A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314c5b4031abcc5585631ae4151fe2614bf166269cd1): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi bhag 11
Oct 29, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-11

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग-11

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-11

©®राधिका कुलकर्णी.

 

लग्नाला पंधरा दिवस उलटले तरी दोघे एकत्र कुठेही बाहेर गेले नाहीत की मुलांना घेऊन कुठे फिरणे नाही.एकमेकांशी फटकुन वागत नसले तरी त्यांच्यातले अंतर म्हणावे तसे कमी होण्याचे चिन्हही दिसत नव्हते.

वेणूताईंचे अगदी बारकाईने लक्ष होते दोघांच्या प्रत्येक हालचालींवर.नाही म्हणायला त्या चार दिवसात सुहासने सुखदाची खूपच काळजी घेतली.तिला चहा करून देणे,गरम पाण्याची पिशवी शेकायला देणे.इतर काही हवं नको चौकशी करणे हे सगळे अगदी आपुलकीने केले होते.पण नंतर गाडी पुन्हा मूळ पदावर.

हा आता एक समाधानकारक बदल झाला होता तो म्हणजे आता वेगळे अंथरूण नव्हते.त्यालाही तसेच कारण घडले.

अगोदर एकाच खोलीत सुखदा जीजाला घेऊन खाली झोपायची आणि वरती आदि आणि सुहास ही विभागणी झालेली.बेड दोन्ही बाजुंनी उघडा असल्याने जीजा त्यावरून पडायची भीती हे कारण देऊन ती खालीच गादी घालुन झोपत असे.

पण खाली झोपायची सवय नसल्याने सुखदाला अचानक पाठदुखीचा त्रास सुरू झाला ते पाहुन मग सुहासने बळजबरी तिला जीजासोबत बेडवर झोपायची सक्त ताकीदच दिली आणि नाईलाजाने तिलाही ती मान्य करावी लागली.पण बाकी जैसे थे च सगळे.

बेडच्या दोन कडेला हे दोघे आणि मधे आदि आणि जीजा.

सोबत मुले असल्याने त्यांच्यांत उरली सुरली आशा पण शुन्य होताना दिसत होती.

वेणुताईंना हे काही फारसे रूचत नसले तरी काही ईलाजही नव्हता त्यांच्या अटींपुढे.

 

अखेर न राहवुन आपली व्यथा सांगायला आणि झालेच तर बाेलुन ह्यातुन काही मार्ग निघतोय का बघायला वेणूताईंनी नलिनीताईंना फोन लावला.

अचानक घरातले सामान संपल्याची एक यादी देऊन सुखदाला सामान आणायला पाठवले.

कारण ती असताना ह्यांना आपल्या मनातले कुठे बोलता आले असते..म्हणुन ही युक्ती लढवली होती त्यांनी.फोन लागला. रींग जात होती.नलिनीताईंनी घाईतच फोन उचलला.

 

नलिनीताई- हॅलोऽऽऽ!!कोण बोलतेय?"

 

वेणूताई - अहोऽऽऽ मी बोलतेय तुमची विहीण.

 

नलिनीताई- अगोबाईऽऽ ह्यावेळी कसा वेळ मिळाला हो??(काहीतरी आठवल्यासारखे करून मस्करीत)आता काय बाई एक जणांना हाताखाली राबायला सून मिळालीयऽऽमग काय वेळच वेळ मिळणार..आमच्यासारखे थोडीच आहे.

 

वेणूताई(चेष्टेतच)- छेऽऽहोऽ!!! कसचे काय..जाच चाललाय जाच नुसता..

साधं बोलायची चोरी झालीय.पहिल्या सारखे मनमोकळे बोलायलाही वेळ मिळत नाही आजकाल.आत्ता सुद्धा ती बाहेर गेली तेव्हा कुठे फोन करता आला.

 

(त्यावर हसुनच) नलिनीताई- बापरेऽऽ इतका का छळवाद चाललाय?मग मी काही मदत करू शकत असेल तर सांगा हो..काढु आपण ह्या समस्येतुन मार्ग..

 

वेणूताई- अहो मग मी त्यासाठीच तर फोन केलाय ना.मला तुमची मदत हवीय.

 

नलिनीताई-दिली मदतऽऽ….पण आधी समस्या तर सांगा.

 

वेणूताई-आता काय सांगूऽऽऽ कप्पाळ!!!ते दोघे इतके छान छाऽऽन गोड गोऽऽड बोलतात.सकाळी गुड मॉर्निंग काय रात्री गुड नाईट काय हे आणि ते.. पण बाकी प्रगती शुन्य.

त्यात ती दोन चिल्लर पार्टी पण त्यांच्याच सोबत.

कसे होणार ह्यांचे पुढे काय माहित..???

