A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314c8e05a37bdad644feb1d15af68560beb8ac85d1b6): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi 4
Oct 29, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग 4

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग 4

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-4

©®राधिका कुलकर्णी.

 

नलिनीताईंनी सुखदाकडे वेणूताईंचा प्रस्ताव मांडुन आज चार दिवस उलटुन गेले होते परंतु सुखदाने अजुनही म्हणावा असा काही निर्णय घेतलेला नव्हता.त्यामुळेच न राहवुन त्यांनी तिला रात्री आठवण करून दिली.काहीतरी निर्णय लवकरात लवकर घे असे बजावुन त्या आपल्या खोलीत निघुन गेल्या.

सुखदाने आदिच्या मॅथ्सचे प्रॉब्लेम्स सोडवण्यात मदत केली नंतर जीजाला झोपवता झोपवता आदिही तिथेच पेंगुळताना पाहुन ती जीजाला एका अंगावर नीजवुन आदिला उचलुन आई वडिलांच्या खोलीत गेली.आदि रोज आज्जीजवळच झोपायचा.आज अभ्यास करता करताच तो सुखदाच्या बेडवर पेंगायला लागला.दोघांना घेऊन तिच्या बेडवर खूप अडचण होई म्हणुन तो आज्जीजवळच असायचा.

तेच निमित्त करून सुखदा आईच्या खोलीत गेली.

बाबा त्यांच्या जागी बसुन काहीतरी वाचन करत होते आई पण झोपायचीच तयारी करत होती.आदिला आईच्या बेडवर झोपवुनही तीला तिथेच घुटमळताना पाहुन नलिनीताईंनी विचारले,"काय ग्ंऽऽ काय झाले?काही हवेय का?"

"अंह्ऽऽ.." सुखदाने मानेनेच नकार दिला.

"मग काही दुखतेय का?डोके वगैरे?गोळी देऊ का?"

"अगं नाहीऽऽ गं.बरीय मीऽऽ"

सुखदाने वैतागुनच उत्तर दिले.

कधी कधी आपल्या मौनाची भाषा समोरच्याला न बोलताच कळावी अशी अवाजवी अपेक्षा आपण करतो.पण नात्यांच्या ह्या दुनियेत बऱ्याचदा न बोलल्यानेच नात्यात गैरसमज होतात किंवा नात्यात फारकतही येते.

इथेही सुखदाला नेमके हेच वाटत होते की तिच्या मनातली खळबळ आईला न बोलताच कळावी.पण दुर्दैवाने तसे घडणे शक्य नव्हते.बोलण्यावाचुन पर्याय नाही हे कळल्यावर तीने मनातल्या मनात शब्द जुळवणी केली.इकडे ती किती वेळची नुसतीच ऊभी आहे बघुन नलिनीताईंनी विचारले,"अगं मग काय हवेय?का घुटमळतीएस?काही बोलायचेय का तुला?"

हुश्श..! आत्ता कुठे नलिनीताईंना कळले की ती इकडे नुसतीच पुतळ्यागत का उभी आहे.

लहानपणापासुन सुखदा अशीच होती.काही हवे असले की तोंडाने सांगणार नाही.मग आपणच काय ते जाणुन घ्यावे तेव्हा कुठे ती बोलती व्हायची.

वयाचा इतका मोठा टप्पा पार होऊनही तिच्या स्वभावातला हा गूण आजही बदलला नव्हता.

सुखदाने मानेनेच होकार भरला.

नलिनीताई लगेच म्हणाल्या, "अगं मग बोलऽऽ उभी का नुसतीच?"

थोडा पॉज घेत ती म्हणाली,"आई-बाबा उद्या शनिवारी मला दोनच लेक्चर्स असतात त्यामुळे मी दोन वाजेपर्यंत फ्री होऊन जेवायला घरीच येईन.तर डबाही नेणार नाही."

"आणिऽऽ……!"

"आणि???काय!!"

नलिनीताईंनी खुणेनेच प्रश्न केला.

त्यावर सुखदाने अडखळतच वाक्य पुरे केले,

"आणि…..आल्यावर मला तुमच्या दोघांशीही आत्ता तु ज्या विषयावर बोललीस त्यावरच थोडे बोलायचेय.आत्ता बोलले असते पण मग झोपायला उशीर होईल आणि सकाळी मला जायची घाई अाहे सोऽऽ आत्ता नको."

