फिरूनी नवी जन्मेन मी भाग-15

लग्नानंतर फुललेल्या नात्याची सुंदर नवी पहाट म्हणजे फिरूनी नवी... ...कथा.

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-15

©®राधिका कुलकर्णी.

सुखदा प्रचंड अस्वस्थ,बेचैन होती.तिला मुळीच करमत नव्हते.सततची चिंता कसा असेल सुहास?काय करतोय.?

तिन दिवस झाले पण एक मेसेज नाही की फोन नाही.असे कसे बेजवाबदार वागणे.घरी कोणी आपली काळजी करत असेल इतकेही समजु नये का ह्याला...असा काय हा??

      ~~~~~~~~~~~~~~~~

आठवड्याभरातच सुहासची तब्येत ठणठणीत बरी झाली तसे त्याने ऑफीसही जॉईन केले.गेल्या आठवडाभर आजारपणामुळे तो सक्तीची विश्रांती घेत घरीच होता.

त्याच कालावधीत त्याची सेवा करताना,त्याची कामे करताना नकळत सुखदाला सुहासची खूपच सवय होऊन गेली होती.

सुहासचीही काही वेगळी अवस्था नव्हती.

पण मनात निर्माण झालेले असंख्य प्रश्न आणि त्याच्या उत्तरांचा शोध त्याला घराच्या चार भिंतीं भेदून बाहेर पडण्यास उद्युक्त करत होते.

एखादी वस्तु जशी खूप जवळ असेल तर नीट दिसत नाही तेव्हा तिला नजरेपासुन काही अंतरावरून बघितले की ती स्पष्ट दिसते तसेच सुहासच्या बाबतीतही होते.त्याला त्या विशिष्ट अंतरावरूनच गोष्टी जोखणे गरजेचे वाटत होते.

घरात नजरेच्या अगदी जवळ राहुन त्याला त्याची उत्तरे मिळणार नव्हती;उलट तो अधिकाधिक कनफ्युज्ड स्टेटमधे गेला असता.

म्हणुनच स्वत:लाच जोखण्यासाठी सुखदापासुन दूर  जाण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला.

निमित्त होते कॉन्फरन्स मिटींग.ते प्रपोजल त्याच्यासमोर मागच्याच महिन्यात आले होते पण घरात लग्नाची गडबड म्हणुन तो त्याला अव्हॉईड करत आला होता.

परंतु ज्या दिवशी तो विचित्र प्रसंग घडला आणि मग मनात जी असंख्य प्रश्नांची माला फेर धरून नाचु लागली..त्याची उत्तरे शोधण्यासाठी त्याला ह्या मिटींगचाच एकमेव पर्याय दृष्टीस दिसला.तात्काळ वेळ न दवडता त्याने घाईतच एक मेल टाईप केला.त्याच्या मेलला लगेच अप्रुव्हल पण मिळाले बॉसचे.

नंतर ज्याप्रकारे त्यांच्यात सुलह घडला ते पाहता तिला सांगुन जाण्याचा मार्ग त्याला रिस्की वाटला कारण ही गोष्ट घरात कळली तर त्याच्या तब्येतीमुळे त्याला हा पर्याय निवडायला कदाचित आडकाठी झाली असती आणि घरात राहुन त्याला त्याच्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली नसती म्हणुन तुर्तास हा प्लॅन त्याने कुणालाच सांगायचा नाही असे मनोमन पक्के केले.

त्याप्रमाणेच त्याने सगळी पावले उचलत ऑफीसमधुनच तो डायरेक्ट एअरपोर्टवर गेला.

ऑफीसच्या मिटींग्ज कधीही होऊ शकतात म्हणुन त्याची एक बॅग नेहमी पॅक्ड असायची तिच शिताफीने त्याने रात्रीच कारबूटमधे ठेवली.

सकाळी नेहेमीप्रमाणेच ऑफीसला गेला.

यायची वेळ उलटून गेली तरी सुहास अजुन का आला नाही म्हणुन काळजीने सुखदाने फोन लावला तर त्याचा फोन नॉट रीचेबल.

तिला कसल्यातरी विचारात पाहुन वेणूताईंनी विचारले

वेणूताई- काय गं,काय झाले,कसला एवढा विचार??

