A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session69adc53fe7c6fc1e3dc501bc6e1fa2b5335aa1172f23aebb8e15225fd0d702510c99b1a2): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Firuni Nawi Janmen Mi - 2
Oct 25, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-2

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग-2

फिरूनी नवी जन्मेन मी - 2

©®राधिका कुलकर्णी.

 

सुहासशी बोलुनही चार पाच दिवस उलटून गेले होते.वेणूताईंची तगमग वाढत चालली होती.आडमार्गाने विचारणा करूनही सुहासचे  'बघतो विचार करतो' हे साचेबद्ध उत्तर त्यांना जास्त खटकत होते.

आता मात्र त्यांचा संयम संपत चालला होता.आज काहीही करून ह्या प्रश्नाचा तुकडामोड करायचाच असा त्यांनी मनोमन निश्चय करून टाकला.

रात्रीची जेवणे उरकून सुहास त्याच्या खोलीत लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता.

इतक्यात दारात वेणुताईंना बघुन त्याने आश्चर्यानेच विचारले, "काय ग, झोपली नाहीस अजुन?काही हवेय का?"

त्यावर खोलीत शिरतच त्या बोलल्या,"हो त्यासाठीच तर आलेय."

लॅपटॉप स्क्रीनवरची आपली नजर न हलवता तो बोलला,"अग काही हवे होते तर मला आवाज द्यायचा ना,मी आलो असतो तिकडे."

वेणुताईंनी आयतीच संधी साधली व म्हणाल्या," तूला कितीही आवाज दिले तरी तुझ्या कानापर्यंत माझी हाक पोहोचते कुठे?चार पाच दिवस झाले मी जे विचारतेय त्याचे उत्तर कुठे दिलेस तू अजुन."

सुहासच्या डोक्यात आत्ता कुठे प्रकाश पडला.आईचा उपरोधिक स्वर त्याला आत्ता नीट समजला.

त्याने आपला लॅपटॉप मांडीवरून बाजूला ठेवला आणि आईच्या मांडीवर डोके ठेवुन शांत पडून राहिला.त्याच्या डोळ्यातुन ओघळलेल्या आश्रुच्या ओलाव्यानेच वेणुताईंना त्याच्या मौनातील अर्थ उमगला.

 

त्याच्या काळ्या घनदाट केसांतुन हात फिरवत वेणुताई म्हणाल्या,"तुझ्या मनाची स्थिती मला समजत नाही असे वाटतेय का तूला.?तुझ्या मनात काय चाललेय ते सारे कळतेय.रोज उशीरा उशीरा पर्यंत तुझ्या खोलीचा दिवा चालू असतो.रात्र रात्र तुझ्या डोळ्याला डोळा लागत नाही हे समजत का नाही मला!!!"

मी खूप कठोर पाषाण ह्रदयी बाई आहे असेही वाटेल तुला पण तुझ्या पदरात दोन लेकरं आहेत त्यांचाही विचार नको का करायला तूला?तु बाप आहेस त्यांचा,मग त्यांच्या भविष्याची काळजी तु नाहीतर कोण करणार सांग बरं बाळाऽऽऽ?"

 

सुहासने आईचे सगळे शांतपणे एेकुन घेतले आणि म्हणाला,

"त्यांचाच विचार करून तर मी कितीदा स्वत:ला सावरलेय आई,कसे सांगू रात्र रात्र झोप लागत नाही.सतत संपदाचाच चेहरा डोळ्यापुढे येतो डोळे मिटताच.माझ्या बाबतीतच नियती इतकी कठोर का गं झाली?"

"आधी लहान वयात वडील गेले.सगळे बालपण कोवळ्या वयातच संपले.कधी मोठा झालो समजलेच नाही."

"संपदाच्या रूपाने एक चांगली सहचारिणी मिळाली दोन सोन्यासारखी मुले झाली,सूख सूख म्हणतात ते आणखी काय असते असे वाटायचे.खूप स्वप्न पाहिली होती गं आम्ही मिळुन.आदिला डॉक्टर करू म्हणायची संपदा. तिला स्वत:ला डॉक्टर व्हायचे होते पण नाही होता आले म्हणुन आपल्या मुलाला डॉक्टर करायची ईच्छा होती.सगळी स्वप्ने अर्ध्यावर सोडून निघुन गेली बघ मला,मुलांना पोरकं करून."