 

अगदी मोजक्या शब्दात त्रोटक बोलुन ती खोली बाहेर पडली.

 

नलिनीताई आणि रणजितराव एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते.

ज्या निर्विकार चेहऱ्याने सुखदा दोघांशी बोलली ते बघता उद्या ही नेमके काय सांगणार ह्याचा कुठलाही अंदाज दोघांनाही लागत नव्हता.

 

देवा जे काही तिच्या डोक्यात चाललेय ते चांगलेच निष्पन्न होऊ दे रे बाबा अशी मनातल्या मनात प्रार्थना करत दोघेही झोपी गेले.

       ~~~~~~~~~~~~~~

दुसरा दिवस उजाडला.सकाळची घाईची वेळ.आदित्यची शाळा त्याचे सगळे आवरणे डब्याची घाई.जाताना तो थोडा मऊ तूप मेतकुट भात खाऊन जात असे.अशी सगळी गडबड पार पडत सुखदासह आदिही घराबाहेर पडला.

नलिनीताईंचे चित्त आज थाऱ्यावरच नव्हते.दुपारी सुखदा काय निर्णय ऐकवतेय ह्याचीच चिंता लागलेली त्यांना.

सतत मनात देवाचा धावा चाललेला.

"ह्या पोरीला योग्य निर्णय घ्यायची सद्बुद्धी दे रे देवाऽऽ."

सगळी कामे रोजच्या सारखीच होत होती परंतु आज त्यांचे मन कुठेच लागत नव्हते.काळजीने त्यांना पोखरले होते.

बघता बघता घड्याळाने दोनचा टोल दिला तसे त्यांच्या ह्रदयाची धडधडही अचानक वाढली.मन सैरभैर झालेले.

तेवढ्यात सुखदाच्या गाडीचा हॉर्न वाजला आणि त्या सावध झाल्या.

लगबगीने दरवाजा उघडुन त्या जेवणाची तयारी करायला लागल्या.जीजाचे जेवण होऊन तिला नुकतेच झोपवले होते म्हणजे आता बोलताना कुठलाही व्यत्यय येणार नव्हता मधे.सुखदा तोंड हातपाय धुवुन लगेच डायनिंगटेबलपाशी येऊन बसली.

नलिनीताईंनी पाने घऊन रणजितरावांनाही जेवायला बोलावले.जेवताना तिघेही शांतच होते.कुणीच कुणाशी बोलत नव्हते.एक अनामिक तणाव वातावरणात निर्माण झाला होता.

शेवटी एकदाची सर्वांची जेवणे उरकली तसे हात धुवुन सगळेच पुन्हा टेबलाशी गोळा झाले.

बराच वेळ कोणीच काही बोलत नाही पाहुन नलिनीताईंनीच सुरवात केली, " हम्मऽऽ बर तु काय म्हणत होतीस काल?काय बोलायचेय तुला?"

त्यावर सुखदाने एक सुस्कारा सोडला हम्मऽऽऽ!!

"आई/बाबा मी काय निर्णय घेतलाय किंवा माझा निर्णय झालाय की नाही ह्याहुनही महत्त्वाची बाब मला तुम्हा दोघांना विचारायचीय.गेल्या चार दिवसा पासुन माझ्या डोक्यात किडा वळवळतोय पण मला उत्तर मिळाले नाही म्हणुन नाईलाजाने मला तुम्हाला विचारावे लागत आहे."

तिचे असे कोड्यात बोलणे दोघांनाही संभ्रमात टाकुन गेले.हिला नेमके विचारायचेय तरी काय जे गेल्या चार दिवसापासुन हिच्या डोक्यात खदखदतेय??"

तरीही धीर करून बाबाच म्हणाले," अगं मग विचार ना? कसला एवढा विचार चाललाय तुझ्या डोक्यात?"

"बाबा,चार दिवसापुर्वी आईने मला वेणूमावशींच्या फोनबद्दल सांगितले.तुम्हालाही माहितच असेल,आईने तुम्हालाही सांगितलेच असेल…!"

