटतेय.

तिला इंग्रजीचा 'इ' पण येत नसणार  अॅम डॅम शुअर म्हणुन आपल्यातुन दूर दूर पळतेय बघ.

 

हा सर्व वरील संवाद कुजबुजत्या पण तिला ऐकु जाईल ह्या स्वरात चाललेला. ती मनाशीच हसली.

तेवढ्यात सुहासचा जवळचा होस्ट मित्र सचिन तिच्याजवळ आला.

तो सवयीने तिच्याशी इंग्रजीमधे संवाद साधू लागला.सगळ्यांनी कान त्या दिशेनी टवकारले.आता काहीतरी मस्त फजिती बघायला मिळणार ह्या अविर्भावात दाखवत नसल्या तरी त्यांच्या नजरा त्या दोघांवरच केंद्रीत झालेल्या. 

सचिन - Hey..Sukhada  Hi….! 

am sachin party host.

Are you comfortable here? 

तिला ही आयतीच संधी मिळाली.तिच्यातली खट्याळ पण जशास तसे उत्तर देणारी हजरजवाबी सुखदा जागी झाली.

तिने अतिशय अस्खलित इंग्रजीमधे सगळ्या धान्यांच्या पोत्यांना ऐकु जाईल इतपत आवाज ठेवुन त्याला उत्तर दिले.

सुखदा. -Hello Sachin.Nice to meet you.Am absolutely fine and enjoying the party.. 

By the way venue is really beautiful and amazing decoration.

Classic ambience.

I must appreciate your aesthetic sense..Really wonderful..!!! 

सचिन- yeah….Thank you so much for this lovely compliment.Please be comfortable,enjoy the party &

have fun.. 

सुखदा - yeah. Sure.. Thnx 

तिच्याशी बोलुन सुहासचा मित्र वळला तसा सुखदाने एक तिरपा कटाक्ष सगळ्या धान्यांच्या पोत्यावर टाकला.त्यांची बोलतीच बंद झाली होती.तिने त्यांना चांगलेच नाकावर आपटवले होते.त्यांची ती सपटलेली अवस्था बघुन सुखदा मनाशीच हसली.

इतक्यात पुल गेम्सची अनाऊंसमेंट झाली.

सगळ्या कपल्सना स्विमिंग काश्चुम घालुन पाण्यात उतरायचे होते.प्रत्येकाने आपापले कॉश्चुम चढवले आणि पाण्यात उतरले.

सुखदा जेव्हा कॉश्चुम घालुन यायला लागली सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या.एखाद्या जलपरीसारखी दिसत होती ती.

तिची ती कितीलाना चाल आणि परफेक्ट फिगर स्विमिंग कॉश्चुममधे जास्तच उठुन दिसत होती.

तिच्या त्या जाळलावू रूपाकडे सुहास एकटक बघत राहीला. सुहासचीच ही अवस्था तर बाकीच्यांची काय गोष्ट.

सगळे पाण्यात उतरले.पुलच्या जवळच बार अरेंज केलेला होता.वेगवेगळे कॉकटेल्स मॉकटेल्स,वाईन,व्होडका ब्रीझर लेडीजसाठी स्पेशली अरेंज केले होते.पाण्यातच ड्रींक्स सर्व्ह होत होते.

सुहास हळुच तिच्या जवळ येऊन म्हणाला

सुहास - आज मी थोडे हार्ड ड्रिंक घेणार आहे हंऽऽऽ..!

सुखदा -घे तु पण लिमिटमधे घे.जास्त नको होऊ देऊस.

सुहास - यस डार्लिंग डोन्ट वरी.

मी माझ्या कोट्याच्या वर घेत नाही.पण ऐक इकडे सगळे तुलाही आग्रह करतील नाही म्हणु नकोस..

सुखदा - एऽऽ नाही हंऽ मी कधी घेत नाही पब्लिक प्लेसेस मधे यु नो इट..

सपुताई बरोबर कधीतरी एखादवेळी वाईन घेतली होती..पण असे बाहेर तर नाहीच नाही.आणि तु घेतल्यावर निदान मी तरी शुद्धीत नको का?नाहीतर ड्रायव्हींग कोण करेल मग??

सुहास - अगंऽऽऽ तेच सांगतोय.तुला आग्रह करतील तर तु नाही म्हणु नकोस.मी तुझे स्पेशल कॉकटेल आणतो सांगुन अॅपी ज्युस आणेन.तु ते घे सगळ्यांबरोबर कंपनी म्हणुन..