वेणुताईंनी आपली समस्या बोलुन सांगितली.त्यावर एक मोठ्ठा पॉझ घेत 

 

नलिनीताई -हम्मऽऽऽऽ…समस्या गंभीर आहे.पण ह्यात माझी काय मदत हवीय तुम्हाला तेवढे सांगा.बंदी हाजीर है।

नलिनीताईंनी लगेच फिल्मी डायलॉग पण झाडला हिंदीतुन.

 

वेणुताई (विचार करून)- असे काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून मुले त्यांच्यापासुन दूर राहतील.

 

नलिनीताई- अहोऽऽ नुसती मुले दूर होऊन काय उपयोग??ह्यांची मने दूर आहेत एकमेकांपासुन ती जवळ यायला हवीत  ना अगोदर..तोपर्यंत ह्या सगळ्याचा काय उपयोग??

 

वेणूताई(मुद्दा पटल्याचे दाखवत) - हम्मऽऽ,मुद्दा बरोबर आहे.तुम्ही म्हणताय ते पटतेय पण मग हे घडणार कसे?काहीतरी तर आयडीया द्या की.

 

नलिनीताई- आता असल्या आयडीया लढवायची वेळ उभ्या आयुष्यात कधी आली नव्हती हो.काय काय करायला लागतेय आपल्या पोरांसाठी….देवा बघतोएस ना रेऽऽ.आता तुच काही तरी कर बाबा.

मनोमन त्या देवाला साकडं घालता घालताच एक विचार चमकला तशा त्या खुष होऊन म्हणाल्या.आता दोघांपैकी एकजण आजारी पडले तरच काहीतरी होईल..

त्यावर वेणूताईंची कळी खुलली.त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक निर्माण झाली.

वेणूताई (काहीतरी सुचल्याच्या अविर्भावात)- आजारी तर नाही पण कोणी पडले तरीही काम भागेल की.

नलिनीताई(त्यांच्या शब्दोक्तीवर कौतुकाने हसत)-चला शेवटी उपाय मिळाला तर.आता लागा कामाला मग.

त्यावर दोघीही पुन्हा हसल्या.कसले कसले अघोरी उपाय करायला लागताएत ह्या पोरांच्या पायात.देव वरून बघतोय हं आपल्याला.शिक्षा करू नये म्हणजे मिळवली.

 

वेणूताई - बर चला.माझी सून परत यायची वेळ झाली.ठेवते फोन.फाऽऽऽऽर सासुरवास चाललाय होऽऽ.बघाऽऽघाबरून फोन पण बंद करायला लागतोय…

 

नलिनीताई - आता काय करताऽऽ!!भोगा कर्माची फळं.आलिया भोगासीऽऽऽ…. सादर व्हा आता..!!

विहीणबाईंशी मनासारखे हितगूज होताच

हसतच दोघींनी फोन बंद केला.

        ~~~~~~~~~~~~~~

फोन झाला तसे वेणूताईंच्या मनात विचारचक्र वेगाने फिरू लागले.

काय करावे हे सुचत नव्हते पण काहीतरी करायला पाहिजे हे मात्र खरे.

काय करू?काय करू? आणि करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे काही झाले तर?एकीकडे भीतीही वाटत होती.तर दुसरीकडे काहीतरी क्लुप्ती करायला मन उद्युक्त होत होते.

विचार करतच त्या पलंगावर लवंडल्या.

सुखदाही तेवढ्यात आली.सामानाची जागा विचारून तिने जिथल्या तिथे लावले.दोघींनी दुपारचे जेवण उरकले.सुखदा जीजाला घेऊन आपल्या रूममधे गेली.

असाच वेळ जात होता.कामे आपापल्या वेळी होत होती.वेणूताईंना हवी तशी कोणतीही युक्ती सापडत नव्हती त्यामुळे त्या मनातुन जराशा अस्वस्थच होत्या.

सुखदाचे कॉलेज सुरू व्हायच्या आत त्यांच्यातले अंतर कसे कमी करता येईल ह्या विचाराने त्यांना पोखरून टाकले होते.दोन दिवस उलटले तरी मनासारखे काही घडत नसल्याने जरा निराशच होत्या वेणूताई.खाष्ट सासवा डेलीसोप्स मधे काय काय प्रकार करतात सुनांना त्रास द्यायला त्याचीही उजळणी करून झाली पण असले अघोरी उपाय आपण शत्रुलाही करू शकणार नाही तर आपल्या लाडक्या लेकरांना काय करू शकतोय ह्यावरही त्यांचे मनोमन एकमत झाले.

      ~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी नेहमीप्रमाणेच सुखदा स्नानादि उरकुन घाईघाईत आदिच्या शाळेची तयारी करत किचनमधे बिझी होती.वेणूताई अंघोळीला गेलेल्या.