"कसा करू मी दुसऱ्या कुणाचा विचार तुच सांग आई कसा करूऽऽ?"

सुहास आता हमसुन हमसुन रडत होता.इतके दिवस मनात साठवलेले सगळे दु:ख तणाव अश्रुरूपाने बाहेर पडत होते.

वेणूताईंनी मनसोक्त रडु दिले त्याला.

 

अश्रुंचा बहर थोडा ओसरल्यावर पुन्हा त्या बोलल्या,"सुहास बाळा,काळ कुणासाठीच थांबुन रहात नाही.जाणारा निघुन जातो पण आपल्या जवाबदाऱ्या तर पार पाडाव्याच लागतात ना लेकरा,,त्यांना कुणाच्या भरोशावर सोडणार?"

"म्हणुन सांगते,आता दु:खाला थोडा आवर घाल आणि पोरांकरता तरी ह्या विषयाचा पुनर्विचार कर हो."

डोळ्यातले पाणी पुसत थोडा सावरून आता सुहास उठुन बसला आणि म्हणाला, "आता खरच शेवटचे दोन दिवस दे.मी तुला नक्की माझा विचार कळवतो प्रॉमिस आई..आणि हे खोटे वचन नाहीये.."

"मी नक्की सिरीयसली विचार करून सांगतो तुला..आता खुष!!!" सुहासने गंभीर झालेल्या वातावरणाला खेळकर करण्यासाठीच मिश्किलपणे डोळे मिचकावत वेणुताईंना विचारले.

त्यावर त्याही डोक्यात हळुच टपली मारत म्हणाल्या,"माझे काय तु खुष तर मी पण खुष.तुझ्या आनंदातच माझा आनंद लपला आहे नाऽऽ."

" बरं चल झोप बघु तु आता. नाहीतर जागरणानी तुला पित्त व्हायच."

"हो हो जातेच आहे.तुही झोप आता तो डब्बा बाजुला ठेवुन.सारख बघाव तेव्हा त्यात तोंड घुसवुन काय करत असतोस देव जाणे."

 त्याला डब्बा नाही लॅपटॉप म्हणतात गंऽऽ आई."

सुहासनेही हसतच वेणुताईंना सांगितले.

"बरं बरं ते जे काय असेल ते बाजूला ठेवुन शांतपणे झोप..अकरा वाजायला आलेत." वेणुताई बडबडतच खोलीबाहेर गेल्या.

सुहास लॅपटॉप बाजुला ठेवुन झोपायची तयारी करतच होता इतक्यात फोन वाजला.

सुखदाचे नाव पाहुन त्याने पटकन फोन उचलला….

"हायऽऽ इतक्या उशीरा जागी..काही विशेष?"

"सॉरी डिस्टर्ब केले का?"

"अगं नाहीऽऽ इतक्या वेळ आईबरोबर गप्पाच चालु होत्या.अजुन झोपलो नव्हतो.तु बोल ना?"

"अरे काही नाही आदि मागे लागला होता. सारखा तुझ्याशी बोलायचेय फोन लावुन दे म्हणत होता.मग शेवटी खूप सांगुनही ऐकेना म्हणुन फोन लावला,बोल त्याच्याशी, मी आलेच."

तिने फोन आदिला दिला आणि उद्याची राहिलेली तयारी करायला बाहेर आली.

"हाय बाबा!"

"हेऽऽ चँम्प..कसेय माझे पिल्लू!"

"बाबा मी रूसलोय तुझ्यावर.मी बोलणारच नाहीये तुझ्याशी..कट्टीऽऽऽ!"

"का बाबा कट्टी?माझं पिल्लु का रूसलेय कळु तर दे."

"बाबा तु काहीतरी विसरतोएस का?."

सुहास विचार करू लागला.काय विसरलो आपण?

"आदिचा बर्थडे?नाही... तो तर एप्रील मधे होऊन गेला.जीजाचाही नाही..मगऽऽ?!"