त्यावर तिने हसुन होकार दिला.

तिकडे पुल गेम्स सुरू झाले.आधी बॉल पासिंग गेम झाला.मग वॉटर व्हॉलीबॉल झाला.सगळे उडी मारून बॉल पास करताना पडत काय होते धडपडत काय होते.पण मजा येत होती.

पाण्यात वॉटर बॉटल टाकुन ती शोधायचा गेम झाला.

आता रेस लावायचा गेम अनाऊंस झाला.बॅक ग्राऊंडला मस्त इंग्लिश गाण्यांची धुन वाजत होती.

When Marimba rhythm start  

                  to play 

Dance with me,make me 

                 sway

Like a lazy ocean hugs the 

               Shore

Hold me close, sway me more….. 

 

म्युझिक चालू असताना पूलचे हे टोक ते ते टोक जो सगळ्यात आधी गाठेल त्याला प्राईज पण ठेवले होते.

ते पाणी खरेतर फक्त तीन ते चार फिट कमरे इतकेच होते.त्यात चॅलेंजिंग असे काहीच नव्हते.त्यात सुखदा रेग्युलर प्रॅक्टीशनर असल्याने तिला सहा फूट पाण्याचीही सवय हाेती.

तिच्या ह्या टॅलेंट बद्दलही अजुन कुणाला माहीत नव्हते.सुहासने तिकडुनच सुचक डाेळा मारला.त्याला माहीत होते हे प्राईज सुखदाच जिॆंकणार.

एक एक नको नको करत कुणी पोहत तर कुणी सरळपणे पाण्यात चालत जाऊन दोन्ही एंडला टच करत कसबसे येत होते.पुरूषांमधे काहीजण चांगले पोहु शकत होते त्यात सुहासही होता.पण बायकांमधे त्यांचे अवाढव्य देह सावरत पडत धडपडत त्या कशाबशा भोज्जा करत होत्या.आता शेवटी सुखदाची टर्न आली.

बायकांना मगाशी झालेला अपमान इकडे भरून निघेल अशी आशा वाटु लागली.आता ही पण कशी पाण्यात धडपडते हे बघण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट होता.

म्युझिक ऑन झाल्याबरोबर सुखदाने पाण्यात मासोळी सारखी सुळकी मारली.फ्रीस्टाईल स्ट्रोक मारत ती काही सेकंदातच ते इवलेसे अंतर पार करत पुन्हा दुसऱ्या टोकाला आली.तिचे ते पोहतानाचे दृष्य थक्क करणारे होते.सगळ्यांची बोलतीच बंद झाली.

सगळ्यांनी टाळ्या वाजवुन तिचे कौतुक केले.मग सगळ्यांनी तिला व सुहासला एकत्र पुल डान्सची विनंती केली.आता सुहासही तिला जॉईन झाला.

पुलमधे दोघांनी वेगवेगळे स्ट्रोक्स कधी फ्रंट क्रॉल,तर कधी बॅक स्ट्रोक.मधेच फ्रीस्टाईल तर कधी बटरफ्लाय स्ट्रोक दाखवत सगळ्यांचे भरपूर मनोरंजन केले.बटरफ्लाय स्ट्रोक करत दोघेही तिन फिटमधुन सहा फूट लेव्हलमधे गेले.आता ते थोड्या दूर अंतरावर होते.सुहासला पाण्यातही तिचा स्पर्श होताच वीजेचा लोळ उठत होता अंगातुन.त्यात रेड लेबलची हलकीशी बसलेली किक त्याचा स्वत:वर ताबा राहणे अवघड झाले होते.त्याच्या नशील्या डोळ्यांनी सुहासने एक मिनिटाकरता तिच्या डोळ्यात डोळे घालुन बघितले आणि पाण्यातच तिला कमरेमधे घट्ट पकडुन एक पॅशनेट कीस घेतला.

त्याची पाठ असल्याने पाहण्याऱ्यांना कळलेही नाही पण त्या थंड पाण्यातही सुखदाच्या अंगातुन वीज गेली त्या स्पर्शाने.कोणी पाहिले तर ह्या भीतीने तिने त्याला तसेच पाण्यात ढकलुन एक स्माईल फेकत सुळकांडी मारत काठाच्या दुसऱ्या टोकावर आली.

सुहासही तिच्या पाठोपाठ पाण्याबाहेर आला. 

दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत होता.

