Feb 24, 2024
प्रेम

पहिली भेट भाग ६

Read Later
पहिली भेट भाग ६

पहिली भेट भाग ६

                पुजाशी व प्रियाशी गप्पा मारता मारता पटकन जेवण उरकले, पुजाकडून फोन घेतला व रुमच्या बाहेर जायला निघाले.

पुजा--- (मला चिडवण्याच्या मूड मध्ये) श्रीराजशी आमच्यासमोर बोललीस तरी चालेल, आम्ही तुला डिस्टर्ब नाही करणार.

प्रिया--- अगं पुजा, जाऊदेत तिला श्रीराजसोबत प्रायव्हेट बोलायचे असेल.

जान्हवी--- काय चालू झालंय तुमचं, प्रिया मला काय प्रायव्हेट बोलायचं असेल सगळंच तर तुम्हाला माहीत आहे, तुमच्या दोघींच्या अभ्यासात व्यत्यय यायला नको म्हणून बाहेर जातेय.

प्रिया--- अगं आम्ही तुझी खेचत होतो, रागाऊ नकोस. 

            मी प्रियाकडे व पुजाकडे बघून स्माईल देऊन रुमच्या बाहेर पडते.आमच्या होस्टेलच्या बाहेर हिरवेगार लॉन होते,त्यावर ठिकठिकाणी बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे तयार केलेले होते. रात्रीच्या वेळी सगळ्या मुली मोकळ्या हवेत फिरण्यासाठी ह्या लॉनवर जात असत. जिथे कोणी बसलेले नाही असा बाक निवडून मी त्यावर बसले, जून महिन्याचा शेवट असल्याने हवेत थोडा गारवा होताच. मी श्रीराजला फोन लावला, त्याने एका रिंगमध्येच फोन उचलला.

श्रीराज--- हॅलो जान्हवी

जान्हवी--- श्रीराज फोन हातातच घेऊन बसला होता का? एका रिंगमध्येच उचललास .

श्रीराज--- फोन उचलायला उशीर झाला असता तर तुला राग आला असता म्हणून फोनकडेच बघत बसलो होतो. तुझे जेवण झाले का?

जान्हवी--- तु दिलेल्या आदेशानुसार पुजाने जेवण पूर्ण झाल्याशिवाय फोनला हातच लावू दिला नाही.

श्रीराज--- एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्यात कितीही टेन्शन आले, काहीही घडले तरी जेवण वेळेवर करायचे.

जान्हवी--- हो आता इथून पुढे जेवणाकडे दुर्लक्ष नाही करणार.

श्रीराज--- Thats like a good girl. आता सांग काय झालंय? काय बोलायचे आहे?

                 दिवसभरात घडलेली सर्व हकीकत श्रीराजला मी सांगितली, श्रीराजशी बोलता बोलता मला रडायलाही येत होते. श्रीराजने माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले.

श्रीराज---- आधी तुझे रडणे थांबवं, पहिले तु शांत हो. पाणी पी,मगच मी पुढे बोलतो.

 मी माझे रडणे थांबवते, पाणी पीते.

जान्हवी---- बोल आता, माझे रडणे बंद झालेय.

श्रीराज---- जे काही तुझ्यासोबत घडलंय, ते नॉर्मल आहे. तु सरांचे बोलणे पहिल्यांदाच खाल्लेय म्हणून तुला वाईट वाटत असेल, तुला वाईट वाटणेही स्वाभाविकच आहे. पण एवढा स्वतःला त्रास का करून घेत आहेस?

जान्हवी---- सर म्हणाले की फायनल एक्साम मध्ये जर ओरल खराब गेली तर तु पासच होऊ शकणार नाही. मला नापास होण्याची भीती वाटतेय.

श्रीराज---- पहिले तुझ्या मनातून नापास होण्याची भीती काढून टाक. सर म्हणाले म्हणून तु काही लगेच नापास नाही होणार सो डोन्ट वरी, मी फर्स्ट इयर ला असताना आमचे एक सर होते त्यांनी मला कॉलेज सुरू झाल्यापासून टारगेट केलेले होते, मला तर ते नेहमीच म्हणायचे की तु डॉक्टर होण्याचा पात्रतेचाच नाहीयेस, तु MBBS पूर्ण करूच शकत नाही आणि शेवटी अस झालं की त्यांच्या विषयात सर्वांत जास्त मार्क्स मलाच होते. मार्क्स जास्त मिळाल्यावर सरांचे असे म्हणणे होते की मी तुला मुद्दामच बोलायचो जेणेकरून तु चांगला अभ्यास करशील.

जान्हवी---- तुला सरांचे बोलणे ऐकून वाईट वाटत नव्हते का? टेन्शन नव्हते येत का?

