पहिली भेट भाग १६
आपण मागील भागात बघितलं, श्रीराज जान्हवीला भेटायला येणार असतो पण काही इमर्जन्सी आल्यामुळे श्रीराजला यायला जमत नाही,आता बघुयात अशी काय इमर्जन्सी आली होती की ज्यामुळे श्रीराजला जान्हवीला भेटायला यायला जमले नाही.
श्रीराजचा मॅसेज आल्यापासून जान्हवी खूपच डिस्टर्ब झाली होती. जान्हवी श्रीराजला भेटण्यासाठी खूप उत्सुक होती त्यासाठी ती तिच्या बाबांशी खोटं बोलली होती. श्रीराजचा फोन आल्याशिवाय जान्हवीला श्रीराज न येण्याचे कारण समजणार नसल्याने ती श्रीराजच्या फोनची वाट बघत बसली होती. श्रीराजच्या विचारातच जान्हवीचा दिवस निघून गेला. जान्हवी रात्री जेवण करून श्रीराजच्या फोनची वाट बघत बसली. थोड्याच वेळात श्रीराजचा फोन आला,
श्रीराज--- हॅलो जान्हवी, I'm really very sorry, मला माहित आहे तु माझ्यावर खूप रागावली असशील पण परिस्थिती अशी होती की मला यायलाच जमले नाही.
जान्हवी--- तुला यायला जमले नाही की तुला यायचेच नव्हते, सगळा प्लॅन तुच केला होता ना, मग असे अचानक काय झाले की त्यामुळे तुला येता आले नाही, तुझ्याशी भेट व्हावी म्हणून मी बाबांशी खोटं बोलले.
श्रीराज--- जान्हवी तुला अस वाटतंय का, मी तुझ्याशी खोटं बोलत आहे, मला ही तुला भेटण्याची खूप इच्छा होती, तुला भेटून तुझ्याशी खूप काही बोलायचे होते.
जान्हवी--- श्रीराज तु मला टाळत तर नाहीये ना.
श्रीराज--- जान्हवी तु वेडी आहेस का? तु काय बोलत आहेस तुला तरी कळतंय का? मी तुला का म्हणून टाळू? आपली भेट व्हावी म्हणून मीच पूर्ण प्लॅन बनवला होता ना. मी पण तुझ्या इतकाच एकसायटेड होतो.
जान्हवी--- अरे आपण रात्री फोनवर बोललो तोपर्यंत सर्व ठीक होते मग अशी अचानक काय इमर्जन्सी आली?
श्रीराज--- आपण फोनवर बोलल्यानंतर मी पहाटेचा अलार्म लावून झोपलो, पहाटे अलार्म वाजल्यावर मी उठलो, तेवढ्यात माझा फोनची रिंगटोन वाजली, मला दोन अलार्म लावायची सवय असल्याने दुसरा अलार्म वाजत असेल म्हणून अलार्म बंद करण्यासाठी फोन हातात घेतला तर अलार्म वाजत नसून आत्याचा फोन आला होता, एवढ्या सकाळी आत्त्याचा फोन बघून मला टेन्शनच आले, मी फोन उचलला तर तिकडून आत्त्याचा रडण्याचा आवाज येत होता, आत्त्याचे रडणे ऐकून मला धडकीच भरली, आत्याने रडता रडता सांगितले की, मामांना रात्री छातीत दुखायला लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा कळले की मामांना माईल्ड हार्ट अटॅक आला होता. आत्याच्या आवाजावरून आत्या खूप घाबरलेली वाटली, आत्याने मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. मी अंघोळ न करता फक्त तोंडावर पाणी मारले, कपडे बदलले आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. घाईघाईत वेळ काढून तुला पहिले मॅसेज केला. दिवसभर हॉस्पिटलमध्येच होतो, मामांच्या वेगवेगळ्या टेस्टस करायच्या होत्या, अशावेळेस मला आत्या सोबत थांबणे गरजेचे होते आणि म्हणूनच दिवसभरात मी तुला फोन करू शकलो नाही. या सगळ्यात माझं काही चुकलं आहे का?
जान्हवी--- सॉरी श्रीराज, सर्व अस काही असेल याचा मी विचारच केला नाही. तुझी खूप धावपळ झाली असेल ना.
श्रीराज--- जान्हवी तुझा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे, तु ना कुठल्याही परिस्थितीत पटकन conclusion वर येऊन पोहचते. समोरच्याच्या परिस्थितीचा सारासार विचार करावा.
जान्हवी--- वन्स अगेन सॉरी श्रीराज, मी खरच वेडी आहे, कधीकधी मलाच कळत नाही की मी काय बोलून जाते.