आता पुल गेम संपले तसे सगळेच चेंज करून पुन्हा पहिल्या वेषात आले.

सगळ्यांसाठी एक चिठ्ठी गेम ठेवण्यात आला होता.एका बाऊलमधे खूप साऱ्या चिठ्ठ्या होत्या.चिठ्ठीत जे नाव येईल ती गोष्ट करून दाखवायची असा तो खेळ .

कुणाला जोक सांगणे आले,कुणाला सिंगिंग तर कुणाला डान्स.सुखदाला लकीली डान्सची चिठ्ठी आली.

ही इकडेही भाव खाऊन जाणार हे सुहासला माहित होते.कारण ती क्लासिकल शिकते हे त्याला सोडुन तिकडे कुणालाच माहित नव्हते.

ती स्टेजवर गेली.आपल्या वनपिसला गुडघ्यापर्यंत वर घेऊन व्यवस्थित टायअप केले.(आतमधे तिने स्कीनकलर टाईट्स घातले होते.)

सुरवातीला कथ्थकच्या बेसिक स्टेप्स दाखवुन नंतर त्यात वेस्टर्न बॅले डान्सचे अप्रतिम फ्युजन दाखवत नितांत सुंदर कथ्थक/बॅले फ्युजन दाखवुन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.

सुहासला ती डान्स शिकते हे माहीत होते पण तिचा डान्स प्रत्यक्षात बघण्याची ही पहिलीच वेळ होती.ती कमालीची ग्रेसफुल दिसत होती डान्स करताना.

सुहास तर भान हरपुन तिच्या ह्या रूपाकडे अनिमिश नेत्रांनी बघत राहीला..

तिच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी छुपे पैलू आज उलगडताना दिसत होते सुहासला.आज स्वत:ला काबुत ठेवण्याकरता सुहासने नेहमीपेक्षा दोन पेग जास्तच रीचवले.तरीही म्हणावी अशी नशा चढत नव्हती..का…?

कदाचित त्याहुन स्ट्राँग जीतीजागती नशा त्याच्या अवती भोवती वावरत होती म्हणुन….?!!!!

ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हते त्याच्याजवळ..

डान्स संपला तरी दोन मि. संपुर्ण शांतता.

मग जाग आल्यासारखे सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे कौतुक झाले.

येताना जिची फक्त सुहासची बायको एवढीच ओळख होती ती सुखदा निघेपर्यंत प्रत्येकाच्या तोंडावर होती.प्रत्येकाच्या तोंडी फक्त सुखदाचेच नाव होते.

हे सांगण्याची गरज नाही की त्यादिवशीची सर्व प्राईजेस सुखदाच्याच ओट्यात पडली.

आली तेव्हा तिला हिणवणारी सर्व धान्यांची पोती आता तिच्याभोवती गराडा घालुन ऊभी होती.हा सर्व नजारा दुरून न्याहळत सुहास रेड लेबलचे पेगवर पेग रीचवत होता.स्वत:ला काबुत ठेवण्यासाठी आज पहिल्यांदाच तो नशेचा सहारा घेत होता.

पार्टी संपली तरी सुहासच्या डोक्यातले सुखदा ह्या विषयाचे गारूड संपले नव्हते.

त्याच्या ओठावर पदोपदी क्षणोक्षणी फक्त एकच नाव रूंजी घालत होते.

सुखदा…..!सुखदा….!! आणि...सुखदा….!!!!

~~~~~~~~~~~~~(क्रमश:16)~~~~~~~~~~~~~~~~~~

क्रमश:16

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार मंडळी,

आजच्या भागात बरेच इंग्रजी शब्द वापरले गेलेत कारण ती ह्या भागाची गरज होती.

काही शब्दांनी तर आपल्या बोली भाषेतही सहज स्थान मिळवलेय.जसे की फॅन,रूम,वॉशरूम,किचन,डायनिंग टेबल इ.इ.त्यामुळे हे शब्द लिखाणात आले तर त्याचा बाऊ केला जाऊ नये.

हल्लीच्या कार्पोरेट युगात लोक बरेचदा इंग्रजीत बोलताना आढळतात आणि आजची पार्टीही तशाच समुहाची दाखवली असल्याने हे शब्द वापरणे अपरिहार्य होते.

आशा आहे की ही गोष्ट वाचक समजुन घेतील.

आजचा भाग कसा वाटला? हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा.जर माझी कथा आवडली तर माझ्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा कुठेही शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..