आपण काही विसरलेलो नाही ह्याची खात्री पटताच तो बोलला, " मी काय विसरलोय सांग बघु?"

"बाबा तु मला एक प्रॉमिस केलेलेस लास्ट विक विसरलास ना?"

"अरे होऽऽसॉरी डिअर मी विसरलो.तुला मी ती बुलेट ट्रेन मागवुन देणार होतो.खरच विसरलो.आता कमिंग संडे मी येईन तेव्हा आपण दोघे मिळुन जाऊ शॉपिंगला चालेल?"

सुहास आदिची समजूत काढत बोलला.

"अरे बाबाऽऽ मी त्या बद्दल नाहीच बोलत आहे.तूला तर हे ही आठवत नाही की तु लास्ट संडे आम्हाला भेटायलाही आलेला नाहीस."

बाबा तु का नाही आलास रे?मी कित्ती कित्तीऽऽ मिस केले माहितीय तूला."

तु प्रॉमिस केले होतेस ना वॉटरपार्कला जाऊ म्हणुन?"

हिरमुसल्या तोंडानेच आदि तक्रार करत होता.

आत्ता कुठे सुहासला आठवले त्या दिवशी एक अर्जंट मिटींग बोलावल्यामुळे सुहास मुलांना भेटायला गेलाच नव्हता.

(संपदा गेल्यावर जशी मुले त्यांच्या नलिनीआज्जीकडे रहायला गेली तसे दर विकएंडला सुहासच त्यांना भेटायला जात असे.)

"सॉरी राजा त्यादिवशी बाबाला खूप काम होते ऑफीसचे मग नाही जमले यायला.पण ह्या विकेंडला पक्का जाऊया हंऽऽ.प्रॉमिस!"

सुहासने समजुत काढण्यासाठी लाडीगोडीत प्रॉमिस केले.

त्यावर आदित्यही फुरगटून बोलला,"काही नको तुझे फेक प्रॉमिस आणि सुखाई घेऊन गेली आम्हाला वॉटरपार्कला.कित्ती धमाल केली माहितीय आम्ही तिकडे."

"सुखाई यु नो बाबाऽऽ,शी ईज दऽऽ बेस्ट!!!"

"तिने आम्हाला नंतर गार्डनला नेले तिकडे पाणीपूरी,चाट खाल्ले मस्त लाँग ड्राईव्ह करत घरी आणले."

आदी इतक्या उत्साहात सुखाई म्हणजेच सुखदाबद्दल सांगत होता ते ऐकुन सुहासही विचारमग्न झाला.खरच आई म्हणतेय ते बरोबर आहे का?"माझी कर्तव्ये जी मी करायला हवी ती सुखदा पार पाडतेय.बहिणीची मूले असली म्हणुन काय झाले जितके प्रेम माया सुखदा मुलांना देतेय तेव्हढे आपण करू शकलो असतो कुणा परक्याच्या मुलांसाठी?"

त्या शेवटच्या प्रश्नाने सुहास अंतर्मुख झाला.आदि

बरेच काही बोलत होता.त्याच्या कानावर पडत होते पण मनापर्यंत पोहोचतच नव्हते कारण तो स्वत:च्याच विचारात गर्क होता.

"बाबा बाबाऽऽ.. एऽ बाबा...हॅलो!!"कुठेस तु?

फोन कट झाला का?"

"नाही बाळाऽऽ बोल..बाबा ऐकतोयऽऽ."

"बाबा मी हेच सांगत होतो की नेक्स्ट वीक तु आम्हाला सगळ्यांना आऊटींगला घेऊन जायचेस समजले का?"

आदीने जरा दरडावुनच बाबावर हुकूम गाजवत सांगितले.

तसे सुहासनेही प्रॉमिस देत होकार भरला.

"बर चला आता उद्या स्कूल आहे ना झोपा लवकर.संडेला भेटुच.बाय पिल्लु"

"बायऽऽऽबाबा.लव्ह युऽऽ!गुड नाईट!"

