पहिली भेट भाग ५

Story of a friendship

पहिली भेट भाग ५

    बघता बघता फर्स्ट इयर ची थिअरी एक्साम संपली, अभ्यास चांगला झाला असल्याने सर्वच पेपर्स खूप चांगले गेले. एक्साम झाल्यावर कॉलेजला एक आठवडा सुट्टी असल्याने घरी जाऊन आले, खूप दिवसांनी घरी गेल्यावर खूप बरे वाटले. प्रॅक्टिकल एक्साम बाकी असल्यामुळे सुट्टी संपल्यावर लगेच कॉलेजला परत आले. 

        आता कॉलेजमध्ये जर्नल तपासणी, असाईनमेंट सबमिशन ची धावपळ सुरू झाली. प्रॅक्टिकल एक्सामची प्रॅक्टिस चालू झाली. मला सगळ्यात जास्त भीती वाटत होती ॲनाटॉमी या विषयाच्या ओरल एक्सामची. ॲनाटॉमी हा माझा आवडता विषय होता पण त्याचा अभ्यास खूप जास्त होता, त्यात डिसेक्शन, मानवी सांगाडा (skeleton), सर्व अवयवांचा अभ्यास होता.थिअरी एक्साम मध्ये विचार करायला वेळ भेटत असल्याने लिहायला सुचते पण ओरल एक्साम मध्ये एक्सामिनरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पटापट द्यावी लागतात, त्यासाठी खूप कॉन्फिडन्स हवा असतो. मला प्रश्नांची उत्तरे माहीत असायची पण सरांसमोर गेल्यावर काहीच आठवत नसायचे, मला खूप भीती वाटायची.

     फायनल प्रॅक्टिकल एक्सामच्या आधी ॲनाटॉमीची प्रॅक्टिस एक्साम होती. एक्साम सुरू झाली, ओरल घ्यायला सरांनी सुरुवात केली, माझा नंबर आला मी सरांसमोर जाऊन बसले, सरांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. सरांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला येत असूनही व्यवस्थित उत्तरे देता आली नाही. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. सर मला खूप ओरडले व म्हणाले की एक्सामिनर समोर अशी उत्तरे दिली तर तु नापास होशील.

       सरांचे बोलणे ऐकल्यावर मला खूप रडायला आले. मी कॉलेजमधून निघून कोणाचीही भेट न घेता तडक रूमवर गेले.खूप वाईट वाटत होते, खूप रडायला येत होते, डोळ्यातले पाणीच बंद होत नव्हते,सारखे सारखे सरांचे बोलणे आठवत होते. सरांच्या म्हणण्यानुसार मी परीक्षेत नापास झाले तर काय होईल? आई बाबांना काय वाटेल? सर्व नकारात्मक विचार डोक्यात येत होते.काय करावे काहीच सुचत नव्हते. दुसऱ्याच क्षणाला श्रीराजची आठवण झाली, त्याच्याशी बोलले तर बरे वाटेल म्हणून फेसबुक वर त्याला मॅसेज केला पण तो ऑनलाईन नसल्याने त्याचा रिप्लाय आला नाही. जवळ जवळ 2तास मी त्याचा मॅसेज यायची वाट पाहिली, तरी त्याचा रिप्लाय आलेला नव्हता.तोपर्यंत प्रिया व पुजाही कॉलेजमधून रूमवर आल्या.त्या दोघींनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्या डोळ्यातील पाणी थांबायला तयार नव्हते.त्यामागे कारणही तसेच होते कारण आजपर्यंत मला कोणीच शिक्षक मला अभ्यासावरून ओरडले नव्हते. पुजाने मला सल्ला दिला की श्रीराजशी बोल म्हणजे तुला बरे वाटेल, तुझं मन हलके होईल.मी तिला सांगितले की मी श्रीराजला फेसबुकवर मॅसेज केला होता पण त्याचा रिप्लायच आला नाही. यावर पुजा बोलली की तो त्याच्या अभ्यासात व्यस्त असेल, तुझ्याकडे त्याचा फोन नंबर आहे ना तर त्याला फोनच कर. मला पुजाचे म्हणणे पटले मी श्रीराजला फोन केला, 2 ते 3 वेळेस फोन लावला पण समोरून फोन उचलला गेला नाही म्हणून मी श्रीराजला मॅसेज करुन ठेवला.