श्रीराज--- इट्स ओके, पुढच्या वेळेस अस काही बोलू नकोस.
जान्हवी--- आत्ता तु कुठे आहेस?
श्रीराज--- मी जेवायला बाहेर आलो होतो, रात्री मामांसोबत हॉस्पिटलमध्ये रहायची माझी ड्युटी आहे.
जान्हवी--- तु खूप थकला असशील ना, रात्री झोपही भेटणार नाही.
श्रीराज--- दिवसभरात खूप धावपळ झाली, थकलो तर आहेच, पण आत्या सोबत कोणीच नसल्याने मलाच थांबावे लागेल, उद्या आत्त्याचा मुलगा येणार आहे मग माझी गरज लागणार नाही.
जान्हवी--- श्रीराज तुही स्वतःची काळजी घे, नाहीतर तूच आजारी पडशील, वेळेवर जेवण करत जा.
श्रीराज--- यस मॅडम, उद्या तु घरी जाणार असशील ना.
जान्हवी--- हो, आपल्याला फोनवर बोलता येणार नाही.
श्रीराज--- हो ते आहेच, घरून परत आल्यावर फोन कर.
जान्हवी--- हो नक्की. श्रीराज मी तुझ्यासाठी गिफ्ट घेतले होते त्याच काय करू?
श्रीराज--- एक काम कर, मी तुला माझा होस्टेलचा पत्ता पाठवतो, त्यावर कुरिअर कर.
जान्हवी--- बेस्ट आयडिया.
श्रीराज--- आत्त्याचा फोन येतोय, नंतर बोलूया बाय.
श्रीराजने मला त्याचा पत्ता पाठवला, मी त्या पत्त्यावर श्रीराज साठी घेतलेला परफ्यूम व ग्रिटींग कार्ड पाठवले . मी दुसऱ्या दिवशी एका आठवड्यासाठी घरी गेले, घरी जाऊन जरा रिलॅक्स झाले. आता फायनल इअर सुरू होणार असल्याने घरी यायला भेटणार नव्हते. श्रीराजला मी दिलेला परफ्यूम खूप आवडला, त्याचे असे म्हणणे होते की, जेव्हा तो परफ्यूम मारतो व जेव्हा त्या परफ्यूमचा सुगंध येतो त्यावेळी माझी आठवण आल्याशिवाय राहत नाही.बघता बघता एक आठवडा संपला व माझी सुट्टीही संपली.
मी कॉलेजला गेल्याबरोबर श्रीराजला फोन केला, श्रीराजने मला फायनल इअर चा अभ्यास कसा करायचा याच्या काही टिप्स दिल्या तसेच मोबाईलचा वापर कमी करण्यास सांगितले. माझे फायनल इअर सुरू झाले, सुरुवातीपासूनच मन लावून अभ्यास करण्याचे ठरविले होते. काही दिवसातच थर्ड इअर चा रिजल्ट लागला, मला फर्स्ट क्लास मिळाला होता.
श्रीराजची इंटर्नशिप संपली होती, श्रीराजला एन्ट्रान्स एक्साम मध्ये चांगले मार्क्स मिळाले, त्याला MD MEDICINE ला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. श्रीराजचे स्वप्न पूर्ण झाले होते, त्याने केलेल्या कष्टांना फळ मिळाले होते. अभ्यासाचा लोड वाढल्याने मी श्रीराजशी फोनवर बोलणे कमी केले. फायनल इअर मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे हे एकच ध्येय समोर ठेऊन अभ्यास सुरू ठेवला.
बघता बघता फायनल इअर संपत आले, धावपळीत बिजी शेड्युल मध्ये वर्ष कसे संपले कळालेच नाही. फायनल एक्साम एक आठवड्यावर असताना श्रीराजने मला फोन केला,
श्रीराज--- हाय जान्हवी कशी आहेस?
जान्हवी--- मी ठीक आहे, एक्सामचे जाम टेन्शन आले आहे. तु कसा आहेस?
श्रीराज--- मी मस्त, एक्सामचे टेन्शन घेऊ नकोस, तु वर्षभर सातत्याने अभ्यास केला आहेस, तुझी एक्साम मस्त जाईल.
जान्हवी--- हो पण थोडेफार टेन्शन येतेच ना.
श्रीराज--- एक्सामचे टेन्शन येणे स्वाभाविकच आहे, पण अति टेन्शन घेणे घातक आहे, मी तुझा जास्त वेळ घेत नाही. स्वतःची काळजी घे, जास्त जागरण करू नकोस. एक्साम संपली की मला फोन कर मग निवांत बोलू. ऑल द बेस्ट.
जान्हवी--- थँक्स, बाय.
©®Dr Supriya Dighe