"हो सांगितले ना...पण मग त्याचे काय?" बाबांनी आश्चर्यानेच प्रश्न केला.

"मला त्यांच्या फोनबद्दल आक्षेप नाहीच आहेऽऽ.माझ्या डोक्यात वेगळाच विचार चाललाय."

"मग बोल की बाळा, काय चाललेय तुझ्या मनात.?" आता नलिनीताईंनीही रणजितरावांप्रमाणेच तिला विचारले.

"वेणूमावशींना सुहासची काळजी वाटते,त्यांना त्याचे लग्न करावे वाटतेय इथवर सगळे ठिक आहे पण मला हे समजत नाहीये की आईच्या म्हणण्यानुसार त्यांना मी लग्नासाठी मुलगी म्हणुन पसंत आहे आणि ह्या पसंतीवर सुहासनेही पसंती दाखवली???

हे कसे काय?"

त्याला मला विचारावे नाही वाटले की मी तयार आहे की नाही?"

 

गेली चार वर्ष त्याने मला पाहिलेय.मी कित्येकदा ह्या बाबतीतली माझी मते त्याला स्पष्टपणे सांगुन झालेली आहेत.जेव्हा इतर स्थळे घेऊन तुम्ही मला लग्नासाठी तयार करू पहात होतात ना तेव्हा एक दोनदा त्यानेही मला ह्या बाबतीत तुमचे ऐकावे म्हणुन सांगायला बोलणी केली होती तेव्हा मी त्याला माझे लग्नसंस्थे बाबतीतले विचार नीटपणे सांगितले होते.मग असे असतानाही माझ्याशी एकदाही बोलावेसे नाही वाटले त्याला?"

"तो डायरेक्ट होकार कळवुन मोकळा झालाऽऽ,,धिस इज अॅब्सल्युटली रिड्डीक्युलस आय टेल यु."

"मला हे अजिबात आवडलेले नाहीये.आणि ह्या सगळ्याचा छडा जोवर लागत नाही मी कोणत्याही निर्णयापर्यत पोहोचु इच्छित नाही."

"अॅम अॅक्च्युअली हर्ट.."

"इतरांचे ठिक होते पण ह्याला माझी सगळी परिस्थिती ठाऊक असुनही……. खरच मला समजत नाहीये मी काय रिअॅक्ट व्हावे."

बोलता बोलता सुखदाचा कंठ दाटुन आला.

 

तिच्या मनातली ती खळबळ ऐकुन नलिनीताईंना काळजीही वाटली आणि भीतीही वाटु लागली. भीती ही की आता जर हिला समजले की हे सगळे आम्ही आयांनीच रचलेले नाटक आहे तर ही काय निर्णय घेईल??"

तरीही हिंम्मत करून त्या बोलल्या," मी काही बोलु का सुखदा? म्हणजे बघ हंऽऽऽ,कदाचित असे असु शकेल की मुलांना तुझा किती लळा आहे पाहुन वेणूताईंच्या मनात हा विचार आला असेल.

तोच त्यांनी सुहास पुढे मांडला असेल आणि आपली आई विचारतेय म्हणुन सुहासरावांनीही फार खोलात न शिरता मुलांसाठी होकार दिला नसेल कशावरून??

मुलांसाठी तुझ्याहुन चांगली आई कोण होऊ शकेल ह्यावर सुहासरावांचेही मतैक्य झाले असेल तर???"

"आता ह्याहून जास्त डोके लावणं मी तरी करू शकत नाही.मला इतकेच वाटते जास्त काथ्याकुट न करता तु तुझा निर्णय घ्यावास."

 

आईच्या ह्या बोलण्यावर तीही थोड्यावेळाकरता निरूत्तर झाली पण मनातली खळबळ संपलेली नव्हती हे तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं.

शेवटी काहीतरी ठरवुन तिने एक निर्णय आई बाबांना ऐकवला," उद्या रविवार म्हणजे सुहास मुलांना भेटायला येईलच.मी विचार करतेय की उद्या त्याच्याशी समोरासमोर स्पष्टच बोलावे म्हणजे सगळे समज गैरसमज दूर होतील आणि मग पुढचा निर्णय काय घ्यायचा हा विचार करायला वेळ मिळेल.काय वाटते तुम्हाला?"

