A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session965315ee058a371fc510a3de59fe87e83783c1e181310a296330026a0440520622e06287): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi 6
Oct 23, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग 6

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग 6

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-6

©®राधिका कुलकर्णी.


 

सुखदाने दारावरची बेल वाजवली.नलिनीताईंनी दरवाजा उघडला.सुखदा गुणगुणतच घरात आली.नलिनीताई विस्मयानेच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघु लागल्या.जाताना चेहऱ्यावर जे बारा वाजले होते ते चित्र आता पुरते उलट झाले होते.मधल्या दोन तीन तासांत अशी काय जादू घडली की हिचा मुड एकदम फ्रेश झाला.??

हा सुहासच्या भेटीचा परीणाम तर नाही!!!

आश्चर्य आणि प्रश्नांची विचित्र सरमिसळ झालेली पण जे काही बघत होत्या ते पाहुन निलिनीताईंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.देवी अंबाबाईचीच कृपा हो….!

मनोमन हात जोडले नलिनीताईंनी देवीला.

गेल्या कित्येक वर्षात सुखदाने कधी साधे गाणे ऐकलेही नव्हते गुणगुणणे तर फार दुरची गोष्ट.

पण आज हा चमत्कार ह्याची देही ह्याची डोळा त्या समक्ष घडताना बघत होत्या.

कमालीच्या आश्चर्यातच त्यांनी सुखदाला विचारले, " काय गं काय बोलला सुहास,तुमचे बोलणे झाले नाऽऽऽ?"

त्यावर सुखदा पाठमोरी तशीच रूममधे जाताजाता बोलली," प्लिज आई उद्या बोलू नाऽऽमी खूप थकलेय आत्ता आणि रात्रही फार झालीय.बायऽऽ.गुड नाईट!!"

गुड नाईट म्हणत तिने रूमचा दरवाजाही लावुन घेतला.

नलिनीताई अजुनच संभ्रमात तशाच आपल्या खोलीत गेल्या..

 

इकडे सुखदाने फ्रेश होऊन कपडे बदलुन उद्याची कॉलेजची तयारी करून बेडवर बसल्या बसल्या सुहासचे वॉट्सअॅप अकाऊंट उघडले.

मेसेज करू का?असा विचार करत दोनदा हात टाईप करण्या करता नेला आणि परत मागे घेतला.

तो काही गैरसमज तर करून नाही ना घेणार??

उगीच ओव्हर एक्साइटमेंट नको दिसायला.

पण ती आज सुहासच्या बोलण्याने खरोखरच इम्प्रेस झाली होती.

कित्येक वर्षांनी आज तिला खूप मोकळं मोकळ छान वाटत होतं.मनावरच ओझ दडपण उतरल्यासारखे वाटत होते आणि ह्या सगळ्याचे कारण होते सुहासच्या बोलण्यातली कमालीची आश्वासकता.

माणसाला शेवटी आयुष्यात काय हवे असते तर आश्वासकता.'चिंता नको मी आहे' ह्या  पाठिंब्याच्या दोन शब्दांची आश्वासकता आणि ती आज एका निर्मळ निर्लेप मनाकडुन तिला मिळाली होती.

एखाद्याबद्दल मनात पुर्वग्रहदुषित करून आपल्याच संकल्पनेच्या कोंदणात त्याला बसवुन जेव्हा व्यक्ती दुसऱ्यावर दोषारोपण करू पहाते आणि अचानक ती व्यक्ती सगळे अत:चक्षु जागृत करून जुन्या बरबट विचारांना साफ करून नवविचारांचा प्रकाश मन:चक्षुंवर टाकते तेव्हा हा असा आंतर्बाह्य बदल घडतो आणि हे घडवुन आणणारा तो योगपुरूष सुहास होता सुखदासाठी..

न राहवुन तिने शेवटी मेसेज केला

"Hi Suhas!! 

Hope you reached home safely. 

 wonderful evening spent with you !!!. 

You are the reason to add a smile on my gloomy face.

