पहिली भेट भाग १५

Story of a friendship

पहिली भेट भाग १५

           माझी थर्ड इअरची एक्साम संपली, सर्व पेपर्स खूप छान गेले होते, आता MBBS पूर्ण होण्यासाठी फक्त एक वर्ष बाकी होते. एक्साम संपल्यावर खूप रिलॅक्स वाटत होते, प्रॅक्टिकल एक्साम एका आठवड्याने असल्याने यावेळेस घरी जाता येणार नव्हते. एक्साम संपल्यावर त्याच दिवशी श्रीराजचा मॅसेज आला होता की मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे, फ्री असशील तर फोन कर. मी लगेच रिप्लाय केला, रात्री ९ नंतर जेवण झाल्यावर फोन करते.

           श्रीराजला काय महत्त्वाचे बोलायचे असेल कुणास ठाऊक हाच विचार डोक्यात येत होता. रात्री जेवण झाल्यावर बरोबर ९ वाजता श्रीराजला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तेवढ्यात बाबांचा फोन आला, त्यांच्याशी बोलण्यात अर्धा तास कसा निघून गेला कळालेच नाही. फोन करायला उशीर झाल्यामुळे श्रीराज चिडणार ही भीती होतीच म्हणून पटकन श्रीराजला फोन लावला, दोन रिंग गेल्यावर श्रीराजने फोन उचलला, 

श्रीराज---- बोला मॅडम, आमच्याशी बोलायला वेळ भेटला वाटतं.

जान्हवी---- सॉरी श्रीराज, तुला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला पण तेवढ्यात बाबांचा फोन आला म्हणून तुला फोन करायला उशीर झाला, प्लिज रागावू नकोस.

श्रीराज---- इट्स ओके जान्हवी, मी रागावलो नाहीये, मला वाटलंच होत की तू कुठे तरी बिजी असशील.

जान्हवी---- श्रीराज आज खूपच समजदार असल्यासारखे बोलतोय.

श्रीराज---- मी आहेच समजूतदार. एक्साम कशी झाली?

जान्हवी---- एक्साम एकदम मस्त झाली.तुला माझ्याशी काय बोलायचे आहे?

श्रीराज---- अगं खूप काही महत्त्वाचे नाहीये, खूप दिवस झाले आपण बोललो नाही म्हणून बोलायचे होते बाकी काही नाही.

जान्हवी---- श्रीराज एवढा भाव खाण्याची काही गरज नाहीये, तुला जे काही बोलायचे आहे ते सरळ बोल. 

श्रीराज---- मी माझ्या बर्थडेच्या दिवशी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो त्यासाठी मला माफ कर, I am really very sorry.

जान्हवी---- Its ok श्रीराज, त्यात माफी काय मागायची, मी तुझा बर्थडे विसरायला नको होता, तुला राग येणे स्वाभाविकच होता.

श्रीराज---- राग येण्यापर्यंत ठीक आहे पण त्यावर दिलेली प्रतिक्रिया चुकीची होती.

जान्हवी---- मला तुझी त्यावेळेस दिलेली प्रतिक्रिया आवडली नव्हतीच पण माझी एक्साम असल्याने मी त्यावेळी त्या विषयावर बोलणे टाळले.

श्रीराज---- मला समजायला हवे होते की तुझी एक्साम होती तरी मी असा वागलो. I am feeling very guilty.

जान्हवी---- अरे ठीक आहे, सोड तो विषय, फक्त एवढंच लक्षात ठेव, आयुष्यात कधी पण रिऍक्ट होण्याआधी विचार करत जा म्हणजे पुढे जाऊन आपल्याच वागण्याचा आपल्याला पश्चाताप होत नाही. तुझी इंटर्नशिप कशी सुरू आहे?

श्रीराज---- इंटर्नशिप मस्त सुरू आहे, आम्ही सगळेच खूप मजा करत आहोत, कॉलेजचे शेवटचे दिवस राहिले आहेत, गेल्या पाच वर्षात सगळ्याच मित्रांशी खूप छान बॉण्ड तयार झाला आहे, इंटर्नशिप संपल्यावर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी जातील.

जान्हवी---- कॉलेज संपल्यावर सगळ्यांची खूप आठवण येईल ना.

श्रीराज---- हो ना. म्हणून तर राहिलेले दिवस फुल्ल एन्जॉय करायचे ठरवले आहे.

जान्हवी---- तुझ्याशी खूप दिवसांनी फोनवर बोलून मस्त वाटतंय.

श्रीराज---- तुझ्याशी बोललं नाही तर चुकल्या चुकल्या सारख वाटतं. तुला एक विचारु का?

जान्हवी---- विचार ना.

श्रीराज---- मला तुला भेटण्याची खूप इच्छा होत आहे, आपण भेटू शकतो का?

जान्हवी---- आपण नक्कीच भेटू शकतो पण कसं आणि कुठे?