सखुही रोजच्यापेक्षा लवकरच कामाला आली ते पाहुन सुखदाने तिला आधी जाऊन बाथरूम स्वच्छ धुवायला सांगीतले.

तिने नेहेमीप्रमाणे बाथरूम क्लिनर सगळीकडे पसरवुन ठेवले अजुन पाणी घालुन धुवायचेच होते की सुखदाने दोन भांडी अर्जंट धुवुन मागितली.भांडी घाईने हवी म्हणुन ती भांडी धुवायला गेली.

बाथरूममधे साबण टाकुन आपण इकडे आलो हे ती साफ विसरली.

ह्यावेळी न उठणारा सुहास कधी नव्हे ते  बाथरूमसाठी वॉशरूमला गेला तेही झोपेच्या तंद्रीतच.अचानक जोरदार काहीतरी धपकन पडल्याचा आवाज झाला आणि पाठोपाठ सुहासच्या किंचाळण्याचा आवाज...

आह्ऽऽऽऽ….!!आईऽऽआईऽ गंऽऽ!! मेलो ग आईऽऽ!!! 

सुहास जोराने कळवळुन ओरडला तसे सुखदा घाबरून आवाजाच्या दिशेनी धावली.

सुहास बाथरूममधे घसरून जोरदार आपटला होता.नळाच्या टोकाला कपाळ आपटल्याने खोक पडुन रक्त येत होते.

मागोमाग सखुही आली.जे झाले ते पाहुन तिने जीभ चावली कारण ती बाथरूम धुवायचे विसरल्यानेच सुहास पडला होता हे तिला समजले.

सुखदा बाथरूममधे पाय ठेवणार इतक्यात सखु म्हणाली "वैनी थांबाऽऽ.ते म्या चुकुन साबण घालुन बाथरूम धुवाया विसरले अन् भांडे घासाया गेले नव्ह का,, म्हुन दादा पडलाय साबणीवर पाय घसरून..तुमीबी पडताल,अगुदरं थोडं पानी टाकुन घ्या मंग आत जावा..!!

त्यावर सुखदा सखुवर चिडली."असं कसं गं अर्धवट काम तुझं.नसत काही झालं असत म्हणजे??"

सखुवर ओरडतच तिने पाण्याचा नळ ऑन केला.पाण्याच्या थंडगार स्पर्शाने सुहास पुन्हा ओरडला.त्याचे खुणेने सांत्वन करत सुखदाने

चहुबाजुने पाणी टाकुन फरशी स्वच्छ धुतली.

अलगद हलकेच संभाळुन बाथरूममधे पाय ठेवला.

सुहासला हाताचा आधार देऊन उठवायचा प्रयत्न केला पण कंबरेला जबरदस्त मार बसलेला त्यात पायालाही थोड खरचटलेले त्यामुळे त्याला उठताच येईना.त्याने तशीच जमिनीवर बसकण मारली.काय करावे सुखदाला सुचेना.दोघांचेही अंगावरचे कपडे पुर्ण ओले झाले होते.तो कण्हत होता.सुखदाला त्याला स्पर्श करताना मन कचरत होते.पण शेवटी त्याचा एक हात तिच्या कंबरेभोवती आणि दुसरा खांद्यावर पकडुन तिने त्याला आधार देऊन उठवले तेव्हा कसबसे त्याला उठता आले.

ते दोघेही पुर्ण ओलेचिंब झाले होते.त्याने तिच्या कंबरेला स्पर्श करताच सुखादाच्या अंगातुन वीज गेल्यागत झाले.शरीरभर सरसरून काटा आला.

तिने त्याला बाहेर आणुन एका चेअरवर बसवले.त्याचे अंग ओल्या कपड्यामुळे थंडी वाजुन थरथरत होते.

अंगावरचे ओले कपडे लवकर बदलावे लागणार होते पण तिचे मन कचरत होते.हे कसे करावे? असे विचार मनात चाललेले तरीही सध्या वेळेची गरज जाणुन स्वत:च्या स्त्रीसुलभ लज्जेला बाजुला ठेवुन तिने कपाटातुन त्याचे कपडे व टॉवेल बाहेर काढला.खूप ऑकवर्ड फिल होत होते पण इलाज नव्हता.

तिने कपडे बदलण्यासाठी हात जवळ नेला.पण ओले असल्याने कपडे अंगाला पुर्ण चिकटले होते.ती जरा त्याच्या अंगावर ओणवी होऊन जोर देवुनच तिने टि शर्ट डोक्यातुन काढला.

कपडे काढताना त्याच्या शरीराच्या ओलेत्या स्पर्शाने सुखदाला शीरशीरी उठली देहात.

सुहासलाही ह्या अवचित स्पर्शाने शहारून आले. 

आज जवळपास पाच सहा महिन्यांनी सुहासला एका स्त्रीदेहाचा स्पर्श झाला होता.