You are the reason to make me think positively. 

Thank you for teaching me how to think 'out of the box' when situations are really out of control. 

Thank you so much. 

(reply when wl be home.) 

Good night ! "

 

मेसेज सेंड करून फोन बाजुच्या सेंटर टेबलवर ठेवुन ती अंथरूणावर लवंडली.

तरीही विचारांचे आवर्तन चालुच होते.तसे पाहिले तर सुहासलाही नियतीने किती मोठा आघात दिला.जे व्हायला नको ते घडुनही त्याने स्वत:ला किती लवकर सावरले.प्रत्येक घटनेकडे समस्या म्हणुन न बघता त्याने त्यातुन मार्ग काढला.कोणावरही राग चीडचीड आदळआपट न करता सर्वात अगोदर परिस्थितीला स्वीकारले.जसे आहे तसे.

 

*जेव्हा समस्येकडे समस्या म्हणुन न बघता संधी म्हणुन बघतो तेव्हाच संधीचे सोने होते* 

 

असे कुठेतरी वाचले होते पण असे बरेच काही वाचुनही प्रत्यक्षात त्याला अंगीकृत करायची वेळ येते तेव्हा सामान्य मनुष्य फक्त रडत बसतो,मी तरी कुठे काय वेगळे केले?नेमके हेच तर केले….!

होऽऽऽ आला एक वाईट अनुभव माझ्या आयुष्यात पण त्याला किती कुरवाळायचे हे मी ठरवायला नको होते का?

व.पु म्हणतात -* 'इट जस्ट हॅपन्स' असे म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात ती जास्त जगतात.*

किती खरय हे…..!

आपण आपले अर्धे अधिक आयुष्य दु:ख कवटाळण्यात किंवा मग आश्रू गाळण्यात वाया घालतो किंवा मग आपल्या दु:खाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात घालतो.

पण सुहासने मात्र कसलाच त्रागा केला नाही सत्य स्वीकारले.समोर आलेल्या परिस्थितीचा सारासार विचार करून कुणावरही झाल्या घटनांचे पडसाद न उमटवता हलकेच मार्ग काढला.

जे त्याला जमले ते इतक्या वर्षात मला का जमले नाही?

खरच मी चुकतेय का?माझ्या आयुष्यात एकटेपण वाढुन घेऊन मी माझ्याच चुकांना कुरवाळत तर नाहीये ना ?

की;

 माझा ईगो सॅटीसफाय करतेय की माझाच निर्णय कसा योग्य होता...आहे.???

पण मग खरे काय आहे.?

आज इतक्या कमी वेळेत कमी शब्दात जे विचार सुहासने माझ्यापर्यंत पोहोचवले ते मला का कळले नाही?

का मी त्याच्या सारखा चौरस विचार करू शकले नाही?

का मी माझेच दु:ख कुरवाळत बसले?

 

"Life has no remote,we have to get up and change it by ourselves…!"

आता मला खरच बदलायला हवेय..तेही माझे मीच प्रयत्नपुर्वक…!

 

सुहास सारखा मित्र मिळणे ही किती भाग्याची गोष्ट आहे.समोर पंचपक्वान्नाचे ताट वाढुन

सरकवलेले असतानाही जर मी ते अव्हेरले तर मग माझ्याइतकी कमनशिबी मीच….!

हा विचार चाललेला असतानाच नोटीफिकेशनची रींग वाजली.

तिने घाईने बघितले.चेहऱ्यावर तेच स्माईल पसरले.सुहासचा रिप्लाय आला होता.

 "Just reached home.same here dear..great evening.

Thnx.GN!"

 

नेट बंद करून फोन बाजुला सारला परंतु

विचारांचे द्वंद्व काही केल्या संपत नव्हते.

आज मात्र सुखदाचा मेंदू पार हलला होता.आपल्याच विचारांवर पुनर्विचार करायला तिला बाध्य करत होता.सगळी जूनी जळमटे बाजुला सारून नात्यांची नवी वीण जोडण्यासाठी एक मन हलकेच पाऊले उचलायचे संकेत देत होते.