श्रीराज---- मुलींना रडून त्यांच्या भावना व्यक्त करता येतात, मुलांना रडण्याचा अधिकार नसतो, आणि स्वतःवर विश्वास असेल ना तर सगळंच शक्य होतं. कोणी काही बोललं तर बोलू द्यायचं, आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे.

जान्हवी----तु किती छान बोलतोस. तुला एवढे छान बोलायला कसे सुचते?

श्रीराज---- अनुभवाचे बोल.

श्रीराजच्या या बोलण्यावर आम्ही दोघेही खूप हसतो.

श्रीराज--- बरं मला सांग,तुला ॲनाटॉमी आवडत नाही का? 

जान्हवी---- मला ॲनाटॉमी विषय खूप आवडतो पण त्यातील काही टॉपिक्स समजायला खुप अवघड जातात मग माझा खूप गोंधळ उडतो. 

श्रीराज---- एखादे उदाहरण देऊन सांगशील का? म्हणजे मलाही कळेल की नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे? 

जान्हवी---- skull खूप सारे फोरामेन्स असतात, त्यातून nerves, artery जातात, तर आता आपण उदाहरण घेऊया foramen magnum, आणि foramen ovale असे बरेच फोरामेन्स शेजारी शेजारी असतात, तर मला त्यांच्या बद्दल डिटेल्स मध्ये माहिती आहे पण सरांनी विचारल्यावर खूप गोंधळ उडतो. लिव्हर व गॉल ब्लॅडरच्या नर्व्ह सप्लाय व ब्लड सप्लाय सांगायच्या वेळेस कन्फ्यूजन होते. 

श्रीराज---- I know antomy is very vast subject but it's interesting also. थोडक्यात काय तर शेजारी शेजारी असलेल्या ऑर्गनस बद्दल अभ्यास करताना गोंधळ उडतो. अगं हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिकस तयार कराव्या लागतात.

जान्हवी---- मी केल्या आहेत काही ट्रिकस तयार पण त्या थिअरी एक्सामच्या वेळेस आठवतात पण ओरलच्या वेळेस नाही आठवत.

श्रीराज---- आता एक काम कर रूमवर गेल्यावर जे टॉपिकस तुला अवघड जातात त्याची लिस्ट तयार कर, उद्या रविवार असल्याने कॉलेजला सुट्टीच आहे तर उद्या दुपारी मी तुला ते टॉपिकस शिकवतो म्हणजे तुझा गोंधळ उडणार नाही.

जान्हवी---- तुझी कल्पना छान आहे पण माझ्यामुळे तुझ्या अभ्यासात व्यत्यय कशाला, तुला तुझ्या अभ्यासाचा लोड आहेच ना.

श्रीराज---- तु माझ्या अभ्यासाची काळजी करू नकोस. तसही दुपारी जेवण केल्यावर मला अभ्यास करण्याचा खूप आळस येतो, झोप येत असल्यामुळे अभ्यासही होत नाही, त्याच वेळेत मी तुला टॉपिकस शिकवतो म्हणजे मलाही झोप येणार नाही आणि तुझाही प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला माझी मदत होईल.

जान्हवी---- हो तुझे म्हणणे बरोबर आहे, मलाही दुपारी जेवण केल्यावर खूप झोप येते. श्रीराज तु खूप स्मार्ट आहेस.

श्रीराज---- जान्हवी मी स्मार्ट तर लहानपणापासूनच आहे.

जान्हवी---- लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढण्याची गरज नाहीये.

श्रीराज---- उद्या दुपारी दोन वाजता जमेल ना.

जान्हवी---- हो चालेल.

श्रीराज---- मी वेळेच्या बाबतीत खूप पाबंध आहे, I am very punctual person. मला वेळ न पाळणारी लोकं अजिबात आवडत नाहीत.

जान्हवी---- मी दिलेली वेळ नेहमीच पाळते, So don't worry about that. 

श्रीराज---- एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला कधी वेळ पाळायला जमले नाही तर एक मॅसेज करून ठेवत जा म्हणजे मी तुझी वाट पाहत बसणार नाही.

जान्हवी---- ओके सर. थँक्स श्रीराज तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेम चे सोल्यूशन असते.

श्रीराज---- प्रत्येक वेळेस आभार प्रदर्शन करण्याची काही गरज नाहीये. "दोस्ती की है तो निभानी ही पडेगी"

जान्हवी---- चल आता फोन ठेवते, खूप वेळ घेतला तुझा.

श्रीराज---- चालेल, आता रात्री जास्त जागरण नको करुस, झोपून घे, आधीच रडून रडून डोळे दुखत असतील, झोप पूर्ण नाही झाली तर डोकं पण दुखायला लागेल. उद्या दुपारी 2 वाजता फोन करतो. बाय गुड नाईट.

जान्हवी---- बाय गुड नाईट.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

 

 

 

 

 

 

          

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//