सुखदा(काळजीयुक्त चेहऱ्याने)- सुहास कसा आला नाही अजुन?रोज तर ह्या वेळपर्यंत घरी येतो ना तो म्हणुन चिंता वाटतेय.

वेणूताई- अगं ट्रॅफीक लागला असेल.येईल.एवढी का चिंता करतेस?

सुखदा - अहोऽऽऽ मावशी त्याचा फोनही नॉट रीचेबल येतोय म्हणुन काळजी वाटतेय.

वेणूताई- अगं मग मेसेजेस चेक केलेस का?

बघ एखादा मेसेज केला असेल त्याने.

आत्ता कुठे सुखदाला सुचले.खरच की आपण मेसेजेस चेकच नाही केले..

तिने जाऊन मेसेजेस चेक केले तेव्हा त्यात एक त्रोटक मेसेज होता.

सुहासचा मेसेज-

Going to Bangalore for an Urgent meeting..Wl ping after reaching. 

Tc. Bye.. 

बासऽऽ इतकाच मेसेज?

मिटींग किती दिवस,कधी परत येणार काही काही उल्लेख नाही.

सुखदा धावतच वेणूताईंकडे पोहोचली.

सुखदा- मावशी,ऐकताय का..सुहास मिटींगसाठी बेंगलोरला गेलाय म्हणे.त्याचा मेसेज आलाय तासापुर्वी.

पण मग सकाळी सामान वगैरे काहीच नेले नाही त्याने सोबत.असा कसा अचानक गेला बिना सामानाचा??

तिने कुतुहलानेच वेणूमावशींना उद्देशुन मनातली शंका बोलुन दाखवली.

वेणूताई- अगंऽऽ बऱ्याचदा त्याला असे परस्पर बाहेरगावी जावे लागायचे म्हणुन एक सामानाची बॅग त्याची कारमधे तयारच ठेवतो तो.त्यामुळे घरी यायचा जायचा वेळ वाचतो ना त्याचा.

वेणूताईंच्या ह्या उत्तराने जरी तिचे समाधान झाले असले तरी अजुनही तिच्या मनात बरेच प्रश्न रूंजी घालतच होते.

पण आता त्याची उत्तरे सुहासचा पुढचा फोन झाला की विचारू म्हणुन तुर्तास तरी तिने आपल्या मनातल्या प्रश्नमंजुषेला आवर घातला. 

            ~~~~~~~~~~~~~

त्या एका मेसेजनंतर गेल्या तीन दिवसात सुहासने कुठलाच संपर्क केला नाही.एक फोन नाही की मेसेज नाही.

सुखदाला तर काय करावे सुचत नव्हते.तिने केलेल्या मेसेजेसला सीन मधे जाऊनही त्याचा रिप्लाय नव्हता.तिला सुहासचा एकिकडे प्रचंड राग येत होता तर दुसरीकडे त्याच्या काळजीने मन पोखरून निघत होते.

नुकतीच तब्येत ठिक झालेली आणि हा न सांगता सवरता सरळ बेंगलोरला निघुन जातो म्हणजे काय!!!

ती त्याला प्रचंड मिस करत होती.एवढ्या दिवसात त्याचा सततचा सहवास त्याची मस्करी,कौतुक करणे,चीडचीड,संताप आणि मग पुन्हा हळवे होणे असे सगळेच रंग तिने जवळुन अनुभवले होते.

त्याने तिचा आधार घेताना होणारा त्याचा स्पर्श,त्याच्या शरीराचा एक मादक गंध हे सगळ सगळ आठवुन ती वेडीपीसी होत होती.तो जवळ असताना त्याच्या असण्याचे तिला कधीच काही वाटले नाही पण आता त्याच्या नसण्याने ती त्याला जास्त मिस करत होती.

तिला हेच कळत नव्हते की मला हे नेमके होतेय तरी काय.??

 का एवढा त्रास होतोय मला त्याच्या नसण्याचा?

मी त्याच्यात गुंतत तर नाही चाललेय ना?

ह्यालाच प्रेम म्हणतात का मग?

म्हणजे मी प्रेमात …!!!

छेऽऽऽ छेऽऽ!! मी हा काय विचार करतेय.

नाही नाहीऽऽ असे काही नाहीये…

हा फक्त सवयीचा परीणाम आहे बाकी काही नाही..