 

गुड नाईट म्हणत फोन बंद झाला तसे त्याच्या विचारांना पुन्हा गती मिळाली.आई ज्या गोष्टीसाठी इतके दिवस मागे लागलीय ती गोष्ट किती गरजेची आहे खरच.आदित्य किती खुष होता जीजा तर किती लहान पण सुखदा पोटच्या लेकरागत तीचे सगळे करते तेही हसतमुखाने जणु तिचीच मूले.

"मग मुलांसाठी मुलांची आई बनुन जर ती ह्या घरी आली तर…?"

परंतु ह्या विषयावर तिचा विचार जाणुन घेतल्या खेरीज कुठलाही निर्णय आपण एकट्याने घ्यायचा नाही.

तिला जर हा प्रस्ताव मान्य असेल तरच मी हो म्हणणार.

त्याचे आतर्द्वंद्व आता संपुष्टात आले होते.

निर्णयाला एक सकारात्मक दिशा मिळाली होती त्यामुळे उद्याची सकाळ कधी उगवते असे सुहासला झाले होते.

विचारांच्या तंद्रीत कित्येक महिन्यांनी सुहासला आज पहिल्यांदाच शांत झोप लागली होती.

           ~~~~~~~~~~~~~

सकाळ झाली नेहमी प्रमाणेच तो चहासाठी डायनिंग टेबलवर आईची वाट पहात बसला.

वेणुताई देवघरात पूजा करत होत्या.स्वैपाकीॆण मावशींनीच त्याला चहा दिला.

रोज आई मुद्दाम चहाची हीच वेळ साधुन त्याला आडुन आडुन बोलायची आणि आज त्याला बोलायचे होते तर आई पुजेत अडकलेली.आता ती काही पुढे तासभर बाहेर येणार नाही आणि तोवर माझी ऑफीस जायची वेळ होणार.

मनातल्या मनात सुहासची चरफड चाललेली.

पण आज त्याचे नशीब बलवत्तर होते.पूजा आटोपुन वेणूताई देवघरातुन बाहेर आल्या.

त्याही सुहासच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसल्या.

"वत्सलाबाई मलाही थोडा चहा असेल तर द्या हो."

"काय रे आज लवकर उठलास?"

"हो.जाग आली लवकर.म्हटलं तुझ्याशी बोलावे थोडे.तर तुच नाहीस."

"बरं बोल...आता आलेय ना मी.."

ज्या अर्थी सुहास सकाळी सकाळी बोलायचे म्हणतोय त्या अर्थी नक्की त्याचा कालच्या विषयावर काहीतरी ठोस निर्णय झाला असणार हे वेणूताईंच्या अनुभवी नजरेने बरोबर ताडले पण तसे वरकरणी न भासवता त्या सुहास काय सांगतोय ते ऐकायला सज्ज झाल्या.

सुहासने जरा घसा खाकरून बोलण्यासाठी मानसिक तयारी केली.आणि बोलायला सुरवात केली.," आई,काल मी बराच विचार केला तुझ्या प्रस्तावावर.तुझे म्हणणे काही अंशी मलाही पटलेय.मला तुझा विचार पटलाय पण….."

वेणूताई मनातच बोलल्या आता कोणता पऽऽण न् बीणऽऽ पण मनातच."

वरून तसे न दाखवताच बोलल्या," हम्म..बोल मी ऐकतेय.वाक्य पुर्ण कर." 

"पण…. मी तुला स्पष्टच सांगतोय ह्या नात्याचा विचार मी फक्त मुलांच्या दृष्टीकोनातुन करतोय त्यामुळे जर हे लग्न झालेच तर सुखदा फक्त आणि फक्त मुलांची आई ह्या नात्यानेच ह्या घरात येईल इतर कोणतीही अपेक्षा तु किंवा कोणीच बाळगु नये."

"आणखी एक महत्त्वाची गोष्ट…."

"आता काय?" वेणूताईंनी वैतागुनच विचारले.

"हे बघ आईऽऽ आत्ता मी जे जे काही तुला बोललो ते सगळे जसेच्या तसे स्पष्टपणे मी सुखदाशी प्रत्यक्ष बोलणार.माझ्या सर्व गोष्टी तिलाही मान्य झाल्या तरच हे नाते पुढे जाईल.मला तिच्यावर कुठलेही बंधन लादायचे नाहीये.आणि तुम्हा दोन बायकांच्या भावनिक प्रेशर मधे येऊन कुठलाही निर्णय तिने घेऊ नये असे मला वाटते.तिला अंधारात ठेवुन मला हे नाते जोडायचे नाहीये."

