Jan 19, 2022
प्रेम

पहिली भेट भाग ४

Read Later
पहिली भेट भाग ४

पहिली भेट भाग ४

फर्स्ट इयर MBBS ची वार्षिक परीक्षा जवळच आल्यामुळे अभ्यासाचा ताण खूपच वाढला होता. रात्रंदिवस अभ्यास केला तरी कमीच वाटत होता.आयुष्यात पहिल्यांदाच परीक्षेची एवढी भीती वाटत होती.

कॉलेजने परीक्षेच्या आधी अभ्यास करण्यासाठी २ आठवडे सुट्ट्या दिल्या होत्या. माझा रूमवर अभ्यास होत नसायचा म्हणून मी कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचे.

परीक्षेला एक आठवडा बाकी होता, रात्रीच्या जागरणामुळे डोकं प्रचंड दुखत होते, गोळी घेतली तरी डोकं उतरायला तयार नव्हते, डोळ्यासमोर पुस्तकही धरवत नव्हते. माझी अशी स्थिती पाहून प्रियाने मला लायब्ररीत न जाण्याचा सल्ला दिला व रूमवर आराम करायला सांगितले. मला प्रियाचा सल्ला पटला मी हातातील पुस्तक बाजूला ठेवून शांत झोप काढली, झोप झाल्यावर डोकं दुखण्याचे थांबले होते पण फ्रेश वाटत नव्हते, अभ्यास करण्याची इच्छाच होत नव्हती तेव्हा पुजाने सांगितले, जरावेळ मोबाईल वर टाईमपास कर म्हणजे डोकं शांत होईल.

पुजाने सुचवल्याप्रमाणे मोबाईलचे नेट चालू केले, बऱ्याच दिवसांपासून फेसबुक चेक न केल्याने धडाधड नोटिफिकेशन आले, त्यातील एक नोटिफिकेशन श्रीराजच्या वाढदिवसाचे होते, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इनबॉक्स ओपन केला तर त्यात आधीच श्रीराजचा मॅसेज आलेला होता,माझ्या मागच्या मॅसेजला रिप्लाय केलेला होता,

श्रीराज--- मी माझा फोन नंबर तुला गरज पडली तर यासाठी दिलाय, मी कधीही तुझ्यावर फोन करण्याचा दबाव आणणार नाही.तुझी परीक्षा जवळ आली असल्याने तु पण अभ्यासात व्यस्त असशील. तुला अभ्यास कर म्हणून सांगण्याची गरज नाही, तु मुळातच अभ्यासू वृत्तीची आहेस. पहिलेच वर्ष असल्याने तुला परीक्षेचा पॅटर्न माहीत नसल्यामुळे अभ्यासाचे खूप टेन्शन आले असेल.परीक्षेचे टेन्शन येणे स्वाभाविकच आहे पण परीक्षेचे टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये, अभ्यासाचा जास्त लोड घेऊ नकोस. रात्रंदिवस अभ्यास करत बसू नकोस. अभ्यास करच पण त्याबरोबर शरीरालाही विश्रांती दे. अभ्यास करण्याच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस. जास्त जागरणे केल्यामुळे डोकं दुखायला लागते, डोकं जड पडतं, डोळे दुखायला लागतात तेव्हा अभ्यासात थोडा ब्रेक घेत जा. जेवणाच्या वेळा पाळत जा नाहीतर ऐन परीक्षेच्या काळात अशक्तपणा येईल व तु आजारी पडशील. तु विचार करशील की मी किती फिलॉसॉफीकल बोलतो, बोअर तर नाही ना झाले. तुझी काळजी वाटली म्हणून मित्र या नात्याने बोललो. स्वतःची काळजी घे, Don't take too much tension. काही लागलं तर मी आहेच. All the best for your exam.

श्रीराजचा मॅसेज वाचल्यावर खूप फ्रेश वाटले, मनाला एक वेगळीच शांती लाभली. श्रीराज किती छान बोलतो ना. माझी जरा जास्तच काळजी करतो. श्रीराजचे म्हणणे बरोबर आहे अभ्यासाच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष नको नाहीतर ऐन परीक्षेच्या काळात आजारी पडशील.श्रीराजचा मॅसेज वाचल्यावर अभ्यासाचे टेन्शन कुठल्या कुठे उडून गेले. मी लगेच श्रीराजला मॅसेज केला.

