पहिली भेट भाग २४

Story of friendship cum love

        मी श्रीराजला मॅसेज केल्यानंतर त्याचा रिप्लाय आला," कसे वाटले सरप्राईज? संध्याकाळी फोन करतो मग निवांत बोलूया, I love you too",तेवढ्यात आई मला बोलवायला रुम मध्ये आली. 

आई--- जान्हवी इथे काय बसली आहेस? बाहेर सगळे तुझी वाट बघत आहेत.

जान्हवी--- आई तुला माझा राग नाही ना आला.

आई--- खरं सांगू बाळा, सुरवातीला मला तुझा खूप राग आला होता, तुझे बाबा तुझ्या आणि श्रीराजच्या लग्नाला तयार झाले होते पण माझं मन काही तयार होत नव्हते, तेवढ्यात साक्षी बद्दल ऐकायला भेटलं.

जान्हवी--- साक्षी म्हणजे मंदा मावशीची मुलगी ना, काय घडलं?

आई--- हो, सहा महिन्यांपूर्वी तिचे थाटामाटात लग्न झाले होते, खूप छान स्थळ भेटलं होत, अगदी सगळयांच्या मनासारखे भेटलं होत, मुलगा दिसायलाही सुंदर होता,सुशिक्षित घर होत, साक्षी पण खूप खुश होती, तिच्या आई वडिलांच्या आनंदाला पारावार नव्हता. आम्ही दोघेही लग्नाला गेलो होतो, लग्न एकदम राजेशाही थाटात पार पडले. लग्न झाल्यावर दोन महिन्यांपर्यंत सर्व काही ठीक होते पण नंतर हळूहळू साक्षीच्या नवऱ्याचे खरे रंग बाहेर येऊ लागले, त्याला दारूचे अति प्रमाणात व्यसन होते, रात्री मित्र मैत्रिणींसोबत उशिरा पर्यंत पार्टी करत बसायचा, रात्री पिऊन घरी यायचा, साक्षीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही सुधारला नाही म्हणून साक्षी माहेरी निघून आली, साक्षीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला पण तो घटस्फोट द्यायला तयार नाही, आता कोर्टात केस उभी राहिलीये, चांगल्या मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. जेव्हा साक्षी बद्दल ऐकलं तेव्हा वाटलं की आपण कितीही चांगला मुलगा बघितला पण देव न करो जे साक्षीच्या बाबतीत घडलं ते तुझ्याही बाबतीत घडलं तर काय करायचं. श्रीराजच्या बाबतीत विचार केला तर श्रीराज आपल्या बघण्यातला आहे, त्याच्या घरच्यांना आपण खूप वर्षांपासून ओळखतो, या सगळ्यात एकच अडचण आहे ती म्हणजे आपली जात वेगळी आहे पण आयुष्य जगताना जातीपेक्षा सोबत माणसे कशी आहेत यावर आयुष्य कसे जाईल हे ठरते.

जान्हवी--- आई मला बाबांचा आणि तुझा खूप अभिमान वाटतोय, तुम्हाला कल्पना नाहीये की तुम्ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट स्विकारताय. Thank you so much आई.

   मी आईला मिठी मारली, आईच्या डोळ्यात पाणी आले.

जान्हवी--- आई तुझ्या डोळ्यात पाणी, काय झालं?

आई--- मुली खूप लवकर मोठ्या होतात ग, माझं एवढं गुणी बाळ उद्या लग्न होऊन सासरी निघून जाईल.

जान्हवी--- आई आता हा विचार करून इमोशनल होऊ नकोस, चल बाहेर जाऊयात, सगळे वाट बघत आहेत ना.

आम्ही दोघीही हॉल मध्ये जातो.

देशमुख काका--- पुढची चर्चा तुझ्यासमोरच व्हायला हवी म्हणून तुला बोलावलं, तुझी अजून निम्मी इंटर्नशिप बाकी आहे, श्रीराजची फायनल एक्साम बाकी आहे, म्हणजे जवळजवळ अजून सहा महिने तरी तुम्ही तुमच्या कामात बिजी आहात, मला असं वाटतंय की सहा महिन्यानंतरच आपण साखरपुडा, लग्न याचा विचार करूया कारण सध्या श्रीराजला अजिबात वेळ नाहीये, आणि मला वाटतं की आपण अजून सहा महिने थांबुयात तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय?

बाबा---तुझं म्हणणं मला पटतंय, पुढचे सहा महिने आपण थांबून घेऊ, तुला काय वाटतं जान्हवी?

जान्हवी--- तुम्हा सगळ्यांना जे योग्य वाटेल तेच करूया, तसही पुढील सहा महिने श्रीराज साठी खूप महत्त्वाचे आहे.

बाबा--- मग ठरलं तर आता जे काही करायच ते श्रीराजची एक्साम झाल्यावर.