ती स्वत:ची समजुत घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण दर दुसऱ्या तिसऱ्या मिनटाला नकळत लक्ष फोनकडे जात होते.चुकुन त्याचा एखादा मेसेज आला असेल तर?

आजकाल रात्री त्याच्या अंगावर हात टाकण्याचीही इतकी सवय झाली होती की गेल्या तिन दिवसात त्या स्पर्शालाही ती मिस करत होती.

बेडरूम मधे आले की त्याच्या जागी तो नाही पाहुन मग तिने त्याच्या पिलोला त्याचा एक शर्ट गुंडाळला आणि रात्री त्याची बाही ती जीजावरून आपल्या अंगावर घेऊन झोपू लागली.जणु सुहासचाच हात आहे अशी मनाची समजुत करून घ्यायची.त्याच्या शर्टवरचा तो टिपिकल परफ्युमचा स्मेल तिला सुहासच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा.

उगीचच कपडे ठेवायचे निमित्त करून ती त्याचे कपाट उघडायची.त्या कपड्यात त्याचा एक वास भरून राहीलेला नाकात भरून घ्यायची.

काय होत होते तिचे तिलाही कळत नव्हते.

हा सगळा मुर्खपणा आहे कळत असुनही ती करत होती.जिथे जिथे म्हणुन त्याच्या अस्तित्वाची पुसटशीही खुण दिसेल ती त्याला आपल्यात सामावुन घ्यायचा प्रयत्न करत होती.

तीन दिवस तीन वर्षांसारखे वाटत होते तिला.

कधी येणार हेही माहित नव्हते.

         ~~~~~~~~~~~~~~~~~~

उदासपणे जीजाला झोपवुन ती झोपायची तयारी करत होती एवढ्यात फोन वाजला.फोन उचले पर्यंत कट झाला.आता इतक्या रात्री कोण फोन करणार म्हणुन चेक केले तर सुहासचा फोन.तिने घाईघाईत कॉलबॅक केला तर पून्हा नॉट रीचेबल.एकदा,दोनदा,चारदा कितीदा फोन केला तरी तेच.आता मात्र ती खूप रडवेली झाली.

का ह्याने माझा असा छळवाद मांडलाय.काय साधायचेय ह्याला असे वागुन?

आता येऊदे त्याला घरी परत मग बघतेच त्याच्याकडे..काय समजतो स्वत:ला?

त्याला नमवायचेय का मला..?

हो मान्य...मान्य आहे मला…

गुंतलीय मी तुझ्यात…

नाही राहु शकत रेऽऽ तुझ्याशिवाय.का गेलास सोडून असा..??

.ये ना लवकर सुहासऽऽ.

मरेन रेऽऽ मी आता तुझ्याशिवाय…

सुखदा फोनकडे बघुन पुन्हा रडायला लागली.

बराचवेळ तसाच फोन हातात घेऊन बसुन राहीली,आणि विचार करता करताच डोळा लागला तिचा..

पुन्हा रींगच्या आवाजाने ती घाबरून जागी झाली.सुहासचाच फोन होता.तिने पटकन उचलला.

सुहास - हायऽऽ सुखदा!!काय करतेय?

सुखदाला भावना अनावर होऊन ती रडायला लागली.

बराचवेळ ती काहीच बोलत नाही बघुन सुहासने पुन्हा विचारले

सुहास- हॅलोऽऽऽ आहेस ना गं.??फोन कट झाला का???

त्यावर सुखदाने स्वत:ला जरा सावरले.

सुखदा(रडतच)- हंऽऽऽ आहे..बोलऽ.

सुहासला तिचा आवाज कातर झालेला जाणवला.

सुहास - काय गं,काय झाले,रडतीएस??

सुखदाला आता मात्र आवरणे कठीण झाले.

सुखदा- मी ना तुला खूप मारणार आहे सुहास..तु खूऽऽऽप वाईट्टऽऽ आहेस कळले ना तुला…!!!

I just hate you…!

जा अजिबात बोलू नकोस माझ्याशी…

ही काय पद्धत झाली वागायची.??

काही न सांगता सवरता असा कसा निघुन गेलास मला एकटीला टाकुन…

सुखदाचा बांध सुटला होता.ती त्याला वाट्टेल तसे बोलुन फैलावर घेत होती..

