होतीस अनोळखी मज
अन मी होतो अनोळखी तुज
अन मी होतो अनोळखी तुज
पाहता तुजला हरवले
माझे देहभान.
माझे देहभान.
पहिली ती नजर तुझी
माझा न मला ठेवून गेली
माझा न मला ठेवून गेली
उगाच भटकत फिरतो मी
जशी आहेस तू माझ्यासोबती
जशी आहेस तू माझ्यासोबती
भास मजला होती तुझे
तूच दिसतेस डोळ्यापुढे
तूच दिसतेस डोळ्यापुढे
मन ही माझे नसे न काबूत
तुझ्याच आठवणींचा देते सबूत
तुझ्याच आठवणींचा देते सबूत
मन माझे तुझे झाले
पाहताक्षणी तुझ्यात हरवले
पाहताक्षणी तुझ्यात हरवले
एवढीसी ती भेट
भिडून गेली मनाला थेट
भिडून गेली मनाला थेट
काळजाची या होती तरफड
पाहण्या तुजला होती धडधड
पाहण्या तुजला होती धडधड
पाहण्यात तुला हरून बसलो
मन मती स्वप्नात रंगलो...
मन मती स्वप्नात रंगलो...
पाहताक्षणी तूझी जादू झाली
तू मला काबू करून गेली.....
तू मला काबू करून गेली.....
भेट ही नजरेची
नजरेनेच हेरली...
नजरेनेच हेरली...
काय कुठे कसे घडले
पाहताक्षणी प्रेम जडले....
पाहताक्षणी प्रेम जडले....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा