पहिली भेट भाग ९

Story of a friendship

पहिली भेट भाग ९

      आपण मागच्या भागात बघितलं, प्रिया व पुजाच्या बोलण्यामुळे जान्हवी खूप डिस्टर्ब होते.जान्हवीचा श्रीराजवर खूप विश्वास असतो पण पुजा व प्रियाच्या बोलण्यामुळे तिच्या मनात श्रीराज बद्दल शंकेची पाल चुकचुकते, स्वतःच्या शंकेचे निरसन करण्यासाठी जान्हवी श्रीराजला फोन लावते, श्रीराजचा फोन एक मुलगी उचलते, मुलीचा आवाज ऐकल्यावर जान्हवीला धक्का बसतो, तिच्या मनात शंकांचे काहूर माजते.

        खूप वेळ झाला तरी जान्हवी रुममध्ये आली नाही म्हणून पुजा तिला शोधण्यासाठी लॉनमध्ये जाते. पुजाला जान्हवी एका बाकावर बसलेली दिसते. पुजा जान्हवी जवळ जाते पण जान्हवीचे पुजाकडे लक्षच नसते, पुजा जान्हवीच्या खांद्यावर हात ठेवते तर जान्हवी एकदम दचकते. 

पुजा---- एवढे दचकायला काय झाले? तुला आमच्या बोलण्याचा राग आलाय का? एवढ्या कसल्या विचारात आहेस की मी आलेली तुला कळले नाही.

जान्हवी---- मी श्रीराजचा विचार करत आहे.

पुजा---- तु अजूनही श्रीराजवरच अडकलेली आहेस का, अतिविचार करणे घातक असतो मॅडम, आमचं बोलणं एवढं मनावर नको घेऊस, प्रियाच तर अजिबातच नाही.

जान्हवी---- प्रियाच्या म्हणण्यानुसार श्रीराजच्या आयुष्यात दुसरी मुलगी असेल तर.

पुजा---- असेल तर असुदेत ना. तुला काय फरक पडणार आहे. तु श्रीराजकडे फक्त एक चांगला मित्र म्हणूनच बघते ना.

जान्हवी---- पुजा मला वाटतंय मी श्रीराजमध्ये अडकत चाललेय.

पुजा---- श्रीराजला सांग तसं, त्याच्याशी क्लिअर करून घे, जर त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी असेल तर तु श्रीराज बद्दल ज्या काही भावना तुझ्या मनात आहे त्या काढून टाक. जान्हवी समोरच्याला आपण गृहीत नाही धरू शकत. I know श्रीराज खूप चांगला मुलगा आहे, तो तुझी खूप काळजी करतो पण श्रीराज साठी तु फक्त जवळची मैत्रीण असू शकते, जर त्याच्या मनात तुझ्या बद्दल मैत्री व्यतिरिक्त काही भावना नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. एकदा त्याच्याशी बोलून घे म्हणजे तुझ्या सर्व शंकांचे निरसन होईल.

जान्हवी ---- मी श्रीराजला फोन केला होता पण फोन एका मुलीने उचलला होता.

पुजा---- कोण होती ती मुलगी?

जान्हवी---- मी तिचा आवाज ऐकल्यावर मला काय बोलावे सुचलेच नाही, मी फोन कट केला.

पुजा---- अगं मग विचारायचं ना की कोण बोलतंय, म्हणजे कळलं तरी असतं.

जान्हवी---- ह्याच मुलीमुळे श्रीराज मला टाळत असेल का?

पुजा---- जान्हवी हे सगळं तु श्रीराजलाच विचार ना.

पुजासोबत माझे बोलणे चालू असतानाच श्रीराजचा फोन येतो. पुजा मला सांगते सरळसरळ श्रीराजला विचार ती मुलगी कोण होती? हे सांगून पुजा तिथून निघून जाते. मी श्रीराजचा फोन उचलते.

श्रीराज---- हॅलो जान्हवी, फोन उचलायला एवढा वेळ का लावलास? बिजी आहेस का?

जान्हवी---- नाही रे मी बिजी नाहीये, फोन सायलेंट मोडवर होताना तेव्हा फोन आल्याचे पटकन लक्षातच आले नाही.

श्रीराज---- ओके. तु फोन कशाला केला होतास? काही काम होत का?

जान्हवी---- नाही सहजच केला होता.

श्रीराज---- तु बरी आहेस ना, आवाज खूप लो वाटत आहे. खरंच सांग काही झालंय का?

जान्हवी---- मी एकदम ठणठणीत बरी आहे, तु दिवसभर कुठे बिजी होतास?

श्रीराज---- अगं इकडे कॉलेजच्या जवळच माझी एक दूरची आत्या राहते, तिच्याकडे सत्यनारायणाची पुजा होती, सगळेच नातेवाईक येणार होते, कॉलेजला सुट्टी असल्याने मला पण बोलावले होते. रूटीन मध्ये काही तरी बदल म्हणून मी पण आलो, खूप दिवसांनी सगळ्या नातेवाईकांना भेटलो खूप बरे वाटले.

जान्हवी---- तुझा फोन कोणाकडे होता? 

श्रीराज---- मी माझा फोन चार्जिंगला लावला होता, तुझा फोन आला तेव्हा मी बाहेरच्या रुम मध्ये सगळ्यांशी गप्पा मारत होतो, माझी आत्त्याची मुलगी आहे तिने फोन उचलला होता पण तु काहीच बोलली नाही, नंतर ती मला विचारत होती की जान्हवी कोण आहे?

जान्हवी---- मग तु काय सांगितलं?

श्रीराज---- कॉलेजमधली मैत्रीण आहे, दुसरं काय सांगणार.

जान्हवी---- तुझ्या आत्त्याची मुलगी केवढी आहे?

श्रीराज---- ती BAMS करते आहे, सेकंड इयर ला आहे, माझ्यामते तुझ्याएव्हढीच असेल.

जान्हवी---- तिला तु अभ्यासात मदत करत असशील ना.

श्रीराज---- नाही ग, मी तिच्यापासून दूरच राहतो.

जान्हवी---- तिच्यापासून दूर का राहतोस?

श्रीराज---- घरी सगळे आम्हाला एकमेकांच्या नावाने चिडवतात, मी तिला कधी एखादा मॅसेज पण करत नाही, समोर दिसली तरी कमीत कमी बोलतो.

जान्हवी---- एवढी वाईट आहे का ती?

श्रीराज---- नाही ग ती खूप चांगली आहे , माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नको निघायला म्हणून मी तिच्यापासून दूर राहतो.

जान्हवी---- तुला खरंच तिच्याबद्दल काहीच वाटत नाही.

श्रीराज---- जान्हवी आज तुला काय झालंय? तु आज काहीतरी विचित्रच बोलतेय.

जान्हवी---- मी तुला एक प्रश्न विचारला तर त्याचा राग न मानता खरं उत्तर देशील का?

श्रीराज---- आजपर्यंत तुझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचे मी टाळले आहे का?मग आज ही फॉर्मलिटी कशासाठी? विचार जे विचारायचं असेल.( श्रीराज जरा रागातच बोलला)

जान्हवी---- तुला गर्लफ्रेंड आहे का? किंवा तुझ्या आयुष्यात मी सोडून दुसरी कोणी खास मैत्रीण आहे का?

श्रीराज---- जान्हवी तु माझ्यावर संशय घेतेय का? तुझ्या सर्व बोलण्याचा रोख मला आताशी समजला.

जान्हवी---- संशय नाही घेत आहे, माझ्या शंकेचे निरसन करते आहे.

श्रीराज---- अगं पण तुला अशी शंका येऊच कशी शकते. तुला उत्तर ऐकायचे आहे तर ऐक आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच मुली आहेत, त्यांच्याशी माझी सो कॉल्ड फ्रेंडशिप आहे. मला सगळ्यात जवळची आणि खास एकच मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तु.

श्रीराजचे बोलणे ऐकल्यावर मनाला एक वेगळी शांती भेटली, माझ्या डोळ्यातच पटकन पाणी आले, पुढे काय बोलावे मला काहीच सुचत नव्हते.

श्रीराज---- जान्हवी बोल ना, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ना.

जान्हवी---- हो मिळाले. सॉरी श्रीराज 

श्रीराज---- जान्हवी नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे सांगशील का? आजच तुला हा प्रश्न का पडला?

जान्हवी---- कारण आज प्रियाने मला विचारलं, श्रीराज आणि तुझ्यात फक्त मैत्री आहे की अजून काही.

श्रीराज---- तु काय उत्तर दिलेस?

जान्हवी---- मी सांगितले की आमच्यात फक्त मैत्री आहे पण ती बोलली की दिसताना तर असं दिसतंय की तुम्ही दोघेही एकमेकांमध्ये अडकत चालला आहात.

श्रीराज---- तुला काय वाटतंय?

जान्हवी---- मी ह्या सगळ्यावर खूप विचार केला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की मी तुझ्यात अडकत चालले आहे.

श्रीराज---- जान्हवी म्हणजे तु माझ्या प्रेमात पडली आहेस.

जान्हवी---- मला प्रेम म्हणजे काय हे नक्की माहीत नाही पण मला तुझ्याशी बोलायला आवडते, तु घेतलेली माझी काळजी मला आवडते, चांगलं किंवा वाईट काही घडले तरी पहिले तुला सांगायची इच्छा होते. तुझा फोनवरचा आवाज ऐकण्यासाठी रविवारची आतुरतेने वाट बघत असते. तुला पण असंच वाटतं का?

श्रीराज---- जान्हवी तु ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहेस म्हणून तुला समजले, मी ह्या सगळ्याचा एवढ्या बारकाईने विचारच केला नाहीये. तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मला थोडा वेळ लागेल. वेळ घेतोय म्हटल्यावर याचा अर्थ असा नाही होत की माझ्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी आहे. तु गैरसमज करून घेऊ नकोस.

जान्हवी---- मी नाही गैरसमज करून घेणार, तुला माझ्या बोलण्याचा राग तर आला नाही ना. तुला पाहिजे तितका वेळ घे. तुझे उत्तर जे असेल ते मला मान्य असेल पण माझ्याशी मैत्री तोडू नकोस.

श्रीराज---- जान्हवी तु प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करत बसते. मी तुझ्याशी असलेली मैत्री कधीच तोडणार नाही. चल आता फोन ठेवतो नंतर बोलू, बाय

एवढे बोलून श्रीराजने फोन बंद केला, श्रीराजला माझ्या बोलण्याचा राग नसेल ना आला, मी जरा जास्तच बोलून गेले का?

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all