आणि इकडे सुखदाही सुहासच्या बळकट दंड आणि रूंद केसाळ छातीचा कपडे काढताना होणाऱ्या स्पर्शाने शहारत होती.अंगातुन वीजेचा प्रवाह दौडावा तसे काहीसे दोघेही ह्या क्षणी अनुभवत होते.

परंतु वरकरणी मनातली ही भावनिक चलबिचल चेहऱ्यावर न दिसु देता सुखदा निमुटपणे तिचे काम करत होती.

तेवढ्या वेदनेतही ह्या संवेदनेने सुहासला मोहरून आल्यागत झाले.

वेदनेचे दु:ख करावे की ह्या अाकस्मिक स्पर्शाचा आनंद साजरा करावा  हेच कळत नव्हते सुहासला.तो कधी नव्हे ते आतुन हलला होता.

 

तिने एका कर्तव्यदक्ष नर्सची भूमिका वठवत त्याचे सगळे ओलेते कपडे बदलले त्याला बेडवर नीट टेकवुन बसवले.स्वत:चेही ओले कपडे बदलुन सुहासच्या लागलेल्या मारावर स्वच्छ कॉटनने वाईप आऊट करून अँटिसेप्टिक क्रीम लावले.कंबरेला बराच मार लागला होता.

तात्पुरते मुव्ह लावुन तिने त्याला आराम करायला सांगितले कारण आता आधी आदिच्या शाळेचे बघणे गरजेचे होते.त्याला बेडवर झोपवुन ती पुढच्या कामाला लागली पण चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते तिचे.नेमके काय होतेय हेही कळत नव्हते तिला.तो स्पर्श सुखावहही वाटत होता तर दुसरीकडे हा काय विचार करतोय म्हणुन अपराधीही वाटत होतं.विचारांच्या जंजाळातच ती काम उरकत होती.तेवढ्यात वेणूताई स्नान उरकुन बाहेर आल्या.

आतमधे असताना काहीतरी गडबड गोंगाट ऐकु आल्याचा भासही झाला होता त्यांना म्हणुन मग त्यांनीच सुखदाला विचारले,

वेणूताई- काय झाले गं?मला आतमधे कोणीतरी आवाज दिल्यासारखे वाटले..कोणी आले होते का? 

सुखदा-अहोऽ नाहीऽऽ मावशी.आपल्या सखुबाईचा प्रताप…!!

वेणूताई (प्रश्नार्थक)-म्हणजे??

सुखदा- अहोऽऽ तिने बाथरूममधे साबण घालुन धुवायलाच विसरली.मला एक दोन भांडी घाईने घासुन हवी होती तर ही भांडे घासत इकडेच बसली.

तिकडे सुहास बाथरूमला गेला आणि जोरदार आपटला साबणावर पाय घसरून.त्याचाच आवाज ऐकु आला असेल तुम्हाला..

सुहास पाय घसरून पडला हे ऐकताच आई असुनही पहिल्यांदा त्यांना दु:ख वाटायचं सोडुन मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

जे काम आपण जाणुनबुजून करायचा विचार करत होतो ते काम देवानेच माझ्या वतीने पार पाडले.मनातल्या मनात देवाला आज लोणीसाखरेचा नेवैद्यही कबुल केला त्यांनी.

पण वरकरणी चींता दाखवत आश्चर्यमिश्रीत काळजीतच 

वेणूताई - काऽऽय !! अगोऽऽऽबाई!! लागलंय का गं फारऽ?"

मी नेमकी अंघोळीला गेलेली मला इकडे काय झाले कळले देखील नाही."

त्यावर सुखदा (त्यांचे सांत्वन करत)-मावशीऽऽऽ काळजी करू नका.तो ठिक आहे.मी मलमपट्टी केलीय.सध्या आराम करतोय.मी आदिला शाळेत सोडुन आले की त्याला हॉस्पीटलला नेऊन आणते.तुम्ही जरावेळ सुहासच्या जवळ बसता का? त्याला बरे वाटेल.

सुखदाने आदिचा डबा भरता भरताच विचारले.

वेणूताई- होऽऽ.तु आवर आदिचे.मी आहे सुहास जवळ.

त्या लगेच सुहासच्या खोलीत गेल्या.त्याच्या बाजुला जाऊन साईडटेबलच्या स्टुलवर टेकुन बसत हलक्या हाताने सुहासच्या कपाळावर हात लावुन विचारल्या 

वेणूताई- आता कसे वाटतेय राजा?फार दुखतेय का रे?

सुहासने न बोलता हम्मऽऽ असा नुसताच मानेने होकार भरला.होकार देतानाही त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती.मायेने गलबलुन आले वेणूताईंना त्याच्या चेहऱ्यावरची वेदना बघुन.