विचारांच्या नादात कधी झोप लागली कळलेच नाही तिला.

उद्याची पहाट नक्की काय नविन घेऊन प्रवेशणार होती हे अजुनही कोडेच होते.

        ~~~~~~~~~~~~~

आज घरात खूपच लगबग होती.

सगळीकडे सुवासिक अत्तरांचे शिंपण,पानाफुलांनी सजवलेले तोरण.

सनई चौघड्याचे आवाज येताहेत.हॉल मस्त नेटच्या रंगीबेरंगी पडद्यांनी सजवलाय.फुलमाळा रांगोळ्यांनी जागा सुशोभीत केलीय.

सुखदा सुंदर नववधुच्या वेशात हातात हिरवाचुडा भरून गौरीहार पुजतेय.हिरव्यागार शालूत तिचे सौंदर्य अप्रतिम खुलले होते.

सुखदा हे सगळे पाहुन आश्चर्यातच होती.किती कमी वेळात हे सगळे घडतेय हे खरेच घडतेय की……?"

तेवढ्यात आईचा आवाज आला,"अगं आवरले की नाही तुझे.लवकर आवर उशीर होतोय…….!"

"अगं सुखदाऽऽ..एऽ सुखदाऽऽऽ..आज ऊठायचे नाही का..वाजलेत बघ किती?"

नलिनीताईंनी गदगदा हलवुन उठवले तशी सुखदा स्वप्नातुन दचकुन जागी झाली…..

म्हणजे ते सगळे????सुखदा स्वत:शीच विचार करत पुन्हा त्या गोड स्वप्नात हरवली. 

स्वप्नच होते तरऽऽऽ..,!" ती स्वत:शीच हसत डोक्यात स्वत:ला टपली मारत अंथरूणातुन उठली.

नलिनीताईंना कालपासुन धक्क्यावर धक्के बसत होते.काल गाणे गुणगुणतच काय आली.कधी इतक्या वर्षात सकाळी उशीरा न उठणारी आज उशीरा काय उठते आणि गालातल्या गालात हसते काय लाजतेय काय..हिला नेमके झालेय तरी काय!!"

नलिनीताई विचार करत तिथेच उभ्या राहील्या. तेवढ्या वेळात सुखदा बाथरूममधे गेली पण आवरायला.

नलिनीताई पण तिचा डबा वगैरे उरकायला किचनकडे गेल्या.आत्ता विचार करण्याइतकाही वेळ नव्हता त्यांच्याजवळ पण एकंदरीत सुखदा मधले हे सगळे सकारात्मक बदल त्यांना सुखावुन जाणारे होते.

कितीतरी दिवसांनी ती मनमोकळ हसत होती.नाहीतर आयुष्यातले सगळे रस संपल्यागत तिचे ते निरस जगणे नलिनीताईंना प्रचंड वेदना देऊन जात असे.आता मात्र लवकरच काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळणार अशी त्यांची मनोमन खात्री पटली.

कधी एकदा सुखदा बाहेर पडतेय अन् मी हे सगळे वेणूताई म्हणजेच विहिणबाईंशी बोलतेय असे त्यांना झालेले.

           ~~~~~~~~~~~~

सुखदा सवयीनुसार कॉलेजला जायची सर्व तयारी आधीच करून ठेवत असे त्यात तिला उद्या कोणते कपडे घालायचे तेही आधीच काढुन ठेवलेले असत.

वॉशरूम मधुन बाहेर येऊन तिने आधीच काढुन ठेवलेली ग्रे साडी बघितली.मग काहीतरी ठरवुन ती न घालता कपाटातुन आज खूप वर्षांनी तिच्या आवडीची लाइट बेबी पिंक कलरची साडी व त्यावरचे मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाऊज काढले घालायला.