तिने आई बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारले.

त्यावर आई बाबाही म्हणाले,"अरे बोला नाऽऽ.सुहासही असेच बोललेत ना वेणूताईंना की ते आधी तुझ्याशी बोलतील आणि मग तुम्ही दोघे जर सहमत असाल तरच हे नाते पूढे जाईल..त्यामुळे तु उद्याच बोल सुहासशी."

"हम्मऽऽ ठिक आहे.मी कळवते त्याला फोन करून की ऊद्या आपण भेटतोय असे.चालेल ना?"

"चालेल,कळवुन टाक."

अखेरीस मिटींग संपली.हो मिटींगच ..किती ते सवाल जवाब..आई बाबांची तर पुरती नामुष्की झालेली.कशीबशी नलिनीताईंनी बाजू सावरली होती.नाहीतर आज काही खरे नव्हते.

अखेरीस हा सगळा वृत्तांत वेणूताईंना कळवणे भाग होते म्हणजे त्याही थोड्या सतर्क होतील.

पण सुखदा समोर तर हे शक्य नव्हते.नलिनीताई योग्य संधीची वाट पहात होत्या.

अखेरीस संध्याकाळी नाईटस्कूल करता सुखदा बाहेर पडली आणि नलिनीताईंना हवी ती संधी मिळाली.

त्यांनी घाईनेच वेणूताईंचा नंबर फिरवला.

पलिकडुन लगेच वेणूताईंनी फोन उचलला," "बोला विहीणबाई!!" 

वेणूताईं मुद्दाम विहिणबाई शब्द वापरून मिश्कील हसल्या.

त्यावर नलिनीताईंनाही हसु आले हसु आवरतच त्यांनी पण मस्त काव्यात्मक उत्तर दिले…...

"अहो विहिणबाईंची 

फजिती नका विचारू।

लेकीची मिटींग म्हणजे

जणु अडकित्यात सूपारी।।

 

त्यावर वेणूताईंनी हसतच विचारले,"बापरे एवढे काय झालेय??"

 नलिनीताई-" काय झाले काय विचारताय इकडे आग लागलीय आमच्याकडे."

वेणूताई (चकीत होऊन) -" म्हणजे?काय झाले?" 

नलिनीताई -"अहोऽऽ मी व्यवस्थित विषय असा पोहोचवला की तिला चुकुनही शंका येऊ नये की हा आपला प्लॅन आहे.मला वाटले ती करेल काहीतरी विचार पण आज ती वेगळेच काहीतरी बोलली."

"काय म्हणाली? " वेणूताईंनी आश्चर्यानेच प्रश्न केला.

त्यावर नलिनीताईंनी मग सगळा किस्सा अथ पासुन इति पर्यंत वेणूताईंना ऐकवला.

आणि म्हणाल्या, "आता ती उद्या सुहासला ह्याचा जाब विचारायचा म्हणतीय.मला तर काही सुचेनासे झालेय.उद्या सुहासनी जर भाबडेपणाने तुमचे नाव घेऊन सांगितले तर मग तिला नक्की आपल्या दोघींचा संशय येईल.काय करावे काही समजत नाहीये.

नलिनीताईनी भडभड आपले मन मोकळे करून टाकले वेणूताईंपूढे.

 

त्यावर चिंताक्रांत होऊन वेणूताईंनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाल्या," हे बघा नलिनीताई आपण जे केले दोघांच्या भल्याचा विचार करून केले.आता परमेश्वरावर सारे सोडुन देऊन शांत बसुया.कारण त्याच्या मर्जी शिवाय आपले पान तरी हालते का मला सांगा?आपल्यालाच गर्व असतो हे मी केले.ते माझ्यामुळे झाले.परंतु परमेश्वर जोवर ग्रीन सिग्नल देत नाही तोवर आपल्या हातुनही काहीच घडत नाही आणि मला खात्री आहे ह्यावेळी देव आपल्या पाठिशी आहे,तो नक्की ह्यातुन मार्ग काढेल.तुम्ही अजिबात चिंता करू नका.सगळे छानच होईल पहा तुम्ही."