पण ह्या निमित्ताने का होईना सुहास आता घरी राहील आणि त्यांच्यातला सहवास वाढेल ह्या विचाराने मनोमन खुषही झाल्या त्या.

"बरं सुहास तु आराम कर.मी पूजा करून येते हो पुन्हा…" म्हणतच वेणूताई उठल्या.

 

समोरच सखू झाडझुड करत होती रोजचीच.

तिच्यावर थोडे रागावल्यासारखे करून जाताना मला भेटुन जा असे वेणूताईंनी तिला जरा गंभीर आवाजात सांगीतले.

त्यावर सखु मनातुन जाम घाबरली.काय माहित आता आज्जी काय शिक्षा देतात?जे होईल ते होईल.देवाची मर्जी..असे मनातल्या मनात पुटपुटतच ती वेगाने बाकीच्या कामाला लागली.

इकडे सुखदानेही पटपट आदिचे सगळे आवरून त्याला शाळेत पोहोचवायला गेलीसुद्धा.

तीच संधी साधुन वेणूताईंनी सखुला जोराने हाक मारून आपल्या खोलीत बोलवुन घेतले.हातातले पुसायचे फडके तसेच टाकुन घाईघाईनेच हात धुवुन ती वेणूताईंच्या खोलीत गेली.

सखु-आज्जीऽऽ अहो मी मुद्दामुन नाही केलं हो.चुकुन विसरून झालं माझ्याकडुन

ह्या एक बारीला माफ करा.मी पुन्हा नाही विसरणार असं……

ती वेणूताई काही बोलणार ह्या आधीच आपल्या चुकीची कबुली देत अपराधी भावनेने नजर जमिनीला लावुन उभी राहिली.

वेणूताई पाठमोऱ्या कपाटातुन काहीतरी काढत हात हलकेच मागे लपवत कपाट बंद करून तिला आपल्या जवळ बोलावत म्हणाल्या

वेणूताई- तुझा हात पुढे कर.

ती आता जास्तच घाबरली.जवळ बोलावुन हातावर छडीचा फटका मारतात की काय आज्जी ह्या भीतीने ती अधिकच घाबरली.अन् भीतभीतच जवळ गेली.

डोळे मिटुन आता मार खायला स्वत:ला तयार केले तसे तिच्या हाताच्या मुठीत काहीतरी ठेवल्यासारखा भास झाला तिला.तिने हलकेच डोळे उघडले तर त्या मुठीत पाचशेची नोटऽऽ.!!

तिला काहीच समजेना.भांबावल्या नजरेनेच ती एकदा वेणूताईंकडे आणि एकदा नोटेकडे बघत म्हणाली…

सखु(रडवेल्या सुरात)- आज्जी मला नगं हे पैसं.मला कळतय तुम्ही शालजोड्यातला हाणतायसा नाऽऽ.??.पन म्या खरच चुक भुलीने विसरले.आता पुन्यांदा नाही

होणांर.आईचीऽऽआण.

तिने गळ्याला हात लावुन शपथ घेत बोलु लागली.आणि हातातले पैसे परत देऊ लागली.

वेणुताईंच्या आत्ताच्या वागण्याचा तिला कुठलाच अर्थ लागत नव्हता.

इतक्या वेळच्या शांत बसलेल्या वेणूताई आता बोलु लागल्या

वेणूताई- सखु बाळऽऽऽ.अगं,मला महितीय तु मुद्दाम नाही केलंय चुकून झाले तुझ्याकडुन.

सुहासला दादा म्हणतेस ना तु?मग तुझ्या भावाला काही व्हावे म्हणुन तु मुद्दाम असं करशील का,नाही नाऽऽ???

पण आज तुला सुखदावहिनी रागावली ना त्यामुळे???तीही त्या सगळ्या गोष्टीने भांबावुन तुला रागावली.मनाला लावुन घेऊ नकोस होऽऽ तिच्या बोलण्याचे.

सखु- छेऽऽऽछे..! अज्जाबात वाईट न्हाय वाटले मला वैनींच्या बोलण्याचे.त्याबी घाबरून गेलत्या ना दादाला पडलेलं बघुन.अन् माझीबी चुकी होतीच की मंग राग का यावा??

 

मग थोडा विचार करून सखुने पुन्हा विचारले.

सखु- पन आज्जी मला हे पैसे कशापायी दिले???मला नगत हे.

ह्या पैशातुन दादाला मलमपट्टी करा.मला खरच नगं. 

हे बोलताना चेहरा थोडा रडवेला झाला होता तिचा.मनातली अपराधीपणाची भावना स्वच्छ उतरली होती तिच्या सावळ्या निरागस चेहऱ्यावर.