"बर मग मी काय निरोप देऊ नलिनीताईंना तेही तुच सांग.माझ्याकडुन चुकुन शब्द इकडे तिकडे झाले तर उगीच गोंधळ नको व्हायला."

"नाहीतर तुच बोलतोस का नलिनीताईंशी.?"वेणूताईंनी सुहासलाच पेचात टाकले.

"नको तुच बोल पण मी जे बोललोय त्याची कल्पना त्यांना दे.म्हणजे त्या सुखदाशी बोलतील.मग तिचा काय निर्णय येतोय कळल्यावर पुढचे ठरवु."

"बरंऽऽऽ पण म्हणजे तुझा होकार कळवु ना?"

"हम्मऽऽ अटींसहीत.."

"हो रे..तेच ते कितीदा सांगशील?जा आवर आता.ऑफीसला उशीर होईल."

 

वेणूताईंना घाई झाली होती.कधी एकदा सुहास ऑफीसला जातोय आणि त्या नलिनीताईंशी बोलताएत असे झालेले.

मनातुन खूप आनंदी झाल्या होत्या की एकदाचे सुहासचे घोडे दामटले पुढे.आता पुढचे पुढे अंबाबाई करेलच नीट सुरळीत.

कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडेच घातले होते वेणूताईंनी.त्याची प्रचिती त्यांना उशीरा का होईना पण मिळाली होती.

सुहास पटापट आवरून ऑफीसला गेला तसा लगबगीने वेणूताईंनी नलिनीताईंना फोन लावला.एव्हाना सुखदाही कॉलेजला गेलेली असल्याने त्यांना ह्या विषयावर बोलायला हवी तशी प्रायव्हसी मिळणार होती हा हेतू साधुनच वेणूताईंनी आत्ताच फोन केला.

रींग जात होती..बऱ्याच वेळाने नलिनीताईंनी फोन उचलला.

"हॅलोऽऽ बोला वेणूताई ..आज सकाळी सकाळी कशी काय आठवण काढली?तब्येत बरीय ना तुमची?"

"अहो कामच तितके महत्त्वाचे होते म्हणुन राहवलेच नाही.घाईघाईतच फोन केला हो.तुम्हाला वेळ आहे ना आत्ता?की नंतर करू फोन?"

"अहो असे काय मला तुमची काळजी वाटली.ह्यावेळी तुमचा फोन नसतो ना कधी म्हणुन तसे विचारले.मला आहे वेळ बोला.." नलिनीताई बोलल्या तसे हरखुनच वेणूताई म्हणाल्या ,"अहो एक खुषखबरी द्यायची होती तुम्हाला."

"कसली खुषखबरी!!"नलिनीताईंनी आश्चर्यातच विचारले.

"अहो आपण बोललो नव्हतो का मागे त्याबद्दल. अहो सुहासने चक्क होकार दिलाय."

"अरे वाह्ऽऽ!!! ही तर खरचच आनंदाची बातमी आहे की..थांबा देवापुढे साखर ठेवते."

 

नलिनीताई देवापुढे साखर ठेवुन परत फोनपाशी आल्या.

"हंऽ आता सविस्तर सांगा सुहासराव कसे तयार झाले ह्या लग्नाल?"

"तुम्हीच काहीतरी युक्ती केलेली दिसतेय."

नलिनीताई मिश्कीलपणे वेणूताईंना कोपरखळी मारत होत्या.मनातुन त्यांनाही आनंदच झाला होता.

"ह्यावेळी मी खरच काही केले नाही.काल जरा सिरीयसली ह्या विषयावर बोलले रात्री.पण त्याचा परीणाम इतक्या लवकर मिळेल हे मी खरच अपेक्षित केले नव्हते.सगळी अंबाबाईचीच कृपा म्हणायची दुसरे काय.."