पटकन चेंज करून साडी नेसुन त्याला मॅचिंग इअरींग्ज शोधुन घातले.कॉलेजमधे प्रोटोकॉलप्रमाणे मेकअप चालत नसे तरीही तिने स्ट्रॉबेरी कलरचा लिपबाम ओठांवर फिरवला.

हलकासा काँम्पॅक्टचा हात फिरवला चेहऱ्यावर,मस्त परफ्युम भुरभुरवले अंगावर आणि कधी नव्हे ते स्वत:ला आरशात बघितले.तिच्या कर्ली स्टेपकट वर हलकासा ब्रश फिरवुन सगळे ओके असल्याची खुण पटताच तिने स्वत:च स्वत:च्या प्रतिबिंबाला एक गोड स्माईल दिली.

हातात फोन घेऊन एक सेल्फी घेण्याचा मोह आज तिने टाळला नाही.

लगेच सुहासला गुड मॉर्निंग सोबत सेल्फी सेंड केला.पुन्हा एक गोड स्माईल देत आपली पर्स आणि बॅग घेऊन बाहेर आली.नलिनीताई तिला बघुन थक्कच झाल्या.आज हा सूर्य पश्चिमेकडुन कसा काय उगवला!! पण हे सगळे मनातच  वरकरणी तसे न दाखवता त्यांनी तिचा डबा बॅगमधे भरला.आदिचाही डबा त्याच्या बॅगेत भरला.त्या मुद्दाम सुखदाच्या नजरेला नजर देणे टाळत होत्या.

कितीतरी दिवसांनी पोर इतकी गोड दिसतेय उगीच मी काही म्हणल्याने ती कॉन्शस होऊन पुन्हा तीच विटकी साडी नेसायला नको हा विचार करून त्या काळजी घेत होत्या.

एरवी स्वत:कडे फारसे लक्ष न देणारी,चुकुन आईने एखादी कॉम्प्लिमेंट दिली तरी तिकडे दुर्लक्ष करणारी आज मात्र स्वत:हुन नलिनीताईच्या पुढ्यात येऊन विचारत होती, 

"आई माझ्याकडे बघ नाऽऽ."

"हम्मऽऽ काय? बोल पटकन,मला कामं आहेत." नलिनीताईही मुद्दाम आपल्याला काहीच समजत नाही असे दाखवत बोलल्या.

अगं आईऽऽ नीट बघ नाऽऽ.कशी दिसतीय मी सांग नाऽ."

"अगं आता त्यात काय नविन आहे.छानच दिसतेस की नेहमीसारखीच."

हे ऐकुन सुखदाचा हिरमोड झाला.तु रोजच छान दिसते असे मोघम बोलणे तिला आज अपेक्षित नव्हते.तिचे मन खट्टू झाले पण जास्त वेळ नव्हता ह्या बाबतीत बोलायला.आज असेही उशीर झाला होता म्हणुन ती तशीच

" जाऊदे..तुला नाही कळणार..चल बायऽऽ"    म्हणत निघाली सुद्धा..

पण गाडीत बसल्यावर आदि मात्र लगेच म्हणाला,"wow  Sukhaai!! you look gorgeous today…!!!

त्यावर तिने हसुन आदिचा गोड पापा घेतला आणि म्हणाली "Thanks darling…!"

हसतच तिने गाडी स्टार्ट केली.आदिला सोडून कॉलेजला पोहोचली.गाडी पार्क करून लेक्चरर्स स्टाफ केबीनकडे जाईपर्यंत आज जवळपास पंचवीस एक माना तरी तिला तीच आहे का खात्री करायला वळल्या होत्या.आज तिला खूप जण जाणीवपुर्वक निरखुन पाहताहेत लक्षात येऊनही तिने आज तिकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले.

आज तिची अवस्था मनिषा कोईरालाच्या 

"आज मै उपर आसमा नीचे;

आज मै आगे,जमाना है पिछे……"

ह्या गाण्यासारखी झाली होती. 

आज ती खरचचं खूप गोड दिसत होती.

परंतु अजुनही एक अपेक्षित कमेंट न आल्याने ती थोडी अपसेट होती.