वेणूताई (हसतच समजावणीच्या सुरात)- अगं वेडाबाईऽऽऽ हे पैसे तुला लग्नाच्या गडबडीत द्यायचे राहीले होते ना मागल्या हिशेबातले ते आहेत.तु काही मागीतले नाही आणि मीही विसरले नंतर.आता पुस ते डोळे आणि इथुन पूढे काम शांततेने करत जा.घाईगडबडीत तुच समजा पडली असतीस तर केवढ्याला पडलं असत तेऽऽ??!!

जा आता.उरलेले काम कर तुझे..

 

आत्ता कुठे सखुच्या जीवात जीव आला.

ती मनात काय काय विचार करत होती पण प्रत्यक्षात झाले भलतेच.मनावरच केवढ मोठ्ठ ओझं उतरल्यागत वाटत होतं सखुला.

इकडे मनोमन वेणूताई देवाचे आभार मानत होत्या.

एक तो विठुराया संतसखुच्या घरी सखुच्या रूपाने जाऊन राहीला मदतीला आणि आज माझ्या मदतीला ह्या सखुच्या रूपाने आला.

मनात हे सगळे विचार करतच त्या देवपुजेला लागल्या.

कधी एकदा ही बातमी नलिनीताईंना देतेय असे झालेले.पण जोपर्यंत दोघे घरात आहेत त्यांना बोलता येणे शक्यच नव्हते.

      ~~~~~~~~~~~~~~

आदिला सोडून सुखदा घरी आली.सुहासला ब्रश वगैरे करवुन त्याचा चहा नाष्टा उरकला.स्वत:चेही सगळे उरकले आणि लगेच डॉ.पारस देव ह्यांना फोन लावला.डिस्पेंसरी दहाला उघडणार होती.

आता वेळ होतच आली होती.त्यामुळे तिने लगेच सुहासला गाडीत फ्रंट सीटवर बसवले आणि स्वत: ड्राईव्ह करत डिस्पेंसरीत पोहोचली.

 

डॉ.पारस देव.पंचावन्न ते साठच्या आसपास वय.गोरा वर्ण,मध्यम उंची,भव्य कपाळ.एक रूबाबदार हसतमुख व्यक्तिमत्त्व.

अतिशय हुशार आणि अनुभवी डॉक्टर.

जवळपास तीस पस्तीस वर्षांची प्रदिर्घ प्रॅक्टीस.

खूप वर्षांपासुनचे ह्यांचे फॅमिली डॉक्टर.

वेणूताईंपासुन जीजापर्यंत कुणालाही काहीही झाले तरी पहिले ह्यांच्याकडेच दाखवले जायचे.

मग जर त्यांनी काही स्पेशालिस्ट सजेस्ट केला तरच दुसरीकडे.त्यांच्या हाताला गुणही तसाच होता.सहसा ते उगीचच ह्या त्या टेस्ट्स वगैरे सुचवत नसत.अनुभवी व हुशार अशीच त्यांची ख्याती होती.

पाचच मिनटात डॉक्टर आले.त्यांनी सुहासला व्यवस्थित तपासले.सुहासला बराच मुकामार लागल्यामुळे स्पर्श होताच विव्हळत होता तो.

तसे घाबरायजोगे काही कारण नसले तरीही एकदा खात्री म्हणुन त्यांनी पाठीचा/कंबरेचा एक्सरे काढायला सांगितला कारण त्या जागेवर सूज आलेली होती.

 जखमेला स्वच्छ करून नर्सने व्यवस्थित बँडेज केले.डॉक्टरांनी सूज आलेल्या जागी लावायला एक ऑइंटमेंट आणि पेनकिलर्स लिहुन दिल्या.

तीन चार दिवस तरी पुर्ण आरामच सांगितला होता.

सुखदाने सांगितलेली सर्व औषधे जवळच्याच केमिस्ट कडुन घेतली आणि दोघे घरी निघाले.

          ~~~~~~~~~~~~~

इकडे ते दोघे दवाखान्यात जायला बाहेर पडले तसे लगेच वेणूताईंनी नलिनीताईंना फोन लावला.

रींग वाजत होती.नलिनीताईंनी हातातले काम बाजुला ठेवत फोन उचलला

नलिनाताई- हॅलोऽऽ...बोला???

वेणूताई-काय विहीणबाई बिझी दिसताय?

नलिनीताई- कामाचं काय चालतच राहतात.तुम्ही बोला..ह्यावेळी कसा वेळ काढलात ते?आज सुनबाईची भीती नाही का वाटली?

त्यांनी मिश्किलीनेच चिडवले.

त्यावर हसुनच वेणूताई- अहोऽऽ ते सगळे सोडा.तुम्हाला एक झक्कास बातमी द्यायला फोन केलाय मी.ऐकुन तुम्हीही खुष व्हाल.

जराशा विचारातच नलिनीताई- आपला प्लॅन खरच वर्कआऊट केलात की काय तुम्ही??

वेणूताई- प्लॅन वर्कआऊट तर झालाय पण…..