सुहास(मस्करीत) - खरचऽऽबोलु नको काऽऽ???फोन बंद करू?

त्यावर सुखदा अजुनच चिडली.

सुखदा- अरे तुला माणुस प्रेमात बोलतेय हे ही कळत नाही का रे..!!!

खबरदार जर फोन बंद केलास तर…

सुहास ते ऐकुन आश्चर्यचकीत झालेला इकडे.

सुखदा काय बोलली नेमके?

मी बरोबर एेकले की मला भास झाला?

खात्री करण्या करता तो म्हणाला

सुहास - काय म्हणालीस!!! परत सांग.मी नीट एेकले नाही.

सुखदा- अच्छा एेकले नाही का?? काय ऐकले नाही रे? ? काय ऐकायचेय तुला?

फार आनंद मिळतोय ना असे सगळे वागून?

इकडे माझी काय अवस्था झालीय हे तुला सांगुनही कळणार नाही पण तुला मस्करी सुचतेय ना?करऽऽ..कर....कर मस्करी तु..

ती शेवटचे वाक्य पुर्ण करेपर्यंत फोन बंद झाला.

आता मात्र तिचे आत्तापर्य़ंत टिकवुन ठेवलेले अवसान गळुन पडले आणि ती रडायला लागली.

तेवढ्यात सुहासचा व्हडिओ कॉल आला.

तिने फक्त कॉल आला पाहुन उचलला तिला हे पहायची शुद्धच नव्हती की त्याने व्हिडिओ कॉल केलाय.फोन ऑन केल्याबरोबर सुखदाचा रडवेला चेहरा,रडून सुजलेले डोळे,लाल झालेले नाक,फुगलेले गाल असा अवतार बघुन त्याला गलबलुन आले.

त्याने स्क्रीनवरूनच सुखदाच्या कपाळावर आपले ओठ टेकवले..

त्याच्या ह्या अनपेक्षित कृतीने ती बावरली.

नुसत्या कृतीच्या कल्पनेनेच शहारा आला अंगावर.आता ती जरा सावरली.

सुहास मात्र तिच्याकडे एकटक निरखुन पहात होता.

त्याची ती भेदक नजर सुखदाला आतपर्यंत जाळत होती.

तिने लाजुन मान खाली केली.

तसे त्याने विचारले

सुहास- खूप मिस केलेस नं मलाऽऽऽ!!

त्यावर सुखदाने फक्त मान डोलवुन होकार दिला.

त्यावर सुहास पण बोलला.

सुहास- मी पण तूला खूप मिस केलं...करतोयऽऽऽ..

त्यावर फणकाऱ्यानेच सुखदा म्हणाली

सुखदा- तु काही मिस करत नाहीएस मला.तसे असते तर चार दिवसात एक मेसेज तरी केला असतास.पण तुला कशाला माझी आठवण येईल..

आपल्या मनातला राग सुखदा शब्दांवाटे व्यक्त करत होती.प्रत्येक वाक्यागणिक तिचे त्याच्यावरचे प्रेम अधिक स्पष्ट दिसत होते सुहासला.

ज्या प्रश्नांची उकल शोधायला तो गेला होता त्याऐवजी हे आणखी एक गोऽऽऽड,सुखद कोडे त्याला उलगडताना दिसत होते.

आता त्याने घसा खाकरून मनाची पुर्वतयारी केली आणि म्हणाला..

सुहास- सुखदाऽऽऽ मला तुला काहीतरी सांगायचेय..

तुला झोप येत नसेल तर बोलुयात का??

सुखदाने त्याचा शर्ट गुंडाळलेला पिलो हातात घेत म्हणाली.

सुखदा- हंऽऽ बोल....

आज रात्रभर जागरण झाले तरी चालेल मला तुझ्यासोबत.बोलऽऽऽ…

सुहासने तिच्या हातातला पिलो (ज्याला त्याचा शर्ट घातला होता आणि चुकुन तोच तिने हातात धरला होता)बघुन विस्मयानेच विचारले..

सुहास- हेऽऽऽ ए….एक मिनिट.ह्या पिलोला माझा शर्ट का घातलाय?

त्यावर सुखदा आपली चोरी पकडली गेली हे पाहुन वरमली..लाजुन शरमेने तिने मान खाली घातली..

