तिची पहिली पाळी

This article base on puberty age of girl who face 1st periode.... She was no idea in this days....

आठ ,दहा दिवसांपूर्वीची गोष्ट  आईला एका कामानिमित्त्य बाहेर गावला जावं लागलं , ती मला सांगून गेली टिवशनचे मुलं आले तर एक बँच घेऊन घेशील त्यांना घरी परत नको पाठवू  . मला मुलांना शिकवायचं म्हणजे तारेवरची कसरत वाटते कारण मुलं ऐकतातही कुठं मला . सकाळी साडेसातला सातवीच्या मुलांची पहिली बँच चालू झाली . मी मुलांना मँथ्सचे काही equn समजवून सांगितले , म्हटलं आता तुम्ही साँल करून मला दाखवायला आणा . अपुर्वाचं  लवकर साँल झालं आणि ती मला बुक घेऊन दाखवायला आणण्यासाठी उठली . ऐवढ्यात मुलांनी आवाज केला , मँडम अपुर्वाच्या ड्रेसमागे रेड पेंन्ट लागलाय .... मला काय घढलयं हे समजलं . तिला हाँल मध्ये जाऊन बसायला सांगितले . मुलांना equn देऊन मी तिच्याकडे गेले . तर ती रडत होती . कसंबस तिला समजवलं आणि  बाथरूममध्ये जाऊन विस्पर लावायला सांगितलं . ती तिकडून आल्यानंतर म्हणे माझ्या बाँडी मधल्या वेन्स फुटल्यात , म्हणून असं होतय ना !  तिला असं काही नसतं it's normal process म्हणून सांगितलं . घरून तिला ह्याविषयी कधी माहिती मिळाली नसावी ,   शाळेतही 14वर्ष उलटून गेल्यानंतर syllabus मध्ये हा टॉपिक ठेवला आहे , मला वाटतं 10th च्या new syllabus मध्येही नाही disaster management सारखे टॉपिक टाकलेत पण ह्याविषयी नाही . डायरेक्ट 12 वीत Reproductive system ला 12 phase आहेत . सहावी सातवीच्या General science च्या पुस्तकात ह्याविषयी थोडीतरी information हवी होती म्हणेज मुलींना घरून आईकडून माहिती नाही मिळाली तरी वर्गात शिक्षकांकडून सजग होता आलं असतं ,   नंतर तिच्या आईला काँल करून माहिती दिली त्या म्हणे अर्धातासात येते . 8 चे 10 वाजले तरी त्या यायचा काही पत्ता नाही . मग दहाला परत त्या काँल करून म्हणाल्या , मँडम माझ्या घरी ब्राह्मण आलेत पुजा होती एक तास आमच्याकडे असं शिवाशीवीच विटाळाचं चालतं नाही ना , त्यात घरी पाहुने .... थोड्या वेळाने येते मी तिला तुमच्याकडे तेवढा वेळ बसू द्या . बघा त्या  मुलीच्या आईला किती तिची काळजी होती , मी त्यांना म्हटलं तुमच्या मुलीच्या जीवापेक्षा देव येवढा श्रेष्ठ आहे का ? त्या म्हणाल्या तुम्हा आजकालच्या मुलींना देवाचं महत्त्व कळत नाही .  जातांना दारात अपूर्वा तिच्या आईला म्हणते , आई माझं पोट खुप  दुखतय तर त्या तिच्यावर ओरडूनच म्हणतात , गप्प बस्स तुला आजच व्हायचं होतं .... आता पाळी कधीही येणं हे का त्या मुलीच्या हातात असतं ?
दिवसभर हा टाँपिक माझ्या डोक्यातून गेला नाही . आता ती आईच मुलीला अशी रागवेल तर ती आपला त्रास कुणाला सांगेल ??? कधी बदलणार हे जग ठाऊक नाही ....