कॉलेज अवर्समधे फोन अलाऊड नसल्याने तिला लवकरात लवकर त्या एका मेसेजची अपेक्षा होती.अखेर आता लेक्चरची वेळ होणार म्हणुन फोन स्वीच आॅफ करणार इतक्यात तिचे लक्ष ब्लिंक होणाऱ्या पिंक लाईटकडे गेले.

 

एखाद्या कॉलेज गोईंग तरूणीला जो उत्साह असतो त्याच उत्साहात तिने फोन बघितला.

होऽऽ सुहासचाच मेसेज होता.तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल पसरली.आजुबाजुचा स्टाफ तिच्या ह्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवुन असेल ह्याची पर्वा न करताच तिने मेसेज वाचला.

"Good morning Sukhada!" 

"Looking gorgeous in baby pink saree..!" 

"Stay blessed..!" 

मेसेज वाचुन ती खूपच खुष झाली.साडीचा गुलाबी रंग गालांवरही चढला लगेच.

तिचे तिलाच समजत नव्हते की अशी काय जादू झालीय की ती एकदम तिच्या स्वभावाच्या विपरीत वागतेय.

मन आज थाऱ्यावरच नव्हते तिचे.

मन धागा धागा जोडते नवा…..!! तसे काहीसे चाललेले ...

आपल्याच विचारात क्लासरूमकडे जात असताना कॉरीडॉरमधे एक स्टुडंट जवळुन जाता जाताच " हॅप्पी बर्थडे मॅडम !!" विश केला.

तिला मनातुन हसु आले पण त्याला थँक्यु म्हणुन वेळ मारून नेली तिने.

पण मागेच गुणे मॅडम क्लासवर जात होत्या त्यांनी ते एेकुन विचारलेच," हाय सुखदा हॅप्पी बर्थडे डिअर!!"

"गु़ड मॉर्निग गुणे मॅडम.!"

"थँक्यु... पण आज माझा बर्थडे नाहीये." 

तिने हसुनच सांगितले.

"अगंऽऽऽ पण त्या स्टुडंटला तर तु थँक्यु म्हणालीस.आणि आज तु एवढी छान नटुन आलीस तर मलाही वाटले की आज तुझा नक्की बर्थडे असणार.छान दिसतेस हं आज खूप! "

आता ह्यावर काहीतरी सारवासारव करणे भागच होते.तिच्यातली पुर्वीची अवखळ सुखदा पुन्हा जागी झाली.आणि एक नविनच कहाणी तिने मॅडमला दिली ठोकुन…..

"अहो आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि तिचा आग्रह होता ही साडी वगैरे नेसायचा मग तिची इच्छा मोडवेना म्हणुन…!"

"आणि हे कारण मुलांना कुठे सांगत बसणार म्हणुन त्याला थँक्यु म्हणुन सुटका करून घेतली तात्पुरती.." 

"अच्छाऽऽ असे आहे होयऽऽ तरीच मी म्हणतेय आज तु इतकी वेगळी का दिसतेय.साडी,मॅचिंग इअरींग्ज अँड ऑल..Good Good..looking great..!!"

"बर आईंना माझ्या विशेश कनव्हे कर हं.चल लेट होतेय लेक्चरला.बाय."

 

सुखदाही नेहमीप्रमाणे सगळे लेक्चर्स उरकुन आज कोणत्याही क्लासला न जाता सरळ घरीच पोहोचली.

अचानक लवकर घरी येण्याने नलिनीताई धास्तावल्या.

"काय ग लवकर कशी आलीस आज,तब्येत बरीय ना…?"

त्यांची काळजी स्वाभाविकच होती.

"आज कंटाळा आला.वाटले आज तुझ्याशी मस्त गप्पा माराव्यात म्हणुन क्लासेस बंक करून आले डायरेक्ट." काळजी करू नको मी व्यवस्थित आहे..डोण्ट वरी…"

"हम्मऽऽ..मग हरकत नाही.आजकाल थोडेसे जरी विपरीत काही घडले की धास्तावायला होते...काळजी वाटते दुसरे काय?"

