माझा फायनल इअरचा रिझल्ट मनासारखा लागल्याने मी व माझे आई बाबा खूप खुश होतो. माझ्या नावापुढे डॉ लागले होते. थोड्याच दिवसात इंटर्नशिप सुरू होणार असल्याने मला कॉलेजला परत यावे लागले. खूप दिवसांनंतर पुजाला व प्रियाला भेटून खूप आनंद झाला. श्रीराजसोबतही आता फोनवर बोलायला भेटणार होते.
माझी इंटर्नशिप सुरू झाली होती. श्रीराजसोबत दिवसातून किमान दोनदा तरी फोनवर बोलणे व्हायचे. हळूहळू श्रीराजसोबत बोलण्याचे , मॅसेजचे प्रमाण वाढले होते. आता तर आमच्यात विडिओ कॉल पण होऊ लागला. आमच्यातला बॉण्ड अजूनच घट्ट होऊ लागला. पटपट दिवस पुढे जाऊ लागले होते. माझी इंटर्नशिप सुरू होऊन तीन महिने होऊन गेले होते.
एक दिवस मी कॉलेज मध्ये असताना श्रीराजचा मला फोन आला, मी ओपीडी च्या ड्युटी ला होती, पेशंट जास्त असल्याने मला श्रीराजचा फोन उचलता आला नाही. श्रीराजचा चार ते पाच वेळेस फोन येऊन गेला. दुपारच्या वेळी जेवणाची सुट्टी झाल्यावर श्रीराजला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तर श्रीराजचे खूप मॅसेजेस आलेले होते, मॅसेज असे होते की, लवकर फोन कर, मला खूप महत्त्वाचे बोलायचे आहे,its urgent. मी एवढे कॉल व मॅसेजेस बघून घाबरलेच, नक्कीच काहीतरी urgent असेल म्हणून श्रीराजने एवढे कॉल व मॅसेज केले असतील. श्रीराजसोबत बोलायचे म्हटल्यावर मला कॉलेज मधून निघावे लागणार होते, कॉलेज मधून निघण्यासाठी सरांना काहीतरी कारण द्यावे लागणार होते, मी थोडा विचार करून सरांकडे गेले व त्यांना सांगितले की माझे डोकं खूप दुखत आहे, मला रूमवर जावं लागेल. सरांनी थोडी बडबड करून शेवटी परमिशन दिली.
मी रूमवर आल्या बरोबर श्रीराजला फोन लावला, दोन रिंग गेल्यावर श्रीराजने फोन उचलला,
श्रीराज--- जान्हवी तुला आत्ता वेळ भेटला का फोन करायला?
जान्हवी--- श्रीराज मी ड्युटी वर होते, खूप पेशंट होते, मी कशी फोन रिसिव्ह करणार?
श्रीराज--- अग पण मी जर एवढे फोन करतोय म्हटल्यावर काहीतरी महत्त्वाचेच बोलायचे असेल ना.
जान्हवी--- अरे श्रीराज तु माझी परिस्थिती पण समजून घे ना. मी आत्ता सरांना खोटे कारण सांगून रूमवर आली आहे ते कशासाठी? तुझ्याशी बोलायचे आहे म्हणूनच ना, तु काही बोलणार आहेस की असच चिडणार आहेस?
श्रीराज--- जान्हवी तुला कल्पना नाहीये मी कुठल्या टेन्शन मध्ये आहे.
जान्हवी--- श्रीराज तु मला सरळसरळ सांगणार आहेस का की प्रॉब्लेम काय आहे की प्रस्तावनाच देत बसणार आहेस?
श्रीराज--- सांगतो, तुझ्या बाबांचा मला फोन आला होता.
जान्हवी--- माझ्या बाबांचा फोन आणि तुला, कशासाठी?
श्रीराज--- तुझ्यासाठी त्यांनी एक मुलगा बघितलाय, त्याची चौकशी करण्यासाठी फोन केला होता.
जान्हवी--- काय? अरे पण मला तर काहीच माहीत नाही. कोण मुलगा?
श्रीराज--- आमच्या कॉलेजला आहे, MD RADIOLOGY च्या फायनल इअर ला आहे.
जान्हवी--- बाबा तुला काय म्हणाले?
श्रीराज--- ते म्हणाले की जान्हवी साठी एका मुलाचे स्थळ सांगून आले आहे, तो तुझ्या कॉलेजला आहे, मी तुला बायोडेटा पाठवतो, मला त्याची चौकशी करून सांग.
जान्हवी--- तु काय उत्तर दिलेस?
श्रीराज--- मी सांगितले, चौकशी करून सांगतो.
जान्हवी--- बाबांनी हे काय मधेच चालू केलं. बाबांचा पुन्हा फोन आल्यावर काय सांगणार आहेस?
श्रीराज--- मी तोच विचार करतोय.
जान्हवी--- बरं मला एक सांग, तुला या सगळ्यांचे टेन्शन का आले आहे?
श्रीराज--- टेन्शन नाही येणार तर मग काय होणार, या सगळ्यावरून एक लक्षात घेतले पाहिजे की तुझे बाबा तुझ्या लग्नासाठी मुलं बघत आहेत, जान्हवी आपल्याकडे खूप कमी वेळ उरला आहे, आपल्या दोघांबद्दल आपल्या घरी सांगावं लागेल.