सुखदा(चाचरतच)- तेऽऽ…… मीऽऽ….. तु… नव्हतास नाऽऽ म्हणुन…. तुला इमॅजिन करून......सॉरीऽऽ…! तिने हलकेच जीभ चावली.

सुहासला तिच्या मनाचा थांगच लागला नसता हे जर पाहिले नसते तर..

बापरेऽऽऽ म्हणजे …. हि…सुद्धा…???? माझ्या प्रेमात …..!!??!!

त्याच्या मनात विचारांचे कल्लोळ उठत होते. निश:ब्द झाला होता तो.

सुखदा- बरं तु बोल ना..काय सांगायचे होते???

आता सुहासने त्याचा विचार बदलला.

डायरेक्ट घरी जाऊनच हिच्या चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळावा असा विचार करून तो म्हणाला

सुहास- काही नाही हेच सांगायचे होते की अजुन एक दिवस माझे काम आहे.मग मी परवा पर्यंत येईन..तुला काही आणु येताना?

त्याने मुद्दाम विषय बदलला.

सुखदा- बापरेऽ अजुन दोन दिवस...काय रे तु.??.

मला काही नकोय.तुला घेऊन ये लवकर माझ्यासाठी.

आणि मेसेज कर रोज.अाता दिलास तसा त्रास पुन्हा देऊ नकोस.मरेन मी नाहीतर.

सुहास(हळवे होऊन रागवत)-हेऽऽ शुऽऽ शुऽऽ..  please असे बोलु नकोस.ह्यावेळी मला तुला गमवायचे नाहिये राणी.

खूप बोलायचेय तुझ्याशी.खूप काही सांगायचेय तुला.

मनाच्या पाऽऽऽर तळातलं.पण आत्ता नको.खूप उशीर झालाय नाऽऽ.तु झोप शांत.

मग मी आल्यावर बोलु..

त्याबरोबर सुखदाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले.तिने आपले आेठ सुहासच्या आेठांवर टेकवले आणि स्क्रीनवरूनच एक दिर्घ चुंबन घेतले.

गुड नाईट!!!लवकर ये.

अॅम वेटींग फॉर यु…

सुहासनेही तिला किंचित स्माईल करत गुडनाईट म्हणत फोन बंद केला.

          ~~~~~~~~~~~~~~~

खरेतर सुखदाच्या ह्या सगळ्या कृतीने तो आतुन हलला होता.तिच्या चुंबनाने तितक्या अंतरावरूनही त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते.जे जे त्या दिवशी घडले तीच सगळी पुनरावृत्ती तशीच्या तशी घडली.

आपणही तिच्यावर प्रेम करतोय ह्याची खूण ह्या चार दिवसात त्याला क्षणोक्षणी पटली होती.

मुद्दामच त्याने तिच्याशी सर्व संपर्क तोडले होते जेणेकरून ती सोबत नसताना आपण तिला किती मिस करतो.नेमके काय होतेय आपल्याला?ही लागलेली ओढ क्षणिक आहे की प्रेमातुन निर्माण झालीय? हे तपासण्यासाठीच त्याने स्वत:ला तिच्यापासुन दूर ठेवले होते जाणीवपुर्वक.

आता जेव्हा परतीच्या प्रवासाची वेळ जवळ आली तेव्हा न राहवुन त्याने तो फोन केला होता.

सुखदा आपल्यावर चिडेल हे त्याला एक्सपेक्टेडच होते परंतु ती आपल्याला मिस करतेय,आपल्यावरच्या प्रेमामुळे इतकी सैरभैर झालीय हि मात्र त्याला न्यूजच होती.

म्हणजे 'आग दोनो तरफ लगी है बराबर ।' 

हे शतप्रतिशत खरे होते.

त्यामुळे आता घरी जाऊनच तिला सरप्राईज द्यायचे त्याने पक्के केले.

फ्लाईट बोर्ड होऊन कुठल्याही क्षणी उड्डाण करायला सज्ज होती.

पाचच मिनीटात तशी सुचना मिळाली आणि प्लेन रनवेवर धावायला लागले.इकडे विमानाने आकाशात झेप घेतली तसे सुहासच्या विचारांनीही आकाशाला गवसणी घातली.त्याला आतल्या आत काहीतरी होत होते.नविन प्रेमात पडल्यावर होते तशाच संवेदना होत होत्या.