मुद्दाम वेणूताईंनी सस्पेन्स वाढवायला पॉझ घेतला..

नलिनीताई(घाबरतच)- पण‍‍‍…… काय!!!!

पुढे बोला ना..

वेणूताई- अहोऽऽ किती घाबरताय तुम्ही.आधी शांत व्हा आणि नीट ऐका.

आज सुहास सकाळी बाथरूममधे पाय घसरून पडला.त्याला जबर मुकामार लागलाय.जागचे हलताही येत नाहीये.आणि आज सकाळपासुन सुखदा त्याच्या सेवेतच मग्न आहे.

आत्ताही ती त्याला घेऊन डॉ.देवांच्या दवाखान्यात गेलीय म्हणुन मी फोन केला.

हुश्श!!! दमले बाई इतक सगळं एका श्वासात सांगुन.

नलिनीताई(घाबरतच)- अरे बापरेऽऽऽ.फार लागले नाही ना आमच्या जावईबापुंना.

म्हणजे हा सगळा प्लॅन सक्सेसफूल केलात म्हणायचे की तुम्ही.!!!

वेणूताई- अहोऽऽऽ मला कसचं जमतय!!

त्या देवालाच माझी दया आली.तो सखुच्या रूपात धावुन आला सकाळी सकाळी.

नलिनीताई (अगम्य आश्चर्यात)- म्हणजे?मी समजले नाही????

त्या अजुनही विस्मयातच होत्या.

मग वेणूताईंनी सगळा वृत्तांत नलिनीताईंना कथन केला.

वेणूताई-हे असे सगळे झाले.आता फक्त फ्रॅक्चर वगैरे काही नसावे म्हणजे मिळवली.

नलिनीताई- हम्मऽऽऽ.तरीही बरे होईस्तोवर काळजीच आहे.

आता इतकी मदत केलीय तर पुढेही देव बघेलच की.त्याच्यावर भरोसा ठेवायचा दुसरे काय…..

पण बाकी काही म्हणा ह्या निमित्ताने दोघे जरा एकमेकांसोबत वेळ घालवतील ही गोष्ट छान झाली…

चला ऑल द बेस्ट विहीणबाई..लवकरच तुमच्या ईच्छा पुर्ण होतील ही अपेक्षा.

त्यावर वेणूताई- तुमच्या नाही आपल्या म्हणा आपल्या …!

त्यावर दोघी पुन्हा हसल्या.

 

बाहेर गाडीचा आवाज झाला तसा वेणूताईंनी तसे सांगुन लगेच फोन कट केला.

त्या घाईघाईनेच दारात गेल्या.सुखदा सुहासला खांद्याला आधार देऊन हळुवारपणे घरात आणत होती.घरात येताच वेणूताईंनीही दुसऱ्या बाजुने आधार देवुन दोघींनी मिळुन बेडरूममधे नेले.सुखदाने त्याला लगेच ब्रेकफास्ट नंतरची एक टॅबलेट दिली आणि ब्लँकेट पांघरून झोपवले.त्याला पाच-दहा मिनटातच गाढ झोप लागली.बहुतेक हा त्या गोळीचा परीणाम असावा.

एव्हाना जीजाबाईंची चुळबुळ सुरू झाली.

तिचे तोंड धुणे,शी-शू,आंघोळ,खाणे-पीणे.

सुखदाला तर हे सगळे करता करता वेळच पुरत नव्हता.थकायला होत होते.जीजाचे आवरून ती थोडी झोपत नाही तोवर आदि यायचा शाळेतुन.

मग त्याचे सगळे पहायचे.त्यात आता सुहासचेही अॅडीशनल काम.

जीजाचे जेवण उरकुन ती थोड्यावेळ वेणूताईंबरोबर खेळतेय पाहुन सुखदा बेडरूममधे सुहासला बघायला गेली.

सुहास गाढ झोपलेला होता.जेवायची वेळ झालेली होती.जेवणानंतरचा त्याच्या गोळीचा डोसही होता त्यामुळे त्याला बळजबरीने उठवावेच लागणार होते.

एक दोनदा आवाज देऊनही तो उठेना.मधेच अस्फुट आवाजात कण्हताना पाहुन तिने सहज कपाळाला स्पर्श करून पाहिले तर त्याचे अंग बंबासारखे तापलेले.

बापरेऽऽऽ किती अंग तापलेय ह्याचे..!

ती स्वत:शीच बोलत वेणूताईंना जोरजोराने हाका मारू लागली.वेणूताई पण घाबरूनच वेगाने सुहासच्या खोलीत आल्या.

वेणूताई- काय गंऽऽ काय झाले?

सुखदा-अहोऽऽ मावशी ह्याचे अंग बघा ना किती तापलेय तव्यासारखे.