जान्हवी--- श्रीराज मी बाबांशी बोलते, माझ्या लग्नाची एवढी घाई करू नका सांगते.
श्रीराज--- मला वाटलं होतं, तुझी इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर मी स्वतः तुझ्या बाबांशी आपल्या बद्दल बोलेल पण आता घाई करावी लागेल असे वाटतेय.
जान्हवी--- माझ्याही डोक्यात तेच होतं. आपल्या नात्याबद्दल आपल्या घरच्यांना कळेल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल?
श्रीराज--- सकाळपासून हाच विचार करून डोकं फुटण्याची वेळ आली आहे.
जान्हवी--- तु जास्त विचार करू नकोस, योग्य वेळ आली की आपण आपल्या नात्याबद्दल घरी सांगूयात मग जे होईल त्याला आपण सामोरे जाऊयात.
श्रीराज--- जान्हवी तुझ्या बाबांचा फोन आल्यावर मी काय सांगू?
जान्हवी--- काहीतरी सांगावेच लागेल, थांब मला विचार करू देत. बाबांचा फोन येण्या आधीच तु त्यांना फोन करून सांग की तो मुलगा चांगला नाहीये, व्यसनी आहे असं सांग.
श्रीराज--- बरं ठीक आहे. तो मुलगा खूप चांगला आहे, त्याचा स्वभावही चांगला आहे, निर्व्यसनी आहे,हुशार आहे, कोणत्याच मुलीकडे वर मान करून बघतही नाही, सज्जन आहे पण आपल्याला आपल्या फायद्यासाठी खोटं बोलावे लागत आहे.
जान्हवी--- इतका चांगला असेल तर मी करते त्याच्याशी लग्न.
श्रीराज--- तु माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुलाचा विचार करून तर बघ मग तुझ्याकडे बघतो.
जान्हवी--- अरे चिडू नकोस मी गम्मत करत होते, तु बाबांना फोन कर मग मला कळवं बाबा काय म्हणाले?
श्रीराज--- हो चालेल, लगेच फोन करतो मग तुला कळवतो. बाय
श्रीराज एवढे बोलून फोन कट करतो. थोड्याच वेळात पुजा व प्रिया रुम मध्ये येतात,
पुजा--- जान्हवी डोकं दुखायचे राहिले का? बरी आहेस ना.
जान्हवी--- मी बरी आहे, माझं डोकं दुखतच नव्हतं.
प्रिया--- मग रूमवर का निघून आलीस?
माझ्यात व श्रीराजमध्ये काय बोलणं झालं हे सर्व पुजाला व प्रियाला सांगितले.
पुजा--- जान्हवी तुम्ही दोघेही तुमच्या नात्याबद्दल घरी खरं खरं सांगून का देत नाहीत?
प्रिया--- हो ना म्हणजे तुम्हाला अशी लपवा छपवी करावी लागणार नाही आणि शिवाय तुमचा पुढील मार्गही मोकळा होईल.
जान्हवी--- तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आमच्या घरच्यांना आमचं नात मान्य झालं पाहिजे ना, श्रीराजच अजून एक वर्ष बाकी आहे, माझीही इंटर्नशिप पूर्ण व्हायची आहे.
पुजा--- अगं पण तुझे बाबा आणि श्रीराजचे बाबा एकमेकांचे चांगले मित्र आहेत ना, मग तुमच नातं त्यांना मान्यच होईल ना.
जान्हवी--- पुजा आमची जात वेगळी आहे , मैत्री करताना कोणी जात बघत नाही मात्र लग्न करताना सगळे पहिले जात बघ माझा फायनल इअरचा रिझल्ट मनासारखा लागल्याने मी व माझे आई बाबा खूप खुश होतो. माझ्या नावापुढे डॉ लागले होते. थोड्याच दिवसात इंटर्नशिप सुरू होणार असल्याने मला कॉलेजला परत यावे लागले. खूप दिवसांनंतर पुजाला व प्रियाला भेटून खूप आनंद झाला. श्रीराजसोबतही आता फोनवर बोलायला भेटणार होते.

जान्हवी--- पुजा आमची जात वेगळी आहे , मैत्री करताना कोणी जात बघत नाही मात्र लग्न करताना सगळे पहिले जात बघता. माझे बाबा व श्रीराजचे बाबा जरी चांगले मित्र असतील तरी आमच्या लग्नासाठी सहजासहजी तयार होतील याबाबत आम्ही दोघेही थोडे साशंक आहोत.
प्रिया--- ओके, हा मुख्य प्रॉब्लेम आहे तर. योग्य वेळ आली की घरी सांगा मग घरच्यांची प्रतिक्रिया कळेलच. समजा तुझ्या घरचे तुमच्या लग्नासाठी तयार नाही झाले तर तु पुढे काय करायचे ठरवले आहे?
जान्हवी--- माहीत नाही पण मी श्रीराज सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलाशी लग्न करण्याचा विचारच करू शकत नाही. दिवाळीच्या सुट्टीत घरी गेले की आई बाबांना श्रीराज बद्दल सांगेन मग बघू पुढे काय होईल त्याला सामोरे तर जावे लागेलच ना.
प्रिया--- हो ते आहेच, Hope for the best.
©®Dr Supriya Dighe