     रात्रीचे आठ वाजले होते तरी श्रीराजचा फोन आला नव्हता. पुजा व प्रियाने मला जेवण करण्यासाठी मेसमध्ये सोबत चलण्यासाठी खूप आग्रह केला पण माझी त्यांच्यासोबत जाण्याची इच्छाच झाली नाही.मी श्रीराजच्या फोनची वाट पाहत बसली होती पण त्याचा फोन काही येत नव्हता.थोड्या वेळाने पुजा व प्रिया माझ्यासाठी जेवणाचे पार्सल घेऊन आल्या. थोड्या कालावधीनंतर श्रीराजचा फोन आला मी एका रिंगमध्येच फोन उचलला. श्रीराज काही बोलणार तेवढ्यात मीच बोलायला सुरुवात केली, हॅलो श्रीराज, तु कुठे होतास? कितीवेळ झालाय मी तुझ्या फोनची वाट पहातेय, तु माझा फोन का उचलला नाहीस? माझ्या मॅसेजला रिप्लाय पण दिला नाहीस.मला बोलताना खूप दम लागला.

श्रीराज---- जान्हवी जरा शांत हो, एक दीर्घ श्वास घे. किती प्रश्न विचारशील, मला बोलायला तर देशील ना. फोन उचलल्यापासून तूच बोलत आहेस.

जान्हवी--- सॉरी श्रीराज, मी तुला बोलायला दिले नाही.

श्रीराज--- इट्स ओके, मी कॉलेज सुटल्यानंतर लायब्ररीत अभ्यास करत बसलो होतो. फोनची बॅटरी उतरल्यामुळे फोन रूमवर चार्जिंगला लावून गेलो होतो. रूमवर परत आल्यावर फोन बघितला तेव्हा तुझा कॉल व मॅसेज आल्याचे कळले आणि लगेच तुला फोन लावला.

जान्हवी--- माझ्या लक्षातच नाही आलं तु कॉलेजमध्ये, अभ्यासात व्यस्त असशील. तु आता सध्या फ्री आहेस का? मला थोडे बोलायचे होते.

श्रीराज--- काही सिरीयस घडलेय का? मी कँटीनमध्ये जेवायला चाललो होतो, उशीर झाला तर कँटीन बंद होऊन जाईल. जेवण करून आल्यावर बोलले तर चालेल का?

जान्हवी--- खूप काही सिरीयस नाहीये. तु जेवण करून ये मग बोलू पण तू फोन उचलशील ना.

श्रीराज--- फोन माझ्याकडेच असेल सो उचलेल आता. तुझे जेवण झालंय का?

जान्हवी--- नाही.

श्रीराज--- आधी तु पण जेवण कर मग आपण बोलू. तु रूममध्ये एकटीच आहेस की अजून कोणी आहे.

जान्हवी--- माझी रुममेट पुजा आहे.

श्रीराज--- फोन स्पिकरवर टाक, मला तिच्याशी बोलायचे आहे.

जान्हवी--- तुला पुजाशी काय बोलायचे आहे?

श्रीराज--- तु पाहिले फोन स्पिकरवर टाक मग तुलाही कळेलच मला काय बोलायचं आहे.

मी फोन स्पिकरवर टाकला आणि पुजाला सांगितले, श्रीराजला तुझ्याशी बोलायचे आहे, पुजा माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत राहिली.

जान्हवी--- श्रीराज पुजाशी बोलू शकतोस, मी फोन स्पिकरवर टाकला आहे.

श्रीराज--- हाय पुजा, मी श्रीराज देशमुख जान्हवीचा मित्र, तिच्या बोलण्यावरून असे दिसतेय की ती खूपच नाराज आहे आणि शिवाय तिने जेवणही केलेले नाही. जान्हवीचे जेवण पूर्ण होईपर्यंत फोन तुझ्याकडे ठेव. जेवण पूर्ण केल्याशिवाय जान्हवी ला फोनला हात लावू देऊ नको. जान्हवी जेवण झाले की फोन कर, मी वाट बघतोय तुझ्या फोनची.

पुजा--- डोन्ट वरी श्रीराज, आता तु सांगितलंय म्हटल्यावर जान्हवी लगेच जेवण करेल. मी तिच्याकडे लक्ष देते.

श्रीराज--- थँक्स पुजा, बाय जान्हवी, बाय पुजा.

श्रीराज फोन बंद करतो.

पुजा--- जान्हवी श्रीराज तुला परफेक्ट ओळखतो, त्याला किती काळजी आहे तुझी. मित्र असावा तर श्रीराजसारखा. चल बोलत काय बसलेय, तुझा फोन दे माझ्याकडे आणि जेवायला सुरुवात कर.

मी पुजाकडे फोन दिला आणि पुजाशी गप्पा मारत मारत जेवण करत होते तेवढ्यात प्रिया रूममध्ये आली, पुजाने घडलेली सर्व हकीकत प्रियाला सांगितली.

प्रिया--- You are so lucky janhavi, श्रीराजसारखा एवढा काळजी करणारा मित्र भेटायला भाग्य लागत. श्रीराजशी असलेली मैत्री कायम टिकवून ठेव.

प्रियाचे बोलणे झाल्यावर मी विचारात पडले की खरच श्रीराजला माझी किती काळजी आहे, माझ्या फक्त आवाजावरून मी नाराज असल्याचे त्याला समजलं.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all