आता फक्त काही तासांचा प्रवास आणि तो घरी पोहोचणार होता…

मला असे अचानक समोर पाहुन सुखदा कशी रिअॅक्ट होईल ह्या कल्पनेनेच त्याला गुदगुल्या होऊ लागल्या.विचारांच्या नादात डोळा लागला आणि पुन्हा विमानाचा डिसेंड सुरू झाला.

हवाईसुंदरीने पुन्हा एकदा सीटबेल्ट लावायच्या सुचना केल्या.विमान धावपट्टीवर एक जोरदार धक्का देऊन हळूहळू उतरणीला येऊन थांबले.

कॅरोसेलवरून आपले बॅगेज कलेक्ट करून बाहेर यायला किमान पाऊणतास तरी गेलाच सुहासचा.त्याला आता कधी एकदा घरी पोहोचतो असे झालेले.

पार्कींगमधून आपली गाडी बाहेर काढून घाईनेच सामान आत टाकत तो घराकडे निघाला.

घरी पोहोचेपर्यंत पहाटेचे चार साडेचार वाजले होते.सगळे घर,परिसर शांत झोपेत होते.

त्याला एक अनामिक ओढ लागली होती.

आवाज न करता त्याने हलकेच लॅचकीने दार उघडले आणि तितक्याच चोर पावलाने बेडरूममधे गेला.

सुखदा जीजाला पोटाशी कवटाळुन त्या पिलोच्या शर्टाची बाही जीजासहित आपल्या अंगावर पांघरून शांत झोपली होती.

त्याने गुपचूप सामान बाजुच्या कोपऱ्यात ठेवले आणि वॉशरूमला गेला.वॉशरूममधल्या आवाजाने सुखदा जागी झाली.बेडरूमचे दार तिने झोपताना पुढे केलेले आता उघडे दिसत होते.ती घाबरून उठली तर बाजुला सुहासच्या सामानाची बॅग दिसली.तिला मनात काय होत होते सांगता येत नव्हते.ती पटकन बिछान्यावरून उठली.सुहासला बघायला तिचे डोळे अधीर झाले होते.ती उठुन वॉशरूमच्या दरवाजापर्यंत पोहचेपर्यंत सुहास बाहेर आला.तिने सुहासला पाहिले आणि काय झाले तिला काहीच कळले नाही तिने आवेगाने सुहासला मिठी मारली.सुहासनेही तिला आपल्या बाहुपाशात ओढले.

मग हलकेच त्याने तिच्या हनुवटीला वर करून तिची मान आपल्याकडे वळवली.तिचा चेहरा आता अगदी त्याच्या नाकासमोर होता.दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होते की त्यांच्या श्वासांची लयबद्ध हालचाल आणि ह्रदयाची धडधड दोघांना साफ ऐकु येत होती.

सुहासने तिच्या पाणी साठलेल्या डोळ्यात रोखुन बघितले आणि आवेगाने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले.त्याच्या त्या अनपेक्षीत स्पर्शाने सुखदा मोहरली.अंगावर शीरशीरी उठली.तिनेही विरोध न दर्शवता त्याच्या ओठांत आपले ओठ मिसळले.सुहास आता इतका एक्साईट झाला होता की त्याने तिला पॅशनेटली जवळ ओढुन तिच्या ओठांचा चावा घेतला.ती अस्फुट वेदनेने विव्हळली पण त्या वेदनेतही तिला आनंद मिळत होता.आज प्रथमच समुद्राच्या किनाऱ्यावरून ती पाण्यात शिरली होती.त्याच्या लाटांचा स्पर्श आपल्या अंगावर झेलत होती.त्यातली रोमांचकता ती अनुभवत होती.सुहासने तिला परत स्वत:कडे ओढत तिच्या रसरसीत ओठांना आरक्त करू लागला.

जीजाची चुळबुळ चाललेली लक्षात येताच सुखदा भानावर आली आणि सुहासपासुन दूर झाली.

जीजाजवळ जात तिने हलक्या हाताने तिला थापटले तसे ती पुन्हा शांत झोपली.