जान्हवी--- Thank you so much, मॅसेज केल्याबद्दल. तुझा मॅसेज वाचुन खूप छान वाटले. अभ्यासाचे खूप टेन्शन आले होते पण तुझ्या मॅसेजमुळे टेन्शन कुठल्या कुठे उडून गेले. तु मला बरोबर ओळ्खलस मी अभ्यास करताना तहानभूक विसरून जाते. खूप जागरण झाल्याने सकाळपासून डोकं खूप दुखत होते, अभ्यासात ब्रेक म्हणून फेसबुक ओपन केलं आणि तुझा मॅसेज दिसला.

श्रीराज ऑनलाईनच असल्याने त्याने लगेच मॅसेज केला,

श्रीराज--- हाय जान्हवी, कशी आहेस?

जान्हवी--- हाय श्रीराज, मी बरी आहे, तु कसा आहेस?

श्रीराज--- मी मजेत आहे.

जान्हवी---Wish you many many happy returns of the day.

श्रीराज--- Thank you so much. अभ्यास कसा चालू आहे. खूपच टेन्शन घेतलंय वाटतं

जान्हवी--- अभ्यास चांगला चालू आहे, हो परीक्षेचे थोडं टेन्शन आलंय.

श्रीराज--- जास्त टेन्शन घेतलंस तर डोकं दुखण्याचे थांबणार नाही.

जान्हवी--- हो प्रयत्न करते. परीक्षा असल्यामुळे तुला तुझा वाढदिवस साजरा करता येत नसेल ना.

श्रीराज--- MBBS ला admission घेतल्यापासून मला माझा वाढदिवस साजरा करायला भेटलाच नाही पण परीक्षा संपल्यावर माझे सगळे मित्र मिळून जोरात वाढदिवस साजरा करतात.

जान्हवी--- तुझा अभ्यास कसा चालू आहे?

श्रीराज--- मस्त, पण तुझ्याइतका अभ्यास मी नाही करत. तु खूपच सिंसिअर आहेस.

जान्हवी--- खोटं नको बोलूस, मला माहित आहे तु पण खूप अभ्यास करतोस. चल आता बस झालं बोलणं, अभ्यासाला लागावे लागेल नाहीतर पूर्ण दिवस वाया जाईल. तुला पण अभ्यास करायचा असेल.

श्रीराज--- ओके, स्वतःची काळजी घे, तब्येतीला सांभाळून अभ्यास कर.

जान्हवी--- तु पण तुझी काळजी घे, बाय

श्रीराज--- बाय. Once again All the best.

जान्हवी--- Thanks and all the best you too also.

श्रीराजशी बोलून खरंच खूप छान वाटले, माझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघून पुजाने मला विचारले, श्रीराजशी बोलत होती वाटतं, म्हणूनच एवढी फ्रेश दिसत आहेस, तुझ्या डोकेदुखी वर श्रीराजच उपाय होता तर आधीच त्याला फोन करायचा ना.उगाच पूर्ण दिवस वाया घातलास. पुजा मला चिडवण्याच्या फुल मूडमध्ये होती.

जान्हवी--- पुजा शांत बस, अस काही नाहीये, श्रीराजचा वाढदिवस असल्याने त्याला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने थोडंफार बोलणं झालं आमच्यात.

पुजा--- आज श्रीराजचा वाढदिवस आहे तर.

जान्हवी--- चल आपण कँटीनमध्ये जाऊन काही तरी खाऊन येऊ.

पुजा--- श्रीराजच्या वाढदिवसाची पार्टी वाटतं

जान्हवी--- श्रीराजच्या वाढदिवसाची पार्टी मी का देऊ? माझा काय संबंध?

पुजा--- अगं परीक्षा जवळ आल्यापासून तु एकदा तरी वेळेवर खाल्लं आहेस का? आज अचानक कँटीनमध्ये जायचं म्हणालीस म्हणून विचारले.

जान्हवी--- श्रीराजने सांगितलं, अभ्यासाच्या नादात खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष करू नकोस नाहीतर आजारी पडशील.

पुजा--- इतक्या दिवस आम्ही सांगत होतो तेव्हा नाही पटले आता श्रीराजने सांगितल्यावर बरं पटलं.

जान्हवी--- बरं बाई आता माझी खेचत बसू नकोस चल पटकन कँटीनमध्ये जाऊ, अभ्यास करायचा आहे.

श्रीराजच्या बोलण्यात काय जादू होती काय माहीत पण मला त्याच बोलणं लगेच पटायचे.

बोलता बोलता परीक्षा होऊन गेली. अभ्यास चांगला झाल्यामुळे सर्वच पेपर्स चांगले गेले. परीक्षा झाल्यावर एक आठवडा सुट्टी भेटली म्हणून घरी जाऊन आले. थिअरी एक्साम झाली होती पण आता प्रॅक्टिकल एक्साम बाकी होती.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now