वेणूताई बोलत होत्या आणि नलिनीताई मुकपणे त्यांचे बोलणे एेकत होत्या.आता परमेश्वरावरच त्यांचीही भिस्त होती.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि फोन संपला.

       ~~~~~~~~~~~~~~~~~

रात्री बिछान्यावर बसुन सुखदा विचारच करत होती सुहासला मेसेज करू की फोन.

सुहासने अचानक लग्नाला होकार दिल्याने नकळत का होईना सुखदाला पुर्वीच्या मैत्रीचे नात्यात एक दरी निर्माण झाल्यासारखे वाटत होते.

 का कुणास ठाऊक एक परकेपणा जाणवत होता त्याच्याशी बोलण्यात.

पुर्वीइतके सहज वाटत नव्हते.

काय करावे?शेवटी तिने मेसेज केला.

"हाय सुहास!थोडे बोलायचेय.वेळ आहे का?"

त्याचा रिप्लाय यायची वाटच पहात होती की सुहासने डायरेक्ट फोनच केला.

"हाय!बोल काय म्हणतेस?"

सुहासचे इतके सहज काहीच न घडल्यागत संभाषण तिला पचनी पडत नव्हते.

आपल्या विचारांना तात्पुरते बाजूला सारून ती म्हणाली," काही नाही उद्या जीजा/आदिला भेटायला येणारेस का?"

"होऽ म्हणजे काय..मागच्या वेळी आलो नाही तर आदि केवढा फुरगटुन फोन केला मला.

सो धिस टाईम कान्ट मिसऽऽ…"

"हम्म..!"

"बरंऽऽ! तु बोल ना काय बोलणार होतीस?"

"मला तुझ्याशी थोडं बोलायचय."

"मग बोल की."

"असे फोनवर नाही सांगता येणार.वॉन अ मीट अँड डिस्कस..उद्या भेटुयात?"

सुखदानी विषय मांडला.

"यस व्हाय नॉट.."

सुखदा- "कुठे,किती वाजता?"

सुहास- "तु सांग."

सुखदा- हम्म...आपले ते 'कॅपिचिनो कॅफे' ला चालेल?"

सुहास-"ओके टाईम?"

सुखदा-"तु सांग.."

सुहास-"समव्हेअर अराऊंडऽऽ 7pm?"

सुखदा-"डन.विल बी देअर अॅट शार्प 7pm."

सुहास-"नो.आय वील पिक यु फ्रॉम होम."

सुखदा-"आेकेऽऽ पण मग मुलांचे काय?"

सुहास-"मी त्यांना आधी फिरवुन आणेन मग त्यांना घरी सोडुन तसेच तुला पिक करेल.चालेल ना?"

सुखदा-"ओकेऽऽ.भेटु मग उद्या..बाय.गुड नाईट."

गुड नाईट करून सुखदाने लगेच फोन डिस्कनेक्ट केला.

सुहासला तिचे इतके औपचारिक बोलणे जरासे खटकले.नेहमी हसुन खेळुन बोलणारी सुखदा आज अशी एखाद्या अनोळख्याशी बोलावे तसे का बोलली?आज आईची चौकशी नाही मुलांबद्दल काही सांगणे नाही.

बोलणे झाले की फोन कटऽऽ….ही बरीय ना!!"

सुहास मनोमन विचार करतच बेडवर लवंडला.

दिवसभराच्या थकव्याने त्याला पडताच झोप लागली.

इकडे सुखदा मात्र तळमळत होती.रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर.मनात विचारांचे काहूर.सुहासशी नेमकी कशी सुरवात करायची.कसे बोलायचे,काय बोलायचे ह्याची मनातल्या मनात जुळवणी करणे चाललेले.

विचारांच्या तंद्रीत कधीतरी उशीरा तिला झोप लागली.

       ~~~~~~~~~~~~

सकाळचे आठ वाजून गेले तरी सुखदा अजुनही झोपलेलीच होती.आज कॉलेज नसल्याने नलिनीताईंनीही तिला उठवले नाही पण आता ऊन्ह वर आली, इतक्या वेळ ती सुट्टीच्या दिवशीही झोपत नाही मग आज काय झाले..हा विचारच करतच नलिनीताई सुखदाच्या खोलीत आल्या.