सुहास हळुच दोघींच्या जवळ आला.जीजाचा एक अस्फुटसा मूका घेतला आणि तिच्या आहे त्या जागेवरून तिला बेडच्या एका कोपऱ्याला सरकवले.

त्याची ही कृती पाहुन सुखदा बावरली.सुहास पुढे काय करणार ह्या कल्पनेनेच तिच्या पोटात फुलपाखरे उडायला लागली.थोडी टेंन्स झाली होती.

जीजाला सरकवुन सुहास सुखदाच्या जवळ येऊन बेडवर बसला.सुहासने अलगद तिला बेडवर झोपवली आणि तिला घट्ट मिठी मारली.तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले तसे तीच्या अंगातुन वीजेचा करंट जावा तसे झाले.

तो हलकेच तिच्या कानाशी कुजबुजला..

"How much I miss you..,

you just can't imagine.. 

Love you sukhada..! I love you..!!!" 

तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले..

ती त्याच्या छातीवर डोके टेकुन कितीवेळ तरी रडत राहीली.त्याने तिला आपल्या मिठीत घेत तिच्या केसांवरून हात फिरवत सांत्वन करत राहीला.

दोघं किती वेळपर्यंत तसेच एकमेकांच्या मिठीत बद्ध होते.

इकडे भिंतीवरच्या संपदाच्या फोटोची अचानक मंदशी फडफड झाली.

कदाचित नियतीने आपल्या आवडीचे दान पदरात टाकल्याच्या आनंदाची साक्ष तर देत नसावा ना तो…..!!!

        ~~~~~~~~~~~~~~~

सकाळ झाली होती.आदिच्या शाळेची तयारी करायची होती.सुखदाने सुहासची मिठी सैल करत नाईलाजानेच उठली तसे सुहासने तिला पुन्हा हाताने आपल्याकडे खेचले.ती बावरली.त्याच्याकडे आश्चर्य आणि प्रश्नार्थक नजरेने बघायला लागली.तसे तो म्हणाला

सुहास- कधी येशील परत?

तसे ती पुन्हा लाजली.

चल चावट...आता गुपचुप झोप काढ. मला खूप कामे आहेत.आणि माझा राग गेलेला नाहीये अजुन.तुला खूप प्रश्नांची उत्तरे द्यायचीएत मला कळलं नाऽ…

So….. Be ready to shoot Mr. Suhas…! 

हाताने बंदुक मारण्याची खूण करत मिश्कीलपणे ती बोलली.

त्यावर सुहासही खट्याळपणे डोळा मारत म्हणाला,"बंदा हाजीर है जान कुर्बान करने के लिए..please come & shoot me.. !!!

त्याच्या त्या चावटपणावर ती पुन्हा लाजली.

त्याला एक फटका मारत ती रूम बाहेर गेली.

      ~~~~~~~~~~~~~~~~~

सपुताई म्हणाली ते किती खरं होत.किनाऱ्यावर उभे राहुन त्या लाटांचा स्पर्श अंगावर न घेणारी मी खरच गाढवच होते..

पण अजुनही त्याची अथांगता……..???

ती...नाही अनुभवलीय…..!!!!

ते सुख खरच आहे का माझ्या नशिबात????

की पुन्हा पहिलीच पुनरावृत्ती…..?????

-----------------------(क्रमश:15)-----------------------------

क्रमश:15

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मित्रहो,

सुहासच्या अचानक जाण्याने सुखदाला तिच्या सुहास विषयीच्या खऱ्या भावनेची जाणीव झाली.

बऱ्याचदा आयुष्यात माणसे आपल्या जवळ असली की त्यांची किंमत कळत नाही पण जेव्हा ते दूर जातात तेव्हा त्यांचे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे ही जाणीव होते.काही वेळा ती उपरती होईपर्यंत वेळ निघुन गेलेली असते.

आपल्या कथेतल्या पात्रांना ही जाणीव लवकर झालीय पण खऱ्या आयुष्यात असे घडेलच असे नाही म्हणुन वेळीच नात्यांची कदर करायला शिकले पाहिजे हाच मेसेज ह्या प्रसंगातुन द्यायचा होता.

आजचा भाग कसा वाटला?ते जरूर कळवा.

काही सुचना असतील तर त्यांचेही स्वागतच आहे.कथा आवडल्यास माझ्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका...

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहित कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all