श्रीराज---- त्याच्यावर मी विचार करतो, पहिले मला वाटलं होतं की तु भेटायला तयार होणार नाहीस. कॉलेज संपल्यावर माझा पीजी ला कुठे नंबर लागेल सांगू शकत नाहीत आणि नंतर तर मी खूपच बिजी होईल शिवाय तुझेही फायनल इअर चालू होईल.

जान्हवी---- तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे पण प्लॅन करताना सर्व विचार करून कर, उगाच घरी कळलं तर त्यांचा वेगळाच गैरसमज होईल.

श्रीराज---- घरच्यांचा काय वेगळा गैरसमज होईल मला समजलं नाही.

जान्हवी---- आपल्या घरच्यांना वाटू शकते की आपले सिक्रेट अफेअर चालू आहे, पण आपल्यात काय आहे नी काय नाही हे फक्त आपल्यालाच माहीत आहे.

श्रीराज---- अरे हो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. 

जान्हवी---- प्लॅन ठरला की मला सांग.

श्रीराज---- हो सांगतो, तुला झोप आलेली दिसतेय.

जान्हवी---- हो, एक्साम मुळे नीट झोपच मिळाली नाहीये, आता मी झोपते, नंतर बोलूयात, बाय गुड नाईट.

                 दुसऱ्या दिवसापासून प्रॅक्टिकल एक्साम ची तयारी सुरू झाली, सर्व गडबडीत श्रीराजशी बोलणेही राहून गेले होते. श्रीराजनी भेटीचा प्लॅन ठरवण्यासाठी माझे प्रॅक्टिकल एक्सामचे टाईम टेबल माघून घेतले, प्लॅन असा ठरला की शेवटची प्रॅक्टिकल एक्साम झाल्यावर एक दिवस मी घरी न जाता कॉलेजलाच थांबायचे व श्रीराज मला भेटायला कॉलेजला येणार होता.

               आमचा प्लॅन ठरल्यावर मी घरी फोन करून सांगितलं की प्रॅक्टिकल एक्साम संपल्यावर माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे तर आम्ही तिचा वाढदिवस साजरा केल्यानंतरच सर्व मैत्रिणी आपापल्या घरी जाणार आहोत. मी मार्केटमध्ये जाऊन श्रीराजला गिफ्ट देण्यासाठी परफ्यूम घेतला होता त्यासोबत एक ग्रीटिंग कार्ड पण घेतले होते. मी श्रीराजला भेटण्यासाठी खूपच एक्सायटेड झाली होती.

               माझे शेवटचे प्रॅक्टिकल झाले, एक्साम संपली याच्या आनंदापेक्षा मला श्रीराजला भेटायला मिळणार या गोष्टीचा जास्त आनंद झाला होता. आमच्या प्लॅनप्रमाणे श्रीराज दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईहून लवकर निघणार होता. मी श्रीराजला रिसिव्ह करण्यासाठी बस स्टँडवर जाणार होती, अस सगळं ठरलं होते. रात्री आमच्या दोघांमध्ये व्यवस्थित बोलणंही झाले होते. श्रीराजला भेटायला मिळणार या विचाराने रात्री झोपही लागली नाही. 

             रात्री झोप न लागल्याने सकाळी लवकर जाग आली, पटकन उठून फ्रेश झाले, चांगले कपडे घालून तयार होऊन बसले, कधी एकदा श्रीराजची यायची वेळ होईल असे झाले, श्रीराज मला बस पोहोचण्याआधी फोन करणार होता, मी श्रीराजच्या फोनची वाट पाहत होते. थोड्याच वेळात श्रीराजचा फोन येण्याऐवजी मॅसेज आला होता, मी मॅसेज लगेच चेक केला, त्यात असे लिहिले होते की, सॉरी जान्हवी इमर्जन्सी आल्यामुळे मी तुला भेटायला येऊ शकत नाही, मी रात्री फोन करून सगळं सांगतो, प्लिज गैरसमज करून घेऊ नकोस. मॅसेज वाचल्यानंतर माझ्या डोळ्यातच पाणी आलं, मी किती एक्सायटेड होते श्रीराजला भेटण्यासाठी, मी बाबांशीही खोट बोलले होते, ही दुसरी वेळ होती की श्रीराजला भेटता नाही आले. मला खूप जास्त वाईट वाटतं होते, अशी काय इमर्जन्सी आली असेल की श्रीराजला मला भेटायला येता आले नाही, रात्रीपर्यंत तर सर्व ठीक होते, मग अस अचानक काय झालं असेल? श्रीराज मला टाळत तर नसेल ना. माझ्या मनात वेगवेगळ्या शंका येत होत्या. श्रीराजचा फोन आल्याशिवाय माझ्या शंकांचे निरसन होणार नव्हते.

 श्रीराजला कोणती इमर्जन्सी आली असेल बघूया पुढील भागात.

©® Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all