 

हि दिवसभरातली तिसरी धक्कादायक घटना.

कारणाशिवाय कधीच लवकर तेही क्लासेस बुडवुन घरी...!!….सुखदा..!!

हे म्हणजे जगातले आठवे आश्चर्य!!!!

 पण आज आश्चर्याचे धक्क्यावर धक्के नलिनीताईंना बसत होते खरे…!

 ~~~~~~~~~~~~~~~~~

 सुखदा फ्रेश होऊन टेबलपाशी आली.  नलिनीतीई आल्याचा गरमागरम चहा घेऊन डायनिंगपाशी येऊन बसल्या.

चहाचा एक घोट घेताच मस्त तरतरी आली.

काहीतरी आठवले तसे सुखदा लगेच 

म्हणाली, "अरे होऽऽऽ सांगायचेच राहीले,आज आमच्या गुणे मॅडमनी तुझी आठवण काढली गंऽऽ!!"

ह्या वाक्यासरशी मिश्कील हसली सुखदा.

त्यावर नलिनीताई," माझी आठवण?तेही गुणे मॅडमना?का गं?" तिच्या मिश्कील हसण्याचा क्लु लावण्याचा प्रयत्न करत नलिनीताई विचारमग्न झाल्या.

त्यावर सुखदानी कॉलेजमधे घडलेला सर्व किस्सा इथ्यंभुत कथन केला आणि हसायला लागली जोरजोरात.

"काय हे सुखदाऽऽऽ अशी मस्करी करतात का? तुझ्या सिनियर आहेत ना त्या? किमान त्यांच्या वयाचे तरी भान ठेवायचेस..हे जरा अतिच केलेस हंऽऽऽ तु."

"बरे झाले त्यांनी परस्पर फोन केला नाही मला नाहीतर आत्तापर्यंत मस्करीची कुस्करी झाली असती." नलिनीताईंनी शांतपणेच पण सुखदाला समज दिली.

त्यांना असे खोटे बोललेले आवडले नाही.

 

फक्त ह्या सगळ्यात एकच समाधान देणारी बाब म्हणजे सुखदाची गाडी पुन्हा एकदा पुर्वपदावर येत होती.

आधी सर्व काही ठिक असताना दोघी बहिणी मिळुन अशा बऱ्याच प्रँक्स करायच्या परंतु नंतर सगळा उत्साहाचा धबधबा एकाएकी शांत व्हावा तसे झाले होते सुखदाच्या बाबतीत.पण आजची ही घटना द्योतक होती की ती पुन्हा माणसांत येत होती..तिच्या मूळ रूपात…."

 

आईला असे एकट्यातच विचार करताना बघुन सुखदा आईजवळ येऊन बसली तिचा हात हातात घेऊन म्हणाली,"अगं किती काळजी करतेस आईऽऽएवढे काही घडले नाहीये."

"आणि उद्या मी हवेतर स्वत:हुन सांगेन त्यांना मग तर झाले.आता हास पाहु.तुला असे चिंताक्रांत बघुन छान नाही वाटत."

त्यावेळी मला काही पर्यायच सापडेना नाऽऽ काय सांगु कारण त्यांना माझ्या आजच्या छान तयार होण्याचे...म्हणुन चिकटवली स्टोरी आणि सोडवुन घेतले स्वत:ला.." हसतच बोलली सुखदा.

"कारण तर मलाही कुठे माहितीय गं तुझ्या आजच्या नटण्याथटण्याचे…!" हे वाक्य नलिनीताई आपल्याच मनाशी बोलल्या.जोवर सुखदा स्वत:हुन सांगत नाही त्या काहीच विचारणार नाहीत हे त्यांनी ठरवुनच टाकले होते मनाशी.आणि जे जे होते ते चांगल्या साठीच तर वाट पाहुया….

इकडे सुखदाची बडबड चाललेली... 

"बघ तुला विचारले सकाळी कशी दिसतीय मी तर तु काय बोललीस नेहमीसारखीच तर दिसतेस पण आज मी कॉलेजमधे जे काही अनुभवले ते आठवुन तर तु खोटे बोललीस  माझ्याशी असेच वाटतेय आता…!"