"हो का!!फारच उत्तम!पण मग पुढे काय?"

"हो तेच सांगतेय.त्याने होकार तर दिलाय पण त्यात एक मेख आहे."

"म्हणजे काय? " नलिनीताईंनी साशंक होतच विचारले.

"अहोऽऽ म्हणजे एक अट टाकलीय त्याने."

"कसली अट?"

"तो म्हणतोय की तो फक्त मुलांसाठी लग्नाला तयार झालाय म्हणजे ह्या घरात फक्त मुलांसाठी आई येईल.त्याचे तिच्याशी कुठलेच नाते नसणार."

"आणि हे सगळे सुखदाला तो स्वत: सांगणार.जर तिचीही ह्या सगळ्याला मान्यता असेल तर तो लग्नाला तयार होईल असे म्हणतोय."

हम्मऽऽऽ..सगळे जरा गुंतागुंतीचेच आहे एकंदर."सुहास तरी निदान अटी घालुन का होईना तयार तरी झालेत पण आमची ही बया हो म्हणायला हवी ना.काय आहे देवाच्या मनात त्यालाच ठाऊक..!!"

नलिनीताईंनी निराशेनेच एक सुस्कारा सोडला.

 

त्यावर वेणूताई लगेच त्यांना हायसे करायला बोलल्या, "अहो इतक्या निराश नका होऊ.लोणी आगीजवळ नेले तर वितळल्या शिवाय राहतेय का??मग आता तुम्हीच सांगा एकदा लग्न सुखऱूप पार पडल्यावर खरच ते दूर राहु शकणारेत का एकमेकांपासुन आणि किती दिवस?"

"आणि मग आपण दोन अनुभवी बायकांचा काय उपयोग?"

"सध्या तुम्ही इतकेच बघा की सुखदाचा होकार कसा मिळवायचा.बाकीचे पुढचे पुढे बघु.काय!!!" 

"मग आता जरा चेहऱ्यावर हसु येऊ दे.मला इथुनच कळतेय तुम्ही चिंताक्रांत आहात ते."

वेणूताईंनी समजुत घातल्यावर नलिनीताईही हसुन दुजोरा देत म्हणाल्या,"तुम्ही म्हणताय तसेच सगळे होऊ दे."

"तसेच होणार.माझे मन सांगतेय ना मला."

"पण मग कधी बोलताय सुखदाशी?मला वाटते जास्त उशीर नको व्हायला.आजच विचारा जमल्यास."

"होऽऽ हो.प्रयत्न करते.तिचा मुड बघुन बोलते."

"ठिक आहे.कळवा मग बोलणे झाले की.ठेवते फोन.काळजी घ्या.."

हो..तुम्हीही ..चला ठेवते.पूजा व्हायचीय अजुन."

 

बरं..म्हणतच वेणूताईंनी आनंदातच फोन ठेवला.

आज त्यांना आकाश ठेंगणे झाले होते.

पुन्हा एकदा ह्या सून्या वास्तूत सनई चौघडे वाजणार,पुन्हा एकदा पाखरांच्या किलबिलाटाने घर गजबजणार ह्या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहीले.

मुलाच्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसतेय ह्या विचारांनीच त्या हरखुन गेल्या होत्या.कुणाला सांगु न कुणाला नको असे झालेले.

पण जोवर सगळे काही दोन्ही बाजुंनी नीट ठरत नाही ह्या गोष्टीचा कुठेही बोभाटा करायचा नाही हे ही त्यांनी स्वत:ला बजावले.

 

आजची सकाळ गेल्या कित्येक महिन्यांनी त्यांच्याकरता शुभ सकाळ बनुन उगवली होती.

-----------------------(क्रमश:2)------------------------

क्रमश: भाग -2

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार वाचकहो.

काय कसा वाटला भाग दोन?

काय होईल पुढे?

सुखदा तयार होईल ह्या प्रस्तावाला?

काय होणार पुढे सुहासच्या आयुष्यात?

हे सगळे जाणुन घ्यायचे असेल तर पुढचा भाग वाचायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रीया मला लगेच कमेंट्समधे कळवा.

(लेखन वितरणाचे सर्व हक्के लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..