सुखदा अजुनही शांत झोपली होती.त्यांनी कपाळाला हात लावुन पाहिला.पण गरम वगैरे नव्हते.त्यांना हायसे वाटले.

नलिनीताईंना तिला उठवण्याची मुळीच इच्छा होईना.त्यांनी हलकेच तिचे पांघरूण नीट केले डोक्यावरून हात फिरवुन जाऊ लागल्या तसा सुखदाने त्यांचा तोच हात हातात घेऊन उशीसारखा डोक्याखाली घेतला.

नलिनीताईंच्या स्पर्शाने तिची झोप चाळवली होती तरी उठावेसे वाटत नव्हते म्हणुन आळसावुन ती तशीच आईच्या हाताला मिठी घालुन पडुन राहीली.

त्यावर नलिनीताई तिच्या जवळ बसत म्हणाल्या,"आज उठायचे नाहीये का माझ्या राणीला..?"

"किती वाजलेत बघितलेत का?"

"अंऽऽ,आईऽऽ थांब ना इकडेच.मला थोपट ना मघासारखे.."

अगं एऽऽऽ वेडाबाई.माझी कामे खोळंबलीएत.

चल सोड मला.आवरू दे.आदि पण उठलाय.

त्याला दूध द्यायचेय,बाबांचा चहा,नाष्ट्याचे बघायचेय.आज सुहासही येणार ना पोरांना भेटायला.त्याच्या आत सगळे आवरून व्हायला हवे दोघांचे."

सुहासचे नाव ऐकताच सुखदाची झोप एकदम उडाली.ती ताडकन बेडवर उठुन बसली.

"हो खरच की मी विसरलेच होते."

चल पटपट आवरू दोघी मिळुन.मी आलेच फ्रेश होऊन.तोवर चहा कर ना आई.मस्त गवतीचहा घालुन कर.."

ती लगबगीने बेडवरून उठली.जीजाचे सगळे आवरले.तिची अंघोळ खाणे सगळे उरके पर्यंत अकरा वाजुन गेले.सुहासची यायची वेळ होत आली होती.

तेवढ्यात सुहासही आला.नेहमीप्रमाणे तो कॅज्युअल इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता मात्र सुखदाला उगाचच अवघडलेपण जाणवत होते.त्याच्या लग्नाला होकार देणाऱ्या एका कृतीने सुखदाचे सुहासबरोबरचे सगळे नातेच क्षणात बदलुन गेल्यासारखे तिला वाटु लागले.

एक अनामिक दडपण आले होते मनावर.

तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्वच्छ दिसत होती सुहासला.

आई बाबांशी बोलता बोलता खुणेनेच त्याने सुखदाला ईशाऱ्यात काय झाले विचारले त्यावर काही उत्तर न देता ती आपल्या खोलीत जाऊन बसली.

जरावेळाने मन थोडे शांत झाल्यावर ती पुन्हा हॉलमधे आली.तोपर्यंत सुहास आदिला घेऊन बाहेर पडला देखिल होता.

तो गेलेला बघुन सुखदाला हायसे वाटले.

जणु मनावरचे आेझे उतरल्यासारखे वाटले.

     ~~~~~~~~~~~~~~~~

दिवस कलला आणि संध्याकाळ झाली तशी सुखदाची बेचैनी पुन्हा वाढली.पुन्हा तेच अनामिक दडपण,तिच अस्थिरता.हे काय होतेय आणि का हे तिलाही समजत नव्हते.

सुहास बरोबर आज संध्याकाळी भेटायचे ठरलेय हे तिने आई बाबांच्या कानावर घातले आणि आवरायला म्हणुन आपल्या खोलीकडे गेली.

------------------------(क्रमश:4)--------------------------

क्रमश:-4

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार मंडळी.

सुखदाचे सुहास बरोबर काय बोलणे होणार?

सुहास सुखदाच्या मनातील शंकांचे निरसन करू शकेल की गूंता अधिकच वाढणार?हे सगळे जाणुन घेण्यासाठी पुढचे भाग जरूर वाचा.आणि हा भाग कसा वाटला हे कमेंट्समधे जरूर कळवा.

धन्यवाद.

@राधिका.

 

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..