तुम्ही जरा ह्याच्या जवळ बसा.तोपर्यंत मी डॉक्टरांशी बोलुन येते.

बरं म्हणत वेणूताई सुहासच्या जवळ बसल्या.सुहास अजुनही ग्लानीत अस्फुट आवाजात विव्हळत होता.आह्ऽऽऽ!!आईऽऽगं.!!

त्यावर काळजीनेच वेणूताईंनी विचारले -  खूप दुखतेय का रेऽऽ?

देवा लेकराला लवकर बरं वाटु दे रे!!

मनातल्या मनातच त्यांनी देवाकडे सुहासकरता साकडे घातले.

सुखदा- डॉक्टर सुहासला प्रचंड ताप आलाय.असे अचानक कसे झाले??

सुखदाने डॉ.पारसांना फोनवर विचारले.

त्यावर डॉक्टरांनी सांगितले,

डॉक्टर- मुकामार लागल्याने हा ताप आलाय.काळजीचे कारण नाही.ताप उतरण्यासाठीची एक टॅबलेट दुपारी जेवणानंतर आणि रात्री एक द्या.उद्या पर्यंत ताप उतरेल.पण नाहीच उतरला तर मला फोन करा.

 डॉक्टरांशी बोलुन फोन संपला.

ती तशीच पर्स घेऊन बाहेर पडली.

डॉक्टरांनी सांगितलेल्या टॅबलेट्स लगेच घेऊन आली.

 

एव्हाना सुहासला जाग आली होती.

वेणूताई त्याला गरम मऊ वरण भात भरवत होत्या.

बरे झाले हे काम वेणूमावशींनी केले.ती स्वत:शीच बोलली.त्याचे खाणे संपले तसे लगेच त्याला डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या टॅबलेट्सचे डोसेज दिले आणि त्याला पुन्हा आराम करायला सांगितला.

ती बोलताना सुहास तिच्याकडे एकटक निरीखून पहात होता.तिची सकाळपासुनची धावपळ.त्यात आदि आणि जीजाचेही करणे.तिचा चेहरा थकलेला वाटत होता.त्याने तिला प्रेमाने विचारले.

सुहास- तु जेवलीस का? तीन वाजुन गेलेत,कधी जेवणार???सकाळपासुन तुझी धावपळ चाललीय.त्यावर 

सुखदा- अरेऽऽ तुला जेवणासाठी उठवायला आले तर तु तापाने फणफणत होतास.मग डॉक्टरांना विचारून गोळ्या आणायला गेले.हे काय आता बसतेच की जेवायला.पण तु आराम कर आता.आणि जास्त बोलु नकोस त्रास होईल तुला..चल झोप..

आईप्रमाणे तिची दमदाटी त्याला ऐकायला खूप गोड वाटत होती.कोणीतरी आपली इतकी काळजी करतेय ही भावनाच किती सुखद असते.सुहास पुन्हा विचारांत हरवला.पण पाठमोऱ्या वळलेल्या सुखदाला त्यानेही लगेच सांगितले,"हम्मऽऽ.पण तुही जेवुन घे लवकर."

 

हो म्हणत एक छानसे स्माईल देत ती रूमबाहेर गेली.

आज सुहासची नजर मात्र तिलाच शोधत होती……….!

       ~~~~~~~~~~~~~~~

दोघांच्या मनामधे निर्माण झालेली भावनिक आंदोलने.तरीही मायेने एकमेकांची काळजी करणे हे सगळे चित्र वेणूताईच्या मनातली आशा लवकरच पुर्ण होण्याच्या दिशेने योजलेले नियतीचेच पाऊल तर नसेल…….???

काय घडेल पुढे????

----------------------(क्रमश:11)---------------------------------

क्रमश:11

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी.

आजच्या भागातला दोन विहीणींमधील प्रेमळ मैत्रीपुर्ण संवाद कसा वाटला?

दोन आया मग ती मुलीची आई असो की मुलाची पण त्यांच्या वेदना /समस्या सारख्याच असतात.परंतु बऱ्याचदा आपल्यावर उद्भवलेल्या घटनेला तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा कशी/कसा कारणीभूत आहे असे तक्रारवजा बोलणेच जास्त वेळा घडताना दिसते.

पण समस्येवर बोलुन एकत्रीत तोडगा काढुन एकमेकींशी असे खेळीमेळीने वागणाऱ्या विहीणी असतील तर नाती किती छान सांधली जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी मुद्दाम हे संवाद लिहीलेत.तुमच्या प्रतिक्रीया ऐकायला नक्की आवडेल.

ह्या दोघांचेही नाते विविध घटना प्रसंगातुन हळहळु सुधारणेच्या वाटेवर जातेय.

कथा तुम्हाला कशी वाटतेय ते कमेंटद्वारे नक्की सांगा.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.नावासहीत ही कथा नक्कीच शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका. 

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..