    आईने मला श्रीराजच्या आई बाबांना नमस्कार करायला लावला, श्रीराजच्या आईने माझ्यासाठी साडी आणली होती तर त्याच्या बाबांनी पैशाचे पाकीट माझ्या हातात दिले, जेवण करून श्रीराजचे आई बाबा घरी निघून गेले. आई बाबांना आनंदी बघून माझ्या मनावरचे ओझे कमी झाले होते. त्या दिवशी धनत्रयोदशी होती, मी अंगणात रांगोळी काढली, ठरवल्या पेक्षा रांगोळी खूप छान आली होती ते म्हणतात ना जर आपण मनापासून आनंदी असलो तर कुठलीही गोष्ट छानच होते, घरासमोर पणत्या लावल्या. काही वेळाने श्रीराजचा फोन आला, बाबांनी फोन बघितला आणि त्यांनीच फोन उचलला,

बाबा--- हॅलो जावईबापू, कसे आहात?

श्रीराज--- काका मी मस्त, तुम्ही कसे आहात?

बाबा--- मी मजेत आहे.

श्रीराज--- काका मला श्रीराजच म्हणत जा, जावईबापू नको.

बाबा--- अरे गंमत केली रे.

श्रीराज--- काका जान्हवी आहे का तिथे?

बाबा--- आहे ना, इथेच आहे, गालातल्या गालात हसतेय, आमच्याशी बोलायचं नाही का?

श्रीराज--- तस नाही काका, खूप दिवस झाले जान्हवीशी बोलणं नाही झालं.

बाबा--- जान्हवीकडे फोन देतो, आता तुम्ही निवांत गप्पा मारू शकता, कोणीच काही बोलणार नाही.

बाबा माझ्याकडे फोन देतात, मी रुम मध्ये जाऊन फोनवर बोलायला सुरुवात करते.

जान्हवी--- हा बोल श्रीराज

श्रीराज--- बोल काय बोल, काकांशी बोलताना किती विचार करावा लागतो, फोन तु का नाही उचललास.

जान्हवी--- बाबा मोबाईल जवळ होते, त्यांनी फोन घेतल्यावर मी कस म्हणू तुम्ही फोन घेऊ नका?

श्रीराज--- Anyways, आई बाबा आल्यावर काय काय घडलं ते सांग, मला ऐकण्याची उत्सुकता लागली आहे.

मी श्रीराजला सर्व इतंभूत कहाणी सांगितली.

जान्हवी--- श्रीराज तु मुद्दाम माझ्याशी बोलण टाळत होता का?

श्रीराज--- हो कारण मला भीती होती की बोलण्याच्या ओघात माझ्याकडून नको त्या गोष्टी बाहेर पडतील.

जान्हवी--- मला किती टेन्शन आले होते.

श्रीराज--- तुझे टेन्शन दूर व्हावे म्हणूनच मी सर्व खटाटोप केली.

जान्हवी--- श्रीराज तु खूप भारी आहेस.

श्रीराज--- तो मी लहानपणापासूनच आहे, सहा महिन्यानंतर तु मिसेस श्रीराज देशमुख होशील.

जान्हवी--- श्रीराज तुझं ना काही तरच असतं.

श्रीराज--- जान्हवी तु लाजत आहेस का?

जान्हवी--- तुला कस कळलं?

श्रीराज--- हार्ट कनेक्शन

जान्हवी--- गप्प बस

श्रीराज--- मला तू न बोललेल्या गोष्टीही समजतात.

जान्हवी--- श्रीराज नौटंकी बंद कर, तु दिवाळीला घरी जाणार नाहीयेस का?

श्रीराज--- नाही ना, सुट्टीच नाहीये, खूप बिजी शेड्युल आहे.

जान्हवी--- श्रीराज मला वाईट वाटतंय, मी इकडे माझ्या घरच्यांसोबत मजा करणार आणि तु तिकडे काम करतो आहेस.

श्रीराज--- जान्हवी कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है, वाईट नको वाटून घेऊस, पुढच्या वर्षी आपण दोघे मिळून दिवाळी साजरी करू.

जान्हवी--- श्रीराज मला माहित आहे की हे शक्य नाही पण मला तुला भेटण्याची खूप इच्छा होत आहे.

श्रीराज--- मलाही तुला भेटण्याची खूप इच्छा झाली आहे, आपण एवढ्या दिवस थांबलोय आता फक्त सहा महिने नंतर मग काय आपण रोजच भेटणार.

जान्हवी--- हो का, एक्साम झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आपण लग्न करणार आहोत का?

श्रीराज--- आपल्याला बोलायला काय जातंय, तेवढंच मनाला समाधान.

जान्हवी--- हो ना, श्रीराज आई बाबा जेवणासाठी थांबले आहेत, मी फोन ठेऊ का?

श्रीराज--- फोन ठेवण्याची इच्छा तर नाहीये पण दुसरा पर्याय नाहीये, तु आई बाबांसोबत ही दिवाळी एन्जॉय कर, माझ्या बद्दल वाईट वाटून घेऊ नको, नंतर वेळ भेटला की फोन करेल, बाय.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all