"सकाळी तुच खरे बोलली असतीस तर मला असे खोटे बोलायला लागले असते का सांग ..म्हणजे ह्यात पण तुझीच चुक आहे हं…."

ती पुन्हा आईला चिडवायला लागली.

 

आज ती वेगळ्याच मूडमधे दिसत होती.नलिनीताईंनीही हसुनच दुजोरा दिला,"हो ग बाई तुझेच खरेय.माझेच चुकले.मीच खोटे बोलले.तु मॅथ्स प्रोफेसर ऐवजी वकीलच व्हायला हवे होतेस. "

"हम्मऽऽ आत्ता कशी खरे बोललीस.मग सकाळीच हे का नाही बोललीस ह्याचे उत्तर दे."

त्यावर नलिनीताई,"नाही बोलले,आता काय माझी उलटतपासणी घेणारेस का? आपल्या लेकराला आपलीच दृष्ट लागु नये म्हणुन नाही बोलले खरे.आणि काय गॅरेंटी माझ्यामुळे तु लगेच साडी बदलली नसतीस?? मागे एकदा केलेलेस ना असे म्हणुन फार कौतुक केले नाही."

"हम्मऽऽ..बघ आत्ताशी तुझी खरी भीती समोर आली. पण आई तुला खरे सांगु आज मला स्वत:लाच खूप बरे वाटले चार लोकांकडून माझे कौतुक ऐकुन."

"मी आत्तापर्यंत माझ्याच कोषात वावरत होते त्यामुळे जगाचे भानच विसरले होते.मरता येत नाही म्हणुन जगणे चाललेले त्यात आशेचा एकमेव किरण जगायला ऊर्मी देत असेल तर ती  ही दोन लेकरं."

"त्यांच्यामुळे तरी मला जगायचे उद्दिष्ट सापडले.पण स्वत:साठी जगावे अस कधी वाटलेच नाही इतक्या वर्षात."

"आज खूप मोकळं मोकळं वाटतेय.पाऊस पडुन गेल्यावर आकाश जसे निरभ्र स्वच्छ दिसते ना अगदी तसे…!"

 

नलिनीताई तिला हाताला स्पर्शुन फक्त तिचे सहानभूतीपुर्ण नजरेने सर्व ऐकत होत्या.आज त्यांची माणसांच्या बाजारात हरवलेली लेक त्यांना पुन्हा गवसली होती...त्याही भावूक होऊन स्पर्शानेच तिचे सांत्वन करत होत्या.

वातावरण जरासे कुंद झाले होते पण हे आकाशही लवकरच मोकळे होणार ही खात्री होती नलिनीताईंना.

अजुनही बराच पाऊस पडायचा बाकी होता.सुखदा कधी एकदा बोलती होतेय ह्याची वाट पहात होत्या नलिनीताई.

कारण भावनांचा सगळा नीचरा झाला की स्वच्छ झालेल्या आभाळाखाली त्यांनाही दोन फेर धरायचे होते...स्वत:चे….मनसोक्त…. …!!

-------------------(क्रमश:6)----------------------------

(क्रमश:-6)

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार वाचक मंडळी…

सुखदा हळुहळु बदलतेय.तिला उपरती होतेय.

कसा वाटला सहावा भाग.?

कथा आवडतेय ना मग पटपट मला कमेंट्स करून कळवा की तुम्हाला नेमके काय आवडतेय.

पुढेही काय बघायला आवडेल हेही सांगा.

तुमच्या प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.ही कथा माझ्या नावासहीत नक्की शेअर करू शकता.माझी त्याला परवानगी आहे.फक्त साहित्यचोरी कृपया करू नका.तो कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.)

धन्यवाद.

@राधिका कुलकर्णी.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..